कुणी सांगेल का ?

sanjubaba's picture
sanjubaba in काथ्याकूट
17 Jan 2009 - 3:12 pm
गाभा: 

मी मिसळ पावा वरील पाककृती या स्थळाचा विशेष चाहता आहे. या सदरावरील मान्यवर मंडळी ना माझी एक विनंती आहे की कृपा करून कुणी माझ्या एका शंकेचे
निरसन कराल का ?
मी जेव्हा पण इडली हा पदार्थ करतो तो नेहमी बरोबर होत नाही इडली ही जड होते
ती मऊ होत नाही म्हणजे हलकी होत नाही मला फक्त ती कृती कुणी सांगेल का ?
की ज्यामुळे इडली ही मऊ करता येईल...............

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

17 Jan 2009 - 4:23 pm | अविनाशकुलकर्णी

ईडली मऊ होण्या साठी सोडा घालतात असे ऎकले आहे..
महत्वाचे..{सोडा म्हणजे खायचा भुकटी स्वरुपातला सोडा..सोडा दारु बरोबर घेतल्याने हलकेपणा येतो तो सोडा सोडा...तो द्रव रुपात असतो...तसेच कपडे धुण्या साठी पण सोडा वापरतात तो नाहि व तो कटाक्षाने टाळावा...तसेच सोडा नावाचा एक मत्स्व अवतार आहे त्याचाहि वापर टाळावा....योग्य तो सोडा वापरावा..अन्यथा इडली हलकी होणार नाहि.. हे सारे जमत नसल्यास सोड्याचा नाद सोडाणे हितकर..

अविनाश...

विनायक प्रभू's picture

17 Jan 2009 - 4:35 pm | विनायक प्रभू

कै च्या कै.
वाटण आणि उडीद व रव्याचे प्रमाण ,उडीदाचे पीठ वाटून झाल्यावर (फर्मेंटेशन) चा वेळ महत्वाचा असतो. नाहीतर ईडलीने क्रिकेट पण खेळता येते.
नेहेमीच अगदी नरम ईडल्या खाणारा
वि.प्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jan 2009 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि हो, इडल्यांचं पीठ पात्रात घालण्यापूर्वी पीठ जोरजोरात ढवळू नका. फर्मेंट करण्याचा फारसा फायदा होणार नाही.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सुनील's picture

17 Jan 2009 - 4:42 pm | सुनील

सोडा दारु बरोबर घेतल्याने हलकेपणा येतो तो सोडा सोडा
=))

असो, तुम्ही इडलीच्या वाटणात तांदूळ आणि उडीदडाळीचे प्रमाण काय ठेवता आहात? वाटण मिक्सरमध्ये अथवा यांत्रीक रगड्यावर करता आहात का की नेहेमीच्या रगड्यावर? मिश्रण आंबविण्यासाठी किती काळ ठेवता आहात?

जर नेहेमीच्या रगड्यावर करीत असाल तर, उडीदडाळीचे प्रमाण जरा वाढवा. यांत्रीक रगड्यावर १:१ किंवा तांदूळ जरा जास्तदेखिल चालू शकेल. मिश्रण लवकर आंबवण्यासाठी त्यात थोडा शिजवलेला भात घालून पहा.

थोडे ट्रायल एन्ड एरर पद्ध्तीने करून पहा. मग तुमचा तुम्हालाच अंदाज येऊ लागेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लवंगी's picture

18 Jan 2009 - 12:07 am | लवंगी

१ माप उडिद डाळ , ३ माप तांदुळ ५-६ तास भिजत घालुन बरीक वाटून घ्यावी. भरपूर फर्मेंट होउ द्यावे. इडली हलकी होण्यासाठी ४ उपाय.

१. उडीद जास्त वेळ वाटावे म्हणजे पीठ हलके होते.
२. वाटल्यावर यीस्ट टाकावे म्हणजे छान फर्मेंट होते.
३. फर्मेंट होण्यासाठी पीठ उबदार जागी ठेवावे.
४. इडली करण्याआधी १ मूठ भात वाटून घालावा.

छान हलक्या फुलक्या इडल्या होतात.

नितिन थत्ते's picture

20 Jan 2009 - 3:39 pm | नितिन थत्ते

वाटण करताना व झाल्यावर जास्तीचे पाणी अजिबात घालू नये. वर अदितीने सांगितल्याप्रमाणे मिश्रण ढवळायचे नाही व तेव्हाही पाणी घालायचे नाही.

दिलीप वसंत सामंत's picture

21 Jan 2009 - 2:35 pm | दिलीप वसंत सामंत

उकडे जाड तांदूळ वापरल्यास इडली मऊ होते