साहित्य:-
१. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे
२. १ वाटी मटार
३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट
४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन
५. १ चमचा गरम मसाला
६. तेल
७. चीमूटभर साखर
८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर
९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग
१०. मीठ
११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स
१. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे.
२. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत.
३. कढईत तेल गरम करून फोडणी करावी त्यात आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट घालावी.
४. क्रश केलेले मटार घालून परतावे.
५. गरम मसाला,अर्धा चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर , साखर व मीठ घालूनपुन्हा परतावे व झाकण ठेऊन एक वाफ आणावि व गॅस बन्द करावा. हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
६. ५/६ ब्रेडचे स्लाइस पाण्यात भिजऊन ठेवावेत मऊ झाल्यावर त्यातिल पाणी काढुन टाकावे व स्मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करावे.
७. वरिल मिश्रणात उरलेला लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर व मीठ मिसळावे व मिश्रण एकजीव करावे.
८.वरिल मिश्रणाची पारी करून त्यात मटारचे मिश्रण भरावे व रोल करून रवा किव्वा ब्रेड्क्रम्समधे घोळवून तेलात खरपूस तळावेत
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 5:42 pm | अनंत छंदी
पाकृ वाचून किती मस्त लागत असेल याचा अंदाज येतोच, पण फोटो असता तर मजाच आली असती
30 Jan 2009 - 5:48 pm | किट्टु
सहमत!!!
30 Jan 2009 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो असता तर मजाच आली असती
आम्ही फोटो पाहून प्रतिक्रिया देतो...आम्ही पाकृती वाचत नाही :) (ह. घ्या )
30 Jan 2009 - 5:57 pm | दशानन
+१ +१
आम्ही देखील सरांकडून दिक्षा घेतली आहे पाकृती विभागासाठी +१ अथवा =१ !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
31 Jan 2009 - 5:37 pm | मानसी मनोजजोशी
प्राध्यापक साहेब टेस्ट महत्वाची का फोटो? म्हणजे फोटो असेल तर पाककृती ची रंगत वाढते हे बरोबर पण नसेल तर पाककृती वाईट तर ठरत नाही ना?
31 Jan 2009 - 6:15 pm | दशानन
प्राध्यापक साहेब तुमचा प्लस वन ह्यांना !
स्वारी !
काय आहे वारं कुठ वाहत आहे हे पाहून आम्ही दिशा बदलतो ;)
* बाय द वे... तुम्ही लेखन करता करता पाककृती करता की पाककृती करता करता लेखन ?
काही खास कारण नाही विचारायचं.. उगाचं आपलं टिपी .. चालू दे तुमचं !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
31 Jan 2009 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तर पाककृती वाईट तर ठरत नाही ना?
पाकृती वाईट ठरत नाही. खरं आहे ! आपली पाकृती आवडली ! :(
-दिलीप बिरुटे
(प्राध्यापक साहेब)
16 Feb 2009 - 5:28 pm | दशानन
हे जबरदस्ती दे होय वाटत आहे सर... मनापासून नाही !
3 Feb 2009 - 5:10 pm | मानसी मनोजजोशी
फोटो कसा टाकायचा ते सांगाल Please
16 Feb 2009 - 5:15 pm | PRAPTI P
नमस्कार
मला चिकन तंदुरीची रेसिपी पाहिजे आहे.
धन्यवाद
31 Jan 2009 - 6:25 pm | नीरजा
मस्तच !!!
रोल करून रवा किव्वा ब्रेड्क्रम्समधे घोळवून तेलात खरपूस तळावेत
किंवा तेलाचा हात लावुन ओव्हनमधे ग्रिल केल्यासहि छान लागतात्.(तेलाच्या कमी वापरा साठी कारण ब्रेड जास्त तेल शोषून घेतो)
1 Feb 2009 - 6:22 am | पक्या
ह्म्म, चांगली वाटतीये रेसिपी. ट्राय करायला हरकत नाही. फोटो असते तर नक्कीच मजा आली असती बघायला.
एक सूचना: स्मॅश (smash) चा अर्थ वेगळा आहे. इथे मॅश (mash) हा शब्द योग्य आहे.
मॅश म्हणजे कुस्करणे, ठेचणे...जेणेकरून लगदा होईल असे. उदा. mashed potato .
आणि स्मॅश म्हणजे धडकून फुटणे, मोठा आवाज होईल असे आपटून बारीक तुकडे होणे..उदा. The car smashed into a tree.
2 Feb 2009 - 2:59 pm | मानसी मनोजजोशी
महितीबद्दल धन्यवाद
2 Feb 2009 - 3:45 pm | विसोबा खेचर
छ्या! आम्ही बिगरफोटूच्या पाकृं वाचतदेखील नाही!
तात्या.
3 Feb 2009 - 4:25 pm | मानसी मनोजजोशी
तुमच्यावर कोणी सक्ती केलेय का? नको वाचू
पण असल्या प्रतिक्रिया देऊन अपमान तरी करु नका
16 Feb 2009 - 12:22 pm | केळ्या
हेच सगळे मिश्रण दोन पावांच्या मध्ये घालून त्याचे टोस्ट करूनही खूप छान लागतात बरं का!
16 Feb 2009 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर
वरील सारणात कांदा परतून त्यावर ओलानारळ परतून बारिक चिरलेली कोथिंबीर (वाटून नाही) टाकल्यास अजून मस्त मजा येते.
आपली पाकृही चांगली आहे. अभिनंदन.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
16 Feb 2009 - 5:23 pm | विसोबा खेचर
तुमच्यावर कोणी सक्ती केलेय का? नको वाचू
पण असल्या प्रतिक्रिया देऊन अपमान तरी करु नका
अपमान करायचा हेतू नक्कीच नव्हता, परंतु सोबत फोटूही दिला पाहिजे हा आग्रह मात्र जरूर होता..
असो,
फोटू टाकलात, आपलं भांडण मिटलं! कमीअधिक शब्दाबद्दल क्षमस्व..
सुंदर पाकृ..!
येऊ द्या अजूनही अश्याच पाकृ.. :)
तात्या.
16 Feb 2009 - 5:25 pm | स्मिता श्रीपाद
फोटो दिसत नाहीये हो...