इच्छांचा नियंत्रक कोण?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 Nov 2025 - 7:05 am
गाभा: 

The German philosopher Arthur Schopenhauer said: “Man does at all times only what he wills, and yet he does this necessarily. But this is because he already is what he wills.” — Chapter 5, On the Freedom of the Will

Albert Einstein paraphrased Schopenhauer in his essay My View of the World (1931): “A man can do as he will, but not will as he will.”

जास्त काही लिहिण्याच्या फंदात पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे. आता वरील कोट जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्याला थोतांड म्हणणे वगैरे चुकीचे आहे. आणि तसेच असेल तर मग खरंच आपल्या मनात ज्या इच्छा निर्माण होतात त्यांवर नियंत्रण कोणाचं असतं? कोण ह्या इच्छा आपल्या मनात आणतो? कारण याच इच्छांच्या मागे आपलं शरीर काम करण्यासाठी झटत राहत.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

28 Nov 2025 - 12:17 pm | शाम भागवत

संक्षींची गैरहजेरी जाणवतेय. ;)

गवि's picture

28 Nov 2025 - 1:03 pm | गवि

A man can do as he will, but not will as he will.

He is the you in you & I is the me in you.

तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? ;-)

हा प्रतिसाद पुलंची लेगसी वापरून विनोदी अशा अर्थाने लिहीला आहे हे खरेच. पण तो अगदीच बाष्कळ नाही. किंवा निरर्थक नाही.

किंबहुना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक निरर्थक नाही.

इच्छा आणि ती मिळवण्यासाठीचे प्रयत्न हे अनेक अद्वैतांपैकी एक आहे. या दोन्ही गोष्टी एकाच क्षणी जन्मतात. त्यामुळे अ ही गोष्ट मनुष्याच्या स्वतःच्या इच्छेने झाली आणि ब ही इतर कोणाच्या इच्छेने झाली असे वेगवेगळे काढण्यात अर्थ दिसत नाही.

मुळात मनुष्य किंवा जीवन अस्तित्वात असणे हीच एक अनावश्यक उचापत आहे. ती इच्छा तरी मुळात कोणी केली?

इच्छा आणि ईषणा.. इच्छा ही मानव करू शकतो. ईषणा मात्र ईश्वर करू शकतो असे मानले जाते.

wish, volition.. असा फरक. आता त्यासाठी ईश्वर मानावा की नाही हा पुढचा मुद्दा. ज्याची त्याची "इच्छा".. :-)

Bhakti's picture

28 Nov 2025 - 2:54 pm | Bhakti

"आपण स्वतः "

इच्छा या अनेक प्रकारच्या असतात.त्यातल्या ,जसे अन्न,पाणी, वस्त्र,निवारा मिळवण्याची 'इच्छा' नसेल तरीही ती मिळाल्याशिवाय तुम्ही जगूच शकणार नाही.
जर कायम निष्क्रियच राहायचं ठरविल्यास,समोर अनेक भौतिक गोष्टी असूनही तिचा 'इच्छा' नसल्याने उपयोग करूच शकत नाही.
इच्छा आहे पण कृतीचं करणार नसाल तर 'आनंदी' राहायची 'इच्छा' कशी पूर्ण करणार??
आपल्या काही कुतूहालांचे रूपांतर इच्छेत होतं आणि कृतीचे इच्छापूर्तीत.

एक उदाहरण देतो लता मंगेशकर यांचा गाण्याकडे ओढा होता. तर त्यांचा गाण्याकडेच का ओढा होता ?जगात इतकी कौशल्य , कला , विद्या आहेत त्या सगळ्यातून गाण्याकडेच ओढा असण्याचे म्हणजेच गायनाची इच्छा असण्याची कारण काय? हे कोणी नियंत्रित केले? त्या नृत्यांगना , शिक्षिका , शास्त्रज्ञ का झाल्या नाहीत ? गायिकाच का झाल्या?

युयुत्सु's picture

29 Nov 2025 - 10:43 am | युयुत्सु

तर त्यांचा गाण्याकडेच का ओढा होता ?

संधीची उपलब्धता, अंगभूत कौशल्ये, पोषक वातावरण या नुसार व्यक्ती घडत जाते.

हे कोणी नियंत्रित केले?

याचे उत्तर खाली दिले आहेच

ओढा होता.. त्यांना जी आवड होती त्यातच त्यांनी खुप मेहनत प्रयत्न केले आणि त्या गायिका झाल्या.त्यांनी सुरूवातीला अभिनयदेखील केला पण गायनात अधिक मेहनत घेत राहिल्या.
मला शास्त्रज्ञ व्हायचे होते पण मी त्यादृष्टीने मेहनतच केली नाही त्यामुळे नाही झाले.

युयुत्सु's picture

29 Nov 2025 - 11:54 am | युयुत्सु

मला शास्त्रज्ञ व्हायचे होते पण मी त्यादृष्टीने मेहनतच केली नाही त्यामुळे नाही झाले.

तुमच्याकडे शास्त्रज्ञ होण्यासाठी अंगभूत कोशल्ये - उदा० जिज्ञासा, प्रयोग, चिकित्सा इ० ची आवड, प्रॉब्लेम सॉल्व्हींग स्किल्स या पैकी काय काय होते/आहे?

Bhakti's picture

29 Nov 2025 - 12:32 pm | Bhakti

मी आठवीलाच बाबांना मायक्रोस्कोप घ्यायचा हट्ट केला.सायन्सचे शिक्षण घेतांना ATC,PTC खुप प्रयोग केले.पुढे PTC तर खुप नाविन्यपूर्ण प्रयोग केले.पण मी पूर्ण झोकून,अनेक त्याग ,मेहनत केली नाही.I just bounded my knowledge as normal bread earner,not learner.

जगात नॉन फिजिकल किंवा नॉन नॅचरल असे काही नाही, किंवा, तसे काही असले तरी त्याची माहिती मिळवणे शक्य दिसत नाही.

त्यामुळे, आपले विचार, इच्छा इत्यादी सर्व गोष्टी भौतिक प्रक्रियेचा भाग आहेत.

डोंगरावरून पडणाऱ्या धोंड्याला दिशा निवडण्याचे किती स्वातंत्र्य असते ?

मानवी मेंदूतील उपाग्र खंड भाग इच्छांवर नियंत्रण ठेवायचं काम करतो पण ते एका मर्यादेपर्यंतच. संप्रेरकांच्या उद्रेकामुळे भाग निष्प्रभ होऊ शकतो.

युयुत्सु's picture

29 Nov 2025 - 8:22 am | युयुत्सु

आणखी एक वेगळा दृष्टीकोन

वैयक्तिक पातळीवर इच्छांचा नियंत्रक माणसाचा उपाग्रखण्ड असला तरी आपण ज्या समाजात राहतो तो देखिल आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असतो. कमकुवत उपाग्रख्ण्ड असलेल्या व्यक्तींना इच्छांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अनाहूत सल्ले देण्यापासून, प्रयत्नात अडथळे निर्माण करणे हे एकप्रकारचे आपल्या इच्छांचे नियंत्रण किंवा दमनच असते. माध्यमे आणि सांस्कृतिक प्रवाह इच्छांवर प्रभाव पडतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2025 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

.