मिपाची वाटचाल आणि इतिहास

विंजिनेर's picture
विंजिनेर in काथ्याकूट
26 Jan 2009 - 11:35 am
गाभा: 

संपादक/प्रशासक मंडळींना रामराम,

मिपाचा जन्म कसा झाला हे काही चर्चांमधुन क्वचित जाणवते(जेव्हा विसोबा नाहितर तात्या काही किस्से सांगतात तेव्हा) पण हा सगळा प्रवास कसा झाला आणि ह्या संकेतस्थळाचा चालविता(ते) धनी कोण, त्यांचा परिचय हे सगळे "मिपाचा प्रवास/मिपाची चित्तरकथा" (Category:About Us) अश्या सदराखाली प्रकाशित करायला काय हरकत आहे?
मी मिपाचा सदस्य झाल्यापासून बराच शोध घेतला पण काही सापडले नाही म्हणून विचारत आहे. कुठे आधीच दुवा उपलब्ध असेल तर सांगावे.
कदाचित जुन्या मंडळींना ह्या प्रस्तावाबद्दल काही विशेष वाटणार देखिल नाही(अर्थात सर्व जुन्या मंडळींनासुध्दा हे माहिती असेलच असे नाही) पण नविन येणार्‍या सदस्यांना हे कुतुहल जरूर असेल ही मला खात्री आहे.

आपला,
मिपाचे व्यसन लागलेला विंजिनेर

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Jan 2009 - 11:37 am | अवलिया

अरे वा शिणुमा....!!!!

चला...बसलो पिटातली शीट पकडुन... शिट्या मारायला !!!!

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:39 am | दशानन

मी बी, भंडग आणला हाय.... शिट्या चुकायच्या नाय बर का नाना... !

ह्म्म्म..

करा चालू... !

अरे कोणी हाय का... पडदा तरी वर घ्या राव.. अरे ए छोट्य.. खाली बस... ओ नवीन पावणं राहू दे दमानं ... बसा बघ गुमान खाली... करा रं चालू सिनेमा !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

अवलिया's picture

26 Jan 2009 - 11:42 am | अवलिया

आर आर त्या छोट्याला कशाला आनलस...
मारामारी पाह्यली की रडतय की रे ते...

शोले इस्टाईल मारामारी हाय बाबा...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:46 am | दशानन

असं व्हयं... पाठवतो.. सखु बरोबर...!
पर नाना.. मागच्या वानी कोणी... पडदा फाडला तर.. ते सरपंच साहेब गप्प बसणार नाहीत बॉ... त्यांनी लई कष्टानं उभं केले हाय हे... !

त्यांचि जरा ओळ्ख करुन द्याच पाहुण्यांना.. कश्याला उगाच दंगा.. आपल्या गावात आधी लई दंगा व्हायच... पण मागं प्रमाण कमी झालं हाय.. पण कधी कधी जंगलातून ते लांडगे येतात त्यांचा पण बदुबस्त करणार हाय पंच !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विंजिनेर's picture

26 Jan 2009 - 11:47 am | विंजिनेर

मिपाचा इतिहास म्हणजे मारामार्‍यांची लिष्ट आहे की काय? बापरे!!

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:58 am | दशानन

असं काही नाही आहे भाउ !

तात्या अभ्यकरांनी हे संकेतस्थळ चालू केले.... "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ." हे स्थळाचं ब्रीद वाक्य.

सुंदर मुर्ती घडवण्यासाठी त्याचा मापात न बसणारा दगड हा काढावाच लागतो नाही का, त्याच पध्दतीने एका संकेतस्थळाची मक्कतेदारी तोडून त्यांनी लेखक व वाचकांसाठी नवीन स्थळ चालू केलं.... ह्याला आम्ही भांडण म्हणत नाय बॉ... ह्याला आम्ही कला म्हणतो.. ! ह्यांनी जागा घेतली बाकी व कळस बसवला,

बाकी निलकात नावाचा आहे एक वेड** त्याला काय बी काम नाय त्यामुळे तो उचापति करतो व त्या उचापतीतून एवढं साधं व वापरायला सोपं संकेतस्थळ तयार होतं .. आता घर बांधायचं म्हणाले तर काय दगड-माती - सिमेंट आपण स्वतःच थोडी तयार करतो... तसेच ह्या स्थळासाठी.. निलकांतने ड्रुपल कडुन पाया घेतला.. व रंगरंगोटी स्वतःच केली.

अजुन एक येडा आहे जो स्वतः काम करतो.. राबराब राबतो व त्याच्यामुळे आपण येथे मराठीत लिहतो आहोत... तो ओंकार.. !

बाकी काय बी नाय... घरात कशी चार भांडी घुतानं वाजत्यात तसं येथे पण वाजतं कधी कधी... चालायचं ! आमच्या सारखी अनेक पडीक मेंबर हायत काय येत नाय ते पण लिहत्यात व जे कळत नाय ते पण बोलत्यात... चालायचं... काही कवी आहे त तर काही लेखक ! कोणी भारतातून लिहतो आहे कोणी परदेशातून... काही मंडळी फक्त वाचायला येतात.. तर काही घराचा पाय पळवून नेण्याचा कट रचत्यात.. ! पण तात्या असल्यांना फाट्यावर मारतो.. त्यामुळे फाट्यावर ह्या शब्द प्रकाराला लई मोठं वजन हाय येथं

बाकी सगळा रामभरोसे चालू आहे... !

आई अंबाबाई व तात्यांचा लालबागचा राजा ह्यांचे आशिर्वाद !

आम्ही सुखात !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2009 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्याही सांस्कृतिक, सामाजिक, घटनेमागे एक चळवळ असते. तसेच याही घटनेमागे सांस्कृतिक क्रांतीची बीजे आपणास सापडतात. मिपाच्या जन्माचा एक मोठा इतिहास आहे. कोणी एका महान थोर सैनिकाने एका देशात प्रशासकाच्या ताब्यात गुलाम म्हणून राज्यात रमणार नाही असे म्हटले आणि स्वातंत्र्याचा पाया घातला. या पेक्षा स्वतंत्र देश निर्माण करीन, जिथे दोन लोक एकत्र येतील, गुजगोष्टी करतील, जिवाभावाचे स्नेह निर्माण करतील, ज्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक चालते बोलते व्यासपीठ असेल.जिथे माणसं स्वतःच्या मर्जीने येतील आणि जातीलही अशी सिंहगर्जना केली. तर या स्वातंत्र्यविराने विरोधकांचे शेणाचे गोळे चुकवित एका खडकाळ प्रदेशात गाव बसवले. 'चले थे अकेले, लोग आते गये त्याप्रमाणे त्यांचा मोठा कारवा' बनला. जालीय देशात लोकशाही आणि लेखनाचे स्वातंत्र्य असलेला एक मोठा परिवार मिसळपावच्या निमित्ताने उभा केला. पुढे त्यांच्या परिवाराची मोडतोड होण्यासाठी नव-नवीन संकेतस्थळांची / टीका करणार्‍या स्पेशल ब्लॉगची निर्मिती व्हायला लागली... मराठी जालावर वावरणार्‍या एका बाल्टीमोरच्या मित्राची म्हण मला त्याबाबतीत आवडते, तो मराठी संस्थळाच्या बाबतीत म्हणतो..'छ्त्तीस लुगडी आणि नेसणारी एकटी' अशी अवस्था मात्र जालीय मराठी माणसाची होणार आहे. :)

-दिलीप बिरुटे
(जालावरील मराठी संस्थळे, त्यांचे मालक आणि संस्थळावरील साहित्याचा गाढा अभ्यासक)

दशानन's picture

26 Jan 2009 - 12:32 pm | दशानन

टाळ्या !

पण तुमचे उत्तर.... पुस्तकी छापाचे आहे.... आमच्या सारख्या गावातल्या अडाण्या लोकांना काहीच कळणार नाय ना.. त्यामुळे मी मिपाच्या ब्रिद वाक्याचा मान राखुन एकदम देशी भाषेत उत्तर दिले... व त्यांना समजले पण असावे त्यांनी त्यानंतर एक ही शब्द लिहला नाय !

कसं बरोबर की नाय :?

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2009 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पण तुमचे उत्तर.... पुस्तकी छापाचे आहे
प्रा.डॉ. या बिरुदाचे काय करायचे मग !
>>एकदम देशी भाषेत उत्तर दिले... व त्यांना समजले पण असावे त्यांनी त्यानंतर एक ही शब्द लिहला नाय !
हेही बरोबर ! :)

अवांतर : अवांतर गप्पा मारण्यासाठी खरडफळ्याचा वापर करावा..अशी सुचना येण्याअगोदर आपण खरडफळ्यावर गेलेले बरे ! :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 12:42 pm | विसोबा खेचर

मिपाचा इतिहास, मालक यांच्याबद्दल मिपापेक्षाही इतर काही ब्लॉग्ज आणि संस्थळावर अधिक माहिती मिळेल! ;)

बाझवला तिच्यायला! :)

तात्या.

दशानन's picture

26 Jan 2009 - 12:43 pm | दशानन

=))

सहमत. प्रेमींचा पत्ता देण्यास विसरलो होतो मी !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विंजिनेर's picture

26 Jan 2009 - 1:10 pm | विंजिनेर

मिपाच्या (गाढे,देशी आणि इतर) अश्या सर्व चाह्त्यांचे हा इतिहासाचा वर्ग मनोरंजक(, चविष्ट आणि ज्ञानात भर टाकणारा) केल्याबद्दल आभार.

मिपाचा इतिहास, मालक यांच्याबद्दल मिपापेक्षाही इतर काही ब्लॉग्ज आणि संस्थळावर अधिक माहिती मिळेल!

हा तुमचा विनय झाला. पण मिपाची माहिती इतरठिकाणी असेलतर उत्तमच पण मिपावरही असणे आवश्यक आहे.
एक "शॉर्ट्कट" म्हणजे ह्याच दुव्याला "वाविप्र" मध्ये टाकता येईल तर बघा.

सखाराम_गटणे™'s picture

26 Jan 2009 - 2:14 pm | सखाराम_गटणे™

मिपाचा इतिहास मला सुदधा फारसा अवगत नाही.
माझे मराठी आंतरजालिय वय १ वर्ष पेक्षा कमी आहे.

ऑर्कुट वरुन मिपावर आलो. मग मनोगत, मायबोली, माझे शब्द, उपक्रम इ. संस्थळे माहीत पडली.

मिपाचा इतिहास एकण्यास मी नक्कीच उत्सुक आहे. कारण इतिहास हा माझा लहानपणापासुन आवडीचा विषय आहे.

असे कोण निवडक शिलेदार होते, त्यांनी बेलभंडार उचलुन मराठी संस्थळ बहुजन समाजात आणण्याची शपथ घेतली?
राज्य स्थापने मागची मुळे उद्दीष्टे कोणती? शत्रुपक्षाकडुन आलेले हल्ले कसे परतवले? कुठे तह केले? आंतरजालिय बहिर्जी नाईक, मदारी मेहतर, बाजी प्रभु, मुरारबाजी, सेनापती नेताजी पालकर कोण? सुरवातीच्या कळा सोसुन आता तरुणपणात कसे वाटते आहे?

सर्किट's picture

26 Jan 2009 - 2:29 pm | सर्किट (not verified)

हा चर्चेचा प्रस्ताव वाचून वारलो !

बस एवढेच म्हणतो !

विंजिनेराल वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आणि गणतंत्रदिनाच्या देखील !!!

आणि गुद्दायुद्धदिनाच्या च्या पहिल्या माहपूर्तीबदल देखील शुभेच्छा !

-- सर्किट

महेंद्र's picture

28 Jan 2009 - 9:15 am | महेंद्र

मिपाचा इतिहास
बेडेकरांची मिसळ बरी असते . पुण्याला गेलो कि शनिवाराला नक्की जातो . बेडेकर मिसळ जरा तिखटच करतात. पण चविला चांगली असते..
आमच्या नागपुरला मिसळ प्रमाणेच पोहे विथ चना रस्सा... मस्त असतो. (एल आय सी समोरचा)

मुंबैला आल्या पासुन जरा हालच होते मिसळ खाण्याचे. सगळ्या शेट्टी च्या हाटेलातली मिसळ चाखुन झाली . शेवटी आमचा एक लालबागचा मित्र, त्याने लालबाग च्या आणि परळ च्या अस्सल मर्हाट्मोळ्या मिसळची चव दाखवली अन.. बस्स! शेवटी युरेका युरेका... असं ओरडावसं वाटलं.

पाव हा कुठल्याही बेकरितला बरा असतो. पण पायाने तुडवलेल्या कणकीचा पाव जास्त चवदार असतो.

baakI itihas itar lok sangatilch

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 9:31 am | मधु मलुष्टे ज्य...

मिपाचा इतिहास तात्यांखेरीज दुसर्‍या कुणाला कसा चांगला ठाउक असेल. तात्यांच्या लिखाणाचा आम्ही ’मनोगत’वर असल्यापासुनचा चाहता आहे. मिपावर त्यांच्या लिखाणाबरोबर अन्य लेखकांचे दर्जेदार लिखाणही वाचावयास मिळते. मिपाला जन्म तात्यांनी दिला असला तरी त्याला सर्वांचे लाडकं संस्थळ बनवण्यात येथील सर्व सदस्यांचा मोठा वाटा आहे. मिपाचा इतीहास कळेलच हळू हळु पण मिपाचे भविष्य उज्वल आहे हे नक्की.

-- मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

निखिल देशपांडे's picture

28 Jan 2009 - 9:35 am | निखिल देशपांडे

मि पा चा इतिहासाबद्द फारशि माहिति नाहि....... वरच्या राज व प्रा. डा. चा प्रतिक्रियां वरुण थोडि माहिति मिळालि पण तात्यंना विनंति आहे कि त्यांनि इतिहास लिहुन काढावा

अवलिया's picture

28 Jan 2009 - 9:38 am | अवलिया

तात्यंना विनंति आहे कि त्यांनि इतिहास लिहुन काढावा

तात्या इतिहास लिहित नाहित, घडवतात.
इतिहास लिहिणारे दुसरेच आहेत, मिपावर रहा काहि दिवस म्हणजे कळेल कोण ते. त्यांना सांगा ते लिहितिल...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

चतुरंग's picture

28 Jan 2009 - 9:44 am | चतुरंग

तात्या इतिहास लिहित नाहित, घडवतात.
एकदम पक्की बात बोललात अवलिया!

चतुरंग

निखिल देशपांडे's picture

28 Jan 2009 - 9:50 am | निखिल देशपांडे

तात्या इतिहास लिहित नाहित, घडवतात.
इतिहास लिहिणारे दुसरेच आहेत

मि पा चा सर्व जेष्ठ सभासदांना विनंति आहे...... मि पा चा इतिहासा बद्द्ल थोडि माहिति द्यावि

जयेश's picture

28 Jan 2009 - 11:34 am | जयेश

हेच म्हणतो

इतिहास सांगाच