गाभा:
मित्रहो...
रामसेना आणि मनसे ...
काल बातमी वाचली... वृध्द आणि स्त्रियांना मारहाण.
आजच्या पेपरला बातमी वाचली. मनसे ने माफि मागितली आहे झाल्या प्रकाराबद्दल.
कार्यकर्ते हे स्वघोषित नेत्ते झाले आहेत कां?
ही अशी मार हाण कितपत योग्य आहे ( रामसेना असो की मन्से असो)??
http://tinyurl.com/dyrnwo
प्रतिक्रिया
28 Jan 2009 - 10:28 am | मधु मलुष्टे ज्य...
इथे एक मुलींना मारहाणीचा व्हिडिओ मिळाला . पण नक्की मारहाण का केली हे कळाले नाही.
--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.
28 Jan 2009 - 10:37 am | मराठी_माणूस
महिंलावर हात टाकणे हे भेकडपणाचे लक्षण आहे
28 Jan 2009 - 1:09 pm | विसोबा खेचर
सहमत आहे! गांडू आहेत साले!
28 Jan 2009 - 10:44 am | घाशीराम कोतवाल १.२
महिंलावर हात टाकणे हे भेकडपणाचे लक्षण आहे
याच्याशी सहमत
मनसे ने प्रजासत्ताक दिनी भोजपुरी कार्यक्रम केल्याचा कांगावा करत नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांची धुलाई केली, तर याच मनसेच्या विद्यार्थी कार्यर्कत्यांनी मुंबई विद्यापीठात 'मराठी'सह भाषा विषय परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक केल्याचा राग मंगळवारी रजिस्ट्रारांची केबिन फोडून व्यक्त केला.
तर आपल्या बातमीत काहि तरी गफलत आहे महेंद्र जर विचार पुर्वक बातमी देत जा
विनाकारण त्रास होईल ईतरांना
आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा
हे जरा जुन आहे
28 Jan 2009 - 4:39 pm | महेंद्र
अहो, मी स्वतहा पाहिली बातमी टिव्हीवर म्हातार्याना मारहाण करतांना. आणि त्या मुलिला केलेल्या मारहाणी ची लिंक मेल मधे आलीहोती. ते पाहिलं आणि आपण सूसंस्क्रुत समाजाचा भाग आहोत हे विसरल्यासारखं झालं.मुद्दामवा लिंक पेस्ट नाही केली ब्लॉग वर. पण मला मनापासुन वाईट वाटलं...
28 Jan 2009 - 11:05 am | दशानन
भ्याड आहेत लेकाचे !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
भारत-श्रीलंका सामना थेट प्रेक्षेपण
28 Jan 2009 - 4:28 pm | प्रनित
ह्यात कसली मर्दानगी?
कुठे होते हे लोक जेव्हा ताज्मध्ये आतिरेकी घुसले होते.
28 Jan 2009 - 7:58 pm | संदीप चित्रे
च्यायला... त्या मेंगलोरमधल्या मुली पबमधे गेल्या म्हणून काही 'संस्कृती रक्षकांनी' त्यांना मारहाण केली.
काय संबध ? 'संस्कृती रक्षणाच्या' नावाखाली मारहाणीचा अधिकार कोणी दिला ?
त्यातही मुलींना मारून तर ह्यांनी फार मोठे तीर मारले आहेत ... आणि म्हणे 'श्रीराम सेना' !!! X(