गाभा:
आत्ताच रेडीफ.कॉम वर एक बातमी वाचली. त्याप्रमाणे पांढरे कबुतर(डोव्ह) असलेले एक भेटकार्ड नविन वर्षाच्या शुभेच्छांसहीत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या पत्नीने सही करून पाकीस्तानी पंतप्रधानांना पाठवले.
Manmohan sends new year card to Zardari
ही वरील बातमी वाचल्यावर प्रश्न पडला की हक्की नक्की कोणती गिरी आहे? - गांधीगिरी, मुन्नाभाई गिरि आहे का मनमोहन गिरी आहे ते.
तुम्हाला काय वाटले बातमी वाचून?
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 3:25 am | धनंजय
असे ठराविक मजकुराचे पत्र (फॉर्म लेटर) सर्व देशांना पाठवण्याची रीत असावी. मागच्या वर्षीसुद्धा पाठवले होते का?
14 Jan 2009 - 4:07 am | विकास
असे ठराविक मजकुराचे पत्र (फॉर्म लेटर) सर्व देशांना पाठवण्याची रीत असावी. मागच्या वर्षीसुद्धा पाठवले होते का?
तसे नाही वाटत. आत्तापर्यंत कधी ऐकले नव्हते आणि त्यांच्या कार्डाला "रेसिप्रोकेट" करण्यात येईल असे झरदारींचा प्रवक्ता म्हणाला.
राजनैतिक पद्धत असे म्हणायचे असेल तर लेव्हल टू लेव्हल होणे शिष्ठाचार संमत वाटते. म्हणजे भारतीय पंतप्रधानाने पाकीस्तानी पंतप्रधानाला पाठवणे उचीत ठरते. येथे आपले पंतप्रधान पाक पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांना कार्डे पाठवतात. ती पण पांढरी कबुतरे ज्यांचा अर्थ हा शांततेचा प्रस्ताव (युद्धानंतर जिंकणे जमले नाही की) असा काहीसा ठरू शकतो.
असो.
14 Jan 2009 - 7:47 am | धनंजय
संयुक्त राज्ये (यू.एस.)च्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला भरताच्या पंतप्रधानांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या असे पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरून दिसते.
या प्रकारच्या सगळ्याच बातम्या वाचनात येत नसाव्यात - बहुधा फॉर्म-लेटर असावे म्हणून असेल.
ही यू.एस.ची बातमी देखील तिथे पंतप्रधान-यूएसराष्ट्रपती संवादाच्या संदर्भात २००६ मध्ये वाचायला मिळते, मुख्य बातमी म्हणून नाही.
14 Jan 2009 - 3:31 am | प्रमेय
त्या पत्रात काय काय लिहिले आहे हे कळू शकेल काय?
इथे सैन्य जमा करायचे आणि ह्या लोकांनी पत्र पाठवायचे ?
ही नक्कीच मुन्नाभाई गिरी असावी.
तो नाहीका 'तिला' पत्र पाठवून आपली चूक कळवतो? हे ही तसेच काही असेल!
14 Jan 2009 - 3:56 am | सुहास
याला "कबुतर उडवेगिरी" म्हणतात... हा प्रकार भारत -पाक संबंधात नेहमी दिसतो... (आता बहुतेक हे कबुतर "अनोळखी उडती वस्तू" म्हणून मारले जाईल...)
14 Jan 2009 - 3:56 am | ब्रिटिश टिंग्या
नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांच्या ह्या कृतीला फारफार तर XXगिरी असं म्हणता येईल!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
14 Jan 2009 - 4:28 am | चंबा मुतनाळ
सहमत.
- अच्युत मुतनाळ
14 Jan 2009 - 11:23 am | संजय अभ्यंकर
+१
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Jan 2009 - 12:33 pm | निखिलराव
१७५% सहमत........
14 Jan 2009 - 4:30 am | विसोबा खेचर
नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी अशी कृती करण्याची जी लाचारी केली आहे याची एक भारतीय म्हणून मला लाज वाटते!
त्या लोकांनी इथे येऊन अंदाधुंद गोळीबार करायचा, बाँबस्फोट घडवायचे आणि निरपराध माणसं मारायची! त्याचा प्रतिकार करतांना मेजर संदीप उन्नीकृष्णन सारखे शूर जवान आम्ही गमवायचे आणि आमच्या पंतप्रधानांनी मात्र त्यांना पांढरी कबुतरं पाठवायची!
अरेरे! थूत आमच्या जिंदगानीवर!
तात्या.
14 Jan 2009 - 8:20 am | भास्कर केन्डे
नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी अशी कृती करण्याची जी लाचारी केली आहे याची एक भारतीय म्हणून मला लाज वाटते!
-- अगदी मनातले बोललात तात्या.
14 Jan 2009 - 4:35 am | केदार
असे नाव द्या. कडक शब्दात त्यांची वाजवने तर दुर वर ही लाचारी त्यांनी पत्करली. वर बायकोचीही सही. च्यायला एक व्यक्ती म्हणून कोणाला पत्र पाठवायचे ते पाठवा पण देशाचा पंतप्रधान म्हणून तरी नको. (एकदा पंतप्रधान झाले की तो व्यक्ती उरत नाही).
म्हणलेच आहे अहिंसेची नशा की दारुच्या नशेपेक्षा घातक आहे. त्याचाच प्रत्यय आला.
14 Jan 2009 - 7:56 am | सुनील
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अध्यापही राजनैतिक व्यवहार आहेत. तेव्हा वर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे हा एक निव्वळ उपचार आहे, या पलीकडे त्यास फार महत्त्व देण्याचे कारण नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jan 2009 - 8:16 am | सहज
त्यास फार महत्त्व देण्याचे कारण नाही.
14 Jan 2009 - 11:01 am | विनायक प्रभू
पत्नीला महत्व नाही दिले तर पुढची सर्व जेवणे लोकसभेच्या कँटीण मधे.
पत्राचे म्हणाल तर त्याला थर्ड पार्टीगिर्री म्हणावे.
14 Jan 2009 - 11:47 am | घाशीराम कोतवाल १.२
ही तर मार खाउ गांडुगिरि
आम्ही केलेले किडे
14 Jan 2009 - 6:31 pm | प्रदीप
हे मी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्या कृतिस उद्देशून म्हणत नाही आहे, तर येथे अत्यंत सुजाण व आदरणीय सभासदांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याबद्दल म्हणत आहे. असे ठराविक मजकुराचे पत्र दरवर्षी आपण पाठवत होतो काय, तसेच आपले व पाकिस्तानचे राजनैतिक संबंध अजूनही सुरळीत आहेत, (सबब) ह्याबद्दल विशेष विचार करण्यासारखे काही नाही, ही चर्चा केवळ दुर्दैवी आहे. एकतर दरवर्षी आणि ह्यावेळी ह्यात, हे जे काही (नुकतेच) होऊन गेले आहे, त्यामुळे काही फरक आहे की नाही? तेव्हा हा राजकिय शिष्टाचार (जरी) असला(च), तरी तो ह्यावेळी पाळण्याची जरूरी काय आहे? म्हणजे जे काही ह्या शेजारी देशाने घडवून आणले त्याबद्दल आपणास चीड तर नाहीच, उलट त्यावर जर सुजाण नागरिक 'दरवर्षीचा प्रघात' , 'राजकिय शिष्टाचार' ही कारणे आहेत किंवा नाहीत हे तपासून बघत रहाणार असतील, तर... ह्या देशाचे 'देव भले करो' असे म्हणणार होतो..... पण मग वाटले, देवावर तरी आपण कसला कसला भार टाकणार आहोत?
जे काही सध्या आपल्या सरकारने चालवले आहे, त्याबद्दल आपणाला कमीत कमी एक प्रामाणिक चीड तरी असावी, ही काही फार अपेक्षा आहे काय? आपण काय करू शकतो, तर निदान ह्या सर्व हाताळणीबद्दल एक प्रक्षोभ मनात बाळगू शकतो व संधि मिळताच ह्या राजकारण्यांना दाखवू शकतो.
'समिधाच नव्हे त्या, त्यात कसला ओलावा?
कोठून फुलांपरि मकरंद वा मिळावा?
जात्याच रूक्ष त्या, एकच त्यां आकांक्षा,
तव आंतरअग्नि क्षणभरी तरी फुलावा!'
