सत्यमच्या निमित्याने

आनंद घारे's picture
आनंद घारे in काथ्याकूट
10 Jan 2009 - 3:47 am
गाभा: 

एक मर्यादित कंपनी जेवढा नफा कमावते त्याच्या प्रमाणात तिला कर भरावा लागतो आणि तिचे सममूल्यधारक उरलेल्या संपत्तीचे वाटेकरी बनतात. सरकार आणि सममूल्यधारक यांना त्यांचा न्याय्य वाटा द्यावा लागू नये या उद्देशाने कांही स्वार्थी संचालक हिशोबाच्या वहीत लिहिलेल्या आकडेवारीत कंपनीला झालेला नफा कमी दिसेल अशी तरतूद करून नफ्याचा कांही भाग स्वत:च्या घशात घालतात असे यापूर्वी ऐकले होते. पण या राजू महाशयांनी याच्या विपरीत जाऊन कंपनीला न झालेला फायदा झाला असे दाखवले असे दिसते. न झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला ? अखेर तसे केल्याने त्यांनी काय साध्य केले असेल? यावर कोणी उजेड टाकला तर अज्ञ लोकांना या प्रश्नांचा उलगडा होईल.

प्रतिक्रिया

झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला हे माहित नाही. पण एखाद्या कंपनीचे समभाग घेण्यापुर्वी लोक त्या कंपनीचे विश्लेषण करताना नफ्याच्या आकड्यांना बरेच वजन देतात. कंपनी भरपुर नफ्यात असेल तर आपल्या समभागांना चांगला परतावा येणार ह्या विचाराने बरेच लोक खरेदी करतात आणि समभागाची किंमत वर जाते. ही चढ्या भावात होणारी समभागांची विक्री कंपनीत अधिक भांडवल घालते आणि कंपनीला जास्ती पैसा मिळतो म्हणूनच राजूने नफ्याचे आकडे फुगवले असावेत. अर्थात हे माझे तोकडे सामान्यज्ञान. कुणी तज्ञ लोकांनी आणखी उजेड टाकल्यास वाचायला नक्कीच आवडेल.

केदार's picture

10 Jan 2009 - 5:19 am | केदार

चढ्या भावात होणारी समभागांची विक्री कंपनीत अधिक भांडवल घालते >>

पहिली तिन वाक्य बरोबर पण त्यानंतरचे लॉजीक वेगळे.
हे असे होत नाही. एकदा का तो समभाग बाजारात आला की कंपनीला त्याचा काहीही फायदा होत नसतो व त्यावर पुर्ण कंट्रोलही नसतो.

सत्यम ने नंतर आय पि ओ पण आनलेला नाही त्यामूळे असलेल्या भावाचा फायदा होणे हे ही नाही.

मग तो चढवुन दाखवायचे काय कारण?

दोन कारणे.

त्याचे सोपे कारण आहे की क्लायंटसचा विश्वास. होते काय की ह्या दिवसात देखील ही कंपनी फायद्यात आहे म्हणजे तिला भरपुर क्लायंटस आहेत व रेव्हेन्यु मार्जीन चांगले आहे अशी न्युज पसरते. मग गार्टनर सारख्या रेटींग देनार्‍या कंपन्या अश्या कंपनीला कॅश काउ मध्ये आणतात. ( मॅजीक क्वार्डंट) आणी तिचे रेटींग वाढल्यामुळे मग नविन होणारे क्लायंटपण तिला प्रिमीयम कंपनी समजुन प्रोजेक्ट देतात. व पर्यायाने पैसे येत राहतात.

दुसरे कारण - प्रमोटर्स ऑफलोडींग. म्हणजे जे शेअर्स प्रमोटर्स कडे आहेत ते हळू हळू विकने. इथे राजु व त्याची बायको, मेव्हना व त्याची बायको हे प्रमोटर होते व त्यांनी य शेअर बाजारात विकले. मग तुम्ही आपले शेअर्स कमी भागात विकाल का? तर तो भाव वाढन्यासाठी हे घडवुन आणले गेले. शिवाय डमी ट्रॅन्झॅकश्नस पण केली जातात. त्यामूळे प्रमोटर्स असे घोटाळे नेहमीच करत असतात.

