मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
संभोग म्हणजे काय?
हा प्रश्न फारसा कोणाला पडत नसावा. किंवा चारचौघात हा प्रश्न विचारण्याचे धाडस होत नसेल म्हणुन हा प्रश्न कोणी विचारत नसेल्.एखाद्या नवर्याने त्याच्या बायकोला किंवा बायकोने नवर्याला हा प्रश्न विचारला तर प्रश्न ऐकणारा एक क्षण हादरुन जाईल. त्या प्रश्नापासून जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर जाईल. शक्य तितक्या लवकर प्रश्न विसरण्याचा प्रयत्न करेल. सुसंस्कृततातल्या संस्कृत माणसाला या प्रश्नाने जितके पछाडले असेल तितके इतर कोणत्याच प्रश्नाने पछाडले नाही.
जगात आत्तापर्यन्त अन्न आणि सेक्स या विषयावर जितके संशोधन झाले आहे तितके माणसाच्या इतिहासावरही झालेले नाही. भारतीय समाजाबद्दल बोलायचे झाले तर आपली कुटुम्ब संस्था हे त्या विषयाचे फलीत आहे.सुरक्षीतता आणि कामवासना हे आपली समाजसंस्था टिकवणारे दोन महत्त्वाचे खांब आहेत.भारतीय विवाहसंस्थे चा मूळ उद्देशच तो आहे.सहजीवन वगैरे ही त्याला दिलेली गोंडस नावे आहेत.
लग्न हे दोन जीवांचे मीलन आहे. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात आहे वगैरे मुलामा असतो. गेल्या शतकाच्या मध्यापर्यन्त लग्नपत्रीकेत सरळ सरळ लग्न या ऐवजी "शरीरसम्बन्ध" असा उल्लेख असायचा.
भारतीय कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता देण्यासाअठी आस्तित्वात आली असे इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
लग्नात स्त्रीला "धर्म अर्थ काम " यात पुरुषाच्या बरोबरीने स्थान असावे असे म्हणतो. तशी प्रतीज्ञाही करतो . किती पुरुष हे असे स्थान स्त्रीला देतात? किंवा किती स्त्रीयाना याची जाणीव असते?
स्त्रीला धर्माच्या बाबतीत दुय्यम स्थान असते. धर्म याचा अर्थ समाजकारण रीत व्यवहार अशा अर्थाने. अर्थाच्या बाबतीत स्त्री कमावणारी नसेल तर तीला कित्येक घरांत भुईला भार अशीच वागणुक दिली जात असतें नवर्याच्या पगारात खर्या अर्थाने स्त्रीचा अर्धा वाटा असतो हे कितीजण मान्य करतात? नवर्याने त्याला मिळणार्या पगारातून खर्च किती करायचा हे नवरा ठरवतो पण कमावत्या स्त्रीला मिळणार्या पगारातुन तीने स्वतःसाठी किती खर्च करायचा हे किती स्त्रीयाना स्वतः ठरवता येते? घरात घेतल्या किती निर्णयात स्त्रीचा विचारघेतला जातो?
पैशाच्या किंवा समाजात मिळणार्या स्थानाच्या बाबतीत बर्याच जणानी थोडा पुढे जाउन विचार केला असेल पण एका बाबतीत मात्र आपण अ़जूनही विचारसुद्धा करायला तयार नसतो . ते म्हणजे तीच्या कामभावने बाबत.
नवराबायकोचे नाते म्हणजे एक कविता असते. दोघे मिळून अवघे विष्व असते असे आपण म्हणत असतो.एखाद्याला दैवत्व दिले की त्याबातीतले सगळे प्रश्न निकालात काढता येतात अशी आपली समजुत असते.स्त्रीला एकदा देवी म्हंटले की तिच्या मानवी समस्यांबद्दलचे सगळे प्रश्न संपतात असे आपला समाज मानत असतो.
नवराबायको च्या नात्यात स्त्रीला किती प्रमाणात समानतेची वागणूक मिळते. कित्येक ठीकाणी तर स्त्रीला गृहीत धरूनच व्यवहार होतात. एखाद्या घरात धर्म आणि अर्थाच्या बाबतीत समान वागणूक मिळतही असेल पण काम याबाबतीत मिळनार्या वागणूकीचे काय? त्याही बाबतीत स्त्रीला गृहीत धरले जाते. शरीरसंबंधास नकार देणार्या स्त्रीला मारहाण झाल्याच्या बातम्या कधी वर्तमानपत्रात येत असतात. न येणार्या छापल्या जाणार्या बातम्यांबद्दल काय.
सम्भोग हा शब्द सम + भोग या दोन शब्दानी मिळुन बनलेला आहे. यात भोग या शब्दाला जितके महत्त्व आहे तितकेच सम या शब्दालाही आहे.
एक व्यक्ती म्हणून किती पुरुष स्वतःच्या पत्नीला ओळखत असतात. किंवा एक पत्नी स्वतःच्या नवर्याला एक व्यक्ती म्हणून किती ओळखत असते. मला वाटते की दोन्ही प्रश्नांची उत्तरे फार वेगळी नाहीत. नवरा बायकोच्या नात्यात शरीरसम्बन्ध हे फार महत्त्वाची भूमीका बजावत असतात. किंबहुना संसाराच्या गाड्यात शरीरसम्बन्ध हे वंगणाची भुमीका बजावत असतात. कुरकुरी कुरबुरी कमी करायला शरीरसम्बन्ध खूप उपयोगी पडत असतात. तसेच त्या वाढवायला ही कारणीभूत होत असतात.
