विंनती

श्रेया's picture
श्रेया in काथ्याकूट
27 Jan 2009 - 5:38 pm
गाभा: 

आपल्या मिपाच्या सभासदानां विंनती आहे एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे उगाच नको ते विचार मांडंयची गरज नाही

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 5:40 pm | सखाराम_गटणे™

एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे
हे वाचायच्या आधी कसे समजणार???

बाकी तुमचे नाव कुठे तरी एकल्या सारखे वाटते आहे.

दशानन's picture

27 Jan 2009 - 5:41 pm | दशानन

मॅडमच्या विचारांशी १००% सहमत.

माझी मिपावर मित्रांना विनंती आहे की मॅडमी ची विनंती लक्ष्यात घेता त्यांचे लेखन फक्त वाचावेत आपले मत व्यक्त करु नये, पण मॅडम अश्यानं तुमचा लेख काही मिनिटातच गायब होऊन मागे पडेल त्यांचे काय ? त्यात तुम्ही मांडलेले विचार लोकांपर्यंत पोहचणार कसे ? ह्याचा ही विचार करावा.

कृपाभिलाषी !

कार्ट

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

सहज's picture

27 Jan 2009 - 5:46 pm | सहज

अहो जर तुम्हाला इतरांचे विचार जाणुन घ्यायचे नसतील तर कृपया फोरम मधे न मांडता आपल्या ब्लॉगवर लिहणे उचित.

अहो असे वेगळ्या विचारांना घाबरुन चालणार नाही.

काही "नको ते असेल" तर संपादकांच्या नजरेस आणून द्या ते नक्की कारवाई करतील.

कळावे ही विनंती. आपण देखील आपल्या धाग्यात विचारलेल्या योग्य प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

उदा. मंगळसूत्र का घालतात? त्याचे महत्त्व काय आहे?

अमेरिकेसारखे वागुन चालणार नाही म्हणजे काय?..

आपल्याला पटते का?

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 6:01 pm | नितिन थत्ते

अहो असे कसे चालेल? काथ्याकुटात प्रश्न टाकायचा आणि मग काथ्या कुटण्याच्या आवाजाचा त्रास होतो असे म्हणायचे हे कसे जमायचे बॉ?

तुम्ही नको ते विचार (आमच्या दृष्टीने) मांडले तर आम्ही ते खंडणारच की.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

दशानन's picture

27 Jan 2009 - 6:02 pm | दशानन

नवीन सदस्याच्या प्रत्येक नवीन लेखनाला कमीत कमी ६०% प्रतिसाद हे १००% मान्य, सहमत आहे, +१ अश्या पध्दतीचे असावेत असा मी ठराव मांडतो, ह्यामुळे त्यांना प्रोत्साहान मिळेल.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2009 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार

>>ह्यामुळे त्यांना प्रोत्साहान मिळेल.
== पण प्रोत्साहन देणारे त्यांना दुश्शासन वाटतात त्याचे काय ?

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

काथ्या कुटण्याचा त्रास घेणारान्वर एक प्रकारे बन्दीच म्हणावी काय?

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

मीनल's picture

27 Jan 2009 - 6:35 pm | मीनल

अहो ,नको ते विचार म्हणजे `विषयांतर करणारे विचार` असतील हो!

समझा करो यार!

मीनल.

झेल्या's picture

27 Jan 2009 - 6:40 pm | झेल्या

सगळ्यांनाच आपापले विचार मांडू वाटतात ना....
म्हणून सगळ्यांना काही ना काही लिहू वाटते...
ज्यांना काथ्या कुटू वाटतो ते कुटतील...
तुम्हाला सोडू वाटले तर सोडून द्या

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

इनोबा म्हणे's picture

27 Jan 2009 - 6:49 pm | इनोबा म्हणे

आपल्या मिपाच्या सभासदानां विंनती आहे एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे
बरं बरं

उगाच नको ते विचार मांडंयची गरज नाही
तुम्हाला वाचकांचे विचार नको असतील तर लेखाच्या सुरुवातीला किंवा शेवटाला नक्की कशाप्रकारचे प्रतिसाद नकोत किंवा कशाप्रकारचे हवेत हे लिहून ठेवा.कारण 'नको ते' म्हणजे नक्की कसले ते आम्हाला अजूनही कळाले नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

झेल्या's picture

27 Jan 2009 - 6:52 pm | झेल्या

हा 'नको तो' काथ्याकूट का चालू केला आहे बरे?

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

इनोबा म्हणे's picture

27 Jan 2009 - 7:08 pm | इनोबा म्हणे

आपण झेलावा म्हणुन... :)

(झेलमचा नावाडी) -इन्या
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर