आपल्याला पटते का?

श्रेया's picture
श्रेया in काथ्याकूट
27 Jan 2009 - 5:20 pm
गाभा: 

आज जग २१ व्या शतकात आहे आपण प्रगती केली
जुने विचार बदलले पाहिजेत हे मान्य पण आज काही लग्न झालेल्या बायका मंगळसुञ घालत नाही हेच चिञ T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी दिसते काळाबरोबर बदल केला पाहिजे पण मंगळसुत्र न घालणे हे पटत नाही ती फॅशन नसुन त्याला काही महत्व आहे आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे

आपण भारतीय आहोत अमेरिके सारखे वागुन जमणार नाही आपला भारत विविध समृध्दिनी , संस्कारांनी नटलेला देश आहे आणि आपण तो ठेवणार आहोत

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 5:22 pm | सखाराम_गटणे™

माझ्या बायकोने माझ्या नावाचे मंगळसुञ घालावे असे वाटते, बाकेच्या बायका काय करतात त्यांचे ते बघुद्यात.

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 5:25 pm | ब्रिटिश टिंग्या

बाके कोण? अन् त्याला बर्‍याच बायका आहेत वाटतं! ;)

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 5:30 pm | सखाराम_गटणे™

बाके कोण? अन् त्याला बर्‍याच बायका आहेत वाटतं!
वाके चा मावसभाउ, बाके

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 5:52 pm | ब्रिटिश टिंग्या

तो युके ला असतो का ;)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

झेल्या's picture

27 Jan 2009 - 6:42 pm | झेल्या
सुचेल तसं's picture

27 Jan 2009 - 5:23 pm | सुचेल तसं

हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

झेल्या's picture

27 Jan 2009 - 6:49 pm | झेल्या

'प्रत्येकीचा' असं म्हणायचं होतं का? :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 6:57 pm | नितिन थत्ते

प्रत्येकीचाच प्रश्न असायला हवा. प्रत्ये'का'चा काही संबंध नाही यात.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सुचेल तसं's picture

27 Jan 2009 - 7:03 pm | सुचेल तसं

येस... प्रत्येकीचा असच म्हणायचं होतं.. स्लीप ऑफ की-बोर्ड

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

30 Jan 2009 - 8:26 pm | विसोबा खेचर

हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

आम्हीही हेच म्हटले आहे.

पण एक मात्र आहे, मंगळसूत्र घातलेली बाई का कुणास ठाऊक पण दिसते मात्र छानच हो! बाई गोरी असेल तर काळ्या मंगळसूत्रामुळे तिच्या गळ्याचं गोरेपण अगदी उठून दिसतं! ;)

आपला,
(कलासक्त रसिक!) तात्या :)

दशानन's picture

27 Jan 2009 - 5:25 pm | दशानन

>>>संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे

हे कालानूसार बदलत असते, जर तुम्ही पण कालानूसार बदलला नाही तर कालबाह्य व्हालं !

हे माझं मत आहे... बाकीच्यांचे माहीत नाही.

बाकी,

तुम्ही हा विषय अजून व्यवस्थीत मांडायला हवा होता... पण तरी ही एक साधक-बाधक चर्चा होऊ शकेल ह्यातून !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 5:27 pm | लिखाळ

मंगळसूत्र का घालतात? त्याचे महत्त्व काय आहे?

अमेरिकेसारखे वागुन चालणार नाही म्हणजे काय?..
-- लिखाळ.

सखाराम_गटणे™'s picture

27 Jan 2009 - 5:31 pm | सखाराम_गटणे™

मंगळसूत्र का घालतात? त्याचे महत्त्व काय आहे?
मंगळसूत्र ला काही ठिकाणी लायसन्स पण म्हणतात.

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 5:30 pm | विनायक प्रभू

अमेरिका मंगळ्सुत्र घालते की काय? असेल तर कुणाचे.

अविनाशकुलकर्णी's picture

27 Jan 2009 - 5:51 pm | अविनाशकुलकर्णी

मान्य्,,निदान..T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी तरी त्यांनि मंगळ सुत्र घालावे

इनोबा म्हणे's picture

27 Jan 2009 - 6:55 pm | इनोबा म्हणे

मान्य्,,निदान..T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी तरी त्यांनि मंगळ सुत्र घालावे
नाही घातले तर काय फरक पडतो? शेवटी एखाद्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. त्याने समाजाचे काय नुकसान होते?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल's picture

28 Jan 2009 - 9:26 pm | शितल

इनोबा यांच्या मताशी सहमत.

सखाराम_गटणे™'s picture

28 Jan 2009 - 9:29 pm | सखाराम_गटणे™


सहमत

नीधप's picture

29 Jan 2009 - 11:50 pm | नीधप

+ १
अवांतरः हे अधिक एक चं प्रकरण उत्तम आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अवलिया's picture

27 Jan 2009 - 7:25 pm | अवलिया

त्यांनि मंगळ सुत्र घालावे

कुठे घालावे?

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

मीनल's picture

27 Jan 2009 - 5:51 pm | मीनल

मला काही वाटत नाही की लग्न झाल्याच प्रतिक म्हणून मंगळ्सूत्र घालाव.
ते मनातूनच वाटायला हवं.मानायला हव आणि टिकवायला हव.
नाही तर मंगळ्सूत्र घालायच एकाच्या नावाने आणि मनात दुसराच.कसल काय?

केवळ मंगळ्सूत्र घालून संस्कृती , संस्कार , परंपरा याचे जतन होत नाही .आचार ,विचार ही हवेत. केवळ पेहराव ,आभूषण उपयोगी नाहीत.

मी एक दागिना म्हणून घालते मंगळ्सूत्र.भारतीय साणांना ,पूजेला ,हळदी कूंकाला आवर्जून घालते.भारतीय कपड्यावर छानच वाटतो.

माझ्या नव-याचा ही मंगळ्सूत्र घालाव असा अट्टहास नाही.

