गाभा:
लहानपणी (किंवा कधीतरी) आपण ठरवतो की मी हा-हा किंवा ही-ही होणार. पुढे आपण तो-तो किंवा ती-ती होतोच असे नाही.
तर आपण जे-जे होणार होतो आणि जे-जे झालो आहोत ते-ते इथे मांडूया...
इतर संकल्प आणि सिद्धी यांचे द्वंद्व देखील जरूर लिहा...
तर काय म्हणतायंत आपले जुने संकल्प आणि आपली सद्ध्यस्थिती ?
माझ्यापासून सुरुवात करतो...
मला व्हायचं होतं फिल्लम् डायरेक्टर...आणि जमलं तर ऍक्टर सुद्धा...आणि लेखक...आणि तबला वादक...आणि एखाद्या 'भटकंती' टाईप सिरियलचा होस्ट.
हम्म्म्म्म्म्म्म!
झालो ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयर आणि आता काम करतोय सॉफ्टवेअर ईंजिनीयर म्हणून..
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 3:11 pm | रम्या
मला व्हायचं होतं नासामध्ये वै़ज्ञानिक :D पण झालो सोफ्टवेअर इंजिनिअर ! #:S
आम्ही येथे पडीक असतो!
16 Jan 2009 - 3:16 pm | घाशीराम कोतवाल १.२
मला व्हायचे होते सोफ्टवेअर इंजिनिअर पण झालो हार्डवेअर इंजिनिअर
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
16 Jan 2009 - 3:17 pm | विनायक प्रभू
सर्व्व सॉफ्टवेअर इंजिनीयर होतात ते पाहुन हार्डवेअर इंजिनीयर झालो.
आता म्हणतो : कोण होतास तु, काय झालास तु
आधी नेमका कोण होतो बरे?
16 Jan 2009 - 4:36 pm | ब्रिटिश टिंग्या
मला माणुस होउन स्वच्छंदीपणे जगायचं होतं......पण झालो गुलाम! :(
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
17 Jan 2009 - 3:15 pm | mamuvinod
१००% सहमत
16 Jan 2009 - 4:43 pm | निखिल देशपांडे
मला व्हायचे होते एक C.A झालो मेक्यानिकल इंजिनिअर आणि काम करतो एका सोफ्टवेअर इंजिनिअरचे......
भविष्यात काय करणार ते माहित नाहि...
16 Jan 2009 - 4:53 pm | सखाराम_गटणे™
http://www.misalpav.com/node/3391
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
16 Jan 2009 - 6:31 pm | झेल्या
असो असो! याची आम्हांस कल्पना नव्हती.
पण इतर काही संकल्प आणि त्यांच्या सिद्धींची (लागलेली) वाट हे मात्र नक्कीच नव्याने चर्चिले जाऊ शकेल असे वाटते..
पाहूया कोण कोण काय काय म्हणतंय...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
16 Jan 2009 - 7:04 pm | टारझन
झेल्या भौ .... एक लंम्र इणंती ... ही सिग्नेचर आमच्या खरडवह्यांमधे वारंवार टाकून आमचं टाळकं सटकवू णका म्हणजे झालं ..
- फेक्या (टार्या)
16 Jan 2009 - 7:32 pm | झेल्या
बाकी या सिग्नेचरने तुमचं टाळकं सटकतं म्हणजे कमालच आहे...
असो.
मित्रा, तुझी 'इणंती' काही विचारार्ह वाटत नाही. क्षमस्व... :(
तू मोठ्या मणाचा दिसतोस्..(ह. घे.).. क्षमा करशील अशी आशा आहे...!
तुझी 'ण' ची ष्टाईल लै भारी रे...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
16 Jan 2009 - 7:51 pm | टारझन
तुम्हाला कमाल वाटते याचीच कमाल वाटली ... बाकी मिपाच्या नियमित लोकांपैकी १० लोकांना विचारा मी ते काय म्हंटलो ते .. तुम्हाला पुन्हा कमाल वाटेल .. मग आम्ही तुम्हाला "कमाल अकमाल" किंवा "कमाल खाण" म्हणू ;)
ती सिग्णेचर खरडीत जा लोकांना रोज .. तुम्हाला कळेलच
ह्म्म ... मुलगा असुन तु "चांगल्या स्वभावाचा" वाट्टोस .
