शिक्षणाचे ओझे झाले आहे का?
मित्रवर्य 'एक तू ही निरंकार' यांना फोन केला.
बोलणे संपताना सहज म्हणून परीवाराची चवकशी...
मुलगी इयत्ता चॉथी.. अभ्यासच करत नाही.
येतं सगळं, पण करायलाच मागत नाही.
मी - ही - आणि आई, प्रयत्न करून थकलो. काही रीस्पॉन्सच नाही.
तिला समजावून, धमकावून, चढवून, पाहिलं... नाहीच. शेवटी पूर्ण तिच्यावर सोडलं तर भलतंच...
आता नव्वदच्या खाली आलीय... वार्षिक पर्यंत वर आली नाही तर तिची तुकडी बदलेल. मग 'ढ' मुलां सोबत बसायला लागेल.. सगळं फ्युचर अपसेट होईल. काय करू आम्हाला कळेनासं झालंय.
मित्र अतिशय हुशार, स्वतः यशस्वी इंजिनिअर, त्यात यशस्वी शिक्षक. मुलगी किंगजॉर्जला.. गोड, लाघवी.. चॉथी पर्यंत उत्तम प्रगति....
काय झाले असेल?
त्याला डॉ. मनोज भाटवडेकरांचे, "आपण आणि आपली मुले" वाचायचा सल्ला...
मित्र चुकतोय की मुलगी.. मग घरोघर हीच तक्रार ऍकू का येते.
अति अपेक्षा धरणारे पालक. आपलं मुल आपल्या सारखंच झालं पाहिजे हा हट्ट ... की मुलांकडे त्यांच्या सर्वांगीण प्रगतिकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक? की आजची शि़क्षण पद्धति, की जीवघेणी अर्थार्जन स्पर्धा?... यात घुसमट कुणाची होतेय? मित्र चुकतोय का? पुस्तक वाचून तो आचरेल का? दीज आर ऑल फंडामेण्टल क्वेश्चन्स चिको! शाळेत गति नसलेल्यांना आपण मंदबुद्धी का समजतो? शिकल्या - सवरल्या मंदांचं काय? हू इज किडिंग मी... चिको ?
शिक्षणाचे ओझे जड झाले आहे का?
गाभा:
प्रतिक्रिया
5 Jan 2009 - 1:36 am | लिखाळ
शक्तिमान रेझर,
आपले प्रश्न चांगले आहेत.
शाळेत अभ्यासात प्रगती न दाखवणार्यांना मी मंद समजत नाही. त्यामुळे मी स्वतः सुद्धा माझ्यालेखी कधी मंद ठरलो नाही :)
अनेकदा शाळेतले मंदच आपल्या मुलांना हुशार बनवायचा घाट घालताना दिसतात.
शिकल्या सवरल्या मंदांचे ज्यांना शक्य आहे त्यांनी कान उपटावेत.
आपण शक्तिशाली असाल तर ते करु शकाल. काल-परवाच पृथ्वितलावर आलेल्या आपल्याला लगेच मर्त्य मानवाच्या खर्या मूलभूत समस्या दिसायला लागल्या याचे कौतूक वाटले. आपण नक्कीच गतीमान आणि हुशार दिसता. (ह.घ्या.)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
5 Jan 2009 - 11:49 pm | रेझर रेमॉन
शक्तिमान रेझर,
आपले प्रश्न चांगले आहेत.
शाळेत अभ्यासात प्रगती न दाखवणार्यांना मी मंद समजत नाही. त्यामुळे मी स्वतः सुद्धा माझ्यालेखी कधी मंद ठरलो नाही Smile
(शाळेत प्रगति दाखवणारे हुशार गणले तरी कालौघात मंद ठरतात. मागे वळून आपल्या शाळेतल्या शेवटच्या बाकांचा ट्रेस घेतला तर हे सहज ध्यानात यावे. आपण शाळेत मं...द होतो!)
अनेकदा शाळेतले मंदच आपल्या मुलांना हुशार बनवायचा घाट घालताना दिसतात.
