मुंबईतल्या रस्त्यांचं चाललेलं कॉंक्रिटीकरण

तात्यालबाड's picture
तात्यालबाड in काथ्याकूट
30 Jan 2009 - 1:54 pm
गाभा: 

आपण सर्व जण सध्या पहात आहात की जिथे तिथे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण चालू आहे. हे का ते माहिती आहे का ? तर आता आले आहे मतदान...नगरसेवक,आमदार आणि खासदार या पदांसाठी. जी त्यांना ४ १/२ जमू शकत नाही ती कामे त्यांना निवडणूका जवळ आल्या की आठवणीने आठवतात. आणि मग ती कामे घाईगडबडीत पूर्ण करून त्यावर "नगरसेवकाच्या / आमदाराच्या / खासदाराच्या अथक परीश्रमानंतर" असे फलक लावायलाही ही मंडळी कचरत नाहीत.सगळे साले खोटारडे.निवडून आल्या आल्या लगेच ही कामे केली तर पुढच्या निवडणूकीत मतदारांना आपण आठवणार नाही अशी पोकळ भिती कदाचित त्यांना वाटत असावी.

मला मात्र या संदर्भात काही प्रश्न पडले आहेत...
१) ज्या वेळी ह्या रस्त्यांचे काम चालू असते त्या वेळी कंत्राटदाराचे किती वरीष्ठ प्रत्यक्ष कामाच्या जागी देखरेखीकरता हजर असतात ? कंत्राटदाराचे वरीष्ठ लोक देखरेख करत आहेत की नाही हे पहायला सरकारी यंत्रणा तरी जागी असते का ?
२) ज्या रस्त्याचे काम चालू असते त्या रस्त्याकडे येणार्‍या रस्त्यांवर आधीच ’वन वे’ चा फलक का नाही लावत
? वाहनचालक त्या रस्त्यांपर्यंत आल्यावर मग तो एकदिशा मार्ग असल्याचे कळते.
३) रस्त्यावर जिथे काम चालू असते तिथे सुरक्षिततेकरता पत्र्याचा अडसर प्रत्येक ठिकाणी लावला जातोच असे
नाही.काही ठिकाणी नुसत्याच लाकडाच्या पट्ट्या उभ्या आडव्या ठोकून लावतात, त्या ही मध्ये मध्ये.लाल दिवाही
दोन्ही टोकाला लावायचा नियम असूनसुद्धा माझ्या पाहण्यात तो कधीही लावलेला आढळला नाही.
४) जिथले काम चालू आहे,त्याच्या आजूबाजूचे रस्ते तरी सुरळीत वाहतूकीकरता धड हवेत की नको.पण ते ही
काही कारणाने मध्येच कुठेतरी खोदून ठेवलेले आढळतात.
५) एका वेळी एकच रस्ता करायला घ्यावा की नाही ? तो व्यवस्थित पूर्ण करून मग दुसरा रस्ता दुरुस्तीला
काढावा,पण सगळीकडे एकाच वेळी हगून ठेवण्यात एमएमआरडीए चा हात कोणी धरू शकणार नाही.

मला पडणारे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीला कसे काय पडत नाहीत ?लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याच्या आगोदर
हे ही सामान्य जनतेप्रमाणेच राहात असतात ना ? मग निवडून आल्यावर त्यांना आपण तोंड दिलेल्या प्रश्नाकरता
काहीच कसे करावेसे वाटत नाही ? म्हणून मला आता असे वाटू लागले आहे की आपण मतदान करणे सोडून देऊन
ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना गुवातले जोडे हाणले पाहिजेत. अर्थात त्यांना काहीच फरक पडणार नाही, कारण ते
कायमच नेसूचे सोडून बसलेले असतात...पण मला मानसिक समाधान.

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 3:19 pm | भडकमकर मास्तर

आमच्या भागात पुष्कळ समतल विलगक केलेले आहेत, बांधकाम चालू असताना त्यांच्याशेजारी अरुंद रस्ते भीषण...
संरक्षक पत्रे तुटलेले असतात . आणि त्यांचे गंजके कोपरे वार्‍यावर हेलकावत दुचाकीस्वारांच्या मध्ये येतात...आणि त्या पत्र्यांमुळे संरक्षण व्हायच्या ऐवजी काही जण तिथे अपघाती मृत्यूलाही सामोरे जातात...
..
आमचे एक अज्ञ निरीक्षण ..... रस्ता बांधताना हल्ली खणत नाहीत , आहे त्यावर नवीन उंच उंच रस्ता बांधतात.... काही वर्षांतच आजूबाजूची घरे दुकाने गेली खड्ड्यात ....

अवांतर : एकाच वेळी हगून ठेवण्यात एमएमआरडीए चा हात कोणी धरू शकणार नाही.

वरील वाक्य भाषासौंदर्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय वाटले. :)
एखादी संस्था / व्यक्ती(?) एकाच वेळी अनेक ठिकाणी हगते म्हणून तिचा हात कोण धरायला जाईल ? आणि हात धरून तरी फायदा काय? 8|

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कवटी's picture

30 Jan 2009 - 3:41 pm | कवटी

एखादी संस्था / व्यक्ती(?) एकाच वेळी अनेक ठिकाणी हगते म्हणून तिचा हात कोण धरायला जाईल ? आणि हात धरून तरी फायदा काय?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

कवटी

http://www.misalpav.com/user/765