<आपल्याला| |पटते का?>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
30 Jan 2009 - 9:43 pm
गाभा: 

आज आपण सर्व मिपावर (मराठी या एका समान धाग्यामुळे) आहोत. आपल्या मिपावर वर्षापेक्षा थोड्या अधिक काळात तीनहजारावर सभासद आहेत आणि मिपाने तांत्रिक आघाडीवरही अधिक प्रगती केली आहे.
शुद्ध किंवा प्रमाणे भाषेबद्दलचे विचार बदलले पाहिजेत हे मान्य (बोली भाषा ऐकायला आणि वाचायलाही अगदी ग्वाड वाटतात), पण आज काल काही लोकं प्रमाणभाषा किंवा बोलीभाषाही शुद्ध लिहित नाहीत, विरामचिह्नांचा योग्य वापर करत नाहीत. हेच चित्र लेख आणि प्रतिसाद वाचतेवेळी दिसते. प्रमाणभाषा बोजड असू नये आणि बोलीभाषांनाही समान मान दिला पाहिजे असा छोटासा बदल केला पाहिजे; पण असंबद्ध वाटेल, खिल्ली उडवली जाईल एवढं अशुद्ध लिहिणं, लेखनाला विरामचिह्नाचे अलंकार न घालणे हे पटत नाही. ती फॅशन नसुन त्याला काही महत्व आहे आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे. आपली संस्कृती, संस्कार, परंपरा, भाषा, सर्वसमावेशकता, उदार, दिलदारवृत्ती याचे आपण जतन केले पाहिजे.

आपण सर्व मराठी बोलणारे लोकं आहोत, अमेरीकेसारखे* वागून जमणार नाही. आपला भारत विविध (खाद्य, पेय, वस्त्रं, शिल्प, नृत्य, संगीत इ.) संस्कृती, प्रमाणभाषा आणि त्यांच्याशी संबंधित अगणित बोलीभाषांनी नटलेला देश आहे. हा ठेवा आपणच जपून ठेवायचा आहे.

अधिक माहिती: * जसं कलर, मीटर, सेंटर अशा शब्दांची स्पेलींग्ज बदलणे, इन्फ्लमेबल या शब्दाला फ्लेमेबल म्हणणे, इ.
"आपका" शृंखलेतील हे मूळ धागा सोडून चौथं(?) काथ्याकूट!

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

30 Jan 2009 - 9:49 pm | लिखाळ

हा धागा विडंबन म्हणून काढला आहे का? याला प्रतिसाद मौज-मजा, अवांतर, विरंगुळा असे येणे आपेक्षित आहे का?
की गंभीरपणे यावर मत यावे अशी आपली आपेक्षा आहे?

ता.क.- प्रतिसाद दिल्यावर लक्षात आले की 'विरंगुळा' या सदरात धागा आहे.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 9:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन म्हणाल तर गंभीर! बरेच दिवस हे डोक्यात येत होतं, पण लिहायचं राहून जात होतं. थोड्या टंकनचुका, थोडं अशुद्ध वाचायला काही वाटत नाही, पण "भयंकर" शुद्धलेखन वाचताना त्रास होतोच. पुन्हा एकदा, ब्रिटीश दादूसची आगरी, कुणाची मालवणी, कुणाची कोकणी (सर्व नाही समजलं तरी) वाचायला, वाचताना त्या शब्दांचा उच्चार करायला मस्त वाटतं.

बरं फार गंभीर वगैरे काही मला होता येत नाही तेव्हा हा डाव साधला! :-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

आचरट कार्टा's picture

30 Jan 2009 - 10:25 pm | आचरट कार्टा

हो... मलाही पटलं. लेखन शुद्धच हवं.

म्हणजे जे लिहिता ते शुद्ध भाषेमधे हवं, असं नव्हे. पण ज्या बोलीत लिहितो, ती बोली शुद्ध ती बोली म्हणून आली तर मजा आहे. उगाच मालवणीत म्हणून लिहायचं, आणि "भोतूर चल्लंय" ऐवजी "आत चल्लंय" टंकायचं, म्हणजे मग एकदम फुस्स होतं यार.