इतर प्राणी आणि मानव यांच्याबुद्धी मध्ये किती फरक आहे हे ठाऊक नाही. पण प्राणी आणि मानव यांच्यात कामवासने मध्ये मात्र खूप फरक आहे. प्राण्यांच्यात कामभावना ऋतुमानानुसार ठरावीक कालावधीतच असते. मानवामध्ये मात्र ती सदोदीत असते . पशुपक्ष्यांत नर कधी मादीवर आक्रमण करून तिच्यावर हक्क गाजवताना दिसत नाही. पक्षी मादीला उत्तम घरटे विणून दाखवतो. कधी तो तिच्या भोवती रुन्जी घलतो. तिला गोड गाणी म्हणून मोहवतो.मानवात मात्र हे दिसत असते किंवा काहींना तर आक्रमण करणे म्हणजेच पुरुषार्थ असे वाटत असते.
कदाचित "धर्म ,अर्थ" हे एकेकट्याने करता येत असतील पण "काम" पूर्ण होण्यासाठी स्त्रीची गरज असतेच.
घटस्फोटाच्या बरर्याचशा केसेसची सुरुवात या न बोलल्या जाणार्या विषयामधून होत असते. त्या बाबतीत पुरुषाने स्त्रीला हक्काची वस्तु समजण्यामुळे ईगो दुखावले जातात्.पुरुषाला शरीरसम्बन्ध हे शारीरीक मानसीक ताणतणाव मोकळे करण्यासाठीचे साधन वाटत असते तर स्त्रीला भावनीक गुंतवणूक वाटत असते.
स्त्रीने दिलेला नकार हा पुरुषाला पर्सनल रीजेक्षन( व्यक्तीगत रीत्या झिडकारणे) वाटते तर याउलट पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही. यातुनच दोघांचीही घुसमट वाढीला लागते.दोघांचा ही त्या विषयाकडे पहायचा दृष्टीकोण वेगळा असतो.दुर्दैवाने आपल्या समाजात दोघांच्याही मनाची जडघडण लहानपणासूनच हे काही समजुन घेण्याच्या पद्धतीने झालेली नसते. या विषयावर धड कुठे मोकळेपणे बोलताही येत नाही. दोघांच्याही बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती असते
कुटुम्बात नवर्याने कमावुन आणणे आणि त्या बदल्यात बायकोने त्याला शरीरसूख देणे म्हणजे संसार हेच त्यांच्या मनावर लहानपणासून कळतनकळत बिम्बवले जाते. ज्या ऋषीने विवाहात "धर्मे च , अर्थे च, कामे च" ची शपथ घ्यायला सांगितली त्याने त्याचा अर्थ जाणला होता. बायकोने नवर्याला एक व्यक्ती म्हणुन तसेच नवर्याने बायकोला एक व्यक्ती म्हणून समजावुन घ्यायला हवे. तरच संसार सुखाचा होईल हेच त्याला म्हणायचे होते. त्यातले मर्म विसरले गेले आहे केवळ उपचार बाकी राहिला आहे.
नवराबायकोने एकमेकाना नीट समजून घ्यायचे असेल तर तीन "टी " कडे जाणीवपूर्वक लक्ष्य दिले पाहिजे
ते म्हणजे टॉक , टाईम , टच
टॉकः नवराबायको एकमेकांशी किती बोलतात यात स्पीक पेक्षा टॉक महत्त्वाचे. एकमेकाना समजून घेने महत्त्वाचे. विचार ऐकणे महत्त्वाचे दुसर्या व्यक्तीलही काही विचार असतात याची जाणीव असणे महत्त्वाचे. तू बोलत रहा मी टीव्ही बघत बसतो/ तुम्ही बोलत रहा मी सीरीयल बघत बसते हे करणे टाळले पाहिजे
टाईम: नवर्याला / बायकोला क्वालिटी टाइम देणे महत्त्वाचे. एकमेकांसोबत घालवलेले साधे साधे क्षणही खूप काही जादू करून जातात. लग्नाच्या अगोदर हे कळतनकळत घडत असते. पण नन्तर त्याची सवय होऊन जाते. आणि हळू हळु शुश्क व्यवहार बनून जातो
टचः हा टी सर्वात महत्त्वाचा. मानवाचे सर्वात मोठे इन्द्रीय त्वचा त्या इन्द्रीयातून जाणवणारे बरेच काही असते. काही स्पर्ष अंगावर पारीजातकाचा सडा पाडतात. लग्ना अगोदर प्रथमच हातात हात घेताना हा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो.तो पारीजतकाचा सडा आपण रोजच्या व्यवहारामध्ये हरवुन टाकतो.
ओशो रजनीश म्हणतात की आपण सम्भोग सुद्धा एक उपचार म्हणून / एक सवय म्हणून करत असतो.ड्रायव्हिंग्ची जशी सवय होते आपण नकळत गीयर टाकत रहातो तसेच काहिसे.. ड्रायव्हिंगमधली गम्मत, थ्रील सम्पलेली असते. नवराबायको हे काही गाडीसारखे यन्त्र नव्हेत.
