गाभा:
मित्रहो,
आत्ताच काही मिनिटांपूर्वी हिंदी "सा रे ग म प" ज्यामधे अनेक देशांमधले गायक सहभागी झाले होते, त्या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला. मराठी सा रे ग म प ची विजेती, आणि साधीसुधी मराठमोळी गायिका वैशाली भैसने माडे या स्पर्धेमधेही विजेती ठरली आहे...
तिचं समस्त मिपा सदस्यांतर्फे हार्दिक अभिनंदन...
अवांतर : ए पोर्या... डोकी मोज.
आत्ता हॉटेलात हजर असणार्या सगळ्यांना माझ्याकडून चहा (आणि सिगारेट ऑप्शनल :) ) !!!
प्रतिक्रिया
25 Jan 2009 - 12:08 am | नीलकांत
वैशाली भैसने-माडे चं हार्दिक अभिनंदन...
नीलकांत
25 Jan 2009 - 12:25 am | पक्या
वैशालीचं हार्दिक अभिनंदन.
सोमेन आणि याशिता हे अंतिम फेरीतले स्पर्धक वैशालीच्या तोडीस तोड अजिबात नव्हते. त्यामुळे वैशाली च पहिली येणार याची खात्री होती.
25 Jan 2009 - 12:34 am | केशवराव
वैशाली , तोडलस; चाबुक! मराठीचा ध्वज फडकवत ठेवलास. एकदम खुश!
25 Jan 2009 - 1:42 am | चकली
अभिनंदन
चकली
http://chakali.blogspot.com
25 Jan 2009 - 4:05 am | शंकरराव
व्वा!!!
अभिनंदन वैशू
आनंद झाला बातमी वाचून
25 Jan 2009 - 6:24 am | शुभान्गी
दिल खुश!!!
अभिनन्दन वैशू!!!
जय महाराष्ट्र !!!!
25 Jan 2009 - 8:53 am | आनंद घारे
वैशालीने मराठी सारेगमपमध्ये प्रवेश केल्यापासून मी तिचे गाणे आवडीने ऐकत आलो आहे. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून मार्ग काढून जिद्दीने इतका मोठा पल्ला मारल्याबद्दल तिचे कौतुक करावे तितके कमी आहे. पण या अन्य कारणासाठी तिचे गाणे मला आवडते असे नसून तिचे गाणेच अत्यंत प्रभावी आहे आणि त्यासाठी तिने केलेली मेहनत व प्रामाणिकपणा त्यात दिसून येतो, हे त्याचे मुख्य कारण आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या झगमगाटात राहूनसुद्धा तिचे संयत वागणे आणि विनयशील बोलणे मनाला भिडण्यासारखे आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/