शेयर मार्केट - एक अंदाज

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
31 Jan 2009 - 1:08 pm
गाभा: 

एक ईनो'द -: ह्म्म्म्म ! पडलं पडलं ! मार्केट पडलं ! हे गाणे... आम्ही मागच्या सहा महिन्यात हजारदा गायले... मला गायक म्हनून पुरस्कार मिळायला पाहीजे एवड्यावेळा गायले :D

************

कंपन्यांचे तीमाहीचे निकाल आले, अपेक्षेप्रमाणे रिलायन्स ने जास्त घरसगुंडी नाही दाखवली व बँकांनी आपले निकाल छानच दाखवले त्यामुळे अजून तरि मार्केटवर विश्वास + मध्ये आहे, रिसर्व बँकेच्या व्यवस्थीत धोरणामुळे का असे ना बँका प्रॉफिट दाखवू शकल्या हेच चांगले आता लोकांना परत सुवर्णकाळाची म्हणजेच मार्केट १२०००-१३००० च्या पुढे जाण्याची स्वप्ने दिसायला चालू झालीच असतील ;)

अमेरिकेतील बँकांना सावरण्यासाठी अमेरिका सरकारला धरलं तर चावतयं सोडलं तर पळतयं अशी कंन्डीशन मध्ये बसवले आहे पण भारतीय बँकाची सध्याची परिस्थीती बघता स्वप्न बघायला माझी काहीच हरकत नाही पण त्या स्वप्नाचा पुर्ण होण्याचा कालावधी किती असेल ह्यात काही च माहीत नाही.. हा काळ एक-दोन वर्षापेक्षा पण जास्त असू शकतो अथवा तीन-चार वर्षावर देखील जाउ शकतो. सिटी बँकला सावरण्यासाठी अमेरिकेला अक्षरशः पैसा ओतावा लागला... पण अश्या पध्दतीने किती संस्था वाचवणार ? जॉब कट चालू झालेच आहेत... आकडे पण जबरदस्त !

इंग्लड मध्ये बार्कलेज बँक चे राष्ट्रीयकरण करण्याची वेळ आली... खजाना आटू लागला की काय करावे हेच कळत नाही... कसे वाचावे ह्यातून. मागे भारतात आयसीआयसीआय बँक पळणार... बुडणार.. अशी बातमी उडाली व मार्केटची तारांबळ उडाली ;) बँकांचे निकाल चांगले आले म्हणून जास्त खुष होण्याचे पण कारण नाही.. एकदा लोकसभा निवडनुका होऊ दे ... जून-जुलै मध्ये निकाल येऊ दे तिमाहीचा.. मग पाहू.. पण एक मन म्हणत आहे... कंसोलिडेशन काळ बघणे हे आपल्या नशीबी नक्कीच आहे .. कुणाचा फुगा लवकर फुटतो ते पाहू.. !

ओबामा आला ओबामा आला... अहो आताच आला आहे जरा बसू द्या... दम खाऊ द्या.. त्याला आपल्याला काय काम करायचे आहे हे तरी पाहू द्या.. तो काय जादुगार आहे थोडीच... की देव आहे... आल्या आल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था पळू लागेल ! नाय शक्य नाय. ! सध्या तरी ह्या वर्षात तरी... शक्यच नाही.. मागचे खड्डे येवढे मोठे आहेत की ते भरुन काढायला अमेरिकेचा रस निघणार... जगातील सर्वात मोठी अर्थ व्यवस्था ! तर तीचे लफडे पण तेवढेच मोठे ! त्यामुळे ओबामा फॅक्टर चा सध्या काही उपयोग नाही.

काल सोनं कडाकले... एकदम १४१७५ च्या वर उडी ! एका दिवसात मज्जा आली काही जणांना अहो सोनं पळणारचं .. लोकांना शेयर मार्केटवर काडी ईतका पण विश्वास राहीला नाही तर मोठ मोठ्या गुंतवणूक करणा-या कंपन्यांना कुठे राहील... काल इग्लड मध्ये सोन्यावर झालेली उलाढाल बघण्यालायक होती .. मग आता सोन्यात गुंतवणूक करावी का ? ह्म्म्म हरकत नाही पण लॉन्ग टर्म साठी नाही... थोडा प्रॉफिट घे णे व बाहेर पडणे हा नियम माहीत असला तरच सोन्याकडे बघा.. लालच बुरी बला ! कारण सोन्याची वर जाण्याचा व खाली येण्याचा वेग आफाट आहे.. त्या वेगाला समजणे गरजेचे !

मार्केट ह्या येणा-या महीन्यात ८१०० ते ९५०० / ९८०० च्या आसपासच इकडे उडी तीकडे उडी करत बसणार .. माझं म्हणणं आहे लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट आताच नको, जरा मार्केटची पातळीचा अंदाज घ्या तेव्हाच, अजून तर मंदीची सुरवात झाली आहे... पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फैडरल बैंक, सत्‍यम कंप्‍यूटर, एल एंड टी, एनटीपीसी, भारत बिजली, करुर वैश्‍य बैंक, स्‍टेट बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ इंडिया, जी एंटरटेनमेंट एंटरपइनव्हेस्ठे सध्या नफा देणारे शेअर आहेत माझ्या मते.. पण लॉन्ग टर्म वाल्यांनी दुरच राहवे, सत्यम ५० वर येत आहे... ह्याचा डाऊन फ्लो ४६ चा आहे.. एकदा का तो त्याच्या अप रेशो.. ६२ च्या पुढे गेला तर तो नक्कीच ८७-८९ च्या पर्यंत जाईल पण ह्याचा वर खाली होण्याचा रेशो सध्या खुप भयानक आहे हा लहान रक्कमेचा शेयर सध्या सट्टोडीयाचा पसंदचा शेयर आहे... पण हाता धुन घेण्यास काहीच हरकत नाही.. !

सत्यम मुळे सामान्य लोकांचा विश्वास उडालाच आहे मार्केट मधून पण प्रत्येक गोष्टीला एक एंड असतोच त्यामूळे हे दिवस पण जातील व नवीन युगाची सुर्वात पण होईल पण त्यासाठी धीर हवा ज्यांनी मार्केट आपल्या शिखरावर होती त्या काळी ज्यांनी शेयर घेतले आहेत त्यांनी आपले शेयर तसेच ठेवा.. विकु नका.. कारण त्यावेळी पण तुम्ही लॉन्ग टर्मचा विचार केलाच असेल.. ! कधी कधी फसगत होते पण ह्यावर कोणाचाच उपाय नाही.. ना कंट्रोल नाही, पण आता मंदीच्या काळात तुम्ही चढ्या भावला घेतलेल्या शेयर जर रद्दी भावामध्ये मिळत असेल तर आपल्या जवळची थोडी पुंजी खर्च करुन तुम्ही आपल्या चढ्या भावाच्या शेयर चा लॉस रेशो कमी करु शकताच की.

पण एक सुचना देतो मार्केट बद्द्ल कोण काय बोलतो आहे ह्याकडे लक्ष देऊ नका.. वाचा विचार करा व आपल्या मनाने निर्णय घ्या तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल ! हे मार्केट आहे... ते एकदम जबरदस्त आहे... जी शहाणी माणसे आहेत ती पडत्या मार्केट मधून पण पैसा उभा करतात.. सकाळी उघडतात आपले एकाऊट एका शेयर वर नजर ठेवतात... त्याचा वर्-खाली चा गॅप पकडतात त्याचा भाव फिक्स करतात की कधी घ्यायचा व कधी विकायचा.. अगदी दहा पैशापासून ३० पैसे पर्यंत प्रॉफिट फिक्स करतात कमवतात व अकाऊट बंद करुन दिवस भर बाकी काम करतात ! कसे ?
बघा.. इस्पात चा अपडाऊन रेशो ८० पैसे आहे.. सत्यमचा रेशो सध्या ८ रु पर्यंत सुधा आहे !
ते कसे करतात इस्पात पकडला समजा १२.२० पैसे ला... १२.२० च्या दराने दहा हजार बाय अथवा सेल (एक लाख बारा हजारची गुंतवणूक) १२.२० ला जर बाय असेल तर १२.४० / १२.५० /१२.६० ला सेल ! समजा त्याने १२.४० लाच विकला तर २००० रुपये कमाई काही मिनिटातच ;) रिलायन्स सारख्या कंपन्या तुम्हाला इंन्ट्रा डे साठी ५ गुणा क्रिडीट देतात (तुमच्या अकाऊट मध्ये ५ हजार आहेत तर इन्ट्रा डे साठी तुम्ही २५००० पर्यंतचे शेयर घेऊ शकता) पण हा खेळ आहे रिक्स घेण्याची ताकत हवी.. जरा गडबड झाली तर लाखाचे बारा हजार व्ह्याला वेळ लागत नाही.. मार्केट चा ट्र्न्ड समजने महत्वाचे आहे.. पण सयम हवा ! मार्केट समजण्याची गती हवी तेव्हाच नाही तर भले भले बरबाद होतात.. !

* मी खरेदी / विक्री करा असे तुम्हाला सांगत नाही आहे, आपापल्या विवेकबुध्दीला जागून निर्णय घ्या. हे सगळे माझे स्वतःचे विचार आहेत असेच करा असा सल्ला नाही. तुम्हाला जर फायदा झाला तर आनंदच आहे त्या काय हिस्सा नको ;) पण लॉस झाला तर त्यापण हिस्सा नकोच !
विचार करा, मार्केट समजा व मग निर्णय घ्या.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

31 Jan 2009 - 1:12 pm | अवलिया

शेअर मार्केट म्हणजे काय?

*
वर्स्ट इज यट टु कम. बी प्रीपेअर्ड.
*

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन's picture

31 Jan 2009 - 1:23 pm | दशानन

तुला माहीत नाही :?

=))

:D

काय तरी व्यवस्थीत प्रतिसाद दे.. मार्केट बद्दल चे विचार मांड आपले !
उगाच नाटक !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अवलिया's picture

31 Jan 2009 - 1:26 pm | अवलिया

काय तरी व्यवस्थीत प्रतिसाद दे.. मार्केट बद्दल चे विचार मांड आपले !
उगाच नाटक !

का ? लोकांनी मला मारावे असे वाटते तुला... !! असो.
वरती नीट बघ दोन * मधे माझा व्यवस्थित प्रतिसाद आहे.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन's picture

31 Jan 2009 - 1:29 pm | दशानन

ह्म्म्म !

बरोबर आहे पण किती खाली जाईल ! ह्याचा अंदाज ?
इन्ट्रा डे काय वाइट आहे :?

अथवा एफ & ओ ?

२९ तारखे पर्यत ! म्हणजे कमीत कमी २० दिवस तरी मिळतातच की !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अवलिया's picture

31 Jan 2009 - 1:35 pm | अवलिया

बरोबर आहे पण किती खाली जाईल ! ह्याचा अंदाज ?
५०००-६००० ला टच करेल येत्या काही काळात असे वाटते.

इन्ट्रा डे काय वाइट आहे
अजिबात वाईट नाही. पण ज्यांची ताकद आहे अशांसाठीच... अंगावर पडले किंवा मार्जिन गेले तर तयारी हवी...

अथवा एफ & ओ ?
परत वरचेच...

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन's picture

31 Jan 2009 - 1:37 pm | दशानन

>>५०००-६००० ला टच करेल येत्या काही काळात असे वाटते.

म्हणजे कमाईचा चान्स आहे ना मग !

आता धंदा म्हटल्यावर जरा रिस्क घ्यावीच लागते त्यात काय !

माझे एफ & ओ स्केयर ऑफ झाले माग झटक्यात... सगळं बुडीत खाते.. म्हणून काय एफ & ओ सोडू... नाय उलटी गंगा पकडली ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2009 - 9:43 pm | llपुण्याचे पेशवेll

भाऊ स्टॉक मार्केट म्हंजे रे काय?
पुण्याचे पेशवे
Since 1984

दशानन's picture

31 Jan 2009 - 2:25 pm | दशानन

आताच बातमी आली हाती !

इंडीयन ऑइल ने ४१.१ % शुध्द लाभ आपल्या निकालात दिला...