विवाहित नवरे कुठे घालतात मंगळ्सूत्र?
अहो होहहोह्हो !
अश्या परंपरा जतन करायच काम तर स्त्रीयांचच नाही का?

तशीतर आपली नऊवारी साडी नेसायची परंपरा आहे. किती जणी नेसतात महाराष्ट्रात सुध्दा.मी खेडे गावात जीन्स घालणा-या विवाहीत पाहिल्या आहेत.पंजाबी ड्रेस तर सर्रास घालतात.त्यात मला त्यांनी परंपरा सोडली अस वाटत नाही.

माझ वैयक्तिक मत सांगितलं.
शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.

मीनल.

दशानन's picture

27 Jan 2009 - 5:55 pm | दशानन

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

किट्टु's picture

27 Jan 2009 - 6:03 pm | किट्टु

+१!!!

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 6:20 pm | नितिन थत्ते

तशीतर आपली नऊवारी साडी नेसायची परंपरा आहे

खरी परंपरा पाळायची तर स्त्रियांनी छातीभोवती वक्षस्थळे झाकण्यापुरते एक कापड गुंडाळायला पाहिजे (म्हणजे हल्ली ज्याला ट्यूब टॉप म्हणतात ते) त्यावर एक ओढणी आणि खाली धोतरासारखे वस्त्र घालायला पाहिजे.
पुरुषांनी अर्थातच धोतर व उपरणे घालायला हवे. (पँट वगैरे बाद)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

ऍडीजोशी's picture

28 Jan 2009 - 1:01 pm | ऍडीजोशी (not verified)

विवाहित नवरे कुठे घालतात मंगळ्सूत्र?
अहो होहहोह्हो !
अश्या परंपरा जतन करायच काम तर स्त्रीयांचच नाही का?

हे काय चाललंय?????????????????

मंगळसूत्र न घालण्यासारखीच आजकाल उगाच पुरुषांना झोडपायची पण फॅशन आली आहे. मंगळसूत्र न घालणार्‍या बायकांची मानसीकता 'ही संस्कॄती आहे होय, मग आम्ही पुढारलेल्या असल्याने ती पाळणार नाही' अशी असते. मंगळसूत्र का घालायचं माहिती नाही आणि का नाही घालायचं ह्याचं ठोस कारणही नाही.

बायकांनाही स्वत: च्या सोयी प्रमाणे सगळ्या गोष्टी हव्या असतात. संस्कृतीचे बंधन म्हणून मंगळसूत्र नको म्हणतात पण मग बाकीच्या दागीन्यांचा आणि साड्यांचा / कपड्यांचा सोस कमी होत नाही. लग्नात मुलाकडून किमान ५ साड्या द्याव्याच लागतात. आणि त्या पण पैठणी, कांजीवरम असल्या भारीतल्या लागतात. पाटल्या, बांगड्या, चपलाहार, कानातली, नथ, पैंजण, वळी, कमरपट्टा, बाजूबंद इतके सगळे दागीने लग्नात हौसेने घालता मग नवर्‍याची इच्छा म्हणून तेव्हढा एक दागिना घालणं इतकं जाचक आहे का?

सोडायचं असेल तर सगळंच सोडा ना. कुणी थांबवलंय? आणि विचारायला तरी कोण येतंय? व्हा की पूर्ण इंग्रजाळलेले.

पुरूष मंगळसूत्र घालत नाहीत हे कबूल आहे. पण मग ब्राम्हण बायका तरी कुठे आयुष्यभर जानवं घालतात? त्यांची कुठे मुंज होते नी चकोट केला जातो? अशा अनेक गोष्टी पुरूषांच्या बाजूनेही आहेत.

सगळ्यात वाईट म्हणजे स्वत: च्या आप्तांना स्वत: च्या हातानी अग्नी देण्याचं कामही पुरूषच करतात. वर कितीही दु:ख झालं तरी रडायचं नाही अशी तंबी आई-आजी ह्या बायकाच देताता त्या बद्दल काय म्हणणं आहे? जुन्या काळी टोपी न घालता बाहेर पडलं तर 'बाप मेला काय तुझा?' असा उद्धारही मुलांचाच होत असे.

उठ-सूट पुरूषांना धरून चोपण्यापेक्षा जरा डोळे उघडे ठेवले तर संस्कॄती पाळण्याची जबाबदारी पुरूषांवरही आहे हे दिसेल.

सखाराम_गटणे™'s picture

28 Jan 2009 - 1:19 pm | सखाराम_गटणे™

अगदी बरोबर.
हेच म्हणतो.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 2:02 pm | नितिन थत्ते

पुरुषांना झोडपत नाहीयेत त्या.
तुम्ही जे पूर्वीचे दाखले देत आहात त्या रूढींतून पुरुषांनी आपली सुटका कधीच करून घेतली आहे. टोपी घालणे, जानवे घालणे वगैरे.
जी गोष्ट फक्त पुरुषाचा अधिकार समजली जाते (अग्नी देणे) त्याला संस्कृती टिकवण्याचे बंधन म्हणून कांगावा करणे म्हणजे गंमतच आहे.

बायकांच्या बाबतीत मात्र काथ्या अजून कुटला जात आहे.
दु:खाची गोष्ट म्हणजे हा काथ्या एका स्त्रीनेच कुटायला घेतला आहे.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

ऍडीजोशी's picture

28 Jan 2009 - 3:33 pm | ऍडीजोशी (not verified)

आप्तांना अग्नी देणे ह्या क्लेशदायक क्रियेला अधिकार समजला जातो आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून घातलं जाणारं मंगळसूत्र जाचक वाटतं :) चांगलंय.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2009 - 9:20 pm | llपुण्याचे पेशवेll

एक नंबर ऍड्या. लई भारी हाणलाय.

