माझ्या मुलासाठी नाव सुचवा ....

चटोरी वैशू's picture
चटोरी वैशू in काथ्याकूट
16 Jan 2009 - 9:14 pm
गाभा: 

GTA" alt="" />माझ्या मुलासाठी छान नाव सुचवा .... आणि हो लवकरात लवकर... वाट बघतेय....

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jan 2009 - 9:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नावं ठेवणार्‍या लोकांना तुम्ही नाव सुचवायला सांगितलंत, झाला ना गोंधळ. :-)
असो. माझ्या अडीच वर्षाच्या मित्राचं नावच सुचवते, सौमिल.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 9:21 pm | विनायक पाचलग

अमेय
का सुचले माहित नाही
असो

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

स्वाती राजेश's picture

16 Jan 2009 - 9:28 pm | स्वाती राजेश
रेवती's picture

16 Jan 2009 - 11:43 pm | रेवती

आई झालीस का, फारच छान!
अभिनंदन!
मला अभिराम हे नाव आवडतं.
आता तू तुझं नावही बदल, म्हणजे वैशाली किंवा असच दुसरं
म्हणजे आम्हाला म्हणताना बरं वाटेल.

रेवती

विसोबा खेचर's picture

17 Jan 2009 - 12:57 am | विसोबा खेचर

धुरंधर हे नाव ठेवा.. :)

संदीप चित्रे's picture

17 Jan 2009 - 6:47 am | संदीप चित्रे

सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन :)
मुलगा आहे ना.... मग दिवसातून कमीत कमी पन्नास वेळा जे नाव उच्चारताना त्रास होणार नाही असे कुठलेही ठेवा !!! :)
-------
जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सुनील's picture

17 Jan 2009 - 7:06 am | सुनील

जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे.

नशीब विक्रमादित्य नाही!!!! जोक्स अपार्ट!!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऍडीजोशी's picture

17 Jan 2009 - 2:53 pm | ऍडीजोशी (not verified)

माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे.

म्हणजे तो नक्कीच अतीप्रचंड हुशार, हरहुन्नरी, मनमिळाऊ, चाणाक्ष, अशक्य स्मार्ट, हँडसम, रॉकस्टार असणार

संदीप चित्रे's picture

19 Jan 2009 - 10:37 am | संदीप चित्रे

ऍडी म्हणजे 'आदित्य' का रे मित्रा ? :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अनिल हटेला's picture

17 Jan 2009 - 7:18 am | अनिल हटेला

शुभम !!!
कसं वाटतये ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोनम's picture

17 Jan 2009 - 7:24 am | सोनम

सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन

मुलगा आहे ना.... मग स्वराज्,सूरज्,संकेत्,स्वप्नील्,तन्मेय्....

शितल's picture

17 Jan 2009 - 8:13 am | शितल

हे नाव कसे वाटते. :)

विनायक प्रभू's picture

17 Jan 2009 - 10:12 am | विनायक प्रभू

अहो मला मुलांची नावे सुचत नाहीत. मुलींची सांगु का. अंमळ ऍडवाण्स मधे.

सुनील's picture

17 Jan 2009 - 11:52 am | सुनील

मला मुलांची नावे सुचत नाहीत. मुलींची सांगु का
हेच म्हणतो!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

17 Jan 2009 - 10:24 am | रामदास

नावाची निवड करताना घ्यायची काळजी.
तीन अक्षरी नाव असावं.
जोडाक्षरे टाळावीत.
नाव आहे तशीच हाक मारली जाईल असे नाव असावे.
आता व च्या बाराखडीची नावं बरीच आहेत.विनीत, विराज , वगैरे वगैरे...

बाबुराव गनपतराव आपते's picture

17 Jan 2009 - 10:27 am | बाबुराव गनपतराव आपते

सुश्रुत ( पहिले शल्यचिकित्सक )

बाबुराव ..

एकलव्य's picture

17 Jan 2009 - 10:30 am | एकलव्य

!

पर्नल नेने मराठे's picture

17 Jan 2009 - 11:08 am | पर्नल नेने मराठे

आर्यन, अभिषेक, आभिजीत, रोहन, ऱोहित, मोहीत.

चुचु

दिपक's picture

17 Jan 2009 - 12:40 pm | दिपक

तुम्ही सुचवलेलं चुचु हे नाव आवडलं. :)

पर्नल नेने मराठे's picture

17 Jan 2009 - 2:06 pm | पर्नल नेने मराठे

अहो हे माझ नाव आहे ...

चुचु

विजुभाऊ's picture

17 Jan 2009 - 11:31 am | विजुभाऊ

सौमित्र / स्वरानन्द
नाव शक्यतो असे असावे की त्याचा अपभ्रंश होऊ नये.नावाला सुंदर अर्थ ही असावा. नाव सार्थ असावे सार्थ ठरावे
( अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

सुनील's picture

17 Jan 2009 - 11:50 am | सुनील

अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का
आजानुकर्ण याचा शब्दशः अर्थ - ज्याचे कान गुढघ्यापर्यंत आहेत तो...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कोलबेर's picture

17 Jan 2009 - 9:20 pm | कोलबेर

अहो जरा हळू....आता उडतोय वाटतं तुमचा प्रतिसाद तिच्याआयला.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2009 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

मृत्युंजय , मैत्रेय , निनाद, राजस, अभिमन्यु, युगंधर, अजन्मा, अक्षर, निर्गुण, परिक्षित, सनातन,
सध्या येव्हडीच आठवत आहेत !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

गीत's picture

17 Jan 2009 - 11:45 am | गीत

:)
शार्दुल ,शौनक्,मिहीर्,ऋग्वेद ......................

विजुभाऊ's picture

17 Jan 2009 - 12:02 pm | विजुभाऊ

काही नावे अगदीच अगम्य असतात त्यांचे अर्थ च लागत नाहीत.
शाश्वत. यजूश. आरीन्द ,अवर्श ,
अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो)

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

मृगनयनी's picture

17 Jan 2009 - 12:52 pm | मृगनयनी

अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो)

=)) =)) =)) =)) =))

याला लग्नाच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो!!! :-?

असो........................................

"अवनीश", "अर्पित", "सुधन्वा", "मोहित", "राधेय", "रमण"(रमण या सुन्दर नावाचा उच्चार रमन, रामन.. असाही होऊ शकतो!! ), "गर्जन", "शोधन","यशोधन", "अभ्यंग", "ऋग्वेद", "वेदांत", "दीविच", "मोहनीश" "पार्थ"..................................

इ. नावे खूप छान वाटतात.
:)

वृषाली's picture

17 Jan 2009 - 2:13 pm | वृषाली

वैशुताई अभिनंदन.
बघा ही नावे आवडतात का

" अंतरिक्ष", "अथर्व", "आरव","आर्यमन","वेदांत", "ओजस","ध्रुव","ऋग्वेद","चिंतन" ,"अमोघ".

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

डोम्बिवली फास्ट's picture

17 Jan 2009 - 12:18 pm | डोम्बिवली फास्ट

अभिनंदन ..............!!!!!! वैशुताई

आता नाव...???????? प्रश्न पड्ला ना, पण नाव ठेवताना जरा जपून......,

काय आहे माझ्या मित्राच॑ नाव आहे सोनल झुरे, लहाण पणी ठीक होत पण आता कालेजात....... सगळे सोनलच म्हणतात ,

पण..............

मुलीच्या आवाजात......

माझ्या मते :- "सिद्दार्थ

mamuvinod's picture

17 Jan 2009 - 12:49 pm | mamuvinod

राज

एकच नाव

कसे ?

मोहन's picture

17 Jan 2009 - 12:50 pm | मोहन

पुर्वी मुला-मुलींची नावे देवांची ठेवण्याची पध्दत होती. तेवढेच देवाचे नामस्मरण. बघा लॉजिक पटते का?
राम, क्रृष्ण .... ई.
मोहन

सुनील's picture

17 Jan 2009 - 12:54 pm | सुनील

चांगली सुचना!! विष्णूसहस्रनामावली घेऊन बसा आणि ठरवा नाव, कसे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Jan 2009 - 12:57 pm | अविनाशकुलकर्णी

मला मा़झ नाव आवडत........अविनाश
आवडत नाव......कालिजित....कालि

अविनाश......Always busy with no work

योगी९००'s picture

17 Jan 2009 - 2:43 pm | योगी९००

नील
गंधार
संचित
सुगम
सोहम

अथर्व, सार्थक, ओजस ...हे नका ठेवू...फारच पोरं झालीत या नावाची..

सुलभ (हे मुळिच ठेवू नका ...)

ही कशी वाटतात..?

आणि हो.. शेवटी कळवा आम्हाला की काय नाव ठेवले.

खादाडमाऊ

असंच म्हणत आहे.
मुलाला आत्याबाई आहेत का?
शेवटी त्यांचं मत महत्वाचं असतं.

कित्ती कित्ती जुनं पुराणं मत आहे असं नका म्हणू प्लीज.

मॅन्ड्रेक's picture

17 Jan 2009 - 5:57 pm | मॅन्ड्रेक

सुमेध. अनिश , असीम ,
आणि समीर - ह्याच पुढे सॅम अस गोंड्स नाव होत.

.

मॅन्ड्रेक's picture

17 Jan 2009 - 6:05 pm | मॅन्ड्रेक

हे विस रायाला झाल. - तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन

मीनल's picture

17 Jan 2009 - 6:52 pm | मीनल

विहान म्हणजे पहाट .Morning; Dawn

हे नविन नाव ऐकल आहे.

बहुगुणी's picture

17 Jan 2009 - 8:05 pm | बहुगुणी

व्यक्तिगत निरोप पाठवला आहे, पोष्टहापिस पहा.

लवंगी's picture

17 Jan 2009 - 8:31 pm | लवंगी

हे नाव कस आहे. माझ्या मुलाच नाव आहे.

प्रनित's picture

18 Jan 2009 - 12:20 am | प्रनित

आरव, सुरज, प्रथम.

पक्या's picture

18 Jan 2009 - 12:30 am | पक्या

आशुतोष , आयुष , अजिंक्य , ओम , अभिजात
इशान (शंकराचे नाव)
कुशल, कुशाग्र, कौस्तुभ, किन्नर (पुराणातील वीणा वादक)
नमन, निखील, निपूण, निर्मल
पियुष,
मनन , मयांक , मिहीर
सपन , सोहम , समीत की संमित(विष्णु चे नाव) , समरजीत
शौनक, श्रेय
हर्षवर्धन ,
विहंग, विपुल, परवाच एक नविन नाव ऐकले - वृंदावन (आई वडिल कृष्णभक्त आहेत)
युग, यश .

अनामिक's picture

18 Jan 2009 - 10:51 am | अनामिक

वृंदावन??? त्या बाळाच्या डोक्यावर आता तुळशीचं झाड उगवणार की काय असं उगाच वाटून गेलं

अनामिक

गौरिसन्जय's picture

18 Jan 2009 - 2:25 am | गौरिसन्जय

अद्वैत चा अर्थ श्री गणेश , द्वैत भाव राहिला नाहि असा.. भक्त आनि परमेश्वर् यान्च्यामधे द्वैत भाव राहिला नाहि असा..एकरुप झाले. अद्वैत झाले.

शंकरराव's picture

19 Jan 2009 - 4:56 am | शंकरराव

तूम्हा दोघंचे आभिनंदन!

नाव कोणतही ठेवा.. तूम्हाला उच्चारायला सोपे असावे, अर्थ पुर्ण व आडनावाला सुसंगत असावे असे नाव बघा.

मिपा सभासदांचे ही काही नाव विचारात घेउ शकता
पण हो ते सखाराम नाव.. कॉपीराईट वगैरे काय ते बघा बरका ...

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सहमत

सध्या आम्ही कौल व सभासदांच्या प्रतिसादांची मदत घेउन संपदा गोळा करीत आहोत.. जे काही आहे ते बौद्धीक असेलत ह्याची शास्वती नाही पण कॉपीराईट नक्की आहे.

रामदास's picture

18 Jan 2009 - 7:57 am | रामदास

यमन हे नाव पण छान आहे.

दवबिन्दु's picture

18 Jan 2009 - 2:51 pm | दवबिन्दु

यमन हे नाव पण छान आहे.

पन लोक यमनं चा यम करतील बोलन्यात.

सुप्रिया's picture

19 Jan 2009 - 10:53 am | सुप्रिया

अभिनंदन! राजस हे नाव कसे वाटते? माझ्या मुलाचे आहे.

धमाल मुलगा's picture

19 Jan 2009 - 11:10 am | धमाल मुलगा

माझीही एक सुचवणी....
(तसं मला ह्यातलं फार काही कळतं असा माझा स्वतःचाही फाजील गैरसमज नाही पण..तरीही...)

"गंधार" कसं वाटतं? त्या चिटुकल्याचा फोटो पाहून उगाचंच हे नाव मनात तरळून गेलं :)

ऋचा's picture

19 Jan 2009 - 1:20 pm | ऋचा

नील
अनिष
अर्चिस्मान
अन्वय

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

श्रेया's picture

19 Jan 2009 - 1:32 pm | श्रेया

प्रथम, ओम, साकेत,