( धीस इज द गेम. सफेद सदर्यांनी लोकांना नादी लावले. शिकणे म्हणजे सर्व समस्यांचा हल, असे चित्र उभे केले. शिकून समस्या सुटल्या असत्या तर मुलांना पुन्हा का शिकायला लागले असते? शाळेतले मंद बिचारे पहिल्या बाकांवरच्या इल्युजन्स ना फॉलो करायला लागले तर त्यांचे काय चुकले?)
शिकल्या सवरल्या मंदांचे ज्यांना शक्य आहे त्यांनी कान उपटावेत.
(गरज काय? दॅटस डेस्टिनीज जॉब, चिको!)
आपण शक्तिशाली असाल तर ते करु शकाल. काल-परवाच पृथ्वितलावर आलेल्या आपल्याला लगेच मर्त्य मानवाच्या खर्या मूलभूत समस्या दिसायला लागल्या याचे कौतूक वाटले. आपण नक्कीच गतीमान आणि हुशार दिसता. (ह.घ्या.)
( हे चांगलं वाटलं! फंडाज आर फॉर फन चिको!)
काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
(सगळ्यात फंटास्टिक हे आहे! या वाक्यातच मराठी तोरा आहे.)
एनी वेज,
खरा प्रश्र्न मुलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहिला तर...
कारण पालकांच्या व्ह्यू ची किंमत तुम्हा-आम्हाला नाही, तर तिला मोजावी लागणार, नाही का?
- रेझर रेमॉन
5 Jan 2009 - 10:43 am | सुनील
मास्तरांची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 10:51 am | विनायक प्रभू
माझ्याशी संपर्क साधा.
ते जरा हुशार इंजिनयर, शिक्षक, वगैरे विसराल का?
5 Jan 2009 - 11:54 pm | रेझर रेमॉन
थँक्स!
हुशार, इंजिनिअर,शि़क्षक हे सारे लौकिकार्थाने.
मी विसरून काय होणार, चिको?
जात्यातले सूपात येणार काय?
-रेझर
6 Jan 2009 - 10:45 am | विनायक प्रभू
अरे बाबा रेझरा,
तुला सर्व उत्तरे माहित असतील तर प्रश्न का?
आम्हा भोळ्यांचा आपला उगाच गैरसमज होतो ना?
5 Jan 2009 - 1:25 pm | मनीषा
शाळेतली प्रगती ..हेच एकमेव बुद्धीमत्तेचंलक्षण आहे असं वाटत नाही ..
पण तिथे मिळालेल्या गुणांवरच एखादे आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं हेही खरं आहे .
अर्थात काहीवेळा लहान मुलांकडून फार अपेक्षा केल्या जातात ..............आणि मग त्या अपेक्षांचं ओझं होतं
6 Jan 2009 - 12:08 am | रेझर रेमॉन
काय आहे... शाळा बुद्धिमत्ता आणि हुशारी, यश यांचा अन्योन्य संबंध आहे. हे आपल्यावर ठसवलंय... किती ही प्रयत्न केले तरी आपण हे झुगारू शकणार नाही.
शाळेतली प्रगती ..हेच एकमेव बुद्धीमत्तेचंलक्षण आहे असं वाटत नाही ..
पण तिथे मिळालेल्या गुणांवरच एखादे आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं हेही खरं आहे .
वाक्य जरा धोकादायक वाटते... आवडीचे म्हणजे??
डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, आय.टी., पॅरामेडिकल ही आवडीची क्षेत्रे आहेत?
जरा धोकादायक क्षेत्रात आवड निर्माण होऊ दिली जाते?
अर्थात काहीवेळा लहान मुलांकडून फार अपेक्षा केल्या जातात ..............आणि मग त्या अपेक्षांचं ओझं होतं.
महेश ट्युटोरीअल्स, अग्रवाल, चाटेज यांच्याकडे ज्या संख्येने भरती होतेय ती पाहता 'काही वेळा' वर विचार करा.