पुण्याचे पेशवे
Since 1984

धमाल मुलगा's picture

28 Jan 2009 - 3:04 pm | धमाल मुलगा

एक नंबर.

१.संस्कृतीचे बंधन म्हणून मंगळसूत्र नको म्हणतात पण मग बाकीच्या दागीन्यांचा आणि साड्यांचा / कपड्यांचा सोस कमी होत नाही.
-सगळे दागीने लग्नात हौसेने घालता मग नवर्‍याची इच्छा म्हणून तेव्हढा एक दागिना घालणं इतकं जाचक आहे का?

२.पुरूष मंगळसूत्र घालत नाहीत हे कबूल आहे. पण मग ब्राम्हण बायका तरी कुठे आयुष्यभर जानवं घालतात? त्यांची कुठे मुंज होते नी चकोट केला जातो?

३.सगळ्यात वाईट म्हणजे स्वत: च्या आप्तांना स्वत: च्या हातानी अग्नी देण्याचं कामही पुरूषच करतात. वर कितीही दु:ख झालं तरी रडायचं नाही अशी तंबी!

ह्यातल्या एकाही गोष्टीवर कोणीही अवाक्षरही काढलेलं नाही!!!!!!!
काय करता सायबा, सगळं सोयीचं सवडीशास्त्र आहे, झालं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2009 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंतर काही लिहिणार नव्हते, पण या खालच्या वाक्यामुळे कीबोर्ड (तलवारीसारखा) उपसला.
ह्यातल्या एकाही गोष्टीवर कोणीही अवाक्षरही काढलेलं नाही! काय करता सायबा, सगळं सोयीचं सवडीशास्त्र आहे, झालं.

निषेध! मी साधारणपणे चष्मा (किंवा कॉण्टॅक्ट लेन्सेस) आणि घड्याळ सोडून एकही दागिना घालत नाही; त्यामुळे "सोयीचं सवडीशास्त्र"चा व्यक्तीगत निषेध! त्यातूनही, मी कमावते, मी दागिने घालते; कोणते दागिने घालते हा दुसर्‍या कोणत्याही माणसाचा प्रश्न नाही.

सक्ती म्हणून एखादा दागिना वापरणं आणि आवडीने एखादा दागिना घालणं यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सक्ती आणि आवड यात अंमळ अंतर आहे ते समजून घ्या आणि मग दागिने-पैठण्यांचा आवड, सोस आणि मंगळसूत्र न घालणं याबद्दल बोला. जानव्याबद्दल थोडासा(च) आवाज झाला, पण खरोखर किती मुंज झालेल्यांचं जानवं आहे का नाही हे पाहिलं जातं आणि किती सहजपणे "हे काय, तू मंगळसूत्र नाही घालत" हे कानावर येतं याचा थोडा विचार करा. माझ्या भावाला कोणीही विचारत नाही "तुझं जानवं कुठे आहे?" पण मला मात्र महिन्यातून सरासरी दोन प्रश्नकर्ते भेटतात मंगळसूत्राची चौकशी करणारे!

ब्राह्मण बायकांची मुंजच होत / करत नाहीत त्यामुळे त्या जानवं का घालत नाहीत, एकदातरी चकोट का करत नाहीत हा मुद्दा असूच शकत नाही (null and void). करणार आहात का तुमच्या घरातल्या मुलींची मुंज?

माझ्या माहितीत अनेक मुली/स्त्रिया आहेत ज्यांनी लहान भावाला या वयात स्मशानात यायला लागू नये म्हणून वडिलांना अग्नी दिला आहे. मुलींनी स्मशानात येण्याची गोष्ट जरी केली तरी त्याला किती विरोध होतो हे मी पाहिलं आहे; माझ्याच एका मैत्रीणीने अगदी लहान भावाला स्मशानात यायला लागू नये म्हणून वडीलांना अग्नी दिला होता, मी तिच्याबरोबर तेव्हा होते. तिने हे करू नये म्हणून तिचेच पुरूष नातेवाईक मला सांगत होते तिला समजाव म्हणून! तिथल्या बर्‍याचश्या स्त्रियांचं म्हणणं होतं की या कोवळ्या पोराला तिथे नेण्यापेक्षा मोठ्या मुलीनेच हे करावं, जिला पूर्ण समज आहे. हे एकच उदाहरण झालं पण यातून समाजाची मानसिकता स्पष्ट व्हावी.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

ऍडीजोशी's picture

28 Jan 2009 - 3:44 pm | ऍडीजोशी (not verified)

पण खरोखर किती मुंज झालेल्यांचं जानवं आहे का नाही हे पाहिलं जातं

स्वानुभवावरून बोलतोय, आम्हाला विचारलं जायचं. मी अजूनही जानवं घालतो आणि अभक्षभक्षण करत नाही.

मला मात्र महिन्यातून सरासरी दोन प्रश्नकर्ते भेटतात मंगळसूत्राची चौकशी करणारे!

हा भोचक प्रश्न विचारणार्‍यांमधे बायका किती आणि पुरूष किती?

करणार आहात का तुमच्या घरातल्या मुलींची मुंज?

आम्ही काय करणार हा मुद्दा नाहिये. मंगळसूत्र घालणं ही जशी रुढी आहे तशीच ही पण आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे ब्राह्मण बायकांची मुंजच होत / करत नाहीत त्यामुळे त्या जानवं घालत नाहीत त्याच प्रमाणे पुरूषांनी मंगळसूत्र घालायची प्रथा नसल्याने पुरूष मंगळसूत्र घालत नाहीत. त्यामुळे हा मुद्दा असूच शकत नाही (null and void)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2009 - 4:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या भावाला खरोखर कोणीही विचारत नाहीत जानव्यावरून! अगदी एखाद महिना झाला असेल मुंजीला आणि प्रश्न थांबले. माझं तर सोडंच पण माझ्या ६२+ वय असलेल्या काकूंनाही या प्रश्नाची सरळ नाही तरी आडून आडून पृच्छा होते; त्यांच्या लग्नाला झाली असतील कमीतकमी ३५ वर्ष! तूही म्हणतोस की विचारलं जायचं ...