कोणत्याही गोष्टीची सवय झाली की त्यातले काव्य मरून जाते.त्यातले खडे जाणवायला लागतात. रजनीश पुढे म्हणतात की सवय होणे आपण थांबवु शकतो.त्या साठी त्यातला आनन्द जाणीव पूर्वक भोगता आला पाहिजे
संसारात पारीजातकाचा शिडकावा नेहमीच आणायचा असेल तर उपभोगपेक्षा "सम भोग" महत्त्वाचा!
पाहुणा संपादक : विजूभाऊ.
प्रतिक्रिया
20 Jan 2009 - 9:46 am | रामदास
सुरक्षीत कामवासनेतून(आणि साठी) सहजीवन असेही म्हणता यील ना.?
बाकी थेरीच्या पेपरात आमची नेहेमीच बोंब असते.प्रॅक्टीकलमध्ये कॉलेजच्या आणि बाहेरच्या एक्जामीनरनी नेहेमीच पैकीच्या पैकी दिलेत बॉ.
लेख थोडा अपुरा वाटला.कोण रे तो क्वीकी... क्वीकी म्हणतोय.
बहुतेक मास्तर असावेत.
ओव्हर टू समुपदेशक .
20 Jan 2009 - 4:17 pm | विनायक प्रभू
कभी कभी क्वी़की भी अच्छा लगता है.
20 Jan 2009 - 10:24 am | विसुनाना
विषय महत्त्वाचा. संदेश योग्य. पण अग्रलेखाला लागणारी मुद्देसूद आणि ठाशीव बांधणी झाली नाही.
बर्याच ठिकाणी (सांस्कृतिक नव्हे! सैद्धांतिक) आक्षेप घेण्याजोगी वाक्ये आहेत.
भारतीय कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता देण्यासाअठी आस्तित्वात आली असे इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
इतिहासाचार्य केतकर की राजवाडे?
पशुपक्ष्यांत नर कधी मादीवर आक्रमण करून तिच्यावर हक्क गाजवताना दिसत नाही.
असे नक्की म्हणता येत नाही.
पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही.
काँट्रोव्हर्शियल
बारीक कीस...
20 Jan 2009 - 3:30 pm | नितिन थत्ते
भारतीय कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता देण्यासाअठी आस्तित्वात आली असे इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
इतिहासाचार्य केतकर की राजवाडे?
१. पुस्तक राजवाड्यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा विषय यज्ञसंस्कृतीच्या आधीच्या काळापासून स्त्री पुरुष शरीरसंबंधात घडलेले बदल असा आहे. त्यात 'कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता......' अशा अर्थाचे विवेचन नाही.
२. 'कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता ....' असे मत कोणत्याही लेखकाने मांडले असले तरी ते फारच धाडसी विधान आहे.
भारतीय कुटुंबसंस्था ही संपत्तीचे संक्रमण वारसांमध्ये व्हावे यासाठी वारस ठरविण्याचे नियम ठरविताना निर्माण झाली आहे.
यात पुरुषप्रधान विचारसरणीतून योनीशुचितेच्या बाष्कळ कल्पना रूढ होवून स्त्रियांना नियंत्रित केले गेले.
20 Jan 2009 - 10:26 am | कालिन्दि मुधोळ्कर
"भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" हे पुस्तक वि. का. राजवाडे यांचे आहे, केतकरांचे नाही. पण या सद्रुश विशयावर केतकरांनी अप्रतिम कादम्बरी लिहिली आहे, "ब्राम्ह् णकन्या".
लेखाचा विशय समर्पक आहे.
20 Jan 2009 - 11:01 am | विसोबा खेचर
मोठ्यांच्या विषयात लहानांनी बोलू नये या न्यायाने गप्प बसतो! :)
20 Jan 2009 - 11:05 am | सुनील
विषय महत्त्वाचा आणि स्फोटक, तसाच बर्यापैकी "टाबू" असलेला (अर्थात मिपावर नव्हे!). काही ढोबळ चुका वर काहींनी दाखवून दिल्या आहेतच पण एक अग्रलेख म्हणून थोडा विस्कळीत वाटला.
संभोग शब्दाची फोड आणि दोन्ही शब्दांना असलेले महत्त्व, हे विवेचन विशेष आवडले. डॉ विठ्ठल प्रभू यांच्याशी बोलण्याचा एकदा योग आला होता, तेव्हा ते म्हणाले होते, "Sex doesn't lie btween two legs; it lies between two ears". ह्या वाक्याची आठवण आली.
वेगळ्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल विजुभौंचे अभिनंदन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jan 2009 - 11:07 am | अवलिया
मुक्तक म्हणुन ठिक. परंतु विषय नीट मांडला नाही.
अग्रलेखाचा हा विषय होवु शकत नाही, कारण ह्या विषयातील विश्लेषण अथवा विचार हे अग्रलेखाच्या मांडणीत येवु शकत नाहीत. तरी पण दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे. असे असले तरी, अग्रलेखाचे शीर्षक पोलीस टाईम्स अथवा तत्सम गल्लाभरु वर्तमानपत्राला साजेसे, अर्थातच आवडले नाही. त्यापेक्षा अधिक प्रतिभेचा उपयोग करुन प्रगल्भ शीर्षक निवडीस वाव होता. राग नसावा.
प्रत्येक वाक्यात अथवा परिच्छेदात, लेखकाने आपल्याला हवा तसा अर्थ लावलेला आहे, त्यामुळे चुकीच्या कल्पना अधिक विकृत करुन मांडल्या आहेत. लेखक म्हणतो, "पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे", जर असे असेल तर अशा पद्धतीने असुरक्षित असलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी (किमान एक) लेखकाने काय प्रयत्न केले याचा खुलासा नाही. त्यामुळे सनसनाटी लिहायचे, संस्कृती आणि आचार विचार यांच्यावर आगपाखड करायची, पुरोगामी असल्याचा टेंभा मिरवायचा, ही आजकाल चलनात असलेली फॅशन लेखकाने चांगली उचलली आहे याबद्दल वाद नाही. अर्थातच, हे करतांना प्रत्येक पुरोगाम्याचे होते तेच लेखकाचे झाले आहे, पुढून झाकले तरी मागुन उघडे पडते अशा रितीने लेखकाचे अनेक गोष्टींचे अज्ञान किंवा लेखकाने केलेली सोयीस्कर अर्थमांडणी वाक्यागणिक दिसते. तपशीलात जाण्याची गरज नाही.
कुठलेही संबंध असोत मग ते नवराबायको असो की आईमुलगी अथवा बापलेक वा मित्रमित्र, अति परिचय आणि निकटता, उबग आणतच असते. परंतु त्यांचा त्याग एका फटक्यासरशी होत नाही. कुठलेही नाते हे फुलझाडासारखे असते. निगराणी ही करावीच लागते.
पुढील लेखनास शुभेच्छा !!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Jan 2009 - 11:34 am | विसोबा खेचर
असे असले तरी, अग्रलेखाचे शीर्षक पोलीस टाईम्स अथवा तत्सम गल्लाभरु वर्तमानपत्राला साजेसे,
असहमत आहे!
20 Jan 2009 - 11:36 am | अवलिया
असहमत आहे!
हरकत नाही. असहमतीवर सहमती. :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Jan 2009 - 2:59 pm | शंकरराव
सहमत आहे
विषय भरकटत नेला
अग्रलेखाचा हा विषय होवु शकत नाही, कारण ह्या विषयातील विश्लेषण अथवा विचार हे अग्रलेखाच्या मांडणीत येवु शकत नाहीत. ...हे करतांना प्रत्येक पुरोगाम्याचे होते तेच लेखकाचे झाले आहे, पुढून झाकले तरी मागुन उघडे पडते अशा रितीने लेखकाचे अनेक गोष्टींचे अज्ञान किंवा लेखकाने केलेली सोयीस्कर अर्थमांडणी वाक्यागणिक दिसते. तपशीलात जाण्याची गरज नाही.
13 Apr 2010 - 9:28 pm | रामपुरी
सर्वात जास्त खटकलेले वाक्य... "लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे"
या विषयावरील लेख "लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित" करण्याची गरज नव्हती. चंद्रकांत काकोडकर, अरुण साधू इत्यादीना समर्पित केला असता तर ठिक होते.
11 Aug 2010 - 12:42 pm | गिरधर पाटील
अरूण साधू कसे काय मधे आले ?
20 Jan 2009 - 11:20 am | रेवा
लेखाचा नेमका विषय कळला नाही.
स्त्रियांची सुरक्षीतता / स्त्री वरील शारीर अत्याचार?
स्त्री ची आर्थिक स्वायत्तत्ता?
नवरा बायको तील संबंध सुधारण्या साठी काही टिप्स...
वरील प्रत्येक मुद्दावर स्वतंत्र लेख होउ शकेल..
अग्रलेखाचा नेमका विषय कळल्यास, योग्य प्रतिक्रिया देता येईल.
20 Jan 2009 - 11:28 am | सहज
नक्की विषय कामजीवन आहे की "संसारात पारीजातकाचा शिडकावा" हे तितकेसे कळले नाही. काहीशी प्रोफॅमीली, त्यातुन धर्मसंमत वैवाहीक जीवन अपेक्षीत अशी लेखाची पार्श्वभुमी वाटते.
स्वातंत्र्य, समान हक्क, निर्णयप्रक्रियेत स्थान/मिळुन निर्णय घेणे, आदर, प्रेम, निष्ठा, कदर, पर्सनल स्पेस, कामाची त्यातल्या त्यात न्याय्य वाटणी, दोघांची तडजोडीची तयारी, अक्कल, स्वभाव व अजुन इतर असे अनेक घटक सुखी संसारात येतात. व यातील बर्याचश्या गोष्टींचा कामजीवनावर बरा-वाईट परिणाम होतो असे वाटते.
आजच्या समानतेच्या व स्वातंत्र्याच्या काळात सेक्सला फक्त सेक्स समजुन इतर धाग्यातुन वेगळा काढणे स्त्री व पुरुष दोघांना जमत असावे.
20 Jan 2009 - 11:37 am | विनायक प्रभू
तात्या गाण्याचे क्लासेस काढा. श्री. मंडळी शिकायला येतील. सडा पडत राहील.
विप्र्.सडेकर.
अवांतरः असुरक्षित स्त्रीयांसाठी काहीही करायचे असेल तर संपर्क साधा. सर्व कामे येथे करुन दिली जातील. असा बोर्ड तुम्ही रंगवुन घ्या विजुभौ.
20 Jan 2009 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर
सम-भोगाच्या संपादकियात बरीच विषमता आहे.
सुरुवातीला अर्ध्याहून जास्त विवेचनात स्त्री ह्या दुर्बल (मानल्या गेलेल्या) घटकाची मानसिक, भावनिक आणि शारीरीक कुचंबणा केंद्रस्थानी ठेवून विचार मांडले आहेत. 'संवेदनशील पुरुषांचीही प्रसंगी कुचंबणा होत असते' ह्या वास्तवाला स्पर्शही केलेला नाही.
आजकालच्या दूरदर्शन मालिका पाहिल्या तर त्या सर्व, 'स्त्रियांची कारस्थाने' ह्या वर्गवारीत मोडणार्याच असतात असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.
'सेक्स' हे जेंव्हा एखाद्या स्त्री कडून 'हत्यार' म्हणून वापरले जाते, किंवा 'स्त्री देहाचा' बाजार मांडला जातो तेंव्हा ह्या सम-भोगाच्या उदात्त भावनेला काळीमा फासला जातो. त्यात स्वेच्छा आणि अगतिकता असे दोन प्रकार मांडले तरी कृतीचे समर्थन होत नाही.
टचः हा टी सर्वात महत्त्वाचा.
हे वाक्य तर फारच चुकीचे आणि उथळ आहे. माझ्या मते स्त्री-पुरुषातील प्रेमसंबंधात शरीर हे प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक माध्यमांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे तर अजिबात नाही. 'प्रेम' ही भावना सर्वात महत्त्वाची. शरीर संबंधाला, सम-भोगाला महत्त्व जरूर आहे. पण ते प्रेम-संबंधातील सर्वस्व नाही.
प्रेम नसेल तर शरीरसंबंधही रुक्ष होउन जातो. त्यात समाधान लाभत नाही.
विषय चांगला निवडला पण त्या संदर्भातील सर्व मुद्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
20 Jan 2009 - 2:07 pm | सखाराम_गटणे™
'प्रेम' ही भावना सर्वात महत्त्वाची. शरीर संबंधाला, सम-भोगाला महत्त्व जरूर आहे. पण ते प्रेम-संबंधातील सर्वस्व नाही.
प्रेम नसेल तर शरीरसंबंधही रुक्ष होउन जातो. त्यात समाधान लाभत नाही.
सहमत
जर सम भोगात, प्रेम नसेल तर तो व्यवहारच आहे. तो कधी बलात्काराचे रुप घेउ शकतो नाही तर फोरास रोड वरचा धंदा होउ शकतो.
प्रेमात मुळे जी सम भोगात अनुभुती येती ती नक्कीच व्यवहारापेक्षा वेगळी असते,.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
20 Jan 2009 - 2:23 pm | ब्रिटिश
>>>प्रेमात मुळे जी सम भोगात अनुभुती येती ती नक्कीच व्यवहारापेक्षा वेगळी असते,.
ह्ये आस आसतं व्हय, बरं बरं
..
सोताशीच : बोळा नीगालेला दीसतूय !
..
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
20 Jan 2009 - 4:40 pm | दिगम्भा
"सं"म्हणजे सम नव्हे. सं या उपसर्गाने संपूर्ण, सर्वांगाने, सगळ्यांचे असा काहीतरी अर्थ होतो. एरवी बिघडले नसते पण अशा मानलेल्या अर्थाचा विषयाचा विस्तार करण्यासाठी आधार घेतला म्हणून हा खुलासा.
तसेच "काम"याचा अर्थ फक्त संभोगापुरता संकुचित घेऊ नये. त्याची व्याप्ती सर्व इच्छा, जे जे हवेसे वाटते, तितकी मोठी आहे. हे चार पुरुषार्थ म्हणजे माणसाने आयुष्यात काय काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन आहे.
धर्म = सर्व कर्तव्यांची पूर्ती
अर्थ = सर्व गरजा भागतील याची व्यावहारिक दक्षता
काम = सर्व इच्छांची पूर्ती
मोक्ष = (वरील सर्व ऐहिक बाजू सांभाळून मग) ईश्वराची उपासना किंवा पारलौकिक बाबतीतल्या कर्तव्यांची पूर्ती किंवा सुखाची व्यवस्था (ज्याला जो हवा तसा अर्थ घ्यावा).
हे चारी ज्याने करून दाखवले त्याने पुरुषार्थ केला असे म्हणतात.
20 Jan 2009 - 7:20 pm | अवलिया
योग्य फोड आणि चारी पुरुषार्थांचे अर्थ
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Jan 2009 - 6:27 pm | विजुभाऊ
विषय मोठा व्यापक आहे. सर्वांची मते वाचल्यानन्तर पुढचे बोलेन. प्रतिसादाना फाटे फुटले नाहीत हे महत्वाचे.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
20 Jan 2009 - 7:19 pm | पाषाणभेद
पुर्वी हा शब्द सम भाग असा होता. कारण काही ए़क पदार्थ बनवण्यासाठी दोन पदार्थांचे सम भाग मिशृन ग्यावे लागते.
-( भाषातज्ञ सणकी )पाषाणभेद
20 Jan 2009 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अग्रलेखातील नवराबायकोने एकमेकाना समजून घ्यायचे तीन 'ट' कार आवडले !
विषय खूप चांगला आहे. अजूनही आपल्याकडे 'सेक्सवर ' तितके मनमोकळेपणाने बोलले जात नाही. त्याही बाबतीत कोणी तरी एकानेच बोलायचे आणि दुसर्याने केवळ ऐकायचेच असा काहीसा संवाद असतो. अर्थात स्त्रीला दुय्यम स्थान वगैरे असा विचार जपणारा अविकसीत / अशिक्षीत प्रदेश बराच असल्यामुळे वरील विषयाच्या बाबतीत विचारांची बरीच गुंतागुंत अजूनही आहे.
पुरुषाला शरीरसम्बन्ध हे शारीरीक मानसीक ताणतणाव मोकळे करण्यासाठीचे साधन वाटत असते तर स्त्रीला भावनीक गुंतवणूक वाटत असते.
सही रे !
बाकी अग्रलेखाची मांडणीत आपण यशस्वी झालात का ? याचे उत्तर शोधण्यापेक्षा. चार चौघात न बोलता येणार्या विषयाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले अभिनंदन !!!
इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. होते गडबड कधी-कधी :) लिखते रहो !!!
-दिलीप बिरुटे
20 Jan 2009 - 8:12 pm | कलंत्री
मिपाच्या अग्रलेखाची जी काही समाजोपयोगी, प्रामाणिक आणि मूळ विषयाला भिडण्याची परंपरा आहे त्या परंपरेलाच छेद मिळाला आहे असे वाटते.
आता मूळ विषयाकडे, निसर्गातः शरीर, मनाची ठेवण आणि जिवनाकडे बघण्याची पद्धत यामध्ये स्त्री आणि पुरुषयामध्ये आमुलाग्र असा फरक आहे. त्यामुळे एकाच्या दृष्टीकोनातून जर या विषयाचा विचार केला तर गृहितके १०० % चुकतीलच.
दत्तकाच्या कामशास्त्रातील एका नियमाप्रमाणे, दोन डोळ्याचा अनुराग आणि संवाद याचा अंतिम शेवट हा तिसर्यानेत्राच्या छेदनात व्हावा तर वात्स्यायन मात्र परत शरीरालाच महत्त्व देत असतो. आधुनिक फ्रॉइड मात्र शरीराच्या या मुळ गरजेला मनाच्या कोठल्यातरी आजाराचा भाग आणि प्रतिक्रिया समजत असतो. ( संक्षिप्त अशा वाचनावर आधारीत असे माझे हे मत प्रदर्शन आहे.)
20 Jan 2009 - 8:35 pm | प्राजु
मात्र लेखाची सुरूवात थोडी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्याने केल्यासारखी वाटली.
संभोगासारख्या संववेदनशील विषयावर लिहिण्याच्या प्रयत्नाचे कौतुक वाटले.
ट्च : प्रेम भावनेमध्ये टच हा मह्त्वाचा असतोच पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले आहे तसा नव्हे. प्रेमामध्ये ट्च या शब्दामध्ये खूप काही सामावलं आहे. केवळ पारिजातकाचा सडा शिंडकावणारा टच नव्हे. धीर देणारा, समजून घेणारा, कौतुक करणारा... ट्च या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे.
सम्भोग हा शब्द सम + भोग या दोन शब्दानी मिळुन बनलेला आहे.
याचे विश्लेषण दिगम्भा यांनी दिलेच आहे. पण आपण लावलेला अर्थही चांगला आहे.
लेख किंचित विस्कळीत वाटतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 7:15 pm | agnivarsha
लेख खुप सुन्दर आहे प्रतिक्रिया देन्या परास वाचुन समाधान
27 Jan 2009 - 1:39 pm | साखरांबा
गेल्या शतकाच्या मध्यापर्यन्त लग्नपत्रीकेत सरळ सरळ लग्न या ऐवजी "शरीरसम्बन्ध" असा उल्लेख असायचा.
आपले पुर्वज फारच पुढारलेले होते म्हणायचे. याचेच पुढचं उदाहरण म्हंजे लग्नातील "लवंगा तोडणे" हा विधी. मला तर जबरी मजा आली त्यावेळेला.
विजुभाऊ कंडोमवर पण लिहा डिट्टेलमधे. जमले तर फोटोपण टाका बुव्वा.
30 Jan 2009 - 5:54 pm | ऍडीजोशी (not verified)
स्त्रीला धर्माच्या बाबतीत दुय्यम स्थान असते. धर्म याचा अर्थ समाजकारण रीत व्यवहार अशा अर्थाने. अर्थाच्या बाबतीत स्त्री कमावणारी नसेल तर तीला कित्येक घरांत भुईला भार अशीच वागणुक दिली जात असतें नवर्याच्या पगारात खर्या अर्थाने स्त्रीचा अर्धा वाटा असतो हे कितीजण मान्य करतात? नवर्याने त्याला मिळणार्या पगारातून खर्च किती करायचा हे नवरा ठरवतो पण कमावत्या स्त्रीला मिळणार्या पगारातुन तीने स्वतःसाठी किती खर्च करायचा हे किती स्त्रीयाना स्वतः ठरवता येते? घरात घेतल्या किती निर्णयात स्त्रीचा विचारघेतला जातो?
कुटुम्बात नवर्याने कमावुन आणणे आणि त्या बदल्यात बायकोने त्याला शरीरसूख देणे म्हणजे संसार हेच त्यांच्या मनावर लहानपणासून कळतनकळत बिम्बवले जाते.
स्त्रीने दिलेला नकार हा पुरुषाला पर्सनल रीजेक्षन( व्यक्तीगत रीत्या झिडकारणे) वाटते तर याउलट पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही.
नवराबायको च्या नात्यात स्त्रीला किती प्रमाणात समानतेची वागणूक मिळते. कित्येक ठीकाणी तर स्त्रीला गृहीत धरूनच व्यवहार होतात.
:O कुठल्या शतकातले संसार पाहून हा लेख लिहीलाय? :?
परिस्थीती फार बदलली आहे विजूभाउ. मुलांची अवस्था आता वाईट होत आहे. अशिक्षीत वर्गात असले प्रकार (कदाचीत) होत असतीलही, पण सुशिक्षीत / मध्यमवर्गीय घरांत असलं काही होताना मी तरी बघितलं नाही. आजू बाजूला बघितलेल्या जोडप्यांवरून केलेली ही काही निरिक्षणे-
- नवरा टिपीकल (वेल सेटल्ड, जास्त पगार, स्वतःचे घर, जबाबदार्या नकोत) हवा असतो, पण स्वतः ला टिपीकल बायको व्हायचे नसते.
- घराच्या इन्स्टॉलमेन्टस भरताना आणि खर्च जमवताना नवर्याचीच फाटते. कधी ऐकलंय का - एखाद्या मुलीने मुलाला म्हटलं की आपण दोघे समान आहोत ना मग तू घरातली अर्धी कामं कर मी घरासाठी अर्धे पैसे (१८-२० लाख) देते. समानता सोयिस्कर असते तेंव्हाच हवी असते.
- घराची सजावट / रंग ह्या सगळ्याचे निर्णय बायकोच घेते.
- आधी ज्या कारणांसाठी नवरा आवडायचा आता तीच कारणं जाचक वाटू लागतात.
- नवर्याने कुणा बरोबर रहायचे, किती वेळ बाहेर रहायचे हे सगळं ठणकाऊन सांगितलं जातं.
- नवर्याने पगाराचा हिशोब मागितल्यावर त्याच्याकडे ब्रम्हहत्या केल्यासारखे बघितले जाते.
- स्वत: नवर्याच्या १/४ पगार कमवून 'मी सुद्धा काम करून दमते' हे ऐकवलं जातं. तसंच मलाही माझं करियर महत्वाचं आहे हे ऐकवलं जातं.
- नवरा घरकामात मदत करत नाही ह्या कारणास्तव डिवोर्स झालेला मी पाहिला आहे. (तरी घरात धुण्याभांड्याला बाई आहे.)
- आई वडिलांना त्यांची एकुलती एक मुलगी जड नसल्याने ती नवर्याला कायम फाट्यावर मारायला तयार असते.
- स्वत: च्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी नवर्याला दिवसचे दिवस 'उपास' घडवले जातात.
- नवर्याने कोणते कपडे घालावेत, काय खावं हे स्वत: ठरवतात आणि त्याने फक्त मंगळसूत्र घाल असं सांगितलं की ते स्वातंत्र्यावरचं आक्रमण वाटतं.
30 Jan 2009 - 5:59 pm | सखाराम_गटणे™
मार डाला,
अगदी बरोबर.
बघुया स्त्री - पुरुष समानता वाले काय म्हणतात?
सॉरी सॉरी
बघुया सोयीच्या स्त्री - पुरुष समानता वाले काय म्हणतात?
9 Feb 2009 - 11:05 am | स्वानन्द
>>- नवरा टिपीकल (वेल सेटल्ड, जास्त पगार, स्वतःचे घर, जबाबदार्या नकोत) हवा असतो, पण स्वतः ला टिपीकल बायको व्हायचे नसते
सहमत!
सोयीपुरती समानता !
13 Apr 2010 - 11:27 pm | सोम्यागोम्या
अॅडीशी सहमत.
माझ्या मित्राची बायको नव-याकडून बेडवर सगळ्यागोष्टी कबूल करुन घेते (नवी साडी, नवा फ्रिज, फिरायला जाणे) मगच उपास सोडला जातो.
12 Mar 2009 - 2:36 am | नंदा
हा लेख केवळ स्त्री-पुरूष यांच्यातील लैंगिक संबंधांवर आहे. लैंगिक संबंधांचे पुरुष-पुरूष, स्त्री-स्त्री असेही तितकेच सुंदर अविष्कार असू शकतात. यासंदर्भात मराठीत फारशी चर्चा होत नाही. कदाचित यावर बरेचजण नाके मुरडतील, पण अल्पसंख्येत जरी असले (लोकसंख्येच्या साधारण ३%), तरी असे संबंध निसर्गात निश्चितपणे आढळतात. अशा संबंधांना आणि विवाहांना बर्याच पश्चिमी देशात आणि अमेरिकेतील काही राज्यांत कायदेशीर मान्यता आहे. भारतातही असे संबंध असतात, पण प्रामुख्याने ते गुप्त आणि समाजाच्या भीतीपोटी सर्वमान्य असा स्त्री-पुरूष विवाह करून त्या बाहेर ठेवले जातात. मराठीत विजय तेंडुलकरांनी सर्वात प्रथम 'मित्राची गोष्ट' मधे ह्या विषयाला हात घातला. अलिकडे सचिन कुंडलकरचे 'छोट्याशा सुट्टीत' हे नाटक, आणि मंगला आठलेकरांचे 'हे दु:ख कुण्या जन्माचे' हे सर्वेक्षणात्मक पुस्तक याप्रकारच्या संबंधांवर अधिक प्रकाश टाकतात.
30 Mar 2009 - 8:58 am | संजयक्षीरसागर
१) संभोगाचा पहिला अर्थ शरीर संबंध
२)दुसरा अर्थ : सम- भोग. या अस्तित्वातली प्रत्येक प्रक्रिया ही दोन विरूद्ध आकर्षणामधले मिलन आहे. खरी भूक लागली असताना जेवणे ही भूक (ॠण पोलॅरिटी) आणि अन्न (धन पोलॅरिटी) यांचे मिलन आहे (इन्टर प्ले). संगीत ही शंतता आणि स्वर या दोन विरोधी आकर्षणा मधील नृत्य आहे. त्याच प्रमाणे शारिरीक मिलन ही स्त्री या ऋण आणि पुरूष या धन आकर्षणामधले मिलन आहे. ही दोन्ही आकर्षणे जितकी सम तितका प्रक्रियेत आनंद. निसर्गानी ही प्रक्रिया पुनर्निर्मिती साठी निवडलेली आहे. माणसानी मात्र तिचा समाज, नाती, बंधने, स्त्री ला आधर, पुरूषाचे वर्चस्व, नैतिकता अश्या अनेक पैलूनी पूर्ण गोंधळ केला आहे. त्यामुळे जीवनात अनेक टेंन्शन्स निर्माण झाली आहेत. खरं तर गरज दोन्हीकडे सारखीच आणि पूर्णपणे नैसर्गीक आहे.
३) तिसरा अर्थ अध्यात्मिक आहे. त्याचा भर भोगावर नसून भोगणार्यावर आहे. जर तुम्ही सगळे भोग नीट उपभोगले तर तुम्हाला सगळे भोग सारखाच आनंद देतील, सगळे भोग सम होतील असा त्याचा अर्थ आहे.
पहिल्या चरणा पासून तिसर्या चरणा पर्यंतचा प्रवास ही जीवनाची सर्थकता आहे.
13 Apr 2010 - 6:03 pm | आम्हाघरीधन
संभोगातुन ..............समाधी कडे चला.........................
13 Apr 2010 - 8:27 pm | शुचि
कालच "दीपक चोप्रा" यांचं "द पाथ टू लव्ह" पुस्तक वाचत होते ज्यात त्यांनी संभोगास एक निर्मीतीशील प्रक्रिया (क्रिएटीव्ह अॅक्ट) देखील म्हटले आहे. यामधे त्यांनी हे नमूद केले आहे की अनेक अनुभव या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाच्या कुवतीनुसार येऊ शकतात उदा . - वेळेचा विसर पडणे, उत्कटता (एक्स्टसी), हृत्कमल विकसीत होणे, जोडीदाराबरोबर एकतानता, डिलाइट्फुल लाफ्टर, अहं चा विसर पडणे, चिंतामुक्ती, खेळकरपणा, संपूर्ण सुंदर असा शरणभाव, एक संपूर्णता, ब्लेसिंग, आनंद, अपरिमीत प्रेम , समाधान, शांती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14 Apr 2010 - 12:11 am | सोम्यागोम्या
गहन चर्चा करुन थकला असाल, विषय थोडा लाईट घ्या आणि हे (विनोद म्हणून) पहा.
14 Apr 2010 - 12:17 am | डावखुरा
रुचला नाही मुळी......
"राजे!"
14 Apr 2010 - 12:41 am | अविनाशकुलकर्णी
संभोगाचि मजा जर लुटायचि असेल बायकोला संभोगा व्यतिरिक्त च्या काळात अतिशय सन्मानाने वागविणे महत्वाचे आहे...
असे केले तर स्त्री संभोगाच्या वेळी फुलते..
चावट गप्पात सहभाग घेते..{डर्टी टॉक]....अश्या वेळी तिला एक व्होर म्हणुन घेणे
तिला आवडते..व तुमच्या काम फॅंटसीचि ति पण एक भाग बनते...
व संभोग एक आनंददायी बाब बनते....
पण सारे संपल्यावर ति परत एक नॉरमल स्त्री बनते व तिला सन्मानाने वागवणे भावते...
11 Aug 2010 - 12:50 pm | फुस्स
रोचक लेख, रोचक शिर्षक आणि तितकेच रोचक प्रतिसाद. प्रतिसादांचं वैषिष्ट्य म्हणजे आपण संपादकिय सदरात प्रतिसाद देत आहोत असे समजुन दिलेले आहेत.
विजुभाउ कधीकधी अफलातुन लेखन करतात खरे.
-(आवाज आला क्का ?) फुस्स
25 Dec 2010 - 3:55 pm | विजुभाऊ
एका चांगल्या विषयावर संयमाने प्रतिसाद आले.
धन्यवाद.
क्रमशः
25 Dec 2010 - 4:05 pm | नरेशकुमार
'संभोग' म्हनल्यावर आम्हाला एकंच गोष्ट आठवते.