सारेगमप लिटिल चॅम्प्समधे मुलांचे बालपण हरवत आहे का?

संभाजी's picture
संभाजी in काथ्याकूट
30 Jan 2009 - 11:14 am
गाभा: 

सध्या झी टीव्हीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स हा अत्यंत लोकप्रीय कर्यक्रम चालू आहे. त्यात भाग घेणारी मुले अगदी लहान आहेत. पण परिक्षक मंडळी , विशेषतः अवधूत गुप्ते त्याना भलभलते प्रश्न विचारून भंडावून सोडताना दिसतो.
दोन आठवड्यापूर्वी त्याने रोहित राउतला "एवढी पल्लवी आख्खी समोर असताना तिच्याभोवती का नाचला नाहीस?" असे विचारले होते. सहाजिकच पुढच्या खेपेस परफॉर्म करताना त्याने शर्वरी पाटणकरभोवती पिंगा घातला. पल्लवी तर त्याला मधूनमधून तुला मित्र किती आणि मैत्रीणी किती असं विचारतच असते.
अशामुळे ही मुले अवेळी मोठी तर होणार नाहीत असे मनात येते.
एका विज्ञानकथेत एका लहान मुलाच्या मेंदूत यांत्रिकपणे ज्ञान भरले जाते. तेव्हां तो आपल्या वयाच्या मैत्रिणीकडे पुरुषाच्या नजरेने पाहू लागतो. त्याची आठवण झाली!

प्रतिक्रिया

दशानन's picture

30 Jan 2009 - 11:29 am | दशानन

त्यांच्या आईबापांना चिंता नाही... मग आमच्या का डोक्याला शॉट... :?

आधीच मार्केट पडलं हाय.... कामधंदा कमी होत आहे.. लै नाटक चालू आहेत.... ह्याच चिंता आमच्या कमी होत नाही आहे.. त्यात त्या टिव्ही वाल्या नाटक वाल्यांच्या का चिंता करावी ?

अवांतर : * आज बालिकावधू मध्ये काय होणार.. आज सासभी कभी बहु थी... मध्ये तो मेलाला जिवंत होणार... मायला.. तुमच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.. ती कडं लक्ष द्या !


*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 12:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर : * आज बालिकावधू मध्ये काय होणार.. आज सासभी कभी बहु थी... मध्ये तो मेलाला जिवंत होणार... मायला.. तुमच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.. ती कडं लक्ष द्या !
राजे, क्यू.सा.भी क. ब. थी. बंद झालं, जरा वर्तमानात या!

अवांतरविरहीतः याच अवधूत गुप्तेने 'ये रात'चं निरागस रिमीक्स म्हणून दाखवलं होतं आणि त्या रिमीक्सपद्धतीला मुग्धा (वैशंपायन) रिमीक्स असं नाव दिलं होतं.
एकूणच पुढची पिढी लवकर "मोठी" होत आहे, त्यात ही थोडी भर म्हणा.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

ढ's picture

30 Jan 2009 - 11:40 am |

आधीच मार्केट पडलं हाय.... कामधंदा कमी होत आहे.. लै नाटक चालू आहेत.... :(

राजे हीच पंचलाईन म्हणून वापरा की!

झेल्या's picture

30 Jan 2009 - 12:03 pm | झेल्या

केवळ पॉझिटिव्ह/हेल्दी कॉम्पिटिशन असेल तर नक्कीच बालपणावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. पण या स्पर्धेसाठी जर मुलांवर दबाव आणून, त्यांना भरीस पाडून गाण्याचे काम करवून घेतले जात असेल तर निश्चितच हा चिंतेचा विषय आहे.
स्पर्धा हरून किंवा जिंकून मुलांच्या मनावर विपरित परिणाम होणार नाही याबाबत पालकांनी आणि आयोजकांनी जागरूक रहायला हवे.
स्पर्धा चांगली की वाईट या मुद्द्याला अनेक पैलू आहेत. याचा विचार करण्यापेक्षा स्पर्धेच्या निकालाचा किती व कसा विचार करावा, याचा विचार करावा.

जिथे अनेक 'मोठ्यांचे' सिनेमे रोज घराघरात दूरचित्रवाणीतून अवतरतात, चित्रपटगृहांमधून दाखवले जातात, तिथे अवधूतच्या वाक्याचा कितीसा व काय परिणाम गृहीत धरण्याजोगा आहे?

बालपणावर (विपरित) परिणाम करणारे इतर अनेक महत्त्वाचे व विचार करण्याजोगे घटक आहेत.

