या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
---------
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी
दुसरी माळ - लाल
तिसरी माळ - निळा
चौथी माळ- पिवळा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- चौथी माळ- पिवळा
पाचवी माळ - हिरवा
सहावी माळ -करडा
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- सातवी माळ - केशरी पक्षी
शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग-आठवी माळ - मोरपंखी
नववी माळ -गुलाबी
------
आभार - पक्षीमित्रांनी पाठवलेली काही सुंदर प्रकाश चित्रे लेखामध्ये डकवली आहेत त्यांचे मनापासून आभार.
मे महीन्यातील रखरख संपली की जुन मधे शाळेची लगबग चालू होते. नन्तर वर्षाऋतू धुमाकूळ घालू लागतो. व्रत वैकल्याचे, सणासुदीचे दिवस सुरू होतात. पशुपक्षी- बैल नाग ,निसर्ग-वटसावित्री अगदी रात्रीचा दिवस करणाऱ्या दिव्यांचा जसे कंदील,चिमणी ,समई यांना सुद्धा पूजेचा मान मिळतो. पावसाचा जोर कमी होतो, सोन्याच्या पावलांनी गणपती गौरायांचे आगमन होते. कुणाकडे दिड्,पाच,दहा दिवसाचा पाहुणचारानन्तर पुनरागमनायाच म्हणत त्याना जाड अंतकरणाने निरोप दिला जातो.पुढचे पंधरा दिवस आपल्याला सोडून गेलेल्या पूर्वजांचे स्मरणार्थ असतात. तिथीनुसार श्राद्ध पक्ष व रूपकात्मक ब्राम्हण भोजन आयोजित केले जाते. महालयाचे दिवस संपल्यावर महिषासुराचे निर्दालन करणाऱ्या महिषासुरमर्दिनीची नवरात्र पूजनाची धामधूम सुरु होते. नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करतात. इतिहास, धर्मशात्रज्ञ याबद्दल काय म्हणतात माहीत नाही पण देवीला नऊ दिवस वेग्वेगळ्या रंगाचे वस्त्रालंकार (साडी) अपर्ण करतात आणि भाविक सुद्धा त्याच रंगांची वस्त्रे परिधान करतात घट बसव्तात ,देवीला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालतात तर उरलेल्या दिवसात झेंडू,तिळाच्या फुलांची माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. दररोज एक तझ्या फुलान्ची माळ अर्पण करणे एक आवश्यक विधी असल्याने बहुधा प्रत्येक दिवसास पहिली माळ ,दुसरी माळ असेही म्हणत आसावेत. ही पुर्वपिठीका म्हण्जे ताकाला जाताना भान्डे लपवण्यासरखे.......
नवरात्रीचे औचित्य साधत, या लेखमालेद्वारे, मी पाहिलेल्या निसर्गातील विविध रंगांच्या पक्षांची प्रकाश चित्रे,आपल्या सणासुदीचा आनंद वाढवण्यासाठी लिहावी असे वाटल्याने हा प्रपंच.निसर्गात भत्कन्ती करताना प्रकृतीचे सृजन किती अद्भुत आहि याची कल्पना येते.पहिल्या दिवशी पांढरा रंग म्हणून देवीला शुभ्र वस्त्रालंकारांनी सजवले जाते.काही प्र चि पांढर्या पक्ष्याची.
----------
महाकाली +महासरस्वती
---
१. Mute Swan
--------------------
२. Great Egret
-------------
--------------
३. Long Billed Corella, Austrelian resident
---------
--------
४. Gull Billed Turn
------------
५. Black Headed Ibis
प्रतिक्रिया
30 Sep 2025 - 7:52 pm | कंजूस
ना सुंदरच संकलन.
नांदूर माध्यमेश्वरला गेला आहात का? फार चांगली जागा आहे. महाराष्ट्राचं भरतपूर असंही म्हणता येईल. पाणपक्षी आणि रान पक्षी दोन्हीही आहेत. रात्र पक्षीही आहेत. आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी प्रवासी स्थलांतरी पक्षी येतात.
( सिन्नरकडून वीस किलोमिटर . मांजरगाव, खानगाव थंडी आणि मग धरण. नाशिक निफाडकडून धरणाचा वेगळा किनारा येतो. )