अवांतर : अरेच्च्या... फुस्स हे ही एक सदस्यनाम आहे की! आजच बनलंय :)
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

आपला अभिजित's picture

30 Jan 2009 - 10:31 pm | आपला अभिजित

गेल्या वर्षी हा विषय विनोदी (की हास्यास्पद?) अंगाने टाकला होता.

त्यावरच्या प्रतिक्रियाही रंजक होत्या. जरूर वाच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 10:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद. हे मी पाहिलंच नव्हतं ... अलिकडच्या काळात उपरोल्लेखित कारणांमुळे 'डोक्याची मंडई' होण्याची वेळ अनेकदा आल्यामुळे असेल, शेवटी लिहावसं वाटलं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अवलिया's picture

30 Jan 2009 - 11:56 pm | अवलिया

अदिती बाईंनी पेचात टाकले आहे... विचार करायला लागेल.

माझी त्यांना विनंती आहे, की त्यांने आपले विचार विस्तृत अशा लेखात अगर लेखमालेत मांडले तर माझ्यासारख्या अडाणी माणसाला नक्की काय करायला हवे याचा नीट खुलासा होईल. अर्थात, अंतिम निर्णय अदिती बाईंचे लेखन आणि प्रतिसाद यांचा तटस्थ, सम्यक दृष्टीने का काय म्हणतात ना तसा विचार एकसमयावच्छेदेकरुन (असे लिहिले म्हणजे बरे असते) केल्यावरच घेता येईल. तसेच तात्यासाहेबांचे मार्गदर्शन असेलच अशी अपेक्षा आहेच. असो.

लेख छान आहे.
पु ले शु.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

सचिन's picture

31 Jan 2009 - 12:49 am | सचिन

आदितीबाईंनी माझा वैचारिक गोंधळ उडवून दिला आहे. त्यांचा रोख नक्की कशावर आहे ते स्पष्ट झाले आहे असे वाटत नाही. शुद्धलेखनाविषयी काही मत मांडू पाहात आहेत की भाषेला लवचिकता (सर्वसमावेशकता, उदार, दिलदारवृत्ती) असावी असे सुचवीत आहेत ...पण मधेच एक "तरूण पिढी"वर ताशेरा आहे. विषय थोडा अधिक विशद केला तर साधक बाधक चर्चा होऊ शकेल.

विसोबा खेचर's picture

31 Jan 2009 - 8:38 am | विसोबा खेचर

शुद्ध किंवा प्रमाणे भाषेबद्दलचे विचार बदलले पाहिजेत

शुद्ध आणि प्रमाण भाषा?? ते काय असतं बॉ?????????????????

असो.. बाकी चर्चा चालू द्या. फक्त मिपावर भाषेची शुद्ध-अशुद्धता, प्रमाणभाषा, शुद्धलेखन इत्यादी विषयांना बंदी आहे ही जाण असू द्या. त्यामुळे हा धागा कोणत्याही क्षणी अप्रकाशित केला जाईल याची जाणीव असू द्यावी!

तात्या.

टारझन's picture

31 Jan 2009 - 9:08 am | टारझन

त्यामुळे हा धागा कोणत्याही क्षणी अप्रकाशित केला जाईल याची जाणीव असू द्यावी!

आग्गा बाबो ... आमच्या बोटाचं हाड वाढल्याणे आम्ही 'न' ला 'ण' लिहीतो .. ह्यामुळे सुदलेकण फाट्यावर मारले जाते .. त्यावर कोणाचा आक्षेप आहे काय ?

- टारझण

विसोबा खेचर's picture

31 Jan 2009 - 9:13 am | विसोबा खेचर

ह्यामुळे सुदलेकण फाट्यावर मारले जाते .. त्यावर कोणाचा आक्षेप आहे काय ?

मुळीच नाही. आगे बढो. हम तुम्हारे साथ है!

आपला,
(भाषेला सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवणारा भाषेचा स्वातंत्र्यसेनानी) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2009 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्यामुळे सुदलेकण फाट्यावर मारले जाते .. त्यावर कोणाचा आक्षेप आहे काय ?
आणखी एक स्पष्टीकरणः

जरूर टारू... माझा रोख 'न' चा 'ण' करणे, 'ण' चा 'न' करणे यावर अजिबातच नाही. पण काही वेळा मिपावरचे लेख (प्रतिसादही) वाचताना असं लक्षात येतं की लेखकाला जो अर्थ अभिप्रेत आहे तो समजण्यासाठीही अंमळ कष्ट घ्यावे लागतात. असल्या प्रकारचं एक वाक्य मी पण मस्करीत बर्‍याचदा वापरते, "मज्यशि मयत रि करन्र क?" या वाक्याचा अर्थ लावायलाच किती वेळ लागतो ...
एखाद्या चित्रपट किंवा नाटकाबद्दल लेख लिहायचा पण त्याचं नावंही नीट लिहिलं जात नाही. (माझं नाव अदिती असताना लोकं आदिती लिहातात त्यातलाच एक प्रकार!) वर लेख लिहिताना (प्रेमळ किंवा आगाऊ) धमक्या(!) असतात, शुद्धलेखनाला हसू नये, संबंधित चित्रपट/नाटक पाहिलं नसेल तर प्रतिसाद देऊ नये, इत्यादी.

तर कधी ठराविक नियम न वापरल्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो, विरामचिन्ह न वापरल्यामुळे कधी लेखनामागची भूमिका चुकीची समजली जाते. एखादवेळेस चुकून 'तुरुंग'च्या ऐवजी 'तुरंग' लिहिणं वेगळं आणि (आता उदाहरण आठवत नाही), पण एखाद्या छोट्या चुकीमुळे भलताच अर्थ 'लागणं' वेगळं.

शुद्धलेखन चिकीत्सा असावी असं मला अजिबात वाटत नाही, पण किमान आपण जे लिहायचा प्रयत्न करत आहोत ते वाचकांना कमीतकमी प्रयत्न घेऊन समजावं एवढीच माफक अपेक्षा आहे.

बाकी तात्या, मिपाचं धोरण आणि तुमचे विचार माहित आहेत. कधीही हा धागा अप्रकाशित होईल याची जाणीव ठेवूनच मी हे विचार मांडत आहे.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अवलिया's picture

31 Jan 2009 - 12:34 pm | अवलिया

शुद्धलेखन चिकीत्सा असावी असं मला अजिबात वाटत नाही, पण किमान आपण जे लिहायचा प्रयत्न करत आहोत ते वाचकांना कमीतकमी प्रयत्न घेऊन समजावं एवढीच माफक अपेक्षा आहे.

सहमत

( अवांतर - प्रोमीथीयसचे निषेध खलिते विसरलास का नाना?)

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

नंदन's picture

1 Feb 2009 - 9:59 am | नंदन

सहमत आहे. लेखिकेला यासारख्या अ-वाच्य प्रतिक्रियेत वापरले गेलेले भाषेचे वळण अभिप्रेत असावे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2009 - 1:30 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

प्रसिद्ध उदाहरणः

म्हणायचं होतं: रोको, मत जाने दो!!!
प्रत्यक्षात म्हणलं: रोको मत, जाने दो!!!
मग झाला गोंधळ. राज्यच बुडालं.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Feb 2009 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन आणि बिका. मला जी उदाहरणं आठवली नाहीत, माहित नव्हती, ती तुम्ही दिलीत. मला अगदी हेच्च म्हणायचं होतं.

अवांतर: नाकावर झाली ही सर्दी बहाल एकदम मस्त आहे; जुने धागे उकरून काढायचं पातक माझ्या माथी नको म्हणून मीनलताईंना इथेच लगे हाथ दाद देऊन टाकते.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Feb 2009 - 2:49 pm | प्रकाश घाटपांडे

शुद्धलेखन चिकीत्सा असावी असं मला अजिबात वाटत नाही, पण किमान आपण जे लिहायचा प्रयत्न करत आहोत ते वाचकांना कमीतकमी प्रयत्न घेऊन समजावं एवढीच माफक अपेक्षा आहे

.
मान्य आहे लिहिणारा वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर व वाचणारा वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर असेल तर कम्युनिकेशन कसे होणार? लेखन शुद्ध नसले तरी चालेल पण लिहिणा-याचा हेतु व वाचणा-याचे आकलन स्वच्छ असावे.