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

अभिता's picture

30 Jan 2009 - 1:47 pm | अभिता

शाळा सोडून खुप कालावधि झाला का? जरा बाहेर डोकावून (घराबाहेर)पहा.वय १० ते १४ च्या ग्रुप मध्ये ज्ञानात भर पडेल.मग असे प्रश्ण पडणार नाहित.

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 1:57 pm | भडकमकर मास्तर

मोठ्या माणसांसारखं गायल्यामुळं त्यांचं बालपण हरवतंय...:)

अवांतर : रोहित राउतच्या वयाची मुलं पालकांच्या मनावर वाईट परिणाम होईल म्हणून टीव्हीवरचे तथाकथित अश्लील वगैरे चॅनल (चाईल्ड लॉक फॅसिलिटी वापरून ) कुलुपबंद करून ठेवतात हो हल्ली,, त्यामुळे बिचार्‍या अवधूतवर कशाला घसरताय?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

तात्यालबाड's picture

30 Jan 2009 - 2:06 pm | तात्यालबाड

अवांतर : रोहित राउतच्या वयाची मुलं पालकांच्या मनावर वाईट परिणाम होईल म्हणून टीव्हीवरचे तथाकथित अश्लील वगैरे चॅनल (चाईल्ड लॉक फॅसिलिटी वापरून ) कुलुपबंद करून ठेवतात हो हल्ली,, त्यामुळे बिचार्‍या अवधूतवर कशाला घसरताय?

@) [(

जिथे अनेक 'मोठ्यांचे' सिनेमे रोज घराघरात दूरचित्रवाणीतून अवतरतात, चित्रपटगृहांमधून दाखवले जातात, तिथे अवधूतच्या वाक्याचा कितीसा व काय परिणाम गृहीत धरण्याजोगा आहे?

१००% सहमत

मानसी मनोजजोशी's picture

30 Jan 2009 - 4:51 pm | मानसी मनोजजोशी

सारेगमपने या मुलांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
त्यांच्या करिअरला एक दिशा दिली आहे. एवढ्या लहान वयात संगित क्षेत्रातील मोठ मोठ्या लोकांसमोर गायची संधी या मुलांना मिळाली , त्यान्चे मार्गदर्शन या मुलांना मिळाले. या जमेच्या बाजू सोडून नको त्या गोष्टींची चिन्ता कशासाठी??
आणि तस पहिल तर हि मुल अगदिच लहान नाहित अपवाद फक्त मुग्धाचा.या वयाच्या मुलांना थोडीफार समज नक्किच असते आणि अशी चेष्टा-मस्करी या मुलांना नविन नसते . एक मात्र नक्की जर या मुलांवर पालकांच्या अपेक्षेच ओझ असेल तर मात्र परिणाम होइल . पण याला अवधुत आणि पल्लवि नक्किच जबाबदार नाहित ना?

रेवती's picture

30 Jan 2009 - 7:47 pm | रेवती

अश्याप्रकारच्या स्पर्धा घेताना चॅनलवाले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे बोट ठेवायला जागा देणार नाहीत.
बाकी त्या मुलांचं सगळं ठीक चाललय असे वाटते आहे. लहान वयात किंवा योग्य वयात त्यांना जुन्या जाणत्या
मंडळींकडून मार्गदर्शन मिळत आहे. मुलं जरा दमल्यासारखी मात्र वाटतात आजकाल. पण आता थोडे दिवसांचा प्रश्न आहे.
एकदा मेगाफायनल झाली की पुन्हा नेहमीचं जीवन सुरू. थोडे दिवस लोक जरा त्रास देतात, पण काही हरकत नाही.
चालायचच.:)

रेवती

आचरट कार्टा's picture

30 Jan 2009 - 10:37 pm | आचरट कार्टा

मला नाही असं वाटत!
कारण या मुलांमधे जी चमक आहे, त्याच्या जिवावर ती इथे आहेत. त्या सरावाचा वगैरे फार त्रास नाही वाटत. किंबहुना नवीन काही शिकायला मिळतंय, ही भावना असते. हा माझा तर्क नव्हे, प्रथमेशसारख्यांनी सांगितलंय.
राहता राहिला प्रश्न बालपण टिकवण्याचा, तर मग एकदा प्रअनुभवा.शक्य झाल्यास अनौपचारिक जागी प्रत्यक्ष भेटा, आणि त्याचा आचरटपणा अनुभवा. परिस्थिती त्या मानाने बरीच चांगली आहे. :)
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !