My मराठी...

झेल्या's picture
झेल्या in काथ्याकूट
13 Jan 2009 - 10:30 am
गाभा: 

मिपाजनहो...

आपण असे नेहमी ऐकतो की ईंग्रजी ही 'बिझिनेस लँन्ग्वेज' आहे. विज्ञानात जसे 'आम्लारी' असतात तसे कट्टर 'आंग्लारी' लोकही आपण पाहतो.

१. संपूर्ण जागतिक ज्ञान आणि माहिती मराठीत उपलब्ध करून काही फायदा होईल का?

२. सद्ध्या कुठल्याही मध्यम व मोठ्या व्यवसायात ईंग्रजी (किंवा अन्य परकीय भाषा) शिका आणि अधिक समृद्ध व्हा असे समीकरण ढोबळ्पणे दिसते. ज्यांच्याकडे पैसा/अधिकार्/सत्ता असेल त्यांच्या भाषेला आपोआपच 'भाव' येतो. मराठी ला जागतिक व्यवसाय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळ्वण्यासाठी कोणती पाऊले उचलली जावीत किंवा आपण उचलू शकतो?

३. ईंग्रजी च्या 'बिझिनेस लँन्ग्वेज' या स्वरूपामुळे ईंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मराठीचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे वाटते का? काही वर्षांनी मराठी ही संस्कृत सारखी बाजूला पडेल का? हा जुनाच वादाचा मुद्दा आहे. पण जर सामान्य मराठी पदवी शिक्षणानंतर पैसा मिळणार नसेल किंवा या ग्लोबलाईज्ड जगात जगण्यासाठी काही मूल्यवर्धन होणार नसेल तर मराठीतून गणित, शास्त्र इ. विषय शिकून काय उपयोग आहे? मराठी ही केवळ मातृभाषा म्हणून आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून शिकण्यात कितपत 'पॉईंट' आहे?

४. जे लोक मराठीतून शिक्षण घेतात (उदा. बी ए मराठी/इतिहास्/भूगोल्/समाजशास्त्र/शास्त्र/गणित इ.) त्यांना अधिकाधिक व्यवसायाभिमुख कसे होता येईल? थोडक्यात हे मराठीतले शिक्षण कसे आणि कुठे 'एन्कॅश' करता येईल?

काय म्हणता....?

प्रतिक्रिया

विषयात पारंगत होणे महत्त्वाचे. त्यासाठी प्राथमिक पातळीवर विषय उत्तम समजला पाहिजे. त्यासाठी मातृभाषेतून शालेय शिक्षण हवे (गणित, विज्ञान सुद्धा). जगात संपर्कासाठी इंग्रजीवर प्रभुत्व हवे.
विषयाचे कम्युनिकेशन इंग्रजीतून करायचे असले तरी तो इंग्रजी माध्यमातून शिकायची गरज नाही.

आम्ही तरी कुठे भयंकर अडचणीत आलो नाही.

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 12:53 pm | सखाराम_गटणे™

१. संपूर्ण जागतिक ज्ञान आणि माहिती मराठीत उपलब्ध करून काही फायदा होईल का?
>> हे तर शक्य नाही.
२. सद्ध्या कुठल्याही मध्यम व मोठ्या व्यवसायात ईंग्रजी (किंवा अन्य परकीय भाषा) शिका आणि अधिक समृद्ध व्हा असे समीकरण ढोबळ्पणे दिसते. ज्यांच्याकडे पैसा/अधिकार्/सत्ता असेल त्यांच्या भाषेला आपोआपच 'भाव' येतो. मराठी ला जागतिक व्यवसाय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळ्वण्यासाठी कोणती पाऊले उचलली जावीत किंवा आपण उचलू शकतो?
>>> याचे उत्तर तुम्हीच सांगितले आहे.

३. ईंग्रजी च्या 'बिझिनेस लँन्ग्वेज' या स्वरूपामुळे ईंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मराठीचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे वाटते का? काही वर्षांनी मराठी ही संस्कृत सारखी बाजूला पडेल का? हा जुनाच वादाचा मुद्दा आहे. पण जर सामान्य मराठी पदवी शिक्षणानंतर पैसा मिळणार नसेल किंवा या ग्लोबलाईज्ड जगात जगण्यासाठी काही मूल्यवर्धन होणार नसेल तर मराठीतून गणित, शास्त्र इ. विषय शिकून काय उपयोग आहे? मराठी ही केवळ मातृभाषा म्हणून आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून शिकण्यात कितपत 'पॉईंट' आहे?
>> जो पर्यंत घरात मराठी वापरली जात तो पर्यंत काहीही अडचण नाही.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.