चला सोमवार पर्यंत अजून काही न्युज येतीलच.. चांगल्याच येऊ देत म्हणजे जरा मार्केट + राहिल नाय तर आहेच नेहमीचं रडगाणे ;)

****
न्युज येइल ह्याची वाट बघत होतो तोच न्युज आली !

सत्यम ला स्टैंचार्ट, एचडीएफसी और आईडीबीआई कर्ज देणार !

ह्याचा पॉझिटीव्ह सोमवारी दिसेलच, सत्यम माझ्या कडे १६ रु. भावाने आहे.. सोमवारी जर चढला तर आपला ६२ चा अप रेशो तो नक्कीच पार करेल !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

मृगनयनी's picture

31 Jan 2009 - 3:03 pm | मृगनयनी

पण एक सुचना देतो मार्केट बद्द्ल कोण काय बोलतो आहे ह्याकडे लक्ष देऊ नका.. वाचा विचार करा व आपल्या मनाने निर्णय घ्या तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल ! हे मार्केट आहे... ते एकदम जबरदस्त आहे... जी शहाणी माणसे आहेत ती पडत्या मार्केट मधून पण पैसा उभा करतात.. सकाळी उघडतात आपले एकाऊट एका शेयर वर नजर ठेवतात... त्याचा वर्-खाली चा गॅप पकडतात त्याचा भाव फिक्स करतात की कधी घ्यायचा व कधी विकायचा.. अगदी दहा पैशापासून ३० पैसे पर्यंत प्रॉफिट फिक्स करतात कमवतात व अकाऊट बंद करुन दिवस भर बाकी काम करतात ! कसे ?

राजे, तुमचं हे तत्वज्ञान फार आवडले. तुम्ही खूप शाह नामा नुस आहात!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 5:54 pm | महेंद्र

कार्ट्याचं वाचलं लिहिलेलं..
अरे राजा, माझी पुंगी ऑलरेडि वाजली आहे.. अख्खा पोर्ट्फोलियो लाल झालाय.
७चे २-१/२ झालेत..
आता पुरे~ असं म्हणायची वेळ आली आहे.

"जी शहाणी माणसे आहेत ती पडत्या मार्केट मधून पण पैसा उभा करतात"
आयला म्हणजे मी वेडा की काय?? :)

दशानन's picture

31 Jan 2009 - 5:58 pm | दशानन

तुमचा पोर्टफोलिओ कळवता का जरा ?

काय करता येऊ शकते हे पाहतो बाकी... गाजराची पुंगी आहे... शेवटी खाऊ तर नक्कीच शकतो ना ;)

ह. घ्या. तुमच्या दुखःत मी पण सहभागी आहेच ! सहभागी ह्यासाठी माझे पण काही शेयर आहेत जे लाखाचे बारा हजार नाही पंण लाखाचे २४ हजार जरुर करत आहेत. सगळ्यांनीच मार खालला आहे मागील वर्षी !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 6:08 pm | महेंद्र

मेन स्टफ आयटी.
आणि आर्पीएल १२००
इन्फी, टिसिएस, एच्सिएल, टिव्हिएस, रिलायन्स पावर, एल & टी
जाउ दे.. काही करता येणार नाही..

दशानन's picture

31 Jan 2009 - 6:11 pm | दशानन

व्यनी करा !

हरकत नाही .. नाय तर तात्याला अथवा नानाला विचारा प्रगाढ पंडीत आहेत ते ह्या विषयामध्ये मी तर... त्याच्या समोर काहीच नाही !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2009 - 10:04 pm | पिवळा डांबिस

शेयर काय, मार्केट काय, आन पोर्टफोलियो काय.....
सगळे मेल्या त्या पैशेवाल्यांचे खेळ....
पापलेटां तर सोडाच पण शंबर रुपयांच्या खाली बांगडे पण गावणंत नाय....
शिरां पडो या म्हागाईवर!!!
-डांबिस प्रभू

निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा
:)

