गाभा:
पं. उल्हासजींना या वर्षीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचे आजच्या नभोवाणी बातम्यांतून समजले.
ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर गायकीचा नितांत सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत आहे. पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी, पं. राजाभाऊ कोगजे या गुरुंची परंपरा उल्हाजींनी समर्थपणे पेलली आहे. भारतीय अभिजात संगीताला लोकाभिमूख करण्यातले त्यांचे योगदान खुपच मोठे आहे. उल्हासजींच्या मैफिलींना असलेला युवा वर्गाचा प्रतीसाद पहाता त्यांचे अभिजात संगीतातले दिपस्थंभा सारखे स्थान लक्षात येते.
त्यांच्या समस्त चाहत्यांकडून त्याचे हार्दिक अभिनंदन.
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 9:51 pm | रमण
ही बातमी वाचून खूप आनन्द झाला. आदरणीय पण्डितजीना अभिवादन.
14 Jan 2009 - 10:15 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
15 Jan 2009 - 12:33 am | विसोबा खेचर
पं. उल्हासजींना या वर्षीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचे आजच्या नभोवाणी बातम्यांतून समजले.
हे ऐकून अगदी खूप खूप आनंद वाटला. उल्हासकाकांचं मनापासून अभिनंदन..!
उल्हासकाका माझे अत्यंत आवडते कलाकार..गाण्यातला एक मोठा माणूस!
दिग्गज गुरूंकडून उत्तम तालीम, सततचे चिंतन-मनन आणि रियाज, सुरालयीवरचे प्रभूत्व, ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर या तीन्ही घराण्यांवर प्रभूत्व इत्यादी अनेक गोष्टी उल्हासकाकांबद्दल सांगता येतील..
गजाननबुवा, रामभाऊ मराठे यांची तर त्यांना उतम तालीमच मिळाली आहे. त्याशिवाय करीमखासाहेब, बापूराव पलुस्कर, कुमारजी, निवृत्तीबुवा या दिग्गजांचाही त्यांच्या गायकीत खूप चांगला प्रभाव दिसतो..
त्यांची माझी अगदी चांगली ओळख आहे, त्यांचा स्नेह मला मिळाला/मिळतो आहे हे माझं भाग्य! कलकत्त्याहून मुंबई-पुण्यात कधी आले की त्यांचं गाणं आणि त्याला आमची हजेरी ही ठरलेलीच! आजपर्यंत त्यांच्या अनेक जाहीर व खाजगी मैफली मला अगदी जवळून आणि भरभरून ऐकायला मिळाल्या हे माझं भाग्य!
"उल्हासकाका, जरा बसंतीकेदार दाखवा ना!"
असं आम्ही म्हणावं आणि त्यांनी लगेच, जराही आढेवेढे न घेता जयपूर गायकीतली 'अतर सुगंध' ही पारंपारिक बंदीश सुरू करावी,
"उल्हासकाका, जरा परज दाखवा ना!" असं आम्ही म्हणावं आणि त्यांनी लगेच विलायतखासाहेबांचं "चलो मितवा बालम फगवा" सुरू करावं!
या आणि अश्या फर्माईशी प्रत्येक मैफलीत ठरलेल्याच! :)
आपला,
(उल्हासकाकांचा चाहता) तात्या.
15 Jan 2009 - 8:30 am | डॉ.प्रसाद दाढे
वाचून अतिशय आन॑द झाला. उल्हासजी॑ना हार्दीक शुभेच्छा!
मीही त्या॑च्या सहजसु॑दर गाण्याचा निस्सीम चाहता आहे. ते माझ्या आईचे व मोठ्या बहीणीचे गुरूब॑धू आहेत व अगदी लहानपणापासून मी त्या कुटुम्बास ओळखतो. ते सगळेच स॑गीतातले आहेत. प॑. विकास, प॑. अरूण व प॑. उल्हास असे तिन्ही कशाळकर बन्धू स॑गीताचार्य आहेत. त्या॑चे स्व. तीर्थरूपही स॑गीत-तज्ञ होते. त्या॑चे आमच्याकडे चा॑गले जाणे-येणे होते. मला आठवते आहे, आम्ही ते॑व्हा डो॑बिवलीत एका इमारतीच्या दुसर्या मजल्यावर राहात होतो व बर्याच दिवसा॑त ते आले नाहीत म्हणून माझ्या आजोबा॑नी त्या॑ना पत्र पाठवून चौकशी केली (ते॑व्हा त्या॑च्या घरी फोन नव्हता). कशाळकर आजोबा॑नी उत्तरात लिहिले, " गुढगेदुखीमुळे तुमच्या घराचे आरोह-अवरोह मला झेपत नाहीत म्हणून आलो नाही " जिन्या॑ना दिलेली ही सा॑गितिक उपमा मला खूपच आवडली.