जलजिराच्या गोळ्या.
साहित्य:१टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, ५० , १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर
कृती :काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून पावडर करुन घेणे. सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा.
बडीशेप
साहित्य: अर्धा किलो मोठी बडीशेप्,दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्,लिन्बू टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे
कृती: गार पाण्यात हळ्द, मीठ, लिन्बू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून बाकीचे साहित्य मिसळा.
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 2:31 am | समिधा
छान आहे, जलजिराच्या गोळ्या जास्ती आवडल्या. पटकन बनवता येतिल. या सगळ्या बरोबर त्या चिंचेच्या गोळ्या बनवतात त्याची पण कृती येत असल्यास दे.
;;)
30 Jan 2009 - 2:57 am | चकली
मुखवास च्या पाकृ वाचनात येत नाहीत. अशा वेगळ्या पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद!
चकली
http://chakali.blogspot.com
30 Jan 2009 - 3:07 am | बिपिन कार्यकर्ते
मस्तच. लहानपणी असलं खूप खाल्लंय.
अवांतरः एक ४-५ किले इकडे पाठवून द्या.
बिपिन कार्यकर्ते
30 Jan 2009 - 9:22 am | अवलिया
एक ४-५ किले इकडे पाठवून द्या.
किले? किले कशाला बुवा?
--अवलिया
काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.