राष्ट्रीय सण व ध्वज अपमान !

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
27 Jan 2009 - 2:33 pm
गाभा: 

आताच ही बातमी वाचली व डोके जरा सुन्न झाले !

प्रत्येक १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारीनंतर च्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान... अमुक-मतुक ने झेंडा उलटा लावला.. तमुक-अमुक राष्ट्र गाणच्यावेळी झोपले होते... ह्या बातम्या का येत असाव्यात ?

तिरंग्याचे अथवा राष्ट्रगीताचा मान कसा ठेवा हे राजकिय नेत्यांना खरोखरच माहीत नसते का ? मागे एकदा सर्वे झाला होता एनडीटीव्हीचा, लोकसभेतील किती सदस्यांना राष्ट्रगीत माहीत आहे त्याचा... त्यांचा सर्वे चालू होऊन पंधरा मिनिटे झाली पण एका कबुतराला व्यवस्थीत उत्तर देता आले नाही... खाड करुन टिव्ही बंद केला व डोक्याला होणारा त्रास वाचवला !

आता वर जी बातमी दिली आहे त्या बद्दल थोडंस !
मंदसौर मध्ये.. (म.प्र.) भाजपा कार्यकर्तांनी तिरंग्या सोबतच भाजपाचा कमळ वाला झेंडा पण फडकवला ... ह्यांना हे माहीत असू नये की जेथे राष्ट्र ध्वज येतो तेथे बाकीचे सर्व ध्वज त्याच्या उंची पेक्षा खाली व योग्य अंतरावर लावले जातात ? की त्यांना भाजपाचा ध्वज हा राष्ट्र ध्वजाच्या तोडीस तोड वाटला असावा ? व ह्यात भाजपाचेच कार्यकर्ते आहेत हे पाहून विस्मय वाटला कारण हीच भाजपा मागे दोन वर्षा पुर्वी दिल्ली मध्ये राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत ह्यावरील माहीती पुर्ण पुस्तक मुलाच्या मध्ये मुफ्त मध्ये वाटत होती व त्यांच्या त्या कार्याचे समाजातील सर्व स्थरातून अभिनंदन केले गेले होते... ! एक पार्टी दिथ डिफरन्स असा स्वतःचा उल्लेख करुन घेणारी ह्या पार्टीच्या पदाअधिकारांना इतकी महत्वाची माहीत नसावी .. हे खेदाचे वाटते.. !

मागे १५ ऑगस्टला आम्ही मित्र मंडळींनी रस्तावर पडलेल्या... ज्याचा उपयोग झालेला आहे / फाटलेला आहे.. कोणी मुर्खाने गटारे शेजारी टाकलेल्या ध्वजाचे काय करावे ह्या बद्दल माहीती प्रसार केला होता... व लहानमुलांच्या शाळेत जाऊन त्यांना समजवले होते मला वाटत आहेत तसाच एक कार्यक्रम ह्या मोठ्या नेत्यांचे / त्यांच्या पार्टीच्या पदअधिका-यांचे घ्यावेत !

ह्या बद्द्ल तुम्हाला काय वाटते ?

राष्ट्र ध्वज अवमाननेचा जो कायदा आहे त काय म्हणतो ?

** मला भाजपा / अथवा इतर पार्टीचे नेते ह्यांच्या बद्दल काही ही बोलायचे नाही आहे मला फक्त राष्ट्र ध्वजाचा अपमान होतो तो कसा थांबता येऊ शकतो ह्या बद्दल चर्चा करायची आहे कृपया फाटे फोडू नका.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

27 Jan 2009 - 3:05 pm | आनंदयात्री

लहानपणापासुनची शिकवण झेंड्याला देवत्व देणारी असल्याने ध्वजाचा अपमान सहन होत नाही. पण अमेरिकादी देशातला झेंड्याकडे बघण्याचा व्ह्यु पाहिल्यावर अर्जुन होतो.

-
आनंदयात्री

प्रार्थना प्रमुख
शिवाजी सायम्

दशानन's picture

27 Jan 2009 - 3:20 pm | दशानन

बरोबर आहे पण राज्य घटनेने सुध्दा व वेळो वेळी कोर्टाने सुध्दा तिरंगा व त्याचे अधिकार ह्यावर भाष्य केलेच आहे ना.
व ज्या देशाचा राष्ट्र ध्वज आहे तो त्या देशाच्या स्वातत्र्यासाठी लाखो क्रांतीवीरांनी आपले प्राण दिलेले आहेत .. अश्या राष्ट्र ध्वजाबाबत देवत्वाची भावना व्हावी ह्यात नवल काय ?

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

संदीप चित्रे's picture

28 Jan 2009 - 2:41 am | संदीप चित्रे

आपल्याला झेंड्याचा अपमान अजिबात सहन होत नाही आणि अमेरिकेत झेंड्याच्या डिझाईनची बिकिनीही मिळते !!!
एक गोष्ट मात्र अमेरिकेत नक्की दिसते की त्यांची राष्ट्रभावना अतिशय प्रखर आहे.

दशानन's picture

28 Jan 2009 - 10:09 am | दशानन

>>>आपल्याला झेंड्याचा अपमान अजिबात सहन होत नाही

मला ही होतं नाही त्यामुळेच हा काथ्याकुट चालू केला आहे.

काय करता येईल ह्यांचे उत्तर हवे आहे.. दुस-या देशाशी तुलना नको आहे !
मी भारतात आहे व मला भारतीय ध्वजाबद्द्लच काळजी आहे म्हणुन विचारले आहे.. अमेरिकावाले झेंडाची बिकनी करोत अथवा टॉयलेट पेपर मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहि.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

आचरट कार्टा's picture

27 Jan 2009 - 3:19 pm | आचरट कार्टा

आम्हीही हा प्रयत्न करतो आहोत. गेल्या वर्षी आमचा कॉलेजमधे तयार झालेला ग्रुप (संकल्प ग्रुप) शाळा-शाळांमधे मुलांशी याविषयी बोलला होता. आम्हीच असं नव्हे, अनेक जण हे करताहेत. त्याचा परिणाम म्हणून यंदा निदान आमच्याकडे रत्नागिरीत प्लास्टिकचे झेंडे अत्यंत तुरळक चुकून कुठेतरी दिसले. :)

यंदा एक मात्र कहर पाहिला. एका आंतर महाविद्यालयीन महोत्सवात राष्ट्रभक्तिपर गीतावर समुहनृत्य करणार्‍या गटातल्या दोन स्पर्धकांनी जीन्स च्या खिशात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती अडकवल्या होत्या.
या भोसडीच्यांना उलटं टांगून XXXXXXXXXXXXXXXXXXX............. X( X(
बरं, आयोजक XXXXXXXXXXX राजकीय फुडारी... त्याच्याशी बोललो याबद्दल, तो म्हणाला की पोरं प्रेमाखातर करतायत... अपमानाच्या हेतूमुळे नव्हे. लोकांना चालतंय ना?!!
या XXXXXXXXXXXXXXXXXXXX ना काय म्हणाल? ~X(

माझ्या ग्रुपचं तर असं मत आहे, की भारतीय ध्वजसंहिता शालेय अभ्यासक्रमामधे समाविष्ट केली जायला हवी. चक्क वेगळा विषय म्हणून. बाकी पासिंगच्या अटींची काय XX घालायची ती घाला, पण या विषयामधे पासिंग किमान ८०-८५% हवं. तर काहीतरी होप्स आहेत.

किंवा आणखी एक मार्ग आहे. असले प्रकार करणार्‍यांना आपणच फटकवायचं. तात्विक चर्चेतून वगैरे नव्हे. फिजिकली. जेव्हा जेव्हा शक्य असतं, तेव्हा आम्ही करतो असं. यावर कुणाचा आजवर आक्षेप आलेला नाही. B)
_________________________________________
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

दशानन's picture

27 Jan 2009 - 3:25 pm | दशानन

>>कॉलेजमधे तयार झालेला ग्रुप (संकल्प ग्रुप) शाळा-शाळांमधे मुलांशी याविषयी बोलला होता

छान ! असेच प्रयत्न चालू ठेवा !

>>राजकीय फुडारी... त्याच्याशी बोललो याबद्दल, तो म्हणाला की पोरं प्रेमाखातर करतायत...

त्यांना म्हणवं कोर्टात केस होऊ शकते.... बघ कसे सुतासारखे सरळ होतात.. भिती नाही ना ... अथवा ह्या बद्दल पण कायदा आहे हेच माहीत नाही.... !

>>>> तात्विक चर्चेतून वगैरे नव्हे. फिजिकली.

कार्टा तुझे माझे फक्त नावच जुळत नाही तर विचार पण जुळतात असे दिसू लागले आहे मला :)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

राष्ट्रध्वजाचा अपमान, म्हणजे देशाचा अपमान!

'राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा कुठेही, कसाही, कोणाहीकडुन अपमान झाल्यास , त्या व्यक्तीला/ संस्थेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी', असा नवीन कलम राज्यघटनेत ऍड करावा.

१. कोणाकडुन चुकुन अपमान घडल्यास प्रत्येकी १००० रू. प्राथमिक दंड आकारला जावा.
२. कोणी जाणुन बुजुन अपमान केल्यास प्रत्येकी ३ दिवस अजामीनपात्र- पोलिस कोठडी ची शिक्षा व्हावी. व प्रत्येकी ५००० रू. दंड आकारला जावा.
३. व्यक्तीचे वय जर "७> "असल्यास पालकांकडुन / संबंधितांकडुन ५०० रु. दंड आकारला जावा.
इ. इ. इ..... किन्वा तत्सम कलमे ऍड करुन नवीन मसुदा बनवावा आणि त्याची कठोर अम्मलबजावणी व्हावी.

जय हिन्द !

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 3:40 pm | नितिन थत्ते

ही जी परिस्थिती उद्भवते ती या दोन दिवशी राष्ट्रध्वज लावून आपल्या देशभक्तीचा देखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उद्भवतो. शेवटी देशाशी तसे काही देणे घेणे नसते.
देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

दशानन's picture

27 Jan 2009 - 3:50 pm | दशानन

>>>देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल.

नाही, त्यासाठी घटने मध्ये काही नियम तयार केले आहे त्यातील सर्वमान्य व सहज करता जोगा खालील नियम.

१. कसा नष्ट करा निरुपयोगी ध्वज
व्यवस्थीत पध्दतीने पुरणे जमीनीमध्ये / जाळणे (तेल अथवा ऑईल टाकुन जाळू नये.)!

When no longer in a fit condition to be used, a flag should be disposed of in a dignified manner, preferably by burning or ground burial

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

चापलूस's picture

27 Jan 2009 - 4:11 pm | चापलूस

ही जी परिस्थिती उद्भवते ती या दोन दिवशी राष्ट्रध्वज लावून आपल्या देशभक्तीचा देखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उद्भवतो. शेवटी देशाशी तसे काही देणे घेणे नसते.
देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल.

सहमत आहे. झेंडा हे देशभक्तीचे केवळ एक साधन आहे. दरवर्षी इमानइतबारे "ध्वजाचा अपमान, ध्वजाचा अपमान" म्हणून आरडाओरडा करणार्‍यांच्या देशभक्तीविषयी शंका नाही. पण ती बरेचदा ती अस्थानी असते. तर काहीवेळा स्टंटबाजी. माझ्यामते भ्रष्टाचाराला नकार देणे व शक्य झाल्यास त्याचा विरोध करणे ही अधिक जाज्वल्य अशी देशभक्ती आहे.

ब्रिटिश's picture

27 Jan 2009 - 4:05 pm | ब्रिटिश

गाव भिवंडी, जिल्हा ठाणे, या गावात यक थेटर हाय. प्रेक्षकवर्ग मजुर, हमाल. जीत मीलल तीत थूकनार.
मालकान रिनोवेशन केल्त. मान्स थुकाची थांबनात. त्यान धा मान्स ठेवली साद्या ड्रेसमदे. कोन थुकला क कानाखाली आवाज काडाची. यक म्हैनाभर केल. आता मान्स न्हाईत.तरी थेटर यकदम सोच्छ.

शिस्त आशी लागते.
बाकी सगलं ठीक हाय !

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

महेंद्र's picture

27 Jan 2009 - 4:17 pm | महेंद्र

आपल्या कडे तरिही जरा बरं आहे.
नाहितर अमेरिकेत किंवा इतर युर्ओपिअन राष्ट्रात ध्वजाचे ब्रेसिअर आणि अंडर्विअर घालणे, किंवा पुरुषांनी बर्मुड्आ आणि ध्वजाचे शर्ट्स घालणं नेहेमीचंच झालंय..
नशिब.. आपल्याकडे अजुन तरी ति वेळ आलेली नाही.

आनंद घारे's picture

27 Jan 2009 - 5:30 pm | आनंद घारे

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत वगैरे गोष्टी फक्त प्रतीके आहेत. त्यांचा अपमान होतो म्हणून चिडचिड होते. पण राष्ट्रभावना महत्वाची आहे. ती तर कुठेच दिसत नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 6:30 pm | नितिन थत्ते

सहमत

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

धनंजय's picture

27 Jan 2009 - 11:12 pm | धनंजय

चिह्नाला काही महत्त्व असते, हे मान्य आहे.

पण चिह्नाशी झालेल्या व्यवहाराचा, चिह्नित संकल्पनेशी झालेल्या व्यवहाराशी खूप-खूप गोंधळ करू नये, असे वाटते.

संदीप चित्रे's picture

28 Jan 2009 - 2:46 am | संदीप चित्रे

अमेरिकन्सच्या राष्ट्रभावनेबद्दल मी वर कॉमेंट टाकली आहेच