गाभा:
आम्हाला आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री.अजानुकर्ण ह्यांचे खाते उडवल्याची माहिती मिळाली.
श्री. अजानुकर्ण हे मिसळपाव द्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्याने त्यांचे खाते उडवलेले दिसते. तसे असेल तर ते अगदी योग्य आहे. परंतू ते एक ज्येष्ठ सभासद देखिल होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती.
श्री. अजानुकर्ण ह्यांचे खाते वैतक्तिक आकसामुळे उडवले असल्यास (ज्याचा आणीबाणीत मिपा मालकांना पूर्ण अधिकार आहे) तसे कळावे म्हणजे आम्हाला देखिल आमच्य सदस्यत्वाविषयी अधिक विचार करता येईल. तुर्तास इतकेच!
निवेदन संपले!
आपला मिपाकर,
कोलबेर
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 2:54 am | सर्किट (not verified)
ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. आमच्या व्यक्तिगत मते, श्री. आजानुकर्ण हे व्यासंगी, सर्व बाजूंनी मुद्द्यांचा विचार करणारे लेखक होते/आहेत. मिपाविषयी तक्रारी देखील त्यांनी अत्यंत सोज्ज्वळपणे केल्यात असे आमच्या पाहण्यात आहे. अर्थात आणिबाणी असल्याने त्यांचे खाते उडवल्याची कारणे विचारून उपयोग नाही, त्यामुळे धक्का बसला एवढेच म्हणतो.
-- सर्किट
14 Jan 2009 - 8:26 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो. धक्का बसला.
14 Jan 2009 - 3:22 am | धनंजय
आजानुकर्ण यांच्याबाबत लेखापत्री आणि बोलण्यातही माझे अनुभव चांगले आहेत.
14 Jan 2009 - 7:51 am | सुनील
बोलणे कधी झाले नाही पण त्यांचे लिखाण मुद्देसूद असे, हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jan 2009 - 4:07 am | विसोबा खेचर
मिपाच्या सन्माननीय संपादकांनी येथे काय खुलासा करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु दिनांक १६ डिसेंबर २००७ च्या निवेदनानुसार मिपाचे चालक/मालक/व्यवस्थापक या नात्याने आम्ही कुणालाही कुठलेही उत्तर देणे लागत नाही! मिपा व्यवस्थापनातर्फे सदर निवेदन मिपावर अद्याप जसेच्या तसे लागू आहे याची कृपया नोंद घ्यावी!
तरीही या संदर्भात आम्ही आमचे मत आणि निर्णय सर्व संपादकांना पोष्टकार्डद्वारे कळवला आहे. आमच्यापुरता हा विषय संपला आहे.
धन्यवाद..
आपला,
तात्या अभ्यंकर.
14 Jan 2009 - 9:58 am | एकलव्य
कोलबेर खोटे म्हणतात असे नाही. पण तरीही प्रश्न पडला.
- एकलव्य
14 Jan 2009 - 12:37 pm | चेतन
http://misalpav.com/node/5503 या चर्चेमुळे उडवले असल्यास निश्चितच धक्कादायक आहे.
(एक वर्षापेक्षाही जास्त आणिबाणि का आहे ते न समजलेला आणि+बा+णि+कार ) चेतन 8|
19 Jan 2009 - 11:13 pm | ऋषिकेश
अरेच्या हे कधी, कसे आणि का झाले?
कर्णासारख्या चांगल्या लेखकाला बंदी घातली गेली हे पाहून धक्का बसला हे खरेच! :(
-(गोंधळलेला) ऋषिकेश