प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2009 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिणारा वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर व वाचणारा वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर असेल तर कम्युनिकेशन कसे होणार?

तोच तर प्रॉब्लेम आहे इथे ! :)

लेखन शुद्ध नसले तरी चालेल पण लिहिणा-याचा हेतु व वाचणा-याचे आकलन स्वच्छ असावे.

क्या बात है ! अशा वाक्यांसाठीच आम्हाला घाटपांडे साहेबांची हमखास आठवण होते.

-दिलीप बिरुटे

सहज's picture

31 Jan 2009 - 8:47 am | सहज

आप्न मज्यासी मयतरी! क्राल क?

या अजरामर वाक्यातील गोडवा व वेगवेगळ्या पद्धतीने लिहता येण्याची अनुभुती तुमच्या शुद्धतेमुळे कायमची मिटली जाईल.

त्यामुळे अमान्य व तुम्हाला एकाच लेखात ३१४ वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अवलिया's picture

31 Jan 2009 - 9:02 am | अवलिया

सहमत आहे

(मैत्री किडा) अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

विनायक प्रभू's picture

31 Jan 2009 - 12:41 pm | विनायक प्रभू

सहमत.
वि.प्र.
सहमती हे मतीमंदतेचे लक्षण तर नाही ना?

अवलिया's picture

31 Jan 2009 - 12:43 pm | अवलिया

नाही. ते कंपुदृढतेचे लक्षण आहे.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

मैत्र's picture

31 Jan 2009 - 12:46 pm | मैत्र

मस्त... लै आवडलं नाना!

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:42 am | अघळ पघळ

ज्याने त्याने चवीप्रमाणे शुद्धलेखन वाढून घ्यावे हे उत्तम!

दशानन's picture

31 Jan 2009 - 9:19 am | दशानन

आम्ही कुठ जायचं ओ मग :?

आम्हाला काय बी सरळ येत नाय :(

ना धड हिंदी.. ना इंगलिश ना मराठी... त्यात व्याकरण म्हणजे बघा... पानिपतची लढाई... एक ना घड भाराभर चिंध्या... :D

लै वंगाळ वाटतं कधी मधी सुद दिसलं की... जरा पण गोडवा नाय सापडत ... उगाच कोल्हापुरचं पैलवान .. सदाशीव पेठेत आल्या सारखं.... ! ;)

म्या आता काय बोलु ह्या बाईने तर गडबडच केली वर म्हणत्या... संक्सुर्तु... संकृती... जपा.. कशी जपणार.. ते काय रेडकु ह्या व्हयं... छप्परातनेऊन बांधलं की झालं :(

काय बी नाय कळालं ! आधीच हातपाय गारठल्यात... उसाला पाणी देऊन आलो हाय.. सकाळच्या पारी त्यात हे नवीन लचांड.. नाय समजलं बॉ !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

विनायक प्रभू's picture

31 Jan 2009 - 9:35 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
वि.प्र.
पेन आकर्षक असल्याने लिखाण चांगले होते हा एक मोठा गैरसमज आहे.

सहज's picture

31 Jan 2009 - 10:01 am | सहज

> > > >पेन आकर्षक असल्याने लिखाण चांगले होते हा एक मोठा गैरसमज आहे.

बोरुने, धुळाक्षरे गिरवुन जो सुबक अक्षरात एकसुरीपणा येतो त्याचे गुनगान फक्त जुन्या लोकांकडूनच ऐकले आहे. पेनाला नावे ठेवण्यातही तेच पुढे.

नो पेन नो गेन हेच आम्हाला ठावं.

बाकी ज्याची त्याची शाई व ज्याची त्याची लेखनशैली.

दशानन's picture

31 Jan 2009 - 10:05 am | दशानन

अहो... पेनासाठी किती लफडी केली... आम्ही जेव्हा शाळेत हुतो तेव्हा.... !

पार्कर चे पेन तर भाग्यवंताकडेच !

बाकी.. माझे अक्षर इन्क पेन ने लिहले तर कमी गचाळ दिसते... पण तेच बाकीची फडतूस बॉलपेन ने लिहले की महागचाळ दिसते...