(फायनान्स मधिल अत्यूच्च पदवी मिळवलेला व गेले एक तप मार्केट मध्ये उलाढाली करनारा) केदार

एकलव्य's picture

10 Jan 2009 - 8:28 am | एकलव्य

>पहिली तिन वाक्य बरोबर पण त्यानंतरचे लॉजीक वेगळे.
>>दोन कारणे. सोपे कारण आहे की क्लायंटसचा विश्वास आणि दुसरे कारण - प्रमोटर्स ऑफलोडींग.

३) बर्‍याचदा पगार हे शेअर्सच्या ऑप्शनच्या स्वरूपात असतात. बाजारात शेअरचा भाव वाढला की डायरेक्ट कॅश करून घेता येतो. मला सत्यमचे पगार कसे असतात याची नेमकी कल्पना नाही पण सीएफओने शेअर्स विकले वगैरे बातम्या पाहता शेअर्सच्या स्वरूपात पगार मिळत असावेत.

४) कंपनी फायदेशीर दिसली की कर्ज सहज उपलब्ध होते आणि स्वस्तातही मिळही. (४.१) कर्ज आणि भांडवल यांचे प्रमाण (लेव्हरेज) वाढत गेले की पुन्हा भांडवलधारकांचा फायदाच फायदा आणि (४.२) स्वस्त मिळाल्याने खर्च कमी म्हणजे पुन्हा फायद्यात वाढ. (हा खर्च अगदी शून्यापर्यंत जाऊ शकतो :) )

५) फायदा अधिक झाला किंवा दाखविला तर द ण कू न बोनस!!

६) दुसर्‍या कंपन्या विकत घ्यायच्या असतील तर रोख पैसे मोजण्याऐवजी शेअर्सच्या बदल्यात विकत घेता येऊ शकते. जर बाजारात शेअर्सचा भाव वधारला असेल तर त्याचा अर्थलाभ कसा ते वेगळे सांगायला नकोच.

७) ... तूर्तास इतके पुरे! बाकी ट्रेड सिक्रेट ;)

- एकलव्य

सुनील's picture

10 Jan 2009 - 8:16 am | सुनील

नेमके हेच प्रश्न माझ्याही मनात आले होते. मिपावर अनेक मंडळी या विषयातील जाणकार आहेत, त्यांचाच्याकडून माहितीची अपेक्षा.

(शेअर बाजारातील ओ की ठो न कळणारा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंद घारे's picture

10 Jan 2009 - 6:31 pm | आनंद घारे

इतर सगळी सोंगे आणणे शक्य असले तरी पैशाचे सोंग आणणे शक्य नसते असे म्हणतात पण मोठेपणाचा आव आणण्याने कांही गोष्टी साध्य होत असल्यामुळे कांही लोक कोरडी भाकरी खाऊन मिशीला तूप लावून हिंडतात. पण तूप खाणे परवडायला लागल्यानंतर त्याची गरज नसते. त्यामुळे नांव व पैसा कमावल्यानंतरसुद्धा वर्षानुवर्षे राजू आपल्या कंपनीच्या नफ्याचा आकडा फुगवत राहिला याचे नवल वाटते.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

बट्टू's picture

11 Jan 2009 - 12:32 am | बट्टू

सत्यमसारखाच प्रकार इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्या करत असतील का? त्यांचे घोटाळे असतील तर तेही बाहेर येतिल का. मंदिमुळे बाहेर पडले असावे का सगळे

रेझर रेमॉन's picture

12 Jan 2009 - 9:21 pm | रेझर रेमॉन

आपण मं....द बुद्धी, आपल्याला सत्यम काय हे कळतंच नाय..
पण जे काय लिहीलंय ते चांगलं लिहीलंय, चिको!
माझ्या आधीच्या विधानाला मी मागे घेतोय!
कारण ते पोरकट होतं, चिको!
-रेझर