"मी वेळ" म्हणजे नक्की काय असे विचाराल तर, काही वेळ जो तुम्ही फक्त स्वतः करता घालवता. आता विचाराल की स्वत: करता असा वेगळा वेळ कशाला द्यायला पहीजे?
त्यामुळे, माझ्या मते प्रत्येकाने स्वत: करता दररोज १० मि. वेळ जरुर द्यावा. आता प्रश्न पडेल की मी हे लिहील आणि स्वत: करता वेळ देते की नाही? जरुर देते; दररोज देते अस नाही पण आठवड्यातुन ३-४ वेळा माझ्या संगिताच्या रियाझाच्या निमित्यानी ३०-४० मि. स्वत: करता दिल्या जातात.
तुम्ही पण स्वत: करता वेळ देउन पहा आणि काही फरक जाणवतो का ते बघा. :)
प्रतिक्रिया
29 Jan 2009 - 12:29 am | पिवळा डांबिस
हात्तिच्या, ते तर करतोच की!!
फक्त,
आमच्या "मी वेळे"ला "मिपा वेळ" असेही म्हणतात!!!!
मिपावर रोज काही वेळ ज्ञानसंवर्धन करून आम्ही लईच तरतरीत होतो (आणि उरलेल्या इतर क्षेत्रांत **मस्ती करायला मोकळे होतो!!!!:) )
29 Jan 2009 - 12:32 am | अनामिक
स्वत: करता वेळ द्यायचा म्हणजे या वेळेत नक्की काय करायच? कारण माझं असं मत आहे की आपण दिवसभर (आणि रात्रीसुद्धा ;) ) जे काही करतो ते आपल्या साठीच असते. बरं तुम्ही म्हणता तसा वेळ दिला तरी त्यामूळे टेंशन कमी कसं होतं? माझं असं मत आणि अनुभव आहे की टेंशन असले तर तुम्ही काहीही करा तुमच्या डोक्यातले विचार (ज्या बद्दल टेंशन आहे ते) काही कमी होत नाही. जरा विस्ताराने समजावून सांगा बरं!
अनामिक
29 Jan 2009 - 12:55 am | फटाकडी
स्वत: करता वेळ हा "आई/ स्त्री" हीच्या करता उद्देशुन होता. पण म्हटल 'Discrimination' करतात अस सगळे पुरुष बोंबलतील, म्हणुन सगळयांना अस अनुबोधल. तेव्हा "आई/ स्त्री" जे पण करते दिवसभर (आणि रात्रीसुद्धा ;) ) नवरा आणि घराकरताच करते.
तेव्हा सगळ्या "आई/ स्त्री" यांनी स्वत: करता वेळ हा कढावाच. :)
29 Jan 2009 - 2:16 pm | शंकरराव
लेखिकेचा विचार योग्य आहे,
स्वः ला जाणीवेतून दिलेली वेळ हिच खरि वेळेची ईथे व्याख्या होईल
पुढे सविस्तर लिहु...
29 Jan 2009 - 9:33 am | मधु मलुष्टे ज्य...
स्वत: करता वेळ देणे म्हणजे एक अशी वेळ ज्या वेळेत आपण आपले आवडीचे काम करु शकु. असंच ना? काहींना एकटेपणात जास्त टेंशन येते मग ते दुसर्याबरोबर ती वेळ घालवतात. काहींना कुणाचा सहवास जास्त टेंशन देतो मग एकटे राहतात. माझा एक मित्र स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडुन घेतो अर्धा-एक तास. प्रत्येकाची आवड.
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
29 Jan 2009 - 11:15 am | झेल्या
लिहिण्याचा विचार करतोय... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )