पाषाण युगामध्ये सुध्दा नालंदा महानगर होते

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
21 Jan 2009 - 4:52 pm
गाभा: 

बिहार मध्ये नालंदा जिल्हात राजगीर पासुन पचाने नदीच्या जवळ गिरियक पाशी ताम्रपाषाण काळातील एक महानगर शोधुन काढण्यात पुरातनशास्त्रीना यश मिळाले आहे, पाच हजार वर्षा पुर्वी जेव्हा बाकी जग जंगलामध्ये कंद-मुळे खाऊन जिवन व्यतीत करत होते तेव्हा नालंदाच्या घोडांकटोरा मध्ये लोक महानगरीय जिवन सुविधा उपभोगत होते.

ते एक समृध्द महानगर होते तसेच ते अखंड भारतातील बाकीच्या १६ महानगरापेक्षा समृध्द होते व ती- ते साढेंतीन हजार वर्ष ते शहर आपल्या समृध्दीच्या उच्चतम सीमेवर होते, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे अधीक्षक एन.जी. निकोशे ह्यांनी आज सांगितले की घोडाकटोरा मध्ये पाषाण युगापासून पहिल्या शतकापासून ते मौर्य, शुंग, कुषाण, पाल, गुप्त तथा मुस्लिम काळाचे अस्तित्व सापडले आहे तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की पुढे मागे येथे नवपाषाण युगाचे देखील पुरावे सापडू शकतील, तेथे काही काही कलाकृती, मुर्ती , मुद्रा व गोल विहिरी तसेच काही भिंती सापडल्या आहेत ज्या महानगराचे अस्तित्व स्पष्टपणे अधोरेखीत करतात.

बातमी सोर्स : एनडीटिव्ही.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

21 Jan 2009 - 5:10 pm | नितिन थत्ते

#o काथ्याकुटाचा उद्देश कळला नाही.

दशानन's picture

21 Jan 2009 - 5:12 pm | दशानन

च्यामायला हे काथ्याकुट मध्ये गेलं काय... स्वारी बरं का... ध्यान आलं नाय ध्यान जरा ध्यान मग्न झालं होतं !

नितिन थत्ते's picture

21 Jan 2009 - 6:25 pm | नितिन थत्ते

तरीपण उद्देश काय?

नितिन थत्ते's picture

21 Jan 2009 - 6:25 pm | नितिन थत्ते

तरीपण उद्देश काय?

मैत्र's picture

21 Jan 2009 - 5:41 pm | मैत्र

http://bstdc.bih.nic.in/Nalanda.htm

वरील फोटोवर जी लिंक आहे ती बिहार राज्य पर्यटन विभागाची आहे. तिथे हा फोटो उपलब्ध आहे.
त्याप्रमाणे नालंदा ५व्या शतकातील (ए. डी.) आहे.

दशानन's picture

21 Jan 2009 - 5:54 pm | दशानन

हा शोध १८ तारखे पासून जी खुदाई चालू होती त्या आधारे लावला गेला आहे !

पुर्ण बातमी येथे http://josh18.in.com/hindi/-news-/386592/0

लिखाळ's picture

21 Jan 2009 - 5:45 pm | लिखाळ

चांगली माहिती. यावर अजून वाचायला पाहिजे.

विरंगुळा : प्राचिन महानगरात नारळाची झाडे असत का? आणि नाराळापासून काथ्या काढून त्याचे कूट करत का? की शेंगदाण्याचेच कूट करत? यावर एखादी बोधप्रद चर्चा व्हावी. त्या अनुशंघाने काथ्याचे विविध उपयोग माहिती होतील आणि मी माहितीसंपन्न होईन. :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
संकेतस्थळांवर बरीच माहिती मिळत असल्याने मी इतर पुस्तके वगैरे वाचत नाही.

अमोल केळकर's picture

21 Jan 2009 - 6:03 pm | अमोल केळकर

चांगली माहिती
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अवलिया's picture

21 Jan 2009 - 8:06 pm | अवलिया

मस्त रे... असेच जरा खोदकाम करुन सांगत जा.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

प्राजु's picture

21 Jan 2009 - 8:42 pm | प्राजु

माहीती चांगली आहे. आणखी वाचायला आवडेल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

22 Jan 2009 - 12:24 am | सर्किट (not verified)

आता पुढचे संशोधनः

नालंदा शहरावर मराठी लोकांनी अतिक्रमण केल्याने, त्या शहराची प्रचंड दुर्दशा झाली. बिहारी होते तेच बरे होते.

-- सर्किट

विकास's picture

22 Jan 2009 - 2:24 am | विकास

पाषाण युगामध्ये सुध्दा नालंदा महानगर होते

बिहार मधे आजही पाषाणयुगच तर चालू आहे ना? अशी म्हणण्यासारखी अवस्था आहे ;)

धनंजय's picture

22 Jan 2009 - 3:44 am | धनंजय

चित्र मात्र बौद्ध स्तूपाचेच वाटते.

बातमीवरून काही लहान वस्तू, विहिरींचे आणि भिंतींचे अवशेष सापडले आहेत, लेखातले भव्य चित्र मात्र ५व्या शतकातल्या वास्तूचे असावे.

ताम्रपाषाण युग से पहली शताब्दी तक के मौर्य, शुंग, कुषाण, पाल, गुप्त एवं मुस्लिम काल के कई प्रमाण मिले हैं। ... टिले में कई गोलाकार कुएं एवं दीवारों के अवशेष मिले हैं जो महानगरीय व्यवस्था को स्पष्ट करता है।

मगधातले मौर्य वगैरे ताम्रयुगाच्या आसपास येतात, त्यामुळे "ताम्रपाषाण काल" वाचून अगदी-अगदी आश्चर्य वाटत नाही, पण जर साधे-पाषाणयुग म्हटले तर जरा आश्चर्य वाटले असते. हडा़प्पा संस्कृतीच्या काळातही पूर्वेकडे गंगेच्या खोर्‍यात नागरसंस्कृती असेल तर हा शोध महत्त्वाचा असेल (पण बातमीवरून असे स्पष्ट दिसत नाही.)

एकलव्य's picture

22 Jan 2009 - 7:31 am | एकलव्य

... आणखी काही आठवले. :)

पाषाणयुगाचा संदर्भ नीट रुचला नाही पण दुव्याबद्दल धन्यवाद!

(अश्मयुगीन) एकलव्य