--- कुसुमाग्रज
(निराश) प्रदीप
15 Jan 2009 - 3:15 am | धनंजय
या दुव्यावर वाचावा :
http://www.misalpav.com/node/4938#comment-71934
(कधीकधी वाटते, काही लोकांच्या रेडियोला फक्त ऑन-ऑफ असेच बटन असते, आवाज कमीजास्त करायची कळच नसते. तुमच्या संयमित प्रतिसादामुळे तुमचे तसे नसावे असे वाटते. राजकीय शिष्टाचार पाळण्याच्या वेगवेगळ्या पातळ्या काय आहेत?)
15 Jan 2009 - 6:15 pm | प्रदीप
सर्वप्रथम संशयाचा फायदा मला दिल्याबद्दल धन्यवाद.
आततायीपणे आता भारताने सीमेपलिकडे जाऊन तेथील केंद्रे उध्वस्त केली पाहिजेत असले पोरकट विधान ना मी केले आहे, ना मी दिलेल्या दुव्याच्या लेखकाने. असे काही करणे म्हणजे एक टोक झाले, त्याचप्रमाणे ह्या परिस्थितीतही होती तशीच राजनैतिक सभ्यता त्याच पातळीवर सुरू ठेवणे, हे दुसरे टोक. ह्य दोन टोकांमध्ये समंजस मार्ग असावेत.
तुमचा दीर्घ प्रतिसाद मी तेव्हाच वाचलेला होता. आपली सेना काही कोवर्ट ऑपरेशन्स करत असेल ह्याबद्दल वाद नाही, आणि ती कोवर्टच रहावीत, हेही तितकेच मान्य. पण ही ऑपरेशन्स अगदी परिपाठाची ('रूटिन' ला नक्की मराठी प्रतिशब्द सापडला नाही, म्हणून असे म्हटले आहे) असावीत. त्यांमुळे त्यांचा परिणाम अगदी सीमित असावा. तसे नसते तर हे श्रेणी व फ्रिक्वेन्सीने वाढते हल्ले होत राहिले नसते. तसेच दुसरे हे की असे काहीही परिणामकारक कुठलेही सैन्य करू लागले की आजकालच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे जगातील इतर संस्थांना ह्याचा सुगावा लागला असता व त्याचा कुठे ना कुठे तरी उल्लेख नक्कीच वाचनाता आला असता. तसे काही माझ्या तरी वाचनात आलेले नाही. आपले अत्यंत स्वार्थी, लघुदृष्टिचे राजकारणी अत्यंत निपुणतेने मुत्सद्दीगिरी करत आहेत, त्यानुसार जनतेसमोर व जगासमोर एक सांगून आतून मात्र चोख व परिणामकारक कारवाया करीत आहेत ह्याबद्दल मात्र मी प्रचंड साशंक आहे. हा बेनिफिट ऑफ डाऊट मी आपल्या राजकारण्यांना देण्यास तयार नाही.
राजकिय शिष्टाचार पाळण्याच्या वेगवेगळ्या पातळ्या नक्की काय आहेत ते मला माहिती नाही, पण ह्या प्रसंगानंतर राजनैतिक पातळीवर आपले सरकार काही करू शकले असते--- जसे व्यापार, दळणवळण ह्या पातळींवरचे संबंध तोडणे. आपण अजिबात काहीही आपण केलेले नाही. हे करावयास काही तीव्र आंतरराष्ट्रिय अडथळे आहेत असे अजिबात दिसत नाही. पण आपल्याकडे राजकिय इच्छाशक्तिचा संपूर्ण अभाव दिसतो.
15 Jan 2009 - 8:00 pm | मुक्तसुनीत
भारत हे एक "सॉफ्ट टार्गेट" आहे ...किंबहुना एक "सॉफ्ट स्टेट" आहे अशा प्रकारची बाजू जे मांडतात त्यांना खतपाणी घालतील अशाच घटना घडताना दिसत आहेत. अशा प्रसंगी इस्त्रायलची आठवण येणे अपरिहार्य आहे. १९६७ साली ६ अरब राष्ट्रांनी वेढल्यावर , इस्त्रायलने स्वतःचा हल्ला चढवला. आणि ६ दिवसांनी पूर्वी होता त्यापेक्षा ५०% जास्त प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला.
अर्थात , इस्त्रायल चे धर्माधिष्ठीत अस्तित्त्व , त्यांचा मानवी अधिकारांबद्दलचा रेकॉर्ड वगैरे वगैरे गोष्टी दूषणास्पद आहेतच. इट इज अ सर्व्हायव्हर. "टिकून रहाणे" हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सदैव हे राष्ट्र युद्ध्यमान असते. आपले तसे नाही , त्यामुळे अपहरण , दहशतवादी हल्ले इ. इ. बाबीतला आपला प्रतिसाद "सॉफ्ट" असतो असे दिसते.
