जीभ घसरली......की सटकली....

सुहास.'s picture
सुहास. in काथ्याकूट
14 Jan 2009 - 3:01 pm
गाभा: 

एकदा माझ्या तिर्थस्वरूपाच्या मुखातुन "सत॑रज्या अ॑थरा"च्या एवजी "अथर॑ज्या सथरा"असे शब्द भर लग्नात बाहेर पडले होते...

आणी एक मित्र "चाळ्लेली वाळू"एवजी "वाळ्लेली चाळू" म्हटला होता...

कोणाकडे असे मजेदार प्रस॑ग असल्यास सा॑गा...

वेळ्खाउ(फालतू)

प्रतिक्रिया

रम्या's picture

14 Jan 2009 - 3:10 pm | रम्या

"रमू पंखा सुरू कर" ऐवजी माझा भाऊ एकदा "पंखू रमा सुरू कर" म्हणाला होता :D

आम्ही येथे पडीक असतो!

झेल्या's picture

14 Jan 2009 - 3:33 pm | झेल्या

एकदा आमच्या एका मित्राच्या घरी सगळे गळ नळत होते..!

आमच्या गावचा बिल्हा जीड..!

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

गुंड्या's picture

14 Jan 2009 - 3:37 pm | गुंड्या

मी एकदा "गारं किती वार आहे " असं म्हणालो होतो.

शुभान्गी's picture

14 Jan 2009 - 11:13 pm | शुभान्गी

शिन्पळ्गावचा पिन्पि नदी खान्द्यावर घेउन धोतराच्या काढाकाढाने सळ्त पुटला.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Jan 2009 - 2:39 am | अविनाशकुलकर्णी

पाव भाजि ला एकदा चुकुन भाव पाजि अस ऎकल गेल
लिरिल साबणाच नाव लिरिल म्हणताना बोबडि वळते

केशवराव's picture

15 Jan 2009 - 6:33 am | केशवराव

He is nursing his injury च्या ऐवजी He is injuring his nurse!

रम्या's picture

15 Jan 2009 - 1:45 pm | रम्या

He is nursing his injury च्या ऐवजी He is injuring his nurse
भारी हाय!
आम्ही येथे पडीक असतो!

समीरसूर's picture

15 Jan 2009 - 1:56 pm | समीरसूर

डीएसकेची जाहिरात येते टीव्हीवर्..."या घरट्याला थोडे थोडे घरपण चल देऊ, मायेचा तू हात फिरवता ती आली भुर्रकन चिऊ!"....असं काहीतरी गाणं आहे. त्या जाहिरातीचे गाणे गुणगुणतांना "...ती आली चिऊ उडकन भुरून!!"असे तोंडात आले.

--समीर