हा भोचक प्रश्न विचारणार्‍यांमधे बायका किती आणि पुरूष किती?
साधारण ६०% बायका आणि ४०% पुरूष! मागून शेरे मारलेले (आणि माझ्यापर्यंत बातमी फुटली) आहेत त्याचं प्रमाण साधारण सारखंच. आणि वयाचंही काही बंधन नाही, साधारण माझ्या वयापासून अगदी ९० वर्षांपर्यंत ... अगदी भोचक प्रश्न नाही तरी अगदी डोळे विस्फारून, या विषयावर मुद्दाम होऊन बोलणार्‍यांचं प्रमाणंही साधारण ५०-५० टक्के.

त्याच प्रमाणे पुरूषांनी मंगळसूत्र घालायची प्रथा नसल्याने पुरूष मंगळसूत्र घालत नाहीत. त्यामुळे हा मुद्दा असूच शकत नाही
म्हणजे फक्त प्रथा आहे म्हणून मंगळसूत्र घालायचं का? मग सतीची प्रथाही होतीच ना, विधवा पुर्नविवाह न करण्याचीही प्रथा होतीच ना, हुंडा देण्या-घेण्याची प्रथा आहेच ना ...
नाही पाळली काही मुली, बायकांनी ती प्रथा तर एवढा गोंधळ का घातला जातो?
आणि त्यातसुद्धा बघ, जानवं, मुंज, चकोट हे फक्त काही पुरूषांनाच आहे, पण मंगळसूत्र, टिकली/कुंकू हे मात्र तमाम बायकांना? तुलनाच चुकीची वाटते.

उदा. भाऊ लहान असल्याने मोठ्या जाणत्या बहिणीने भडाग्नी देणे वगैरे. कुठेसं वाचल्याचं स्मरतं की एके ठिकाणी एक विदुषी दशक्रियाविधी इत्यादी करतात.
मुलीने भडाग्नीच का द्यावा? सगळ्यांची इच्छा असेल तर तेव्हा का विधीवत् अग्नी दिला जाऊ नये? असो, तो मुद्दा नाही. मी ज्या एकमेव वेळेला स्मशानात गेले होते, तेव्हा माझ्या मैत्रीणीने अगदी विधीवत् वडीलांना अग्नी दिला होता.
किती मुली/स्त्रिया स्मशानात येण्याच्या स्थितीत असतात याचं उत्तर माझ्या बघण्यात विचारशील तर अनेक. त्यांना घरचे इमोशन ब्लॅकमेलिंग करून घरात थांबवून ठेवतात का? हो.

पतीची इच्छा ही सक्ती वाटत असेल तर बोलणंच खुंटतं की हो.
पत्नीला असं वाटावं यातच लग्नसंबंधातल्या नात्याचं मूल्यमापण व्हावं. या प्रश्नाचं उत्तर तिसर्‍या कोणाला देण्यापेक्षा आपणच आपला विचार केलेला उत्तम!

मुद्दाम होऊन देखावा करून मी मंगळसूत्र घालत नाही याचं प्रदर्शन करावं असं माझं मत नाही; पण कोणी काय दागिने घालावे ही व्यक्तीगत आवड आहे. किंवा 'आज मला मंगळसूत्र घालायचं आहे/नाही' ही सुद्धा व्यक्तीगत आवड आहे.

जाता जाता: संस्कृती ही मातीचं मडकं नाही जी कोणी काय कपडे आणि दागिने घालतं/घालत नाही त्यावरून तुटून, मोडून जावी.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

ऍडीजोशी's picture

28 Jan 2009 - 4:53 pm | ऍडीजोशी (not verified)

तूही म्हणतोस की विचारलं जायचं ...

जायचं म्हणतोय कारण विचारल्यावर जानवं आहे हे त्यांच्या लक्षात यायचं. मग त्या नंतर ते प्रश्न थांबले. म्हणून जायचं असं लिहीलंय.

मग सतीची प्रथाही होतीच ना, विधवा पुर्नविवाह न करण्याचीही प्रथा होतीच ना, हुंडा देण्या-घेण्याची प्रथा आहेच ना ...

सती, हुंडा, केशवपन सारख्या हीन प्रथा बंद पाडण्यात आल्या ह्याचा आनंदच आहे. मी त्यांचं समर्थन करत नाहिये. पण तुमच्या म्हणण्यावरून असं वाटतंय की सती जाणे, हुंडा देणे, केशवपन ह्यांसारखीच मंगळसूत्र घालणे ही हीन प्रथा आहे.
आणि ह्या प्रथा मोडण्यात त्या त्या वेळच्या डोकं ताळ्यावर असणार्‍या पुरूषांनीच पुढाकार घेतला आहे.

म्हणजे फक्त प्रथा आहे म्हणून मंगळसूत्र घालायचं का?

ज्या प्रमाणे मुंज ही प्रथा आहे त्याच प्रमाणे मंगळसूत्र घालणं आहे असा अर्थ आहे त्याच्या. आणि हे कळण्या इतक्या आपण नक्कीच सुज्ञ आहात. ह्या दोन्ही प्रथांमागची कारणं वेगळी आहेत.

'आज मला मंगळसूत्र घालायचं आहे/नाही' ही सुद्धा व्यक्तीगत आवड आहे.
सहमत. पण एकंदर आज कालच्या पुढारलेल्या मुलींचा सूर 'मला आवडत नाही म्हणून घालणार नाही' ह्या पेक्षा 'नवरा घालत नाही मग माझ्यावर सक्ती का?' असा येतो. हा बालीशपणा आहे.
आणि महत्वाचं म्हणजे इतर फुटकळ दागीने आणि मंगळसूत्र एकाच तराजूत तोलण्याइतका मी तरी पुढारलेला नाही. बाकी तुमचं चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2009 - 5:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडंसं व्यक्तीगत:

मंगळसूत्र का घालायचं याचं एकही समाधानकारक कारण न सापडल्यामुळे मी ते घालत नाही. इतर दागिनेही मी घालत नाही कारण आळस!

खरोखर मला मुंज केली नाही तर माणूस शिकत नाही का हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने दोन्ही प्रथाच, एकसारख्याच.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

लिखाळ's picture

28 Jan 2009 - 5:10 pm | लिखाळ

परंपरा टिकवण्यासाठी हौसेने त्या अनुसरणे आणि परंपरा टिकल्याच पाहिजेत या कुणा एकाच्या मतासाठी दुसर्‍यावर सक्ती करणे यातल्या फरकावर भर आहे. अनाठायी सक्तीने आपण बंडाला अथवा अवनतीला प्रोत्साहन देत असतो असे वाटते.
-- लिखाळ.

पक्या's picture

30 Jan 2009 - 12:44 am | पक्या

चांगलं हाणलयं , आदितीताई.
च्यामारी , ज्यां बायकांना जे जे दागिने घालायला आवडतील ते त्यांनी घालावेत. त्यात सक्ती कशाला हवीय? आणि
लग्न झाल्यावर नाही घातले मंगळसूत्र बाईने तर काय बिघडले त्यात? मीनल चा मुद्दा बरोबर आहे. पुरूष दाखवतात का उघडपणे लग्न झालेल्याची निशाणी?
आप्तांना अग्नी देण्याचे काम कितीही क्लेशदायक असले तरी करावेच लागते. ज्या पुरषांना ते काम नसेल करायचे त्यांनी घरातील बायकांना सांगावे. ज्यांच्या घरात फक्त मुलीच आहेत तिथे मुलीच अग्नी देण्याचे काम करतात. हे पाहिलेले आहे.

प्रथा आहे म्हणून पाळायची की नाही कालानुरूप ठरवले पाहीजे. बघायला गेलो तर कितीतरी प्रथा आहेत आपल्याकडे...आपण सर्वच त्या पाळतो का? कालानुसार आणि आपापल्या सोयीनुसार त्यात बदल केलेले आहेत किंवा त्या बंद पण झालेल्या आहेत.

'नवर्‍याची इच्छा' ह्याचे समर्थन करणार्‍या पुरषांना कदाचित तेवढीच खात्री वाटत असेल की आपल्या बायकोने(आताच्या किंवा होणार्‍या) मंगळ्सूत्र घातले म्हणजे हिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही...लग्न झालेलं आहे समजतं ना त्यावरून (ह.घ्या.)span>

अदिती,
आपल्या जवळपास सर्वच मुद्द्यांशी सहमत, परंतु आपले हा मुद्दे बरेचसे वैयक्तिक आवडनिवड ह्याखाली येतो असं माझं प्रांजळ मत आहे.
आपल्याला (वैयक्तिकरित्या स्वतःला) दागिने घालायला आवडतात किंवा नाही ही गोष्ट प्रातिनिधीक असणं खचितच शक्य वाटत नाही.
खाली ऍडी म्हणतो त्याप्रमाणे तो भोचक प्रश्न विचारणार्‍यांत स्त्रीया किती आणि पुरुष किती हाही कळीचा मुद्दा आहेच की. ते असो.

काही उदाहरणं नक्कीच प्रशंसनीय आहेत. उदा. भाऊ लहान असल्याने मोठ्या जाणत्या बहिणीने भडाग्नी देणे वगैरे. कुठेसं वाचल्याचं स्मरतं की एके ठिकाणी एक विदुषी दशक्रियाविधी इत्यादी करतात. हा देखील एक स्वागतार्ह बदल म्हणावा लागेल की जिथे केवळ पुरुषांचीच मक्तेदारी होती तिथे एक स्त्री येऊन हे विधी करवून घेते, असो, हा दाखला अवांतराच्या मार्गाने जाण्याची शक्यता वाटते त्यावर जास्त भाष्य नको.
परंतु,
अशी किती उदाहरणं समाजात घडतात? किती स्त्रीया स्वहस्ते भडाग्नी देण्याच्या अवस्थेत असतात?

जानव्याबद्दल म्हणाल तर अजुनही कित्येक घरांत निदान सण-समारंभ, पुजेच्या वेळी जेवायला बसताना हटकून (कधीकधी चेष्टेने का होईना) "जानवं आहे का रे गळ्यात? " असा प्रश्न येतोच. निदान माझ्या पाहण्यातल्या १००तल्या ९९ घरात तरी मी असंच पाहिलेलं आहे.

---------
>>सक्ती म्हणून एखादा दागिना वापरणं आणि आवडीने एखादा दागिना घालणं यात जमीनअस्मानाचा फरक आहे.
पतीची इच्छा ही सक्ती वाटत असेल तर बोलणंच खुंटतं की हो.
(पती-इच्छा संदर्भः ऍडीचा वरचा प्रतिसाद.)

लग्नापुर्वी फारसे दागिने न घालणारी मुलगी, लग्नानंतर मात्र आवडीने निरनिराळे हार,पाटल्या-बांगड्या आणि काय काय दागिने घालुन हौसेने फिरते. मग त्यासोबत एक बारीकसं असलेलं ते मंगळसुत्र गळ्यात घातलं- नवर्‍याची इच्छा म्हणुन म्हणा हवं तर, तर काय बिघडतं? म्हणजे सूर असाच निघतो आहे ना की बाकीचे दागिने हवेत पण मंगळासुत्र नको?
आता कोणि म्हणेल की मंगळसुत्र हे स्त्रीला गुलामगिरीचं प्रतिक आहे म्हणुन ते घालायचं नाही...पण मग तसं इतर दागिन्यांबद्दल का नाही म्हणलं जात? कारण लग्नापुर्वी किती मुली लग्नानंतर जसे दागिने घालतात तसे दागिने घालुन असतात? नगण्य!!! मग रोष मंगळसुत्रावरच का?

बाकी, ऍडीच्या प्रतिसादातल्या Null and Void ह्याच्याशी पुर्ण सहमत.
असो,
माझ्या माहितीतले बरेचसे 'वैचारिकरित्या उच्चभ्रु' लोक मला अतिमागास विचारांचा वगैरे संबोधतात. त्यामुळे माझी मतं ही त्या प्रकारची आढळल्यास ती तशीच आहेत असं समजावे. :)

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 3:25 pm | नितिन थत्ते

धमाल मुलग्यासाठी

३र्‍या मुद्द्याचे उत्तर मी दिले आहे.

१. लग्नात हौसेने सर्व दागिने घालणे आणि एखादा दागिना कायम सक्तीने घालणे यात फरक आहे. नवर्‍याची इच्छा म्हणून वगैरे ठीक आहे पण नवरा अंगठी घाल, मंगळसूत्र नाही घातलेस तरी चालेल असे म्हणत असता तर ठीक आहे. बायकोने मंगळ्सूत्र घालावे अशीच का इच्छा?
(तुमच्या बायकोचा फोन नं द्या. तुम्ही कायम कानाच्या वरच्या बाजूस भिकबाळी घालावी अशी 'इच्छा' व्यक्त करायला सांगतो. मग तुम्ही त्यांची इच्छा म्हणून भिकबाळी घालून फिरा.)

२र्‍या मुद्द्याचेही उत्तर दिले आहे. जानवे वगैरे रूढींमधून पुरुषांनी कधीच सुटका करून घेतली आहे. इच्छा फक्त बायकांच्या बाबतीत व्यक्त केली जात आहे.

संस्कृती संपवण्यास सदैव उत्सुक
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

ऍडीजोशी's picture

28 Jan 2009 - 3:47 pm | ऍडीजोशी (not verified)

मग तुम्ही त्यांची इच्छा म्हणून भिकबाळी घालून फिरा.

अशी उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो. पण मग त्यांना सो-कॉल्ड पुढारलेली जनता 'मागासलेली जमात' समजते.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 4:32 pm | नितिन थत्ते

मी भिकबाळी घालण्याबद्दल म्हणत नाहीये. बायकोची इच्छा म्हणून भिकबाळी घालण्याविषयी बोलतोय.

नवर्‍याला मंगळसूत्राचीच इच्छा का होते?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

धमाल मुलगा's picture

28 Jan 2009 - 4:35 pm | धमाल मुलगा

>>जानवे वगैरे रूढींमधून पुरुषांनी कधीच सुटका करून घेतली आहे.
असहमत! मी आजच्या घडीलाही किती हजारांनी दाखवोन देऊ जानवं धारण केलेले पुरुष?

नवर्‍याची इच्छा म्हणून वगैरे ठीक आहे पण नवरा अंगठी घाल, मंगळसूत्र नाही घातलेस तरी चालेल असे म्हणत असता तर ठीक आहे. बायकोने मंगळ्सूत्र घालावे अशीच का इच्छा?
एकवेळ अंगठी घालू नकोस पण मंगळसुत्र घाल असं म्हणलं तर नक्की काय ठीक नाही? अंगठी काय येऊन जाऊन अर्ध्याएक तोळ्याची...तेच मंगळसुत्र घसघशीत ५-७ तोळ्याचं. दिसायला चांगलं काय दिसेल? :)

(तुमच्या बायकोचा फोन नं द्या. तुम्ही कायम कानाच्या वरच्या बाजूस भिकबाळी घालावी अशी 'इच्छा' व्यक्त करायला सांगतो. मग तुम्ही त्यांची इच्छा म्हणून भिकबाळी घालून फिरा.)

:) एक गंमत सांगतो, मी आपण होऊन वापरत असलेली चापाची भिकबाळी तिच्या 'इच्छे'खातरच वापरणं बंद केलंय.
आणि मला स्वतःला आवडत नसताना (आणि रंग निव्वळ बायकी आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत असतनाही) हल्ली गुलाबी रंगाचे शर्ट्स केवळ तिची 'इच्छा' म्हणुन मी बर्‍याचदा वापरतो.
अर्थात ह्या गोष्टी वैयक्तिक झाल्या, त्या प्रातिनिधीक होऊ शकत नाहीत.

बाकी, संस्कृती म्हणजे काय, ती जतन कशी करावी, का करावी, करावी की नाही? ह्या गोष्टींबाबत बोलण्याइतकी समज, पात्रता माझ्यात तरी नाही...मी आपलं 'मंगळसुत्र' ह्या विषयीचं माझं मत मांडतो आहे.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 7:09 pm | नितिन थत्ते

मी आजच्या घडीलाही किती हजारांनी दाखवोन देऊ जानवं धारण केलेले पुरुष
हजारॉ बायकाही मंगळसूत्र घालतात. पण पुरुषांनी जानवे घालणे पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून असते. बायकांचे मंगळसूत्र मात्र समाजाच्या इच्छेवर.

तुमची भिकबाळी तुम्ही टाय वर घालत होतात का?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2009 - 9:37 pm | llपुण्याचे पेशवेll

हौस म्हणून भिकबाळी घालणारे लोक कायम भिकबाळी घालतात. आमच्या हापिसामधे असे ५-६ जण तरी नक्की दाखवू शकतो.

(एकेकाळी भिकबाळी घातलेला)
पुण्याचे पेशवे
Since 1984

मदनबाण's picture

28 Jan 2009 - 9:46 pm | मदनबाण

ऍडी आणि धमालशी सहमत...
मी सुध्दा चापाची भिकबाळी वापरली आहे.

