ज्योतिषावरील काही प्रश्न

रम्या's picture
रम्या in काथ्याकूट
14 Jan 2009 - 5:00 pm
गाभा: 

घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि पत्रिका, रास, नाडी, गुण वगैरे वगैरे गोष्टी एकापाठोपाठ एक कानावर येत गेल्या. आजूबाजूचे बरेच लोक रास, नाडी, गुण आणि इतर शब्द अगदी सहजपणे वापरतात पण रास म्हणजे काय? नाडी म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न विचारले तर मात्र समधानकारक उत्तरे मात्र कोणीही दिली नाहीत. मिपाच्या सदस्यांपैकी कोणाची मदत घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. प्रश्न खालील प्रमाणे

१. एखाद्याची रास म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या जन्मवेळी चंद्र (कि सुर्य?) ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तिची जन्मरास असं काहीसं ऐकलं आहे. पण नक्की माहीत नाही.
२. एखाद्याच्या राशी पासून आठव्या राशीची व्यक्ती त्या व्यक्तीची जोडीदार म्हणून योग्य नसते. हा काय प्रकार आहे? आणि हा आकडा आठच का? या अंकाचा उगम कोणता?
३. एखाद्या व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे नक्की काय? लग्नाचे संदर्भातले नियम काय?
४. गुण जुळणे म्हणजे काय? मुळात गुण म्हणजे काय?
५. एका ज्योतिषाने जोडीदाराची नाडी सारखी नसावी असं म्हटलं होतं. या संदर्भातला नियम (आणी आधार) नेमका काय?
६. ज्योतिषाचा एखादा सर्वसामान्यपणे प्रमाण मानला जाणार ग्रंथ, पुस्तक आहे का?

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2009 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार

अधीक माहिती व विश्वसनीय उपायांकरता खालील अधीकारी व्यक्तीशी संपर्क साधावा !
http://www.misalpav.com/guestbook/2662
(ह.घ्या.)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सोनम's picture

14 Jan 2009 - 5:22 pm | सोनम

एवढ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी एका ब्राम्हणाला आणावे लागेल.

पर्नल नेने मराठे's picture

14 Jan 2009 - 6:00 pm | पर्नल नेने मराठे

मी ब्राम्हण आहे L-)
चुचु

बट्टू's picture

14 Jan 2009 - 7:41 pm | बट्टू

या जागी १०० ब्राह्मण असतील आणि भविष्य ब्राह्मणांनि सांगायचं अस लिहीलेलं नाही कुठे? असं काहीतरी लिहीताना जरा भान राखा.

महेश हतोळकर's picture

14 Jan 2009 - 5:27 pm | महेश हतोळकर

येथे मिळू शकतील.

सोनम's picture

14 Jan 2009 - 7:39 pm | सोनम

आता तरी सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील असे वाटते.मी ह्यानी खूप छान लेख लिहिला आहे.

महेश हतोळकर's picture

15 Jan 2009 - 8:48 am | महेश हतोळकर

हा लेख श्री प्रकाश घाटपांडे यांनी लिहीला आहे.

विनायक पाचलग's picture

14 Jan 2009 - 9:35 pm | विनायक पाचलग

मीदेखील ब्राम्हण आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे
आणि होमी जातीवाद पाळत नाही उदाहरण्च द्यायचे झाले तर प्राथमीक शिक्षण घेतानामी जात फक्त हिंदु(धर्म)अशी लावली होती
पण नंतर त्याचे वेगळे अर्थ काढले जावु लागल्याने जात लावली
आणि हो आमच्याबद्दल अनेक गैरस्मज आधीच पसरलेले आहेत अजुन पसरवु नका सांभाळुन लिहा
(या विषयावर चर्चेची इच्चा असल्यास नवीन धागा काढावा इथे उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही)
आणि हो आम्ही देश धर्म जात सावरकर गांधी नेहरु आंबेडकर या विषयावर आमची मते मांडताना ह .घ्या वगैरे म्हणत नाही.
त्यामुळे हे ह.घेवु नये
आपला
(स्वाभीमानी आणि धर्मनिरपेक्ष ब्राम्हण) विनायक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या वरच्या डिस्क्लेमरटाईपच्या प्रतिसादाचा मूळ धाग्यातल्या प्रश्नांशी काय संबंध? कैच्याकैच अवांतर ...

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

विनायक पाचलग's picture

14 Jan 2009 - 10:00 pm | विनायक पाचलग

कैच्याकैच अवांतर ...
अगदी बरोबर
पण जेथे तेथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे जातीवर चर्चा येते तेव्हा डोके उठते
तेव्हा ही संधी घेतली आणि ही सुचना (डिस्क्लेम) टाकली असो
उडवण्यास हरकत नाही

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 11:53 am | छोटा डॉन

अवांतर आणि अनावश्यक वाटल्याने "प्रकाटाआ"
क्षमस्व.