आशा क्षमा करेल का पण ?
धण्यवाद रे .. णाकाचं हाड वाढलं की असं होतं .. आणि माझी हाडं वाढलीत ;)
-दयावान ) टारझन
16 Jan 2009 - 7:25 pm | नीधप
लहानपणी दर १५ दिवसांनी बदलायचं काहीतरी. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही.
बाकी प्रवास नेति नेति पद्धतीचा.. साधारण ८-९ वी मधे जाहीर करून टाकलं की डॉक्टर वा इंजिनियर होणार नाही. वकील होणार नाही. शाळामास्तरीण होणार नाही. सी ए, एफ आय सी डब्लू ए ( हे मला तेव्हाही म्हणता येत होतं! :) ) असंही काही करणार नाही एवढा नन्नाचा पाढा जोडला होता. त्याबरोबर घरीच बसणार नाही हे ही नक्की होतं.
१० वी नंतर मग मला काळजीने ऍप्टिट्यूड टेस्ट ला पाठवलं गेलं होतं. तिथे त्या लोकांनी 'कॉम्प्युटर प्रॉग्रॅमिंग' असं लिहून कळवलं होतं. (त्या काळात हे म्हणजे काहीतरी सॉल्लिड नवीन आहे असं वाटायचं सगळ्यांना!) त्यांना काही येत नाही हे मला तेव्हाच कळलं होतं.
हवाई दलात फायटर पायलट व्हायचं असं वाटल्याने एन सी सी एयरविंग ला गेले होते. पण मुलींना घेत नाहीत आणि कमर्शियल पायलट लायसन्स च्या ट्रेनिंगसाठी अति प्रचंड फी आहे जी बहुतेक परवडणं शक्य नाही हे कळल्यावर इंटरेस्ट संपला. मग १२ वीच्या सुट्टीत नागपूरला कॉस्मेटॉलॉजी मधे बी टेक करण्याचाही विचार करून झाला होता. पण १२ मधे माझे मार्क इतके उच्च होते की ते जमलंच नाही. खरंतर हे माझंच सुदैव...
साधारण एस वायच्या दरम्यान नाटकाचा किडा चावला आणि हळूहळू टी वाय पर्यंत लक्षात आलं की हेच माझं पंढरपूर. त्यात मधेच विक्रम गायकवाडकडे शिक्षण घेणं पण सुरू केलं होतं. किडा मोठा होऊन नाटकाबरोबर चित्रपटाचाही झाला होता. माझ्या पंढरपुराचा जिल्हा झाला होता पण या पंढरपुरातली नक्की आपली आळी कोणती याचा निर्णय मात्र लागत नव्हता. मग एम ए -नाटक, एम एफ ए - कॉश्च्यूम डिझाइन.. असं मेकप्-कॉश्च्यूम चं शिक्षण घेऊन व्यावसायिकरित्या तेच करते आहे तरीही लेखन-दिग्दर्शन आणि क्वचित अभिनय सुद्धा अश्या गल्ल्यांमधे उंडारत असतेच मी.
असं सगळं चालू आहे.. अजून खूप काही व्हायचंय करायचंय त्यामुळे श्टोरी पूर्ण झालेली नाही
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 Jan 2009 - 8:25 pm | ऍडीजोशी (not verified)
मला आळशी व्हायचं होतं. जरा जास्तच आळशी झालो :)
19 Jan 2009 - 3:44 pm | झेल्या
आळशी होण्यासाठी आपण घेतलेल्या अथक परिश्रमांचं चीज झालं म्हणायचं... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
16 Jan 2009 - 8:46 pm | जृंभणश्वान
मला शिक्षक व्हायचे होते आणि आपल्याच शाळेत शिकवायचे होते- ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते.
नंतर विसरलो आणि काम्पुटरवाला झालो
16 Jan 2009 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते.
:-D
हे मला अजूनही वाटतं. आता बहुतेक शिक्षकांची मुलं नाही पण नातवंडं असतील बालवाडीत, अजून आहेत काही वर्ष!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
16 Jan 2009 - 9:24 pm | विनायक पाचलग
आमचे भविश्य पडले आहे
मला ना सगळ्यात जावेसे वाटते कधी नाटक करतो कधी लेखन ,कधी काव्य ,आणि कधीतरी अभ्यासही करावासा वाटतो
असो पण काहितरी चांगले करायचे आहे स्वतःसाठी आणि जगासाठीदेखील
बघु भगवंत काय घडवतोय माझ्याहातुन
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 10:07 pm | चतुरंग
कारण हल्ली मुलंच शिक्षकांना बदडतात असं ऐकिवात येतं! :T तुम्हाला शिक्षकांचा आणि त्यानंतर त्यांच्या मुलांचाही मार खावा लागला असता तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं नसतं का? ~X( (ह.घ्या.)
चतुरंग
16 Jan 2009 - 11:15 pm | जृंभणश्वान
हा हा हा, वाटच लागली असती
16 Jan 2009 - 9:55 pm | लिखाळ
आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो.
-- लिखाळ.
16 Jan 2009 - 10:42 pm | शितल
>>आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो.
=))
16 Jan 2009 - 10:42 pm | वेताळ
शेवटी वेताळ झालो. पण आपण त्यातपण खुश आहोत.
वेताळ
19 Jan 2009 - 3:36 pm | झेल्या
'राम राम..' अशी तपश्चर्या करण्याऐवजी 'मरा मरा..' अशी तपश्चर्या केलीत की काय? (ह. घ्या) :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
17 Jan 2009 - 8:58 am | llपुण्याचे पेशवेll
मला मिल्ट्रीतला जवान व्हायचे होते( कारण टी.व्ही. वरची मालिका परमवीरचक्र ) पण झालो आयटी हमाल. बसलोय कळफलक बडवत. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
17 Jan 2009 - 11:59 am | भिडू
मला हॉटेल टाकायचे होते पण आय.टी. वाला झालो
17 Jan 2009 - 9:21 pm | सचिन
हा विषय निघाला म्हणजे मला लहानपणीचा एक मजेशीर प्रसंग आठवतो.
मी पाचेक वर्षांचा असेन......असेच एका पाहुण्यांनी विचारले "तू मोठा झाल्यावर कोण होणार ?"
मी उत्तरलो, "मी बाबा होणार !".
....आणि योग्य वेळी हे स्वप्नही सत्यात उतरलं.
आता ते कर्तव्य शेवटपर्यंत आनंदाने पार पाडायचं !
17 Jan 2009 - 9:23 pm | ब्रिटिश टिंग्या
१ नंबर!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
19 Jan 2009 - 2:25 pm | विटेकर
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
18 Jan 2009 - 7:41 pm | JAGOMOHANPYARE
मला डॉक्टर व्हायच होत आणि तेच झालो :(
19 Jan 2009 - 6:46 am | विसोबा खेचर
आम्हालाही डॉक्टर व्हायचं होतं! :)
19 Jan 2009 - 5:28 pm | घाटावरचे भट
मला लहानपणी बस कंडक्टर व्हायचं होतं, कारण त्याच्याकडे खूप पैसे (तेव्हा खूप सारी नाणी म्हणजे खूप पैसे असं वाटायचं) असतात असं वाटायचं....पण नंतर झालो काहीतरी वेगळंच.
19 Jan 2009 - 5:39 pm | ब्रिटिश टिंग्या
कंडक्टरच व्हायचं....त्यांना रिसेशनचा काही त्रास नाहीये ;)
-टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
जाताजाता : आजकाल मला पेन्शनर व्हावसं वाटतयं :)
19 Jan 2009 - 11:00 pm | भाग्यश्री
मला बीई Computer,लायब्ररीयन, पुस्तकं-कपड्यांची दुकानदार.. इत्यादी इत्यादी व्हायचे होते.. :)) माझं एकंदरीत अभ्यासावरील 'प्रेम' पाहून आई म्हणायची होम सायन्सला जा! :) बाबांना मी त्यांच्यासारखी सीए व्हावे असं वाटायचं.. इतक्या गोंधळातून मी शेवटी कंप्युटर इंजिनिअर झाले.. ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
20 Jan 2009 - 1:47 pm | फ्रॅक्चर बंड्या
मला पोलिस व्हायचे होते पण झालो software engg :)