(जानव घालणारा भट.)
मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 5:53 pm | नितिन थत्ते

वाल्मिकी रामायणात दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आजोळाहून परतल्याच्या प्रसंगाचे वर्णन आहे. आल्याआल्या तो कैकेयीच्या महालात जातो पण दशरथ त्याला दिसत नाही. तो राजा कोठे आहे असे कैकेयीला विचारतो. ती सांगते सारे जण शेवटी जेथे जातात तेथे गेला आहे वगैरे.
सर्व संभाषणात कैकेयी विधवा झाली आहे याचे कोणतेही चिन्ह त्याला कैकेयीकडे पाहून दिसत नाही. म्हणजे त्याकाळी स्त्रिया कुंकू लावीत नव्हत्या आणि मंगळसूत्र घालीत नव्हत्या.
(वरील मत इरावती कर्वे यांनी त्यांच्या संस्कृती या पुस्तकात मंडले आहे)

(संस्कृती नष्ट करण्यास कायम उत्सुक असलेला)
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2009 - 6:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नुसतं मंगळसूत्रंच का, नऊवारी साडी, TV serials मधल्या बायका लावतात तसलं (भडक) कुंकू/टिकली हवी, नवर्‍याच्या उष्ट्या ताटातच जेवायला हवं, पती हाच परमेश्वर समजून तो म्हणेल तेच प्रमाण म्हणायला हवं, मुलींचं शाळेत जाणंही बंदच करायलं हवं (कारण शिकलेल्या मुली नस्ती काहीतरी खुळं आणतात आणि नवर्‍याला घरात अर्ध काम करायला लावतात), हुंडा द्यायला हवा, नवर्‍यापाठून सती जायला हवं ... जाऊ दे हो ... कलीयुग आलं आहे किती कमी अपेक्षा आहेत पण या मुली एवढ्या आगाऊ झाल्या आहेत, काय सांगू हो तुम्हाला!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन's picture

27 Jan 2009 - 6:34 pm | दशानन

सकाळ पासून +१ टंकुन माझी बोटं दुखायला लागली आहेत बॉ !

कोणा कडे मॉ सती सावित्री अथवा अनुसुयाचे चरित्र पुस्तक आहे का :?

वाचायल हवं आहे ओ !
येणा-या बायकोला देण्यासाठी पण कामाला येइल.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

अवलिया's picture

27 Jan 2009 - 6:44 pm | अवलिया

नव-याचा मार विसरलात का?

आणि हो... ही प्रतिक्रिया लिहिण्यासाठी नव-याची, सासरच्यांची परवानगी का काय ती घेतली होती ना?

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2009 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नव-याचा मार विसरलात का?
हो (सोयीस्करपणे)! ;-)

आणि हो... ही प्रतिक्रिया लिहिण्यासाठी नव-याची, सासरच्यांची परवानगी का काय ती घेतली होती ना?
कंसात लिहिलेली तीच सत्य परीस्थिती:
"शिकलेल्या मुली नस्ती काहीतरी खुळं आणतात आणि नवर्‍याला घरात अर्ध काम करायला लावतात"
त्याहीपुढचं सत्य, नवर्‍याला तेच योग्य वाटतं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मंगळसुत्र घालणे, पायात जोडवे घालणे, कुंकु लावणे वगैरे वगैरे रुढी, परंपरा, संस्कृती इत्यादींचे मानदंड म्हणुन समजल्या जाणा-या गोष्टी सात आठशे वर्षांपुर्वी (फक्त) प्रचारात आल्या. त्यांची कारणे काही विशिष्ट आक्रमणे होती.

बाकी, त्याच्या पुर्वीचे बायकांचेच फक्त पोशाख कसे असत येवढेच जरी समजले तर लो वेस्ट जीन्सला नाके मुरडणा-या नातवंडे पतवंडे असलेल्या ब्रम्हचारी संस्कृतीरक्षकांची गळणारी लाळ संपुर्ण भारतात महापुर आणेल.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 6:55 pm | विनायक प्रभू

यक्दम म्हापूर येल र बाबा.
इस्पेसल लाळेरी लागतील.
काय बी असो.नौ वारी लय भारी

अवलिया's picture

27 Jan 2009 - 7:27 pm | अवलिया

विना वारी त्या हुन भारी

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 7:42 pm | विनायक प्रभू

बिछ्डे सभी बारी बारी

विसोबा खेचर's picture

28 Jan 2009 - 12:37 pm | विसोबा खेचर

आमच्या मते मंगळसूत्र घालावं किंवा घालू नये हा त्या त्या बाईचा वैयक्तिक मामला आहे.

बाय द वे, तुम्ही घालता ना मगळसूत्र? मग झालं तर!
(की लग्न व्हायचंय अजून?)

आपला,
(अविवाहीत!) तात्या. ;)

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 12:41 pm | मधु मलुष्टे ज्य...

(अविवाहीत!) हे ठळक ;)

--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

दशानन's picture

28 Jan 2009 - 12:42 pm | दशानन

बरोबर, ह्यात चर्चा करण्यासारखं काहीच नाही.

बाकी आम्हाला कोणी सुत्र घातले नाही घातले काहीच फरक पडत नाहि.. आम्ही बी सिंगल !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

स्मिता श्रीपाद's picture

28 Jan 2009 - 12:56 pm | स्मिता श्रीपाद

आमच्या मते मंगळसूत्र घालावं किंवा घालू नये हा त्या त्या बाईचा वैयक्तिक मामला आहे.

एकदम सहमत....

आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे

नुसतं मंगळसुत्र घातलं,जोडवी घातली,कपाळाला कुंकु लावलं..म्हणजे आपण संस्कॄती जपतो असे म्हणता येणार नाही...

-स्मिता श्रीपाद

अमोल केळकर's picture

28 Jan 2009 - 1:38 pm | अमोल केळकर

जुने विचार बदलले पाहिजेत हे मान्य पण आज काही लग्न झालेल्या बायका मंगळसुञ घालत नाही हेच चिञ T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी दिसते काळाबरोबर बदल केला पाहिजे पण मंगळसुत्र न घालणे हे पटत नाही
याबाबत थोडा अवांतर प्रतिसाद
स्व. विजय साळसकर यांच्या पत्नीला २६ जानेवारीला विजय साळसकर यांना दिलेला मरणोत्तर पुरस्कार स्विकारताना पाहिले असताना त्यांनी मंगळ्सुत्र घातलेले होते.

या बदलाचे ही स्वागत आहे !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अवलिया's picture

28 Jan 2009 - 3:08 pm | अवलिया

अरे अजुन हा धागा जिवंत आहेच का? असो. चालु द्या...

--अवलिया

काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!

मॅन्ड्रेक's picture

28 Jan 2009 - 3:28 pm | मॅन्ड्रेक

मंगळ असलेल्या बायका सुद्धा मंगळसुञच घालतात

Mandrake - the magician.

एकलव्य's picture

28 Jan 2009 - 4:43 pm | एकलव्य

(बायकांनी नेहमी मंगळ्सूत्र घातले पाहिजे. पण एकवेळ त्यांत थोडे इकडे तिकडे झाले तरी चालेल पण सकाळ संध्याकाळ नवर्‍याचे पाय आणि पाठ मात्र चेपलीच पाहिजे.)

विनायक प्रभू's picture

28 Jan 2009 - 4:44 pm | विनायक प्रभू

तुम्ही सक्ती करताहात का फक्त दोनाची

एकलव्य's picture

28 Jan 2009 - 5:17 pm | एकलव्य

आम्ही संस्कृतीचे सांगतो आहोत... आणि तेही त्यांच्याच भल्यासाठी. ;)

नीधप's picture

30 Jan 2009 - 9:50 am | नीधप

नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवणे आणि नवरा जेवत असताना पंख्याने वारा घालणे हे कसं विसरलात?
काय तुम्हाला बायकांच्या भल्याची चाडच नाही... :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

माझी दुनिया's picture

28 Jan 2009 - 5:06 pm | माझी दुनिया

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

लग्न झाल्यावर मंगळसूत्र घालावं पण आजकाल विवाहित बायका मंगळसूत्र घालताना दिसत नाही,याउलट नवर्‍याच्या पश्चात त्याच्यावरचे प्रेम किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणूनही बर्‍याच बायका मंगळसूत्र वापरताना दिसतात.
त्याप्रकारे टिकलीही (कुंकु ) आजकाल कोणी लावताना दिसत नाही. कुंकवाशी सधवा किंवा विधवा असा भेद असू नये कारण लग्नापूर्वीही कुंकु लावायची रीत होतीच.

संस्कृतीरक्षकाची भूमिका पार पाडायला गेलं तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ओरड होते.शेवटी कालाय तस्मै नम:म्हणून गप्प बसावे हेच खरे.आपल्याला योग्य वाटेल ते करावे. मी टिकलीही लावते आणि हिरव्या बांगड्या,मंगळसूत्रही घालते.जोडवी मात्र वापरत नाही.

सखाराम_गटणे™'s picture

28 Jan 2009 - 5:15 pm | सखाराम_गटणे™

मी धमाल आणि ऍडीजोशी याच्या तथाकथीत मागास विचारांशी सहमत आहे.
तुम्ही बोलतो, ते अगदी योग्य आहे.

वेताळ's picture

28 Jan 2009 - 5:23 pm | वेताळ

पण वर जो भारतीय संस्कृती बद्दल कालवा चालु आहे त्या संस्कृतीमध्ये मंगळसुत्राला काडीचेही महत्व नाही. हे तुम्हाला माहित आहे का?.मंगळसुत्राचा इतिहास तपासुन घ्या.वेदात किंवा प्राचिन ग्रंथात त्याचा उल्लेख नाही आहे.मग ते घाला अगर न घाला त्यामुळे काही समाजाला हानी होत नाही.
वेताळ

खुद्द भारतात अनेक राज्यात हिंदू लोकांमधे सुद्धा मंगळसूत्र घालायची पद्धत नाही - काश्मीरात कान (साधारण अंबाड्याच्या समांतर रेषेत ) टोचून त्यातून दोरा ओवून तो अंबाड्यावर / वेणी वर टोचला जात असे. दक्षिण भारतात ताळी नावाचा प्रकार अस्तो सोन्याच्या साखळीत एक पदक असतं - त्या पदकाचं डिझाईन हे गोत्र/ कुटुंब यानुसार ठराविक असतं.
पंजाबी लोकांमधे पूर्वी मंगळसूत्राची पद्धत नसायचीच.

अमेरिकेत सर्वसाधारण विवाहित स्त्री पुरुष डाव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालतात. जगात अनेक इतर देश आहेत जिथे विवाहित स्त्री /पुरुषांचा मॅरिटल स्टॅटस हा अशा अंगठ्यांनीच दर्शवला जातो. भारतीय व्यक्तिंनी मंगळसूत्र न घालण्यामुळे ते वागणं अमेरिकन कसं काय होतं बुवा? चायनीझ, किंवा रशियन का नाही ?

नितिन थत्ते's picture

28 Jan 2009 - 9:48 pm | नितिन थत्ते

बाकीचे धागे वाचायचे राहतात

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

नीधप's picture

30 Jan 2009 - 12:03 am | नीधप

अजून मंगळसूत्र न घालण्यावरून वादंग चाललाय...
च्यामारी विचारतो कोण तुमच्या इच्छेला वा अनिच्छेला?
जिला घालायचंय ती घालेल मंगळसूत्र आणि जिला घालायचं नाहीये ती नाहीच घालणार. काय वाट्टेल ते करा.
संस्कृतीच्या नावाने गळे काढा नाहीतर स्वतःला सोयीस्कर तत्वज्ञान तयार करून बायांना दुटप्पी दुटप्पी म्हणत बसा.
विचारतो कोण तुम्हाला!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home