काही प्रश्न मला पडतात. इस्त्रायलचे प्रसिद्ध वचन आहे : " अरबी राष्ट्रे पुन्हा पुन्हा हरू शकतात आणि पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतात. इस्त्रायल मात्र एकदाच हरू शकते. आणि एकदा हरले की समूळ उच्छेद ठरलेला." आपण संख्येने इतके आहोत म्हणून का आपल्या जीवाची किंमत कवडीमोल ठरते ? म्हणून का आपलेच सरकार आपल्या इतक्या प्रमाणावरच्या जीवीतहानीकडे "एक स्टॅटीस्टीक" अशा थंड नजरेने पाहू शकते. तसे असल्यास , आपण संख्येने किती कमी झालो तर आपल्या माणसांच्या जीवाला किंमत येईल ?
15 Jan 2009 - 8:19 pm | लिखाळ
आजच्या सकाळच्या अग्रलेखात म्हटले आहे की 'भारताचा संयम म्हणजे दौर्बल्य समजले जाऊ नये, असा संदेश सर्वदूर पोचविण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय अपमान विसरणाऱ्या देशाचे भवितव्यही अंधःकारमय असते.' ते बरोबरच वाटते.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
14 Jan 2009 - 6:41 pm | अविनाशकुलकर्णी
सरदार निति
अविनाश..सरदारांचा सरदार
15 Jan 2009 - 12:30 am | भडकमकर मास्तर
अवांतर : आम्ही सर्व संबंध तोडून टाकू अशी धमकीही भारताने दिली म्हणे...
...
ही काय धमकी झाली?? कमाल आहे... माझ्या मते ही पहिली पायरी असायला हवी...सारख्या डिनायलमध्ये जाणार्या , बोलणे फिरवणार्या उद्दाम देशाला वठणीवर आणायला युद्धानंतरच्या पन्नासाव्या दिवशी ही फुटकळ धमकी?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Jan 2009 - 7:38 pm | लिखाळ
अहो असं काय म्हणताय ! ही नुसती धमकी नाही. तर कडक शब्दात दिलेली धमकी आहे. आणि यावर पाकिस्तानाने काही केले नाही तर कडक शब्दात अजून एकदा त्यांना सांगीतले जाईल. आपले मायबाप सरकार आपल्या पाठीशी अशी कडक भूमीका घेऊन उभे आहे.
मागे झालेल्या अनेक बाँबस्फोटानंतरसुद्धा सरकारने तातडिने 'कडक शब्दांत निषेध' नोंदवलेला मला चांगलाच स्मरतो. त्या आठवणींने सुद्धा माझा गळा दाटून येतो. इतकी जलद कारवाई करणारे आपले सरकार गेले पन्नास दिवस मुंबईच्या घटनेचा पाठपुरावा करत आहे आणि अजूनही त्यांचे 'कडक' धोरण मवाळ पडले नाही.
त्या कबुतराने सुद्धा म्हणे निषेध म्हणून दोन वेळा पंख जास्त फडफडवले आणि शांतीसंदेश-शुभेच्छा देताना आवाज जास्तितजास्त कोरडा आणि संयमित ठेवला होता.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
15 Jan 2009 - 8:38 am | डॉ.प्रसाद दाढे
माझाही ही बातमी वाचून अ॑गाचा तिळपापड झाला. आपले सरकार इतके
बुळचट कसे? मूर्खपणाची परिसीमा म्हणजे आपले स्वनामधन्य गृहम॑त्री पी चिद॑बरम
म्हणतात की पाकीस्तानने पुन्हा असा हल्ला केला तर आम्ही त्या॑ना चा॑गलाच धडा शिकवू. अरे हे काय चालले आहे?ह्या॑ना काहीच कशी लाज नाही.. सगळ्या वीरपुरूषा॑चे बलिदान व्यर्थ जात आहे.
15 Jan 2009 - 10:12 pm | सचिन
ते शंभरदा सांगतात ना , आम्हाला सगळे ऑप्शन्स ओपन आहेत म्हणून....!
एकेक ट्राय करून पाहाताहेत झालं !!
काय एवढं मनावर घ्यायचं ... ?