लग्न झालेल्या मुलींनी माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य ?

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
19 Jan 2009 - 3:55 pm
गाभा: 

प्रथेप्रमाणे लग्न झाल्यावर मुलींनी सासरचे आडनाव लावावे हा रितिरिवाज आहे. पण आजकाल लग्न झाले तरी माहेरचे आडनावच विशेषतः राजकारणात ( माहेरच्या आडनावाचा ) फायदा घेण्यासाठी मुली लावतात.
सध्याचे उदाहरण १) प्रिया दत्त २) पुनम महाजन
हे कितपत योग्य आहे
( मुन्ना भाईने राजकीय फायदा उचलण्यासाठी आजच पत्रकार परिषदेत यासंबंधी मत व्यक्त केले आहे )
आपल्याला काय वाटते. मुलींनी लग्न झाल्यावर फक्त माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य?
माझ्यामते सासर- माहेर दोन्ही आडनावे लावण्यास हरकत नसावी
उदा. -प्रियांका वधेरा-गांधी
माधुरी दिक्षीत- नेने
अशी आणखी काही उदाहरणे इतर क्षेत्रात आहेत का ?

प्रतिक्रिया

लावलेले नाव ठेवावे की
ठेवलेले नाव लावावे...!

काहीही करा...लोक नावं ठेवणारच..!

जाऊद्या. कुणाच्या 'नावा'च्या 'आड' कशाला या..!

(ह. घ्या)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

रोहित परब's picture

23 Jan 2009 - 7:44 pm | रोहित परब

माझ्या मते हे त्या मुलिवर आहे.

विजुभाऊ's picture

28 Jan 2009 - 2:26 pm | विजुभाऊ

लग्न झाल्यावर पुरुषानी बायकोच्या माहेरचे आडनाव लावण्याची पद्धत नाही ते किती बरे आहे
नाहीतर पु लं चे नाव "भाई ठाकुर" असे वाचावे लागले असते

शंकरराव's picture

19 Jan 2009 - 4:03 pm | शंकरराव

आणखी काही उदाहरण

अश्वीनी भिडे-देशपांडे
आरती अंकलिकर-टिकेकर

मिंटी's picture

19 Jan 2009 - 4:06 pm | मिंटी

आणखी एक उदाहरण :

जेष्ठ नृत्यांगना डॉ.सुचेता भिडे - चाफेकर

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jan 2009 - 4:06 pm | ब्रिटिश टिंग्या

अलका कुबल्-आठल्ये
निवेदिता जोशी-सराफ

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jan 2009 - 4:07 pm | ब्रिटिश टिंग्या

ऐश्वर्या राय्-बच्चन

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2009 - 4:14 pm | बिपिन कार्यकर्ते

काय फरक पडतो? कोणतेही आडनाव लावा, दोन्ही लावा, कोणतेच लावू नका...

मूळात हा विषय चर्चिलाच जाऊ नये इतका क्षुल्लक आणि व्यक्तिगत निर्णयाचा आहे असे मला वाटते.

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

20 Jan 2009 - 3:37 am | संदीप चित्रे

एकदम सहमत

नितिन थत्ते's picture

20 Jan 2009 - 2:22 pm | नितिन थत्ते

सहमत

आम्ही माधुरी दीक्षितच म्हणणार.

वाहीदा's picture

21 Jan 2009 - 2:53 pm | वाहीदा

पसंत अपनी अपनी,
खयाल अपना अपना !!
आणखीन एक नाव
भक्ती बर्वे - ईनामदार
~ वाहीदा

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2009 - 6:07 pm | भडकमकर मास्तर

ती बाई आणि तिचं आडनाव...
तिनं काय वाट्टेल ते करावे... आपण कोण बोलणारे?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

19 Jan 2009 - 4:16 pm | सखाराम_गटणे™

कौल टाकायला हवा.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jan 2009 - 4:18 pm | ब्रिटिश टिंग्या

टाक!

सुनील's picture

19 Jan 2009 - 4:29 pm | सुनील

कौल टाकायला हवा.

>:)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Jan 2009 - 10:50 am | घाशीराम कोतवाल १.२

कौल टाकायला हवा.

टाकाच तुम्ही कौल बघु तरी किति मतदान होतय.......
आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा

हे जरा जुन आहे

अवलिया's picture

19 Jan 2009 - 4:19 pm | अवलिया

आडनाव म्हणजे काय हो?
आणि झाड लावतात ऐकले होते.. हे आडनाव कसे लावतात... काय खत पाणी द्यावे लागते?
आडनाव लावु नये.. लावायचेच तर ज्याचे त्याला ठरवु द्यावे.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

सुनील's picture

19 Jan 2009 - 4:23 pm | सुनील

आडनाव लावु नये
सहमत!!

(बिनाआडनावाचा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे तुम्ही कशाला ठरवता?

ज्या लग्नाळू अथवा लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनी ठरवावे.

अमोल केळकर's picture

19 Jan 2009 - 4:26 pm | अमोल केळकर

पुनम महाजन म्हणून निवडून येणे हे कदाचित पुनम राव म्हणून निवडून येण्यापेक्षा सोपे असावे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jan 2009 - 4:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला स्वतःला स्वतःचं नाव बदलणं पटत नाही. लग्नाआधीची स्वतःची संपूर्ण ओळख पुसून टाकायची आणि वेगळंच आडनाव लावण्याची सक्ती, चर्चा, विचारणा इ.इ. होणं मला अन्याय्य वाटतं.

मी स्वतः लग्नानंतर स्वतःचं नाव बदललं नाही, आडनाव बदलण्याचा प्रश्न आला नाही आणि वडलांचं नाव काढून टाकून नवर्‍याचं नाव तिथे लावलं नाही. माझी जवळजवळ २७ वर्षांची ओळख, म्हणजे माझं नाव हा त्याच्या एक भाग, पूर्ण पुसून टाकणं मला अजिबातच पटण्यासारखं नाही. माझं आडनाव माझ्या आईकडून आलं का वडलांकडून हे मला महत्त्वाचं वाटत नाही तर महत्त्वाचं आहे ती ओळख! पूर्वीच्या काळी एकवेळ ठीक होतं, मुलींना घराबाहेर फारशी ओळखच नसायची, पण आजच्या काळात लग्नाआधीच मुलींची स्वतःची ओळख असते, स्वतःचं आयुष्य असतं, ते सगळं लग्नानंतर मुलींनीच का सोडून द्यायचं? मी बिपीनशी संपूर्ण सहमत आहे; आपली ओळख, आयुष्य सोडावं का सोडू नये हा व्यक्तिगत प्रश्न आहे; पण मुलींनी आडनाव बदललं तर त्याबद्दल चर्चा होत नाही, असं झालं नाही तर मात्र चर्चा होते!

चर्चाविषय सुरू करणारे आणि प्रतिक्रिया देणारे पुरूषच दिसत आहेत म्हणून प्रश्न पडला, मुलींनी दोन आडनावं लावायची तर मुलांनीही का नाही? माझ्या माहितीत एक जोडपं आहे, लग्नानंतर दोघंहीजण एकमेकांची आडनावं घेऊन डब्बल-बॅरल आडनाव लावतात.

अवांतरः संजय दत्त हा काही फार मोठा विचारवंत असावा असं वाटत नाही की त्याच्या "या" विधानावरून मोठा गदारोळ व्हावा.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अमोल केळकर's picture

19 Jan 2009 - 4:45 pm | अमोल केळकर

आपला सविस्तर प्रतिसाद आवडला आणी पटलाही

(स्वगतः माझ्या मुलीला ती मोठी झाल्यावर हा प्रतिसाद दाखवायला पाहिजे )

अवांतरः संजय दत्त हा काही फार मोठा विचारवंत असावा असं वाटत नाही की त्याच्या "या" विधानावरून मोठा गदारोळ व्हावा.
एकदम बरोबर - संजय दत्त चे हे विधान केवळ राजकारणी . प्रिया दत्तवर कुरघोडी करण्यासाठीच आहे

(राजकारणी ) अमोल

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शंकरराव's picture

19 Jan 2009 - 4:51 pm | शंकरराव

अवांतरः संजय दत्त हा काही फार मोठा विचारवंत असावा असं वाटत नाही की त्याच्या "या" विधानावरून मोठा गदारोळ व्हावा.
एकदम बरोबर - संजय दत्त चे हे विधान केवळ राजकारणी . प्रिया दत्तवर कुरघोडी करण्यासाठीच आहे

सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jan 2009 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद!

(स्वगतः माझ्या मुलीला ती मोठी झाल्यावर हा प्रतिसाद दाखवायला पाहिजे )

तिला आत्तापासूनच विचार करायची सवय लावा, पुढे फारसे कष्ट करायला लागणार नाहीत! :-)
(चेतावणी: ती पुढे खगोलअभ्यासक बनण्याची दाट शक्यता निर्माण होते!) ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Jan 2009 - 4:42 pm | अविनाशकुलकर्णी

ठिक आहे पण ज्यांचि माहेर व सासर हि दोन्हि आडनावे विचित्र असतात त्यानि जर २ हि आडनावे लावलि तर काय़ होइल?/ऊदा...

१] नेत्रा डोळस-अंधळे
२] आर्या आंबेकर-जांभुळ्कर
३] अलका भोपळे-पावटे
४] मंदा म्हैसकर-गायकर
५] श्वेता बुलबुले-ससाणे
६] सोनिया डुकरे- गाढवे
७] पद्मा नागवेकर- उभेकर
८] स्वाति मुंगी-मुंगळे
९] रत्ना कोकिळ-कावळे
१०]रेशमा दहिभाते-भातखंडे

असो ज्याचा त्याचा हा प्रश्ण आहे.....

अविनाश........बेधुंद मनाच्या लहरी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jan 2009 - 4:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बोळा नाही निघाला की लग्ना आधी आणि/किंवा नंतर मुलांनाही बरेच प्रश्न येत असतील नाही? :?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी's picture

19 Jan 2009 - 4:39 pm | मनस्वी

अगदीच अर्थहीन प्रश्न.

मीनल's picture

19 Jan 2009 - 6:36 pm | मीनल

माझ लग्नाआधीच आईबाबांनी ठेवलेल नाव नव-याने लग्नात बदलल नाही.
माझ लग्न झाल तेव्हा मी फारसा विचार केला नाही की कुठच आडनाव लावायच.
बस्स. प्रथेप्रमाणे मधल आणि आडनाव बदललं गेलं.

पण माझ्या नव-याला मात्र मी त्याच नाव माझ्या स्वतःच्या नावापुढे लावते ते आवडत.
मीनल.

सखाराम_गटणे™'s picture

19 Jan 2009 - 6:49 pm | सखाराम_गटणे™

>>प्रथेप्रमाणे मधल आणि आडनाव बदललं गेलं.

हेच म्हणतो.
फारसे विचार करण्यासारखे काहीच नाही.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

रेवती's picture

19 Jan 2009 - 9:33 pm | रेवती

अत्यंत वैयक्तीक प्रश्न आहे हा!
दोन्ही गोष्टी बरोबर आहेत.
फारसा विचार कधी केला नाही यावर.
अर्थात घरचे मोठे बिझिनेस किंवा त्याप्रकारच्या कोणत्याही कायदेशीर बाबींमुळे
नाव बदलणे किंवा न बदलणे भाग पडत असेल तर गोष्टं वेगळी (त्याबद्दल फारशी माहिती नाही).
माझ्यामते नाव बदलणे किंवा न बदलणे हे पूर्णपणे त्या व्यक्तीने (बाईनेच....तिच्या नवर्‍याने नाही) ठरवावे.

रेवती

चित्रा's picture

19 Jan 2009 - 10:01 pm | चित्रा

माहेरचे आडनाव लावण्याचा निर्णय मी फार विचार करून घेतला असे नाही, तेव्हा कागदपत्रे गोळा करून नाव बदलण्याचे एवढे झेंगट नको म्हणून केवळ नाव आधीचेच राहिले. आता आडनाव नवर्‍याचे लावले तरी काही वाटणार नाही, पण तेही केवळ आळसामुळे लांबणीवर पडते आहे. भारतात माझ्या नावात नवर्‍याचे नाव नाही, याच्यावरून मला कोणीही प्रश्न विचारला नाही. पण अमेरिकेत अनेकांकडून असे अनुभव आले - मुख्यत्वे अमेरिकन बायकांकडून - अगदी तरूण मुलींकडून असे विचारले गेले की तू नाव का नाही बदललेस? बरेचदा मी स्त्रीमुक्तीवादी (पुन्हा साचे आले!) आहे यावरून त्यांना असे वाटते. आपले नाव लग्नानंतर बदलणार असेही एका मुलीने माझ्यातला आणि तिच्यातला विचारातला फरक दाखवून देण्यासाठी मुद्दाम सांगितले.

याउलट एक अनुभव - माझी एक अमेरिकन मैत्रिण लग्नानंतर आपले आधीचेच आडनाव लावते. आधी त्यांनी नवर्‍याचे नाव-आणि बायकोचे असे एकत्र करून जोडनाव लावायचे ठरवले होते, पण तिच्या मनाने आयत्या वेळी कच खाल्ली :) आणि आता केवळ नवरा तसे नाव (जोडनाव) लावतो.

आता कधीतरी असे वाटते की मुलांसाठी म्हणून सगळ्या कुटुंबाचे एकच नाव असलेले बरे असावे, आणि ते नवर्‍याचे असले म्हणून माझ्या अभिमानाला धक्का बसत नाही. कधीकधी माझ्या नवर्‍याला येणारी फुटकळ पत्रे चुकून त्याच्या नावाची भयंकर चिरफाड करीत त्याच्या आडनावाच्या जागी माझे आडनाव घालूनही येतात. अशा वेळी आडनाव एकच असलेले बरे असे वाटते. निदान गोंधळ घातला तर एकाच आडनावाचा घालतील असे वाटते.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

19 Jan 2009 - 10:03 pm | कालिन्दि मुधोळ्कर

प्रश्न आहे हा.

आता विचाराल बालविवाह करावेत का? केशवपन करावे का? हे पण रितिरिवाज होते साहेब.

मी नाव बदलले नाही. गंमत म्हणजे नवरयाने पण नाही बदलले.

टारझन's picture

19 Jan 2009 - 10:13 pm | टारझन

:) काय विचार णाय बॉ केला काय .. इथं आमचं दरवेळे प्रमाणे मत .. हा ज्याचा त्याचा पिरेश्ण आहे ...
च्यायला आपल्या इथं दुसरं काय करतं ह्यात पब्लिक्स ला लै विंटरेष्ट .. आमकी/क्याणे बाहेरच्या जातितली केली/केला आणि तस्तम विषयच काय अजुन ही खरकटे इश्शू आपल्या इथंल पब्लिक चोथा पण सोडत णाही इथपर्यंत चावतं ..
तर आमच्या मते ही तिची इच्छा ... लावायंचं ते णाव लाव ... बाकी पोरींच्या बाजूचं काय बोलणार .. तसंही पोरी काय विचार करतात हे त्यांनी कळंत असावं असा दाट संशय आहे :)

कपिल काळे's picture

19 Jan 2009 - 10:20 pm | कपिल काळे

ही तर आपले नव्हे तर आपल्या आइच्या माहेरचे आडनाव लावते. आता विचाराल की दोन आडनावांचा विषय आहे. तर.. सासर आणि माहेर अशी आडनावे असतात म्हणून दोनच लावतात काही बायका. मग मल्लिकाबाईंचे काय? तिने काय करायचं?

भाग्यश्री's picture

19 Jan 2009 - 10:23 pm | भाग्यश्री

माझ्यामते इतकं काथ्याकूट करण्यासारखा हा प्रश्न नाहीए! ज्याचंत्याचं वैयक्तिक मत आहे हे..
माझ्याबाबतीत, वेळच न मिळाल्याने माहेरच्या नाव-आडनावाच्या पासपोर्टवर आले अमेरिकेत. आणि आता इथे तीच ओळख. नवर्‍यालाही त्यात काही गैर अथवा खटकण्यासारखे वाटत नसल्याने अजुनतरी आणि बहुतेक भविष्यातही माहेरचेच नाव-आडनाव राहील.
अर्थात, उद्या माझं आडनाव बदलायचा विचार केला तरी मला त्यात काही खटकणार नाही.. :) अर्थात या गोष्टी अमेरिकेतल्या आहेत. भारतात गेल्यावर पासपोर्ट ही तुमची ओळख नसतेच बर्‍याचदा,ते सगळं भारताबाहेरच.. तेव्हा भारतात बहुधा आपोआपच सासरचे आडनाव येईल नावामागे. आणि माझी काही हरकत नसेल त्याला..!

http://bhagyashreee.blogspot.com/

विकास's picture

19 Jan 2009 - 10:31 pm | विकास

आडनाव बदलले म्हणून काही विशेष नाही आणि बदलले नाही म्हणूनही काही विशेष वाटत नाही. हा वैयक्तिक प्रश्न म्हणून सोडता येईल. तरी देखील असे कायमच म्हणता येईल की हे पुरूषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहे म्हणून... हा प्रकार फक्त भारतातच आहे असे नाही तर सर्वत्र असावा असे वाटते. अमेरिकेत तर (वर चित्राने म्हणल्याप्रमाणे नक्कीच आहे). कधीपण कुठेही दोघांची नावे देण्याची वेळ आली आणि माझे नाव विचारून झाल्यावर, "बायकोचे नाव काय?" असे विचारताच, नाव सांगतो न सांगतो, तोच आडनाव तात्काळ माझेच लावून मोकळे होतात... असो.

या संदर्भात एक थोडे वेगळे पण निरीक्षण पहाण्यासारखे आहे. (मला हे पटलेले नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगत आहे) - उद्या (मंगळवारी) बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेत ही सर्वत्र क्रांती मानली जात आहे आणि तशी ती आहे देखील. मात्र ते म्हणत असताना तमाम जनता, राजकारणी, प्रसिद्धीमाध्यमे आदी "फर्स्ट अफ्रिकन अमेरिकन प्रेसिडंट" असे म्हणत आहे. "अफ्रिकन अमेरिकन" म्हणजे कृष्णवर्णीय आणि कृष्णवंशीय असे गॄहीत असते. येथे बघाल तर काय आढळते? - आई गोरी अमेरिकन तर वडील केनीयन अर्थात कृष्णवर्णीय... तरी देखील जात नाही पण वंश आणि वर्ण हा वडीलांचाच धरला जात आहे, मिश्र धरला जात नाही आहे...

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2009 - 10:34 pm | मुक्तसुनीत

किरण खेर या हिंदी सिनेमातल्या चरित्र अभिनेत्री काही काळ आपले नाव "किरण ठाकूर सिंग खेर" असे लावायच्या त्याची आठवण झाली. त्यांचे आडनाव हे आडनाव नसून आत्मचरित्राच्या चॅप्टर्सची शीर्षके असावीत असे मला तेव्हा वाटे.

बाकी हा चर्चाविषय वाचून मला पुलंच्या एका महान विनोदाची आठवण झाली : "आजची मराठी स्त्री ही मराठी आहे का ? किंवा ती स्त्री आहे का ?" :))

लग्नाच्या वेळी बायकोचे नाव बदलले नाही कारण मला तिचे नाव आवडले.
त्यावेळी जनरीतीप्रमाणे तिने माझे नाव व आडनाव लावायला सुरुवात केली. काही वर्षांनी आम्ही अमेरिकेत आलो.
आपण जरा विस्तृत समाजाकडे पाहिले की आपल्या बर्‍याच जनरीती/रुढी ह्यांना तसा फार अर्थ नाही असे कळतं, समजून येतं.
पूर्वीपासून तसे आहे म्हणून आपण करतो इतकंच, असं बर्‍याच गोष्टींबाबत वाटते त्यातलीच ही एक.
खरंतर हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक सोयीचा प्रश्न आहे. वर अदितीनं म्हटल्याप्रमाणे वयाची साधारण २५ एक वर्ष जी ओळख असेल ती पुसून अचानक एक नवीन नाव घेऊन वावरणे तसे धक्कादायकच वाटते! (पुरुष सभासदांनी विचार करुन बघावा - लग्नानंतर दुसर्‍या दिवशी तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव बदललेले आहे - काय वाटेल?)
आमच्या इथल्या ओळखीच्या परिवारात बर्‍याच जोडप्यातल्या स्त्रियांनी नावे बदललेली नाहीत आणि काही फरकही पडत नाही.
गतानुगतिकतेचे हे चष्मे काढून आता आपण फिरले पाहिजे हेच खरे.

चतुरंग

ऍडीजोशी's picture

20 Jan 2009 - 3:26 am | ऍडीजोशी (not verified)

(पुरुष सभासदांनी विचार करुन बघावा - लग्नानंतर दुसर्‍या दिवशी तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव बदललेले आहे - काय वाटेल?)

अहो नाव सोडा, आपल्या मिपा वरच शेकडो जणं अख्ख व्यक्तीमत्व बदलून रहातात

चतुरंग's picture

20 Jan 2009 - 3:38 am | चतुरंग

मी प्रत्यक्ष आयुष्यातलं म्हणतोय! :)

चतुरंग

ऍडीजोशी's picture

20 Jan 2009 - 3:32 am | ऍडीजोशी (not verified)

शक्यतो आपल्याच आडनावाचा नवरा शोधावा

चतुरंग's picture

20 Jan 2009 - 3:40 am | चतुरंग

:)
(आपल्याच आडनावाचा नवरा शोधणे हे जोशी, कुलकर्णी आणि देशपांडे कुलोत्पन्न मुलींना यांना बरेच सोपे जाईल का? ;) ह. घ्या.)

चतुरंग

ऍडीजोशी's picture

20 Jan 2009 - 4:07 am | ऍडीजोशी (not verified)

:)

जोशी, कुलकर्णी आणि देशपांडे कुलोत्पन्न मुलांशी लग्न करून आपल्या मुलींच्या भविष्याची सोय करून ठेवावी ही श्रीमंत वडिलांच्या एकुलत्या एक असणार्‍या मुलींना नम्र विनंती.

प्रियाली's picture

20 Jan 2009 - 5:29 am | प्रियाली

सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांची कन्या लग्ना आधीपासूनच मालगाडीसारखे नाव लावून होती. लग्नानंतर काय नाव लावते माहित नाही.

कोणत्याही फॉर्मावर ब्लॉक्समध्ये आडनाव किंवा लास्टनेम भरायला यांना जागा कशी मिळते देवजाणे.

वृषाली's picture

20 Jan 2009 - 11:36 am | वृषाली

मला वाटतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.असे प्रश्न मांडून किंवा कौल घेऊन काही जनजागृती होणार नाहीये.
कुठलेही आडनाव लावा हो पण संसार सुखाचा करा.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

वर्षा's picture

20 Jan 2009 - 12:02 pm | वर्षा

कुठलं नाव लावावं हे तिचं तिलाच ठरवू द्यावं.
बाकी, आपल्या पासपोर्टमध्ये माहेरचं व सासरचं अशी दोन्ही आडनावे लावू देतात का? कुणी लावली आहेत का?

दिलीप वसंत सामंत's picture

21 Jan 2009 - 2:03 pm | दिलीप वसंत सामंत

हा प्रत्येकाचा प्रश्न - पण माझी शंका - सासर व माहेर दोन्ही नावे लावणार्‍यांच्या पुढच्या पिढ्यांनी असेच ठरविल्यास
किती आडनावे लावणार ?

मृदुला's picture

21 Jan 2009 - 2:43 pm | मृदुला

एकंदरित आडनावे वापरूच नयेत.

नीधप's picture

21 Jan 2009 - 7:30 pm | नीधप

मी माझ्या नवर्‍याचं नाव आडनाव लावत नाही. वडिलांचंच लावते कारण आईवडिलांनी मला पहिल्यापासून ते नाव दिलेलं आहे. त्या नावानेच मला आयुष्यभर ओळखलं जातंय. पण पुढच्या पिढीसाठी आईचं आणि वडिलांचं पहिलं नाव मुलाला द्यावं. हे सगळ्यात योग्य असं मला वाटतं. निदान मी तरी हे असंच करीन.
आणि हे काही नवीन नाहीये. गीताली वि. म., सुनीती सु. र., मनस्विनी ल. र. ही उदाहरणं तर नक्कीच माहितीत आहेत.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

फटाकडी's picture

21 Jan 2009 - 9:28 pm | फटाकडी

नाव = ओळख ?
काही अर्थाने बरोबर आहे. आजकालच्या जमान्यात आपण आपलि ओळख/ व्यक्तिमत्व लग्ना आधिच बनवलि असते. त्यामुळे लग्नानंतर नवर्‍याचं नाव लावल तर तु्मच्या व्यक्तिमत्वात काही फरक पडेल अस नाही, पण हे नवरा आणि बायकोने ठरवाव. पण ह्या नाव बदलण्या मुळे ईथे अमेरीकेत मजा होतात, जस माझ्या एका मॅत्रिणिनी आडनाव जवळ जवळ १० वर्षानी बदलल. तर ऑफिस मधे लोकाना वाटले की तिचा डिवोर्सेच झाला.
मी माझ्या माहेरच नाव नवर्‍याच्या नावाच्या जागी वापरते. आणि माझ्या नवर्‍याला त्या बद्द्ल काहिही हरकत नाहीय.
जस ऐश्वर्या राय्-बच्चन :)

मॅन्ड्रेक's picture

22 Jan 2009 - 4:50 pm | मॅन्ड्रेक

आम्हि तर गावाचे सुद्दा नाव लावतो.
like vk ss - Shetty
rss ramamurthy nair

वेताळ's picture

22 Jan 2009 - 11:06 pm | वेताळ

नावात काय आहे? वाचल्या नंतर कळाले खुप काही आहे.दक्षिणेत बहुद्या आडनाव लावतच नाहीत. आडनावाची सुरुवात आर्यानीच केली असावी. बायकानी माहेरचे किंवा सासरचे कोणतेही नाव लावावे.
वेताळ

विसोबा खेचर's picture

23 Jan 2009 - 9:32 am | विसोबा खेचर

लग्न झालेल्या मुलींनी माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य ?

हे आम्ही सांगू शकत नाही. आमच्या म्हातारीने आडनांव बदललं नसतं तर आज आमचं नांव 'तात्या गोरे' असतं एवढंच आम्ही सांगू शकतो..! :)

आपला,
तात्या गोरे - अभ्यंकर. :)

ज्ञ's picture

23 Jan 2009 - 1:24 pm | ज्ञ

आजच्या लोकप्रभामध्ये ह्या विषयावर लेख आला आहे..
http://www.loksatta.com/lokprabha/20090130/kutumba.htm

मॅडी's picture

23 Jan 2009 - 7:36 pm | मॅडी

मोठा फरक पडणार आहे. ?

नीधप's picture

23 Jan 2009 - 8:10 pm | नीधप

हा माझ्या ब्लॉगवरचा माझा लेख..
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2008/09/blog-post.html
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

महेंद्र's picture

24 Jan 2009 - 4:07 pm | महेंद्र

अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत !
बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव?
अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात.

माझी अनुदिनी:- http://kayvatelte.wordpress.com/

नीधप's picture

26 Jan 2009 - 10:04 am | नीधप

>>अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत !<<
लोक येतात का आमचं आयुष्य चालवायला? घडवायला? ते आमचं आम्हीच करतो ना? मग लोकांना काय वाटेल याची कशाला पत्रास? आणि काय फरक पडतो लोकांनी 'लिव्ह इन' समजलं वा विवाहित समजलं तर?

>>बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव?<<
याबद्दल मुलांशी योग्य त्या वेळेला चर्चा करता येते. ४ वर्षाच्या चिमखडीने शेजार्‍यांच्या असल्या भोचक प्रश्नाचं अत्यंत मुद्देसूद आणि योग्य उत्तर दिलेलं मी पाह्यलंय.

>>अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात.<<
मग तुम्ही नका करू. आम्ही करणार कारण आम्हाला पक्की खात्री आहे की आज ना उद्या थोरामोठ्यांच्या पंक्तीत आम्ही असूच.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 4:28 pm | नितिन थत्ते

अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत !
लोकांना काय वाटायचे ते वाटू द्या हो.

बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव?
मुलांना विचारले तर त्याचं उत्तर 'लग्न झालं आहे' असं नाही का देता येणार?

अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात.
याला थेरं म्हणायचं कारणच काय?

महेंद्र's picture

28 Jan 2009 - 8:47 am | महेंद्र

चुक झाली.. तो वाक्प्रचार चुकिचा वापर्ला गेला. क्षमस्व...
पण भावना पोहोचल्या ते महत्वाचे खरे की नाही??