प्रभु सर अक्षर सुधरावे म्हणून काय करु :?

सल्ला द्या...
सल्ला नाही दिला तर
अल्ला ला सांगेन
तो तुमच्यावर दाही दीशेने वारा सोडेल !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अवलिया's picture

31 Jan 2009 - 12:10 pm | अवलिया

अजिबात नाही.
आम्ही लेखनिक(का) ठेवतो.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

विनायक प्रभू's picture

31 Jan 2009 - 10:02 am | विनायक प्रभू

आपले पतन झाले लेखात अपेक्षित असे मी समजावे का?

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:42 am | अघळ पघळ

हो.

सुक्या's picture

31 Jan 2009 - 11:05 am | सुक्या

आपण ह्या सुद्लेकनाला लै भ्यातो बॉ. आमचं मास्तुर म्हंजी एकदम हिटलर वो. बोरुनं सुद्लेकन लिहायला लावायचं. शाईच्या दौतीत बोरुचा टाक बुडवुन ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिवली तशी आमी शुद्लेकनाची वही भरायचो. बा बोरु तासुन द्याचा अन् मास्तुर दुसर्‍या बोरुनं आम्हाला तासायचा. लै पेन बगा.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विसोबा खेचर's picture

1 Feb 2009 - 3:06 pm | विसोबा खेचर

अहो पण मला एक सांगा, गेले वर्षभर तुमच्या त्या सो कॉल्ड प्रमाणभाषेचं आणि शुद्धलेखनाचं कोणतंही स्तोम मिपानं माजवलं नाही, ना कुणाला माजवू दिलं! काय खेटर अडलं आहे मिपाचं? सुरूच आहे ना दणक्यात! :)

आपला,
(प्रमाणभाषेच्या, भाषाशुद्धीच्या आणि शुद्धलेखनाच्या स्तोमाला फाट्यावर मारणारा) तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

1 Feb 2009 - 3:25 pm | सखाराम_गटणे™

हेच म्हणतो.
तमाम सुदलेखन वाल्या फाट्यावर मारणे हे प्रत्येक मिपाकराचे कर्तव्य आहे.

माझे तर असे मत आहे की, मिपाचे सभासदत्व देताना ही अट टाकण्यात यावी.
'मी, सुदलेखण आणि प्रमाण भाषा यांना फाट्यावर मारेन, तमाम असुदलेखन वाले माझे बंधु आणि भगिणी आहेत. मिपाच्या बोलीभाषेच्या पंरपरेत मी माझ्या परीने भर घालेन आणि ज्ञान बहुजन समाजापर्यंत पोचवेन, सुदलेखन पिडीतांचे दु:ख समजाउन घेइन.'

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Feb 2009 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जसं बोल्लात तसंच लिवलंत, मग ते असुद कसं जालं? आता तुमच्याच नियमाप्रमानं तुमचीच मेंबरशिप बंद कराची का?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सखाराम_गटणे™'s picture

1 Feb 2009 - 3:32 pm | सखाराम_गटणे™

इतर स्थळा म्हणण्याप्रमाणे बोली भाशा ही अशुदध आहे.
त्याच आधारावर मिपा स्थापन झाले आहे.

लिखाळ's picture

1 Feb 2009 - 4:24 pm | लिखाळ

अदिती, बिका, नंदन यांच्याशी सहमत आहे.
सध्या मी बरेचदा शब्दात ज्या अक्षरावर जोर असतो तिथे अनुस्वार न देणारे लिखाण पाहतो ते पाहिले की मला पुढे वाचवतंच नाही.
उदा. हे मी लिहाव का? मी असे वागव का? अश्या तर्‍हेचे. यात लिहावं, वागावं असे लिहिले की वाचन सुलभ होते असे माझे मत.
-- लिखाळ.

