साहित्य : पिवळी मूगडाळ एक कप, पिठीसाखर, साजूक तूप, जायफळ, वेलदोडा, मिक्सर व सपिटाची चाळणी.
कृती : जड बुडाच्या कढईमधे मुगाची डाळ मध्यम आचेवर कोरडी भाजावी. किंचित गुलाबी रंग आला की पुरे.
ताटात पसरून गार होऊ द्यावी. गार झाल्यावर मिक्सरमधे बारीक दळून घ्यावी. सपिटाच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.
वर राहिलेला चाळ पुन्हा एकदा दळून घ्यावा आणि चाळून घ्यावा. हे चाळलेले पीठही किंचित रवाळ असावे.
आता गरम कढईत पीठ घालून परतायला सुरुवात करावी व एकीकडे लागेल तसे तूप घालत रहावे. ह्या लाडवांना बेसनाच्या
लाडवांइतके तूप लागत नाही तेव्हा बेताने घालावे. डाळ आधीच भाजून घेतल्याने आता लगेचच खमंग वास यायला सुरुवात होते
तेव्हा आच बंद करावी. पीठ ताटात पसरून ठेवावे. पीठ कोमट झाल्यावर त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून
मिसळून घ्यावे. पीठ हाताला कोरडे वाटल्यास चमचाभर पातळ तूप वरून घालावे व बेताच्या आकाराचे लाडू बांधावेत.
एक कप डाळीचे बेताच्या आकाराचे दहा लाडू होतात.
हे लाडू पौष्टिक आहेत सहाजिकच ही पाककृती माझ्या आईची आहे ;).
[वरीलप्रमाणेच हिरव्या(सालासह) अख्ख्या मुगाचेही लाडू होतात.
हिरवे मूग जपून भाजावेत रंग बदलू देऊ नये, आच मध्यम ठेवावी, नाहीतर लाडू काळे होतात.]
रेवती
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 8:23 am | सहज
फोटो मस्तच.
4 Feb 2009 - 9:15 am | टारझन
मला वाटलं .. "मृगाचे लाडू" की काय .. अंमळ कसंच कसंच झालं ..
अवांतर : वा ! पाकृ झकास आहे .. .बणवता येणार णाय .. पण कधी योग आला तर सगळी हिष्ट्री रिपीट करायला लावणार आहे काकुंस ..
- टारझन
4 Feb 2009 - 8:24 am | मीनल
खावेसे वाटत आहेत.
मीनल.
4 Feb 2009 - 8:50 am | सुचेल तसं
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
4 Feb 2009 - 8:28 am | शितल
रेवती,
सोपी आणी छान पाककृती :)
फोटो पाहुन पटकन एक लाडु उचलुन खावासा वाटतो ;)
करून बघेन आणि तुला कळविणच. :)
4 Feb 2009 - 8:33 am | विसोबा खेचर
हम्म! पाकृ बरी वाटली. पण केव्हातरी बेसनाच्या किंवा मोतीचुराच्या खुमासदार खमंग लाडवांची पाकृ पण द्या बर्र का! :)
जाता जाता -
रेवतीतै,
कधी काळी आम्ही "लाडू" या विषयावर मनोगतावर विस्तृत भाष्य केलं होतं ते सवड मिळाल्यास इथे वाचा! :)
तात्या.
4 Feb 2009 - 7:30 pm | रेवती
आपला लाडूंवरील लेख वाचला.
लाडू आवडण्याच्या प्रकारावरून स्वभाव ओळखणे हा विचारच गमतीशीर आहे.
रेवती
4 Feb 2009 - 8:44 am | रामदास
देशस्थ दिसतायेत आणि काही कोकणस्थ.
हा काय प्रकार आहे बरं?
(तुलना ह.घ्या.)
4 Feb 2009 - 8:52 am | सहज
आकाराने सारखेच दिसत आहेत. ;-)
4 Feb 2009 - 2:48 pm | शाल्मली
कारण काही लाडू हे मुगाच्या डाळीचे (पिवळे) आहेत.
आणि काहीचे हिरव्या मुगाचे सालासकट आहेत. जे थोडेसे हिरवट दिसत आहेत.
--शाल्मली.
4 Feb 2009 - 9:23 am | प्राजु
फुटाण्याची डाळ.. म्हणजेच डाळं.. त्याचेही लाडू असेच मस्त होतात.
पाकृ. मस्तच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 9:46 am | मदनबाण
.
4 Feb 2009 - 9:45 am | मदनबाण
मूगाचे लाडू मस्तच दिसत आहेत... :)
अजुन कधीच खाल्ले नाहीत !!! :(
(अळिवाच्या लाडूच्या शोधात...) :)
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
4 Feb 2009 - 12:55 pm | अनंत छंदी
रेवतीताई
लाडू झकासच! अशाच नव्या पाकृ द्या.
4 Feb 2009 - 1:14 pm | श्रावण मोडक
मुगाच्या या लाडवांसाठी गूळ वापरून पहा. मुगाची डाळ भाजून घेतलेली असल्याने त्यात गुळाचा गोडवा खमंगपणाची बहार आणतो.
हे लाडू पौष्टिक आहेत सहाजिकच ही पाककृती माझ्या आईची आहे Wink.
हे बाकी खासच.
4 Feb 2009 - 7:34 pm | रेवती
गूळ घालून केलेला लाडू मी एकदाच खाल्ला होता.
त्यावेळी फारसा आवडला नव्हता. आता आवडेल असे वाटते.
गूळाने पदार्थ खमंग होतात पण मुलांना आजकाल साखरेचे आवडतात असा अनुभव आहे म्हणून साखरेचे केलेत.
रेवती
4 Feb 2009 - 1:23 pm | आपला अभिजित
मुगाचे लाडू एकदम चविष्ट लागतात.
आजीची आठवण झाली. (असं म्हणायची पद्धत आहे म्हणून नव्हे, खरंच झाली!)
घरी कुरियरने पाठवाल? व्यनि वर पत्ता देतो.
4 Feb 2009 - 1:25 pm | आपला अभिजित
साहित्य : पिवळी मूगडाळ एक कप, पिठीसाखर, साजूक तूप, जायफळ, वेलदोडा, मिक्सर व सपिटाची चाळणी.
साहित्य = मिक्सर!
हे भयंकर आवडलं!!
4 Feb 2009 - 7:50 pm | रेवती
भारतात आल्यावर लाडू पाठवणे जमेल पत्ता पाठवा.
साहित्यात मिक्सर व सपिटाची चाळणी लिहिली आहे कारण नवशिके, अविवाहीत यांच्याकडे सगळ्या वस्तू असतातच असे नाही.
पदार्थ करायला उत्साहाने सुरूवात केल्यावर आपल्याकडे अमूक एखादी वस्तू नाही असे लक्षात आल्यावर हिरमोड होतो, तो होवू नये म्हणून हा प्रकार.
रेवती
4 Feb 2009 - 1:56 pm | वल्लरी
पाकृ. नी फोटो मस्तच.... :)
---वल्लरी
4 Feb 2009 - 2:45 pm | शाल्मली
रेवतीताई,
मस्तच आहे पाकृ.
लगेचच करून पहाते आणि सांगतेच तुला. :)
फोटोही सही!
मला फक्त एक सांग की मुगाच्या डाळीच्या तू सांगितलेल्या प्रमाणासाठी साधारण किती पिठीसाखर लागेल?
--शाल्मली.
4 Feb 2009 - 5:29 pm | रेवती
आपल्याला जितके गोड आवडते तितकी पिठीसाखर घालावी.
एक मेजरींग कप डाळीसाठी साधारण पाच टेबल्स्पून्स गच्च भरून असे प्रमाण मी घेते.
वाटल्यास थोडी कमीजास्त करता येइल.
रेवती
4 Feb 2009 - 7:43 pm | चकली
पाकृ छान आहे. मी कधी खाल्ले नाहित
पण आता करून बघेन!
चकली
http://chakali.blogspot.com
4 Feb 2009 - 10:03 pm | रेवती
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!
रेवती
5 Feb 2009 - 6:24 am | चित्रा
लाडू छान दिसतायत. मुलांना तर नक्कीच आवडतील असे वाटते.
5 Feb 2009 - 6:33 am | भाग्यश्री
मुगाचे लाडू पाहून खरंच आजीची आठवण झाली!! नेहेमी करायची ती! आता नाही करत.. :|
http://bhagyashreee.blogspot.com/
5 Feb 2009 - 9:00 am | स्वाती दिनेश
रेवती, लाडू मस्त दिसत आहेत,:)
स्वाती
5 Feb 2009 - 11:47 am | अनंत छंदी
रेवतीताई
नुसती पाककृती वाचून आणि फोटो पाहून ऑर्डर्स यायला लागल्या, म्हणजे आता नवा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही. चितळे बाकरवडीसारखा रेवती ब्रँड मुगाचे लाडू प्रसिद्ध व्हायला हरकत नाही. :))
(रागावू नका बरं का!)
9 Feb 2009 - 4:17 pm | वीपशा
फुटाण्याची डाळ.. म्हणजेच डाळं ह्यचि पाककृती वेगलि आहे, मुगाचे लाडू ह्या पाककृती पेक्शा :S
9 Feb 2009 - 8:09 pm | रेवती
पुन्हा एकदा आपले आभार!
रेवती
16 Sep 2010 - 2:50 am | समिधा
रेवती मुगाच्या डाळीचे पिठ वापरुन पण करता येतील का गं?
माझ्या कडे मुगाचे पिठ आहे त्याचे करुन बघेन.
16 Sep 2010 - 6:15 am | रेवती
विकतचे मुगाचे पीठ अगदी बारीक आहे का?
लाडवांसाठी थोडे रवाळ हवे आहे. प्रयत्न करायला हरकत नाही.
चाळलेले पीठ तूप घालून भाजण्याच्या पायरीपासून सुरुवात करावी लागेल.
16 Sep 2010 - 3:21 am | बहुगुणी
नुसता फोटो पाहून जेवणानंतरही भूक लागली! :-)
(ही पाककृती आधी वाचायची राहूनच गेली होती, तेंव्हा तिच्या 'उत्खनना'बद्दल 'समिधा' चे आभार!)
रेवती ताई: तो 'अनंत छंदीं'नी वरती सुचवला आहे तो 'रेवती ब्रँड' अस्तित्वात आहे का हो, असल्यास कळवा म्हणजे ऑर्डर देता येईल :-)
[आंध्रात 'सुन्नुंडालु' की अशाच काहीशा नावाचे उडदाच्या डाळीचे लाडू करतात, त्याची साग्रसंगीत पाककृती इथे आहे.]
16 Sep 2010 - 6:19 am | रेवती
हा हा! होय हा रेवती ब्रँड म्हणायला हवा.
पत्ता कळवा, पाठवून देते.
उडदाच्या डाळीचे लाडू (अगदी आंध्र स्टाइल) भयंकर आवडले.
त्यांच्याकडे बाळंतीणीला देतात. भरपूर प्रथिने!
16 Sep 2010 - 4:07 am | इंटरनेटस्नेही
मस्त!
16 Sep 2010 - 6:22 am | रेवती
पुन्हा हा धागा वर आल्याने बर्याच दिवसात मिपावर पाकृ न दिल्याचे लक्षात आले (अर्थात त्यावाचून काही अडले नाही ही गोष्ट वेगळी!;)). आता लवकरच देइन. समिधा, बहुगुणी व इंटरनेटस्नेही, आपले आभार! :)
16 Sep 2010 - 6:29 am | प्रभो
फटू मस्त...
रव्याचे लाडू बनवल्यावर पार्सल धाडणे... :)