आजच्या 'इ-सकाळ'मधे ही बातमी वाचनात आली. बातमी ऐकून मजा वाटलीच आणि या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आपण एका मोठ्या जंगी सामन्यापासून दूर राहीलो याबद्दल खेदही वाटला.
प्रस्तुत बातमीत अनेक समिक्षकानी वेगवेगळ्या कविना आणि त्यांच्या कवितांना धारेवर धरले. तसेच कवींची केवळ रोमँटिक कविता केल्याबद्दल हेटाळणी केली. नंतर एका कविराजानी या सर्व टीकाकारांचा उपरोधिक शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केल्यावर मात्र संबंधित समिक्षक चिडले व गोंधळ सुरू केला. अधिक माहीती वरील दुव्यावर वाचावी.
तर मिपाकर मित्रहो आपणाला याबद्दल काय वाटते?
मला खालील गोष्टी वाटल्या
१. चांगल्या कविंच्या कवितावाचनाचा कार्यक्रम वगैरे ठेवण्याऐवजी साहीत्य संमेलनात '१९७०-१९९० मधील मराठी कविता' असे फुटकळ विषयावर हे लोक चर्चासत्र का आयोजित करतात.
२. एखादे वादग्रस्त विधान केल्याशिवाय समिक्षकाला समिक्षेच्या परिक्षेत पास करत नाहीत काय?
तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बातमी मजेदार आहे ! वर्षातून अनेकदा अशा चर्चासत्राचे आयोजन केले जाते. महाविद्यालयांना, विद्यापीठ अनुदान आयोग अशा चर्चा सत्रांना अनुदान देत असल्यामुळे अशी चर्चासत्रे घ्यावीच लागतात. तेव्हा... 'साठोत्तरी कविता' पासून ते या 'दशकातील कविता' यावर समीक्षक मोजके कविता संग्रह वाचून ती कविता रोमॅन्टीक आहे, सामाजिक आहे, कोणत्या प्रभावाची आहे, खूप काथ्याकूट करतात, आणि एक श्रोता म्हणून ते वाचायला आणि ऐकायला मजा येते.
२. एखादे वादग्रस्त विधान केल्याशिवाय समिक्षकाला समिक्षेच्या परिक्षेत पास करत नाहीत काय?
तसे न केल्यास तो उत्तम समीक्षक ठरत नाही :)
'मराठी संकेतस्थळावरील कविता एक अभ्यास' असा एक चर्चा प्रस्ताव कोणीतरी टाकावा आणि समीक्षक म्हणून त्यावर सर्वांनी टोलेबाजी (गंभीरपणे) करावी असे मात्र आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4 Feb 2009 - 9:42 am | संदीप चित्रे
अभिनंदन !
त्या समीक्षकांनी वापरलेली भाषा त्यांची त्यांना तरी कळलीय की नाही माहिती नाही.
4 Feb 2009 - 1:44 pm | ऍडीजोशी (not verified)
या काळातील कवी रोमॅंटिसिझममध्येच रमल्याचे विधान प्रा. पुष्पा राजापुरे यांनी केले.
या काळातील कवितांनी सामाजिक घटनांवर आपली प्रतिक्रिया कवितेतून नोंदवली नसल्यामुळे त्यांची कविता आत्मकेंद्रित झाली.
श्रीधर तिळवे यांनी या काळातील मराठी कवितेत प्रचंड 'केऑस' निर्माण झाल्याचा आक्षेप नोंदविला.
अर्थांची अनेक वलये ओलांडणाऱ्या कविता या कवींना लिहिता आल्या असत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे कवी त्याच भोवऱ्यात फिरत राहिल्यामुळे त्यांच्या कविता व्यापक झाल्या नाहीत,
=))
ह ह पु वा
ह्या विधानांना काहिही अर्थ नाही. ज्यांनी केलीत त्यांनाही सांगता येणार नाही. कुणी नेमलं ह्यांना परिक्षक?????
4 Feb 2009 - 3:04 pm | सुचेल तसं
श्रीधर तिळवे अतिशय फडतूस कविता लिहीतात. चिंतन आदेश ह्या मासिकात त्यांच्या हीन दर्जाच्या कविता वाचल्याचं आठवतं...
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
4 Feb 2009 - 2:24 pm | प्रभाकर पेठकर
सामाजिक भान जागविणार्या कविता म्हणजेच उच्च काव्य हा समिक्षकांचा समज चुकिचा आहे असे वाटते. रोमँटीक कवितांना हीन का लेखावे?
प्रा. बागवे ह्यांनी समिक्षकांच्या असमतोल समिक्षांचा अत्यंत मोजक्या शब्दात प्रतिवाद केला आहे.
4 Feb 2009 - 2:48 pm | झेल्या
अगदी 'संध्याकाळच्या कवितां'पासून "मितवा'पर्यंतच्या कविता वाचल्यानंतर ग्रेस यांनी केवळ कवितेचा आभास निर्माण केल्याचे जाणवते. त्यांनी शुद्ध कविता लिहिलीच नाही, असे प्रा. तापस म्हणाले.
'शुद्ध कविता' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे देव जाणे.
इथुन पुढे प्रत्येक कवीने कविता केल्यावर कागद गोमुत्रात २-३ दिवस भिजत ठेवणे.
इतकी वर्षे लिहिणाऱ्या कवींना अशा प्रकारे विद्यापीठीय समीक्षेच्या फूटपट्ट्यांनी झोडपणे योग्य नाही
=))
या सर्व समीक्षकांकडून जबरदस्तीने (त्यांना हव्या तशा) काव्यरचना करवून घेतल्या पाहिजेत आणि मग बघूया हे काय दिवे लावतात ते...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
5 Feb 2009 - 10:36 am | आचरट कार्टा
>>>ग्रेस यांनी केवळ कवितेचा आभास निर्माण केल्याचे जाणवते. त्यांनी शुद्ध कविता लिहिलीच नाही
कुणातरी मोठ्ठ्या, यशस्वी माणसाला शिव्या दिल्याशिवाय समीक्षा केल्यासारखं वाटतच नाही का यांना?
बाकीचे चुत्ये म्हणून ग्रेसांना मोठे म्हणतात. आम्ही नाही... काय हा अट्टाहास?
>>>'शुद्ध कविता' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे देव जाणे.
>>>इथुन पुढे प्रत्येक कवीने कविता केल्यावर कागद गोमुत्रात २-३ दिवस भिजत ठेवणे.
=))
बरं यातला कुणी खूप जबरी कविता करतोय, असं कधी ऐकल्याचं आठवत नाही.
अवांतरः वार्यावरची वरात मधलं एक वाक्य आठवलं.
"अहो तुमचं अजून लग्न नाही झालं, आणि बालसंगोपनावर व्याख्यान देणार तुम्ही?... अर्थात,गोवर्या कश्या थापायच्या हे कळायला बैल कुठे व्हायला लागतं?!"
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
4 Feb 2009 - 3:06 pm | मैत्र
नवीन कविता तर फारशी निर्माण होत नाहीये. आणि हे चाळीस वर्षापूर्वी च्या कवितेच्या केऑस बद्दल वाद घालतायत.
हा कोण माणूस आहे तापस? ग्रेस यांनी कविता लिहिलीच नाही. म्हणजे जर छंदात आणि सरळ कविता लिहिली नाही तर ती कविताच नाही? मग मर्ढेकरांबद्दल काय म्हणतात हे विद्वान?
आणि हो आत्मकेंद्रित झाली म्हणून किंवा रोमँटिक असली तर काय बिघडलं? कविता किती उत्तम होती ते महत्त्वाचं!
मग शंभरात एकही चांगली नाही कशावरून ? कारण ती प्रेम कविता आहे?
फक्त त्यांच्या बाजूने एक गोष्ट म्हणजे बागवे यांनी हे खोडून काढणारी त्या काळातील कवितांची कोणती उदाहरणे दिली ते काही बातमी मध्ये नाही...
नवीन कविता लिहित तर नाहीत ... फालतू वाद.