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2009 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

सहमत आहे. शब्दांचे अर्थ बदलत असतील, उच्चार निरर्थक होत असतील तर असे लेखन त्याज्य मानावे.
आपण इतर अनेक ठिकाणी शुध्दतेचा, चांगल्या गोष्टींचा आग्रह धरतो मग भाषेलाच वेगळा न्याय का?
मिपाच्या धोरणानुसार कुठल्याही बोली भाषेला बंधन नाही. तर निदान ती तरी शुद्ध लिहावी. मालवणी, आगरी, सातारी, कोल्हापुरी, बेळ्ळगावी कुठल्याही भाषेत लिहा पण त्या त्या भाषेचा 'बाज' सांभाळून लिहा. ती भाषा नीट येत नसेल तरी, 'अमका लिहीतो मग मी का नको लिहू?' असे नसावे.

(प्रमाणभाषेच्या, भाषाशुद्धीच्या आणि शुद्धलेखनाच्या स्तोमाला फाट्यावर मारणारा) तात्या.

तात्या, भल्या भल्या गायकांनीही असेच म्हंटले असते की शास्त्रीय संगिताच्या नियमांना मी फाट्यावर मारतो, मला लागेल तसे मी गाईन तर ते कानाला गोड लागले असते का? कुठल्याही रागात एखादाही वर्ज्य सुर लागला तरी कानाला विपरीत वाटतेच नं? असो.
शास्त्रीय संगिताबाबत हा माझा लहान तोंडी मोठा घास होत असेल तर माफ करा.

झेल्या's picture

2 Feb 2009 - 11:04 am | झेल्या

शास्त्रीय संगीताचे फार छान उदाहरण दिलेत आपण.

भाषेत विविधता असणे वेगळे आणि भाषा अशुद्ध वापरणे वेगळे.
एखाद्या व्यक्तीचित्राच्या तोंडी प्रभावी व्यक्तीचित्रणासाठी अशुद्ध वाक्य देणे किंवा जाणीवपूर्वक थोडेसे वेगळ्या धाटणीचे, विनोदनिर्मितीसाठी म्हणा, (कॅल्क्युलेटेड) अशुद्ध लिहिणे हे मान्य आहे.

भावना पोहोचल्या की काम झाले असे मानणे अगदीच चूक आहे असेही नाही पण एखाद्या ऑफिशियल /बिझनेस किंवा सामान्य इंग्रजी लेखनात आपण जसे भाषेबद्दल दक्ष असतो, स्पेलिंग्ज कडे आणि व्याकरणाकडे कटाक्षाने लक्ष देतो तसेच मराठीबाबतही अभिप्रेत आहे, इतकेच.

थोड्याफार चुका होणे साहजिक आहे पण....

अगदीच 'बेशुद्ध'लेखन नसावे. :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 3:54 pm | विसोबा खेचर

माझ्या मते संगीताची आणि भाषेची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे या विषयावर अधिक काही बोलता येणार नाही..

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2009 - 12:17 am | llपुण्याचे पेशवेll

म्हटलं तर कशाचीही तुलना कशाशीही होऊ शकत नाही, पण म्हटलं तर कशाचीही तुलना कशाशीही होऊ शकते. बाकी पेठकरकाकांचा मुद्दा सडेतोड आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विजुभाऊ's picture

1 Feb 2009 - 7:41 pm | विजुभाऊ

म्या माज्या सातारच्या भाषेत ह्ये लिवलं तर त्ये बरुबर का न्हायी.
आम्ची भाषा जर्रा वायली हाय तवा तुमी सूद म्हंता तसं लिवता यत न्हायी.
पर ती एकदम फर्मास भाषा हाये . एकदम जित्ती भाषा आस्तीया सातारची.
एक डाव कोनाला दोस्त मान्ला की त्यो जीवाचा मैतर व्हतुया. त्येला सग्ळे गुन्हं माप.
आता म्हराटी सूद लिवायची ह्ये खर्र. पर कंची म्हराटी सूद म्हनायची. तुम्चं ह्रस्व दीर्घ नीट ल्ह्याचं ह्ये बरुबर.
पर आम्च्याकडं लै मान्सं ण ला न म्हन्त्यात त्येचं काय करायचं

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विजूभाऊ,

आम्ची भाषा जर्रा वायली हाय तवा तुमी सूद म्हंता तसं लिवता यत न्हायी.
मला असं वाटतंय की काही लोकांप्रमाणे तुम्हालाही मी जी 'शुद्ध'ची व्याख्या सांगितली आहे ती कळली नाही.

वर लिहिल्याप्रमाणे, जसं बोलता तसं लिहिलं की झालं शुद्ध! बाकीचे संकेतस्थळवाले याला शुद्ध म्हणतात का नाही हा माझा प्रश्न नाही. माझ्या लेखी (आणि बोलतानाही) वायल्या बोलीभाषेत लिहिलं, पण जसं बोललं अगदी तस्संच लिहिलं की शुद्ध. (थोड्या टंकनचुका क्षम्य आहेतच.)

जी काही प्रमाण भाषा आहे ती मराठीची एक बोली भाषा, बाकी सातारकडची भाषा, आगरी, मालवणी, कोंकणी, खानदेशी, मराठवाड्याकडची या आणि इतर सगळ्या बोलीभाषा मस्तच आहेत. विजुभौ, तुम्हाला उत्तर द्यायचं म्हणून मी ओढून ताणून जर सातारी बोली लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो हास्यास्पद होईल; त्यातून मला काय म्हणायचं आहे आणि समोरच्याला काय समजतंय त्याचा गोंधळ होईल तो वेगळाच.
आणि 'मज्याशि मयत रि करन्र क?' हे अंमळ अशुद्धच ... कुठे 'मैत्री' आणि कुठे 'मयत रि'...

कुठल्याही टोकाला जाऊ नये, आणि हे शुद्धलेखनाचा आग्रह धरताना असावं आणि शुद्धलेखनाचा आग्रह नाही हे म्हणतानाही असावं.

शेवटी काय, तारतम्य महत्त्वाचं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

आनंदयात्री's picture

2 Feb 2009 - 11:12 am | आनंदयात्री

वाचणेबल मराठी लिहलीच पाहिजे !!

सुचेल तसं's picture

2 Feb 2009 - 4:22 pm | सुचेल तसं

अदितीच्या विचारांशी सहमत.

शाहरुख's picture

3 Feb 2009 - 9:05 am | शाहरुख

माझ्यामते अदितीला (उगाच अहो जाहो करत नाहीय) शुद्धलेखन चिकीत्सेबद्दल नसुन गचाळपणे केलेल्या टंकनाबद्दल बोलायचे आहे....

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 3:55 pm | विसोबा खेचर

सावधान...!

भाषाशुद्धतेच्या ट्यँव ट्यँव ला मिपावर बंदी आहे त्यामुळे हा धागा कधीही अप्रकाशित होऊ शकतो हे जाणून पब्लिकने प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घ्यावेत..! :)

(हुकूमावरून..)

तात्या अभ्यंकर,
मुख्य व्यवस्थापन अधिकारी/आणिबाणीचा शासनकर्ता,
मिसळपाव डॉट कॉम.

अवलिया's picture

2 Feb 2009 - 3:57 pm | अवलिया

सहमत

पण तात्या, धागा अप्रकाशित न करता अजुन प्रतिसाद देता येणार नाहीत अशी व्यवस्था नाही का करता येणार?
हे अर्थात काही काही धाग्यांनाच असेल....

--अवलिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Feb 2009 - 4:27 pm | सखाराम_गटणे™

हेच म्हणतो,

काय व्यर्थ भाषाशुद्धतेच्या ट्यँव ट्यँव चालु आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Feb 2009 - 5:31 pm | घाशीराम कोतवाल १.२

:W चालुद्या चालु द्या तुमचा भाषाशुद्धतेच्या ट्यँव ट्यँव
आम्ही मजा बघतोय याची ;)
___________________________________________________
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......

सिद्धू's picture

3 Feb 2009 - 9:37 am | सिद्धू

अदिती ताईंनी मांडलेल्या मुद्द्याशी सहमत आहे.
अ-शुद्धलेखन असलेले साहित्य वाचायला फार त्रास होतो.

विसोबा खेचर's picture

3 Feb 2009 - 10:05 am | विसोबा खेचर

अ-शुद्धलेखन असलेले साहित्य वाचायला फार त्रास होतो.

अहो पण मुळात अशुद्धलेखन, शुद्धलेखन म्हणजे काय??