दशानन's picture

1 Feb 2009 - 11:12 am | दशानन

शेअर मार्केटला असे शिव्या देऊन नाही हो चालणार... शेयर मार्केट देशाची अर्थव्यवस्था मजबुत करायला खुप मोठा हात भार लागतो पण कधी हर्षद मेहता तर कधी केतन पारिख असले नमुने ह्याचा ढाचा कमजोर करायला बघतात... पण बड्या बड्या घोटाळ्यानंतर देखील मार्केट उभं राहतं हा इतिहास आहेच ना मागे.... आता सत्यम घोटाळा अथवा अमेरिकेतील मंदी ह्याचा फरक मार्केट वर वाईट परिणाम पडलाच आहे तर आजू बाजूला काही चांगल्या बातम्या आहेत त्यांचा देखील प्रभाव पडेलच ना !

शेयर मार्केट हा पैसे वाल्यांचाच खेळ ! पण हा खेळ नसून व्यवसाय आहे हे लोकांच्या डोक्यात जो पर्यंत बसत नाही तो पर्यंत अवघड... !

चांगला काळ जसा जाऊन वाईट काळ आला आहे
तसाच वाईट काळ देखील जाईल व चांगला काळ येईलच हा विश्वास असला तरचं धंदा करता येतो !
एकदा तोटा झाला म्हणून दुकान बंद केलं तर झाला धंदा !

आपला बनिया.. जैन !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

शंकरराव's picture

1 Feb 2009 - 4:10 pm | शंकरराव

चांगला काळ जसा जाऊन वाईट काळ आला आहे
तसाच वाईट काळ देखील जाईल व चांगला काळ येईलच हा विश्वास असला तरचं धंदा करता येतो !

सहमत
शंकरराव

महेंद्र's picture

1 Feb 2009 - 4:50 pm | महेंद्र

मी नशिबाने फॉरवर्ड ट्रेडींग मधे नाही. म्हणुन वाचलो.
यात पडताना एकच नियम ठेवला . कधी बि किंवा सी ग्रुप मधे पडायचं नाही, केवळ आपला स्वतहा च्या सद सद विवेक बुध्दी ला स्मरुन सगळे निर्णय घ्यायचे. मार्केट फिड्स किंवा टीट बिट्स वर विश्वास ठेवुन गुंतवणुक करायची नाही. ह्या सगळ्या सेफटि बेल्ट मुळे गेली १० वर्ष पैसे कमावले. इनिशियल गुंतवणूक १ लक्ष ७० हजार होती तीची एन ए व्ही ७ लाखा पर्यंत पोहोचली होती..
अजुनही लॉस मधे नाही . परंतु इतकी वर्ष डोकं लाउन कमावलेले पैसे ( अर्थात व्हर्च्युअल) गमावल्याचं वाईट वाट्तं......
असो....

सद्या तरी लाल फोलियोत उडकलेलो आहे तो हिरवा होईल अशी आशा (खरी का खोटी ?) बाळगुन आहे !!!

(म्युचल फंड नक्की रिर्टन्स देईल का? :? )
मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

दशानन's picture

2 Feb 2009 - 9:09 am | दशानन

>>म्युचल फंड नक्की रिर्टन्स देईल का?

हे पण मार्केट वरच डिपेन्ड आहे जर तुम्ही ग्रोथ फंड मध्ये पैसा भरला असेल तर ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

सखाराम_गटणे™'s picture

1 Feb 2009 - 6:12 pm | सखाराम_गटणे™

मी गेल्या वर्षी जानेवारीत सगळे विकुन टाकले. त्यामुळे सध्या मी खुषीत गाजरे खात आहे.

अरुण जाधव's picture

1 Feb 2009 - 8:19 pm | अरुण जाधव

8> खरच कोण सांगेल काय शेअर बाजार म्हणजे काय?

शेखर's picture

2 Feb 2009 - 10:28 am | शेखर

>>पण एक सुचना देतो मार्केट बद्द्ल कोण काय बोलतो आहे ह्याकडे लक्ष देऊ नका.

ह्या वाक्यापर्यंतच लेख वाचला. ;)

शेखर

दशानन's picture

2 Feb 2009 - 10:30 am | दशानन

=))

माझाच शेर माझ्या वर सोडला की राव ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -