कॉकटेल - सोमरस संबधी... !

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
26 Jan 2009 - 3:08 pm
गाभा: 

कॉकटेल - दोन अथवा अनेक प्रकारच्या वाईन / दारु मिक्स करुन जे दिले जाते ते म्हणजे कॉकटेल असा माझा समज आहे, येण-या शनिवारी काही मित्र कॉकटेल पार्टी करु म्हणत आहेत.. पण सगळेच माझ्या सारखे आडाणी... ग्लासात घालणे व ढोसणे ह्याच्या पुढे - मागे काहीच माहीत नसलेली... महाजालावर शोध घेतला पण इंग्लिश कच्चे असल्यामुळे योग्य माहिती सापडली नाही आता पर्यंत तरी.. तोच डोक्यात विचार आला मिपा वर अनेक तळीराम आहेत ते मदत करु शकतील.

मला व्हिस्की व रम प्रकारातील कॉकटेलची माहीती हवी आहे... इतर ही दिल्या तरि चालतील कोणाला णा कोणाला तरी उपयोगी पडतीलच.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Jan 2009 - 3:11 pm | अवलिया

हां यार...
मला पण बरेच दिवसांपासुन हाच प्रश्न होता,..
पण आपण काय ओल्ड मंकच घेतो.. त्यामुळे मिक्सिंग फिक्सिंगचा काही संबंधच नाहि...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

अवलिया's picture

26 Jan 2009 - 3:13 pm | अवलिया

सोमरस हा प्रकार वेगळा असावा... सोम नावाच्या वनस्पतीला कुटुन वगैरे...

किक नसेल बसत म्हणुन मग मागे पडला...
हल्ली त्याचे पिक पण घेत नाही.
उसच नबर वन... ढिंकचाक

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

26 Jan 2009 - 3:16 pm | दशानन

सोमरसाचा उल्लेख... दारु संदर्भातच आहे.... कॉलेज कट्टाला आम्ही सोमरस असाच उल्लेख करत असून बॅगपायपरचा त्या काळी.... !

आता लेखाच्या नावातच दारु हा शब्द शोभत नाही त्यामुळे सोमरस !

बाकी,

ओल्ड मंक जबरा !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

साती's picture

26 Jan 2009 - 3:24 pm | साती

राजसाहेब, तुम्हाला हवी असलेली माहिती या पानावर मिळते का पहा.

साती

सूहास's picture

19 Aug 2009 - 6:02 pm | सूहास (not verified)

मग आता १५० लेखा॑बद्दल काय पाजणार आम्हाला ??

सू हा स...

लवंगी's picture

19 Aug 2009 - 6:46 pm | लवंगी

;)

सूहास's picture

19 Aug 2009 - 6:57 pm | सूहास (not verified)

लव॑ग टाकलेल ?

सू हा स...

लवंगी's picture

19 Aug 2009 - 8:22 pm | लवंगी

लवंगी मिरची टाकलेल

नीलकांत's picture

26 Jan 2009 - 3:27 pm | नीलकांत

काय राजेहो,
ह्या विषयावर आधी चर्चा झालीये की ! हे घ्या दूवे -

http://www.misalpav.com/node/3572

http://www.misalpav.com/node/757 ;)

http://www.misalpav.com/node/823

नीलकांत

विनायक प्रभू's picture

26 Jan 2009 - 4:49 pm | विनायक प्रभू

जमेल ते कॉक्टेल प्या. पण पिल्यावर नाचु नका.'वकार युनुस' होतो.

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:17 am | दशानन

"'वकार युनुस' होतो."

नाय अजून तशी येळ नाय आली !

पण वकार युनुस साठी काही तरी सोय करावी म्हणतो कोप-यात.... मस्त पैकी.... एक वाळु भरलेली टब ठेवतो ;)

* एक दोन सोडले तर कॉकटेल साठी सगळे गडी नवीन आहेत... माहीत नाही कोण कशी रिअएक्शन करेल :D

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

छोटा डॉन's picture

27 Jan 2009 - 10:12 am | छोटा डॉन

राजसाहेब, तुम्हाला जर फुल्ल टांगापल्टी व्हायचे असेल व न नाचताच लुढकायचे असेल तर एक कॉकटेल सांगतो ...

ह्याचे काही "ऑथेंटिक" असे स्पेशन नाव नाही, हे एक गावठी ( किंवा गाढवी म्हणुन शकता ) कॉकटेल आहे ...
एक काचेचा मध्यम आकाराचा ग्लास घ्या, चांगल्या प्रतीची सुमारे ९० मिली व्हिस्की घ्या, त्यात तेवढीच अथवा थोडीशी जास्त "स्ट्राँग बिअर " टाका, बर्फाचे २-३ खडे टाका, मस्त पैकी हलवुन "हळुहळु" पित बसा ...
चकणा शक्यतो काहीही नको ...!
सिगारेट ओढणारे असाल तर ग्लास संपला की मगच तिकडे वळा ..!

लै लै लै हाईट म्हणजे माणुस "१ पुर्ण ग्लास" पिऊ शकतो , २ ग्लास पिणे हे खोली/बार गरागरा फिरवायला व त्या महाभागाच्या डोक्यावर शॉट काढायला लै जास्त होते. बडे बडे महारथी "२ ग्लास" पिले के आउट होतात ..!

वि.सु : शिकाऊ , बेताचे पिणारे ह्यांनी ह्याच्या नादी न लागलेले उत्तम ...!

------
छोटा डॉन

दशानन's picture

27 Jan 2009 - 10:20 am | दशानन

=))

जबरा !

हा कॉकलेट तर आम्ही लै दा पिला... एकदम टांगा पलटी !

बीयर शक्यतो हार्ड वापरावी.. लै जाम मजा येते.... पण मी फॉस्टर व सिग्नेचर मिक्स करुन ... दोन्-तीन ग्लास आरामात पचवतो... दोन्ही पण तसे माईल्ड !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सुक्या's picture

27 Jan 2009 - 10:50 am | सुक्या

वि.सु : शिकाऊ , बेताचे पिणारे ह्यांनी ह्याच्या नादी न लागलेले उत्तम

खरं म्हणजे हे कॉकटेल मदीरापानात पी. एच. डी. केलेल्या लोकांसाठीच आहे. इतर डीग्री होल्डर लोकांनी हे हातातही घेउ नये. एकदा मी असचं २ ग्लास गाढवी कॉकटेल मारलं होतं अन नंतर एवढा गाढवपना केला होता कि विचारु नका.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

नीधप's picture

27 Jan 2009 - 10:02 am | नीधप

वकार युनूस कशानेही होऊ शकतो. कॉकटेलच हवं असं काही नाही.
(कॉकटेलं पिउन मग नाचल्यानेही कधी वकार युनूस न झालेली) नीरजा
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुचेल तसं's picture

26 Jan 2009 - 4:54 pm | सुचेल तसं

कॉकटेलला मराठीत बहुदा मारामारी म्हणतात.

उदा: चहा आणि कॉफी एकत्र असलेली मारामारी

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Jan 2009 - 5:05 pm | ब्रिटिश टिंग्या

कारण मराठीत १ रुपायाच्या नाण्याला 'डॉलर' असेही म्हणतात ;)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सुहास..सदेव हसनार्..'s picture

26 Jan 2009 - 5:27 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

१)बियर आणी लि॑बाचे कोणतेही पेय्..ह्याला काहीतरी chandlelight (मराठी नाव नसावे बहुतेक)...चव छान लागते..

२)कुठ्लाही व्होड्का(एक पेग) आणी त्यात "blue curacao"30 मि.ली. ह्याला बहुतेक "ब्लू सी "म्हणतात्...दिसायला आणी चवीला थ॑ड (कूल्)..पण महाग.."blue curacao"हे जरा(नव्हे जास्त)..असेच बरेच आहेत..

३)आणी सगळ्यात मस्त म्हणजे "while rum"(बकार्डी असेल तर उत्तम) त्यात एक लि॑बू पिळायचा आणी thumps -up...थोडस...स्वस्त आणी मस्त

सुहास
जन्मजात तळीराम

पक्या's picture

27 Jan 2009 - 12:45 am | पक्या

मार्गारीटा
६ औंस लेमोनेड , ६ औंस करोना बिअर वा कुठलीही लाईट बिअर , ६ औंस स्प्राईट , ४ औंस ट़कीला .
मार्गारीटा मिक्स बाजारात मिळते. ते वापरून करायचे झाल्यास. ३ भाग मार्गारीटा मिक्स , २ भाग टकिला, १ छोट्या लिंबूचा रस .

कॉकटेल शेकर मध्ये घालून चांगले मिक्स करावे. सर्व्ह करताना आईस चे मोठे तुकडे घालावेत. (म्हणजे आईस लगेच न वितळून मार्गारीटा डायल्यूट होणार नाही.) ग्लासच्या कडांना थोडे मीठ लावावे.

(१ औंस = ३० मि.लि.)

समर कूलर :
२ औंस जिन (gin) , ६ औंस सायट्र्स सोडा (साधा सोडा घेतल्यास त्यात थोडा ऑरेंज जूस घालावा) , १ लिंबू
एका उंच ग्लासमध्ये आइस क्युब्स घालावेत. त्यावर लिंबू पिळावे, मग २ औंस जिन ओतावी. उरलेला ग्लास सायट्र्स सोडा ने भरावा.

आयरिश कॉफि:
४० मिलि. आयरिश व्हिस्की, पाणी घालून उकळून घेतलेली कॉफी - २४० मिलि, १ - दीड चमचा, १ मोठा चमचा व्हिप्ड क्रिम.
एका ग्लास मध्ये साखर घालावी. त्यात व्हिस्की घालावी मग कॉफी घालावी. हलवावे. साखर विरघळली की वरुन व्हिप्ड क्रिम घालावे.

नीधप's picture

27 Jan 2009 - 1:48 am | नीधप

>>६ औंस लेमोनेड , ६ औंस करोना बिअर वा कुठलीही लाईट बिअर , ६ औंस स्प्राईट , ४ औंस ट़कीला .<<
हे कॉम्बो फारसं काही भलं नाही. बिअर वापरणे हा तर मार्गरिटाचा खासा अपमान आहे. लिंबाच्या ताज्या रसाऐवजी लेमोनेड हा पण मोठ्ठा अपमान. आणि त्यात फिझ वालं पेय.. ? पार वाट लावली रे मार्गारिटाची.....

१ भाग लिंबाचा रस, २ भाग टकिला, १ भाग कुठलीही ऑरेन्ज लिक्योर (ट्रिपल सेक, कुराकाउ किंवा कॉन्ट्रो)
हे सगळ्यात महत्वाचं कॉम्बो.
यापलिकडे या पेयात किसलेला बर्फ आणि फ्लेवरसाठीचे सिरप किंवा फळांचा रस. एवढंच घाला.
नाही त्या गोष्टी घालून मार्गारिटाची वाट लावू नका.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:15 am | दशानन

तुमची ही कॉफी आम्ही पिली आहे... मोझो मध्ये मिळतात अनेक कॉकटेल त्यातलं हे कॉफीच प्रकरण आम्हाला खुप आवडलं होतं !

जाम मजा येते !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

वेलदोडा's picture

28 Jan 2009 - 12:44 am | वेलदोडा

>>आयरिश कॉफि:
४० मिलि. आयरिश व्हिस्की, पाणी घालून उकळून घेतलेली कॉफी - २४० मिलि, १ - दीड चमचा, १ मोठा चमचा व्हिप्ड क्रिम.

आयरिश कॉफि च्या जिन्नसांमध्ये
१ - दीड चमचा साखर लिहायचे विसरलात बहुतेक.

भाग्यश्री's picture

26 Jan 2009 - 11:36 pm | भाग्यश्री

मला एकच माहीतीय, ती देते! :)

व्हाईट रम मधे पायनापल ज्युस्,नारळाचे दुध आणि व्हीपिंग क्रीम टाकून पिना कोलाडा करता येते..
हे मी रम न टाकता सुद्धा करते.. व खूप सह्ही लागते!

http://bhagyashreee.blogspot.com/

पक्या's picture

26 Jan 2009 - 11:59 pm | पक्या

>>हे मी रम न टाकता सुद्धा करते..
ह्याला व्हर्जिन पिनाकोलाडा म्हणतात.

अजून असेच एक व्हर्जिन ड्रिंक : ७ - ८ पिकलेल्या स्ट्रॉबेरिज , १५० मिलि पायनॅपल ज्यूस , ४० मिलि नारळाचे घट्ट दूध /क्रिम (नारळाचे पाणी न वापरता काढलेले घट्ट दूध म्हणजे क्रिम होय.) , क्रश्ड आईस...१ कप.
सर्व जिन्नस ब्लेंडर मध्ये चांगले घुसळून घ्यावेत . ग्लास मध्ये ओतून ग्लास वर पायनॅपल ची फोड खोचावी.
बाजारातील तयार पायनॅपल जूस मध्ये साखर असतेच. घरी तयार केल्यास आवडीप्रमाणे साखर घालावी. (पायनॅपल किति आंबट / गोड आहे त्याप्रमाणे ठरवून.)

भाग्यश्री's picture

27 Jan 2009 - 12:15 am | भाग्यश्री

अरे वा.. हाही प्रकार छान दिसतोय.. करून पाहीन..

http://bhagyashreee.blogspot.com/

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:12 am | दशानन

वाह !

हे सोपं आहे करायला व रिस्क कमी... कुणाचा जीव तरी नक्कीच जाणार नाही ... आज करुन स्वतः ट्राय करतो मग शनिवारी पाजतो !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

पिवळा डांबिस's picture

26 Jan 2009 - 11:49 pm | पिवळा डांबिस

आता "प्रेषक: जैनाचं कार्ट" देखील कॉकटेल्स मारायला लागलं!
नाना म्हणतो ते काही खोटं नाही, जगबुडी येणार लवकरच!!!! :S

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:13 am | दशानन

=))

काय पिडा काका ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

नीधप's picture

27 Jan 2009 - 1:50 am | नीधप

मार्गारिटा बरोबरच व्होडका किंवा व्हाइट रम ची काही कॉकटेल्स मी नेहमी करते. पण आत्ता टायपायला वेळ नाहीये. पर्वा सांगते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

कोलबेर's picture

27 Jan 2009 - 1:57 am | कोलबेर

मोहिटो:

व्हाईट रम मध्ये पुदिन्याची पाने घालुन लिंबू पिळून त्यात साखर आणि क्लब सोडा किसलेल्या बर्फा सोबत घालून ब्लेंडरमधुन फिरवा.

मार्टीनी :
चांगल्या प्रतीची वोडका (ग्रे गुज) कींवा जीन (बॉम्बे सफायर) ३ भाग आणि १ भाग व्हर्मुथ घालुन बर्फाने भरलेल्या कॉकटेल शेकर मध्ये हलवा. थंडगार मार्टीनी ग्लासात भरा.

दशानन's picture

27 Jan 2009 - 9:14 am | दशानन

हा प्रकार पण उत्तम दिसत आहे... करा यला सोपी कृती !

*******

सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

महेंद्र's picture

27 Jan 2009 - 12:36 pm | महेंद्र

लई एक्स्पर्ट लोक हायती हितं...
बरं झालं इची भैन, अळान्याले बी काइ तरि शिकायले भेटले..

अवलिया's picture

27 Jan 2009 - 12:48 pm | अवलिया

च्यामारी

असल्या काकटेलाने काय होते?
छ्या...
फ्रेंच पालिश, व्हाईटनरचे अल्कोहोल अन मोसंबी ज्युस (सुज्ञांणा समजले असेल) एकत्र करायचा अन एका घोटात...
पंजाबात चकणा म्हणुन याच्या बरोबर रोटीला आयोडेक्स लावुन खातात... पी के टुन...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

27 Jan 2009 - 1:33 pm | ब्रिटिश

आत्ता कूट माज्या लेवल वर आलीत सगली

हे झ्या, ह्यान नशा चडल्यासारकी वाटते.

१) आयोडेक्स सँडवीच - ब्रेडला आयोडेक्स लावुन खाणे (२४ तास नशा)
२) सर्पदंश - म्हैनाभर नशा केली क सर्प मरतात विषबाधा होऊन
३) खोपडी - नवसागर + मिथेनाल + पानी समप्रमाणात (ही नशा यकदाच करता येते. दुसर्‍यांदा प्यायला तुमी जीवंत नसता)

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

साखरांबा's picture

27 Jan 2009 - 1:45 pm | साखरांबा

फेणी+फणसाची अशी आचमनं चालतात. दोन्ही पहिल्या धारची असल्यास मस्त चढतात.

धमाल मुलगा's picture

27 Jan 2009 - 3:35 pm | धमाल मुलगा

१.ग्लासात क्रश्ड आईस शिगोशीग भरुन घ्यावा.
२.एक लार्ज व्होडका+कुस्करलेले पुदिना/कोथिंबीर ब्लेंडरमध्ये मिसळून घ्यावे.
३.क्रश्ड आईस भरलेल्या ग्लासात हे मिश्रण ओतावे.
४.आवडत असल्यास वरुन लिंबू पिळावे.
५.ग्लासाच्या कडेवर एक लिंबाची चकती खोचावी.

थोड्याशा स्पायसी स्नॅकसोबत घ्यावी (स्वानुभवः थाई डिशेस ह्यासोबत उत्तम लागतात) किंवा स्नॅक्सशिवायही उत्तम लागते.

दशानन's picture

27 Jan 2009 - 3:37 pm | दशानन

हे पण लई सोपं हाय करायला... !

व्होडला... स्टॉक मध्ये पण पडला आहे... !

धनु धनु !

मस्त आयडीया..

दोनचार आयडीया गोळा झाले आहेत... बघू कसा धिंगाणा घालता येतो ते !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

१. १ पेग व्होडका घेउन त्यात हिरवी मिरची टाकून ठेवावी ५-१० मिनिटे.
मग त्यात सोडा नी पाणी घालावे थोडे थोडेच आणि वरून लिंबू पिळावे. पुदिन्याची पाने गार्निश म्हणून किंवा चुरडून १-२ थेंब रस. झणका जबरदस्त लागतो.
मिरची जास्त वेळ व्होडका मधे मुरवलीत तर जास्त झणका.
मात्र यातला वैधानिक इशारा लक्षात घ्या.. २ पेग वर जाउ नये. नाहीतर सकाळी दुसर्‍या बाजूने झणका यंजॉय करता येतो.

२. व्होडका + नारळाचे पाणी+ वरती पुदिन्याची पाने.. सुप्परहिट लागते.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

30 Jan 2009 - 1:12 pm | दशानन

>>मात्र यातला वैधानिक इशारा लक्षात घ्या.. २ पेग वर जाउ नये. नाहीतर सकाळी दुसर्‍या बाजूने झणका यंजॉय करता येतो.

=))

जबरा इनोद !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

नीधप's picture

30 Jan 2009 - 1:15 pm | नीधप

इनोद कसला डोंबलाचा...
खरी माहिती सांगितली.. झणका लागल्यावर सांगाल नीरजाने आधी का नाही सांगितलं म्हणून... :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आचरट कार्टा's picture

5 Feb 2009 - 11:01 pm | आचरट कार्टा

=)) =)) =))
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

चंबा मुतनाळ's picture

30 Jan 2009 - 3:31 pm | चंबा मुतनाळ

हिंग जिर्‍याची फोडणी द्यावी व ताक घालून कळण म्हणून प्यावे!

दोनचार आयडी गोळा झाले आहेत... बघू कसा धिंगाणा घालता येतो ते !
असे तर म्हणायचे नाही ना ?

दशानन's picture

28 Jan 2009 - 9:53 am | दशानन

=))

नाय ओ दिल्ली प्रदेश मी एकटाच आपल्या ताकती वर संभाळत आहे.. अजुन कोणी मिपावर दिल्लीत सापडला नाही आहे..... ;)

* त्यामुळेच तर दुसरा आयडी घेता येत नाही... आमचा आयपि कोणी एडपट पण सांगू शकतो :)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

चतुरंग's picture

28 Jan 2009 - 9:55 am | चतुरंग

हल्लीच 'प्रभूकृपेने' त्याच्या मनातल्या शंकांचं समाधान झालं आहे असं तो म्हणालाय ना दिल्ली- ते - दिल्ली मधे! ;)

चतुरंग

मॅन्ड्रेक's picture

28 Jan 2009 - 3:37 pm | मॅन्ड्रेक

मदीरापानात पी. एच. डी.
P - पीणे
H- हेच
D- ध्येय.

पिल्लकड.
Mandrake - the magician.

नीधप's picture

30 Jan 2009 - 1:10 pm | नीधप

बियर + सफरचंदाचा रस,
बियर + पीच श्नॅपल्स

चंपाग्ने किंवा व्हाइट वाइन + संत्र्याचा रस. वरती पुदिना पानांचे गार्निश अत्यंत गरजेचे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धमाल मुलगा's picture

2 Feb 2009 - 10:40 am | धमाल मुलगा

बियर + सफरचंदाचा रस,

काय सांगता काय?
हे... हे... असं चांगलं लागतं? आयला, आयडियाची कल्पना एकदम बेष्ट आहे की :)
येत्या विकांताला हे प्रकरण करुन पहायला हवं.

धन्यवाद नीरजा.

अनिल हटेला's picture

30 Jan 2009 - 1:25 pm | अनिल हटेला

आरारारा ~~~~~

एवढा गोंधळ घालण्यापेक्षा रीतसर खंबा लेके बैठ जानेका ..
सोडा + व्हीस्की = सर्वात जबरी कॉम्बीनेशन !!
उगाच पुदीना ,नारळ ,सफरचंद ......इ.इ.

(बेवडाशिरोमणी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

30 Jan 2009 - 1:28 pm | दशानन

+१

सर्वात उत्तम प्रतिसाद ... पण मित्रांना वचन दिले आहे म्हणुन हा सगळा ताप सगळ्यांना ;)

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

नीधप's picture

30 Jan 2009 - 1:35 pm | नीधप

आवडिला आणि हौसेला मोल नसतं...
आम्हाला नाही आवडत खंबा घेउन बसायला. काय करणार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

30 Jan 2009 - 1:45 pm | दशानन

:)

सहमत.

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

अनिल हटेला's picture

30 Jan 2009 - 1:51 pm | अनिल हटेला

>>>>आम्हाला नाही आवडत खंबा घेउन बसायला. काय करणार.
खरं आहे हो तुमचं..पण इतकी उठाठेव करत बसण्यापेक्षा हे बरं पडतं ..
आवडाबाई आणी हौसाबाईला खरंच मोल नसतं ..
चालू देत ..काही दिवसात इकडे "सोमरसपाककृती" नावाचे सदर दिसेल..
असो...आम्ही वाचणाचा आस्वाद घेउ...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नीधप's picture

30 Jan 2009 - 2:22 pm | नीधप

अन्न रांधण्यासारखीच ती पण एक कला आहे. आणि त्यात पण गंमत आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सुनील's picture

2 Feb 2009 - 11:04 am | सुनील

कार्ट्या, शेवटी कसलं कॉकटेल बनवलं ते तरी सांग (नाही तर झ्क्कास पाकृच दे इथे, फोटो सकट!)

अवांतर - फोटो पाकृचे दे, तुमचे नको!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

2 Feb 2009 - 11:18 am | दशानन

आम्ही सर्वजण मिळून १२ जण होतो !
आमच्या फार्म हाऊस वर जमलो होतो.... किती दंगा केला तरी कोणाला काही फरक पडत नाही... आसपास कोणीच नाही ;)

अज्जुका ह्यांनी देलेला उपाय !

१. १ पेग व्होडका घेउन त्यात हिरवी मिरची टाकून ठेवावी ५-१० मिनिटे.
मग त्यात सोडा नी पाणी घालावे थोडे थोडेच आणि वरून लिंबू पिळावे. पुदिन्याची पाने गार्निश म्हणून किंवा चुरडून १-२ थेंब रस. झणका जबरदस्त लागतो.
मिरची जास्त वेळ व्होडका मधे मुरवलीत तर जास्त झणका.
मात्र यातला वैधानिक इशारा लक्षात घ्या.. २ पेग वर जाउ नये. नाहीतर सकाळी दुसर्‍या बाजूने झणका यंजॉय करता येतो.

सिमरन ऑफ व मिरची (हिरवी... शोधून लहान लवंगी मिरची आणली होती ;) )
दोघांनी ट्राय केला ! एकटा स्वप्न नगरात पोहचला तीन पॅग नंतर !
सकाळाचा त्यांचा हाल माहीत नाही... पहाटेच पळुन गेला !
*******

धमाल मुलग्याची आयडीया

१.ग्लासात क्रश्ड आईस शिगोशीग भरुन घ्यावा.
२.एक लार्ज व्होडका+कुस्करलेले पुदिना/कोथिंबीर ब्लेंडरमध्ये मिसळून घ्यावे.
३.क्रश्ड आईस भरलेल्या ग्लासात हे मिश्रण ओतावे.
४.आवडत असल्यास वरुन लिंबू पिळावे.
५.ग्लासाच्या कडेवर एक लिंबाची चकती खोचावी.

थोड्याशा स्पायसी स्नॅकसोबत घ्यावी (स्वानुभवः थाई डिशेस ह्यासोबत उत्तम लागतात) किंवा स्नॅक्सशिवायही उत्तम लागते.

ही मी वापरली व माझ्या काही खास मित्रांनी !
व ह्यात आम्ही थोडी व्हाईट रम व थोडी विस्की मिक्स केली !

टोटल टांगा पलटी ! =)) कधी जेवलो व कधी झोपलो कळालेच नाही !

बाकीच्यांनी विस्की किस्की करत पेगवर पेग मारले व मला शिव्या देत जेऊन निघून गेले... पार्टी यजमान टांगा पलटल्यामुळे रात्री ९ लाच झोपला ( म्हणजे मी)

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

सुनील's picture

2 Feb 2009 - 11:27 am | सुनील

सिमरन ऑफ ???
अच्छा अच्छा - स्मिरनॉफ! (मला वेगळीच शंका आली, असू दे!)

बाकी व्होडका + हिरवी मिरची कॉम्बिनेशन जबरा दिसतयं. एकदा ट्राय करायला पाहिजे.

