प्रजासत्ताक दिन

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
25 Jan 2009 - 11:02 pm
गाभा: 

उद्या प्रजासत्ताक दिन आहे.
बहुतेक सर्व सोसायट्या कॉलन्या आपापल्या आवारात ध्वजवंदन करतील.
ठराविक गाणी म्हणतील. ठराविक छापाची भाषणे करतील.
यातल्या बहुतेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीतील फरक माहित नसेल.

बहुतेकांच्या लेखी दोन्ही दिवस सारखेच. शर्टावर टाचणीने झेंडा लावून फिरण्याचा.

स्वातंत्र्यदिनी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो. तो एक टप्पा होता.
प्रजासत्ताक दिनी 'आपण' आपला देश कशा पद्धतीने चालवणार आहोत हे ठरवले. यादिवशी 'आपण' लोकशाहीची स्थापना केली.
ही लोकशाही अजून आपल्याला समजली आहे का?
आपणच आपला देश (चांगल्या किंवा वाईट रीतीने) चालवीत आहोत अशी भावना दिसत नाही. नेहमी आपण सरकार असे करते सरकार तसे करते असे म्हणतो. सरकार म्हणजे आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळे आहे परके आहे अशी समजूत असते.

लोकशाहीत निवडणुका असतात. त्यावेळी लोक आपले प्रतिनिधी निवडतात. एकदा निवडणूक झाली की आपला लोकशाहीशी संबंध संपला असे आपण (आणि आपले प्रतिनिधीही) मानतो.

आपल्या निवडणुकांमध्ये चुकीच्या/गुन्हेगार व्यक्ती निवडून येतात अशी आपल्याला खंत असते. मग आपण लोकशाहीलाच नावे ठेवतो. ठोकशाहीचे/ हुकुमशाहीचे समर्थन करू लागतो.
लोकशाहीचे मुख्य तत्त्व धोरण व कार्यक्रम हे आहे. म्हणुन पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. निवडून आल्यावर कोणती धोरणे कार्यक्रम राबवणार हे त्यात सांगितलेले असते. तो कार्यक्रम पाहून आपण मते देतो. म्हणजे राममंदिर बांधण्याचा कार्यक्रम आपल्याला मान्य असेल तर आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला मत देतो. परंतु कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो.
जे काही करतो ते आपणच करतो. हीच तर लोकशाही.
(येथे कोणी गठ्ठ्याने मतदान करतात म्हणून शोक करण्याचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठ्याने मते सगळेच देतात.)
लोकशाहीत आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी असते. एकदा हुकुमशाही स्वीकारली (?) की ती संधी केव्हा मिळेल हे सांगता यायचे नाही.
लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा प्रजासत्ताक दिनी संकल्प करू.
जय हिंद.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 12:48 am | विसोबा खेचर

गेली ६० वर्ष चाललेला लोकशाहीचा तमाशा पाहतोच आहे! :)

तात्या.

विकास's picture

26 Jan 2009 - 12:57 am | विकास

दरवर्षी हा देखावा होत आहे याचा अर्थ सर्वांना माहीत असायला हवे की नक्की की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि तो २६ जानेवारीस कसा काय आला हे देखील माहीत असायला हवे. रस्त्यावर हा प्रश्न विचारून सर्व्हे करायला हवा, म्हणजे कळेल. (न्युयॉर्क शहरात एकदा तत्कालीन प्रसिद्धी पावलेली परराष्ट्रमंत्री मॅडलीन आलब्राईट आणि मॅडोनाचे फोटो दाखवून नावे विचारली. अर्थात मॅडोना जास्त माहीत होती! :-) )

कधीकाळी वाचल्याचे आठवते की तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी २६ जानेवारीस (चुकून, तरी देखील) स्वतंत्रता दिन म्हणले होते.

असो.

सर्किट's picture

26 Jan 2009 - 3:10 pm | सर्किट (not verified)

प्रजासत्ताक म्हणजे डेमॉक्रसी ?

गणतंत्र म्हणजे डेमोटेक ?

स्वतंत्रता दिन म्हणजे लिबर्टी डे, एवढे कळते, पण बाकी दोन दिनांविषयी जरा कन्फ्युजन अहे.

(विकासला भारताविषयई जबरा माहिती आहे, त्यामुळे त्याच्याकडून ही इन्फॉर्मेशन मिळेल ही अपेक्षा:-)

अर्थात डे कुठलाही असो, अक्षयकुमार आणि ऐश्वर्याला ला पद्मष्री मिळाल्याच जबरा आनंद आहे.

त्यामुळे गणतंत्र असो किंवा प्रजासत्ताक, दिन हा आमच्या फेवरीट याक्टरला अवार्ड देण्याचा हे नक्की.

(ओ, स्वारी ! हरभजन च्या चुट्टीवर आणखी एक अवार्ड ! कूल !)

-- सर्किट

धनंजय's picture

26 Jan 2009 - 1:59 am | धनंजय

कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो.
...
(येथे कोणी गठ्ठ्याने मतदान करतात म्हणून शोक करण्याचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठ्याने मते सगळेच देतात.)

विशेष सहमती.

दशानन's picture

26 Jan 2009 - 10:36 am | दशानन

कोण काय करतं हे महत्वाचे नाही आपण काय करतो हे महत्वाचे आहे.. !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

कशिद's picture

26 Jan 2009 - 12:33 pm | कशिद

प्रजासतक दिनाच्या हार्दिक सुभेचा ...

भारतीय सविधान न मुले आपल्याला जे विविध अधिकार अणि स्वरक्षण मिळाले आही तो हा दिवस ...हा दिवस चिरायु हो अशी गणरयाच्या चरनी प्राथना .

वन्दे मातरम..

(सविधान व देश प्रेमी) अक्षय

नीलकांत's picture

26 Jan 2009 - 12:42 pm | नीलकांत

ते छापाचं का असेना पण आज मला माझ्या शर्टाच्या खिश्याला झेंडा लावायला आवडतं. आज सकाळी ध्वजवंदन करायला आवडतं. आता हा प्रतिसाद देतानां बाहेर जे देशभक्तीपर गाणी वाजताहेत ती सुध्दा गेली अनेक वर्षे आठवतात.

शाळेत असतांना आपल्या शाळेचं संचलन गावात चांगलं दिसावं म्हणून भांडून घोष आणल्याच्या आणि गावभर चालणार्‍या मिरवणूकीत बाहेर शिकलेल्या घोष रचना वाजवायला आवडायचं. दमून भागून शाळेत परत यायचं आणि खाऊ खायचा. मजा असायची. कुणी कुठलीही घोषणा दिली की हात वर करून 'जय' किंवा 'चिरायू होवो' ची आरोळी ठोकायची. :)

पुढे जाऊन प्रजासत्ताक, गणतंत्र या शब्दांचे अर्थ कळायला लागले. मग जाणवलं की हा दिवस किती महत्वाचा. माझी पिढी किती भाग्यवान ते !

(नागरीक) नीलकांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2009 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मला माझ्या शर्टाच्या खिश्याला झेंडा लावायला आवडतं. आज सकाळी ध्वजवंदन करायला आवडतं. आता हा प्रतिसाद देतानां बाहेर जे देशभक्तीपर गाणी वाजताहेत ती सुध्दा गेली अनेक वर्षे आठवतात / आवडतात.

>>पुढे जाऊन प्रजासत्ताक, गणतंत्र या शब्दांचे अर्थ कळायला लागले. मग जाणवलं की हा दिवस किती महत्वाचा. माझी पिढी किती भाग्यवान ते !

अगदी सहमत आहे !!!

नीलकांत काय आठवणी दिल्या शाळेच्या...शाळेत झेंडावंदनाच्या आदल्या दिवशी पताका चिटकवणे, शाळेतला वर्षानुवर्ष पीटीला तोच बॅड आणि तेच हात करायला मजा यायची. आता महाविद्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला असतो. कधी-कधी मुले देशभक्तीपर गीते गातात. मजा करतात. आम्हीही त्यात असतो , पण फिझीकली. मन मात्र शाळेतच रमते !

-दिलीप बिरुटे
(शाळेतला )

दशानन's picture

26 Jan 2009 - 12:55 pm | दशानन

१००% सहमत.

च्या मायला इकडं दिल्ली ला काय बी मज्जा नाय राव एक परेड सोडली तर... !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

" अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे | गतासूनगतासूंश्र्च नानुशोचत्नि पण्डिता: || १९ || श्रीमद् भगवद् गीता अध्याय २ "
संजीव नाईक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2009 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे | गतासूनगतासूंश्र्च नानुशोचत्नि पण्डिता: ||

सहमत आहे ! पण काय अर्थ आहे हो याचा ?

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 1:59 pm | नितिन थत्ते

ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करीत आहेस आणि वर युक्तिवाद करीत आहेस. पंडित लोक आल्या गेल्याचा विचार करीत नाहीत.

आणि मी लिहिले आहे त्याचा
माझे अवयव कंप पावत आहेत आणि तोंडाला कोरड पडली आहे.
असा अर्थ आहे.

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 1:55 pm | नितिन थत्ते

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यते
असा विषादयोग तर आला नाही ना? त्यामुळे या भानगडीत पडायच्या ऐवजी तो विचार करणेच चुकीचे असे सुचवताय की काय?

दशानन's picture

26 Jan 2009 - 1:58 pm | दशानन

मायला !

अरे तुम्हा विद्वानांना साधी सोपी मराठी येत नाही का ?

की उगाच कुठ पण आपली पाजळायची तलवार ?

कोणी भला मोठा प्रतिसाद इग्रजी मध्ये लिहतो तर कोणी संस्कृत मध्ये... तुम्हालाच कळाले म्हणजे झाले असे नाही राव !
आम्हाला बी कळू द्या जरा.. का लिहता तुम्ही ते !

डोक्यावरुन जाऊ नका... नाय तर पार व्हाल !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 2:02 pm | नितिन थत्ते

अर्थ वर लिहिला आहे.

मराठीतच लिहीन. कोणीतरी संस्कृत लिहिले म्हणून संस्कृतात उत्तर दिले.

कलंत्री's picture

26 Jan 2009 - 8:02 pm | कलंत्री

स्वातंत्र्यदिवस आणि गणतंत्रदिन शाळेत साजरा करण्याची पद्धत ज्या कोणाच्या डोक्यातुन आली असेल त्याला १०० दण्डवत घातलेच पाहिजे. लहानपणी त्या कवायती, मिरवणुका, घोषणा इत्यादींचा माहौल विसरणे जवळजवळ अशक्यच आहे.

सध्या मात्र शाळा असे संमेलने, दिवस टाळण्याच्या मागे आहे असे कळते. कालाय तस्मो नमः

मी माझ्या ऑफिसच्या भिंतीवर भारताचा तिरंगा डकवून साजरा करतोय!
विजयी विश्वतिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा!!
जयहिंद!

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2009 - 12:46 am | भडकमकर मास्तर

झेंडावंदन,घोषपथक आणि कवायत भारी असे...

काही अवांतर आठवणी ::झेंडावंदनानंतर आमचेच संस्थाचालक दर वर्षी तीच तीच गोष्ट सांगत असत....दिव्य माईक आणि स्पीकर्समुळे ती अजिबात ऐकू येत नसे... माईकच्या मोठ्या शिट्ट्या वाजत राहत... दूर अंतरावरून तो खादीधारी इसम नुसतेच तोंड हलवताना दिसे आणि जाम कंटाळा येई... आपल्याला गाता येतं असं समजणार्‍या काही शिक्षिका पाच सात पोरं पोरी हाताशी घेऊन गाऊ लागत...मग मैदानावर खाली बसलेली सर्व मुले एकमेकांना खडे वगैरे मारून स्वत:चे मनोरंजन करत असत... काही मुले पळून जायचे मार्ग शोधत असत... काही जण नंतर वाटल्या जाणार्‍या बिस्किटांच्या पुड्यांवर लक्ष ठेवून असत...

झेंडावंदन संपल्यानंतर मात्र मला उरलेल्या सर्व सोपस्कारांचा वैताग येत असे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/