( संपादकांनी हा प्रतिसाद उडवल्यास आनंद होईल :) )

------
छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2009 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

मीदेखील
प्रेषक विनायक पाचलग ( बुध, 01/14/2009 - 21:35) .
मीदेखील ब्राम्हण आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे
आणि होमी जातीवाद पाळत नाही
_______________
शब्द जपुन वापरा हो मिपा चे विपा
उगाच अर्थाचा अनर्थ होतो आणी मग आमच्या नाका तोंडातुन कॉफी उडते पिताना
=))

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

छान,मी अमके केले. मी तमके केले.अती छान.इथे आमच्या सारखे छप्पन आहेत.आम्ही जात मानत नाही. पण आम्हाला जातीवरुन काही बोललेले खपत नाही(.(जे मानत नाही त्याबद्दल इतका राग?)
)वेताळ

विनायक पाचलग's picture

14 Jan 2009 - 10:32 pm | विनायक पाचलग

अहो होय हो
त्याचे काय आहे जेथे जाइ तेथे जातीचे टुमणॅ
आता महाजालावर ही सुरु झाले म्हणुन ही प्रतिक्रिया
आणी मी काय केले ते सांगायच कारण म्हणजे मग तुम्ही यासाठी काय केलेत असा प्रश्न नको
आणि हो स्वाभीमान आणि दुराभीमान यामधील धुसर रेषा आमच्याकडुन ओलांडली जावु नये हीच इश्वरचरणी प्रार्थना
यावईल इतर चर्चा खरडवहीत करावी ही नम्र विनंती

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

अवलिया's picture

14 Jan 2009 - 10:40 pm | अवलिया

हा धागा ज्योतिषावरील काही प्रश्न असा आहे. जातीवरील काही प्रश्न असा नाही असे वाटते.

(हा प्रतिसाद जर मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सभ्य आणि सज्जन संपादकांनी सोवळेपण नष्ट झाले या कारणाखाली उडवला तरी चालेल)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2009 - 9:35 am | पिवळा डांबिस

रम्याने मूळ धाग्यात कुठेही जातीचा उल्लेख केलेला आम्हाला आढळला नाही...
खरं तर सोनमच्या अभिप्रायातही आम्हाला काही आक्षेपार्ह आढळले नाही. पण जर कुणाला वाटले असेल तर तिला खरड पाठवावी. इथे या धाग्यावर कशाला जातीची चर्चा करायची?
-पिडां

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2009 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जाती, त्यांच्याबद्दलची चर्चा आणि ज्योतिष यांचा काहीही संबंध नाही. (आणि तेही वर "आम्ही मानत नाही" असं म्हणायचं आणि वर उकरून चर्चा सुरू करायची!)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अमोल केळकर's picture

15 Jan 2009 - 9:55 am | अमोल केळकर

तुमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे इथे निश्चित मिळतील.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

रम्या's picture

15 Jan 2009 - 11:49 am | रम्या

च्या मारी आई शप्पथ !!
तात्या!
काय तरी करा हो या सदस्यांचं !
कुठे ज्योतिषशात्रावरील प्रश्नाचा मूळ धागा, कुठे ब्राम्हण जात, कुठे ब्राम्हण असल्याचा सार्थ अभिमान, कुठे कुणी शाळेत लावलेला हिंदू धर्म आणि कुठे "स्वाभीमान आणि दुराभीमान यामधील धुसर रेषा" ??? मेंदूला मुंग्या आल्या वाचून !!
च्यायला कशाचा कशाला संबध?

माझ्या प्रश्नातून एवढा विशाल अर्थ निघतो हे मला स्वतःलाच माहीत नव्हतं.

या असल्या प्रतिसादांसाठी मिपाचा उपयोग म्हणजे भवानी तलवारीने स्वयंपाकघरातल्या मिरच्या कापण्यासारखं आहे.

कुठे एखादा साधा प्रश्न विचारावा तर झाली सुरूवात.

धन्यवाद "राजकुमार", "मी" आणि केळकर साहेब !!
मुळ प्रश्नांशी संबंधीत आतापर्यंत तीन प्रतिसाद आले यातच मी भरून पावलो.
बाकी सुरू राहू द्या!!

आम्ही येथे पडीक असतो!

मैत्र's picture

15 Jan 2009 - 4:03 pm | मैत्र

पंतांना मेल किंवा फोन करा. ते या सर्व प्रश्नांची अतिशय नीट व शास्त्र शुद्ध उत्तरे सांगतील.
त्याप्रमाणे इथे एक लेख लिहा. इतरांच्याही ज्ञानात भर पडेल.