अवांतर - पेग संपल्यावर मिरची खायची की टाकून द्यायची?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

2 Feb 2009 - 11:40 am | दशानन

ह्या बद्दल माहीती नव्हती .. एकानं चावून खल्ली व मी हळुच खाली टाकली ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

नीधप's picture

2 Feb 2009 - 1:34 pm | नीधप

तुम्हाला किती झणका सहन करता येतो त्यावर अवलंबून आहे. पिताना आणि नंतरही.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

2 Feb 2009 - 12:00 pm | विनायक प्रभू

ह्याला के.इ.एम. कॉकटेल म्हणतात.
बेवरे लोक्संख्या लक्षात घेउन भांडे निवडावे. वरील इंस्टीट्युट मधे बालदी घेतात.
सम भागात एकेक व्हिस्की, रम, जीन, वोडका ओततात. चवीपुरता आवडीनुसार कुठलाही फ्रुट ज्युस.
दो पेग मधे कोंबडे उडायला लागतात. ह्याची गॅरंटी

लंबबेटावरील बर्फाळ चहा असाच करतात फक्त वेगवेगळ्या चषकात वेगवेगळा बनवतात. आणि त्यात कोक, खूप सारे बर्फाचे तुकडे आणि लिंबाच्या चकत्या घालतात..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:19 pm | दशानन

=))

कोबंडा उडूच नाय लागेल... तो स्वतः तुंदुर मध्ये बसायला पण तयार होईल ;)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

विजुभाऊ's picture

5 Feb 2009 - 9:42 pm | विजुभाऊ

व्होडका उसाचा रसात
रम ब्लॅक कॉफीत
टोंमॅटो सूप +व्होडका
नुसतीच व्होडका कोरी आणि पालथ्या मुठीवर मीठाची पूड ( याची ओळख टकीला अशी करुन दिली आहे)
सूचना : रम + बीयर ; व्हिस्की +बीयर हे कोणत्याही परीस्थीत टाळावे

अविनाशकुलकर्णी's picture

6 Feb 2009 - 12:43 am | अविनाशकुलकर्णी

दारु चढल्यावर ची खास वाक्ये
१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
५. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
६. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
७. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
८. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
९. तुला काय वाटत मला चढली आहे?
१०. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
११. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१२. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
१३. यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१४. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१५. कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१६. तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है ???
१७.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१८. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१९ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
२०. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
२१. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि..
२२..यार अभ्याला यायला काय धाड भरली होति..
२३..यार तु पहिल्यासारखा वागत नाय हल्ली....

अविनाशकुलकर्णी's picture

6 Feb 2009 - 12:45 am | अविनाशकुलकर्णी

आमली द्रव्य

सुर्य मावळला,संध्याकाळ झाली
आमली द्रव्य पिण्याची मित्रांनो
सा~यानांच धाई झाली..

पम्या आला, रम्या आला रम्याचि होंडा आली
नंद्या आला, चंद्या आला.नंद्याची पल्सर आली
पम्या रम्या या या..नंद्या चंद्या या या

विस्की आली, रम आली, साथीला पेप्सी आलि
ग्लास आले ,बश्या आल्या, बिसलरीची बाटली आली.

चकण्याला काय भाऊ,? सा~याकडुन विचारणा झाली
दाणे आले, फुटाणे आले, लागतात म्हणुन पापडांची चळत आली

पेप्सीतुन,नीट, बिसलरीतुन, शांभवि पोटात प्रवेशली
शांभविवर स्वार होता होता, शांभवीच सा~यांवर स्वार झाली.

एक गिलासीचे चार गिलासी झाले,सारे जण मस्त पैकी ’टुंग झाले
रम्या पम्या तर्राटले,नंद्या चंद्या "टल्लि झाले,माझे अन बापुचे माकड झाले ..

मद्य आमल डोक्यावर होता, रसवंति पाझरु लागली
तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही...चंद्या
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..नंद्या
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच...रम्या
एकमेकाच्या गळ्यात गळे घातले..सांगाता झाली
रम्या होता पम्या होता आमची सारी पेदाड गँग होति
पार्टि लै जबरी झाली...फार फार मजा आली...
फार फार मजा आली...
अविनाश

निखिलराव's picture

21 Aug 2009 - 9:49 am | निखिलराव

आज श्रावण संपला.............