चिंगरी माछेर मलाईकरी - (नारळाच्या रश्यातिल कोळंबी)

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
1 Jan 2009 - 12:07 am

**************नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा **************
(२००९ मधला मिपावरचा पहिला लेख)

साहित्य:

* १/२ किलो सोललेले कोळंबी (मध्यम आकाराच्या)

* २ चमचे मोहरीचे तेल
* १ कांदा बारीक चिरलेला
* १/४ चमचा हळद
* १ चमचा धने-जिरे पुड
* १ चमचा लाल मिरची पुड
* १/२ चमचा साखर
* ३/४ वाटि नारळाचे घट्ट दुध (पहिल्या दाबणीचे)

कृती:

१. एका भांड्यात तेल गरम करुन त्यात कांदा कुरकुरीत परतुन घ्या आणि बाजुला काढुन ठेवा.



२. गरम तेला मधे कोळंबी टाकुन १ मिनीट परतुन घ्या.


३. सगळे मसाले आणि साखर टाकुन १ मिनीट परतुन घ्या.


४. नारळाचे दुध घाला. झाकुन १० मिनीटे होऊ द्या.


५. परतलेला कांदा घालुन गरमा गरम भाताबरोबर वाढा.


---

हि पारंपारिक बंगाली पाकृ करण्यास एकदम सोपी आणि चवीस अप्रतिम आहे (माझ्या संग्रहातल्या पाकृ पुस्तकातुन घेतली आहे). तेव्हा करुन बघा आणि आपले अभिप्राय जरुर कळवा!

लोभ असावा.

(कोळंबीच्या प्रेमात) पांथस्थ...

प्रतिक्रिया

प्राजु's picture

1 Jan 2009 - 12:09 am | प्राजु

कलेजा खल्लास..!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वल्लरी's picture

2 Jan 2009 - 9:34 am | वल्लरी

असेच म्हणते....
:)

---वल्लरी

पक्या's picture

1 Jan 2009 - 12:20 am | पक्या

जबरा. शब्दच नाहीत वर्णन करायला.
सोपी पण चविष्ट पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद. फोटोज ही सुंदर.

मयुरा गुप्ते's picture

1 Jan 2009 - 12:45 am | मयुरा गुप्ते

रेसिपी आणि फोटोस एकदम मस्त.तोन्डाला पाणि सुटाले.

baba's picture

1 Jan 2009 - 12:46 am | baba

नविन वर्षाची सुरवात तर जबरा चविष्ट झालीय... फोटो बघुन अन पाकृ वाचून बादलीभर लाळ गळाली !!

..बाबा
सर्वा॑ना नविन वर्षाच्या शुभेच्छा

नंदन's picture

1 Jan 2009 - 12:50 am | नंदन

वर्षाच्या सुरुवातीलाच अशी चवदार पाककृती! खल्लास!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Jan 2009 - 12:52 am | ब्रिटिश टिंग्या

काय जबराट कोळंबी आहे!

आता बंगळुराला आल्यावर तुमच्याकडे मुक्काम पक्का! तुम्ही आतापर्यंत पाककृती दिलेले सर्व पदार्थ तुमच्याकडेच खाईन म्हणतो :)

- (चिंगरी माछेरप्रेमी) टिंग्या!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

पांथस्थ's picture

1 Jan 2009 - 1:11 am | पांथस्थ

येकदम. अनेक मंडळिंचा हाच बेत आहे, तेव्हा मज्जा येइल :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धनंजय's picture

1 Jan 2009 - 1:05 am | धनंजय

करायलाच पाहिजे.

शंका : धने-जिरे पूड : धने:जिरे = १:१, की २:१?
(कमलाबाई ओगले "रुचिरा" मध्ये २:१ सांगतात साधारणपणे...)

झुमाक्ष's picture

1 Jan 2009 - 1:10 am | झुमाक्ष (not verified)

धने-जिरे (संमिश्र) पूड इंडियन ग्रोसरी स्टोअरांत रेडिमेड मिळतेशी वाटते... काय प्रमाण असते त्यांनाच माहिती!

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

पांथस्थ's picture

1 Jan 2009 - 1:10 am | पांथस्थ

आपापल्या आवडिनुसार...मी धने १: जिरे १ घेतो...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

धनंजय's picture

1 Jan 2009 - 5:22 am | धनंजय

आणि फस्त केली!

संदीप चित्रे's picture

1 Jan 2009 - 1:15 am | संदीप चित्रे

आधीच कोळंबी, त्यात नारळाच्या जोडीतली....
करनेकोच मंगता :)

आजानुकर्ण's picture

1 Jan 2009 - 5:25 am | आजानुकर्ण

सह्ही पाककृती. शेवटचं ताट तर काय देखणं दिसतंय

आपला
(मासेखाऊ) आजानुकर्ण बंदोपाध्याय

सुनील's picture

1 Jan 2009 - 6:48 am | सुनील

मस्तच!! पाकृ आणि फोटू!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

1 Jan 2009 - 8:52 am | विसोबा खेचर

अ प्र ती म..!

धम्मकलाडू's picture

1 Jan 2009 - 12:35 pm | धम्मकलाडू

अहाहा.. मंडळी, हिवाळा, मोहरीचे तेल, मासे, बंगाली रेसिपी.. अहाहा... आठवले

आमरा दुजॉन भाय
शिबेर गोजोन गाय
झिंगडी माछेर पुटकी दिये
डुगडुगी बजाय

पांथस्था, या हृदयात अजूनही वास (या सुवासात सरसूच्या तेलाचाही थोडा सुवास आहेच) करणार्‍या काही मत्स्यकन्यांची आठवण करून दिलीस... धन्यवाद.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील's picture

1 Jan 2009 - 1:11 pm | सुनील

या हृदयात अजूनही वास करणार्‍या काही मत्स्यकन्यांची आठवण करून दिलीस...
अरे, धम्मकलाडवा, कशाला कशाला नको नको त्या (की हव्याहव्याशा?) आठवणी जाग्या करतोयस? तेही नववर्षाच्या सुरुवातीलाच!

मोहरीचे तेल हे बंगाल्यांचे खासच. शिवाय कलौंजी नामक एक (जिर्‍यासारखा) मसाल्याचा पदार्थही ते बर्‍याच पदार्थात वापरतात.

सुनीलदा

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश's picture

1 Jan 2009 - 2:03 pm | ब्रिटिश

मस्तच रे पांथस्था , साल माशे मटन म्हटला क आपुन सपशेल पांडरा रुमाल दाकवतो
ता.क. मीठ टाकाला ईसरलास वाटत र दादुस

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

कवटी's picture

1 Jan 2009 - 5:57 pm | कवटी

नविन वर्षाची सुरवात तर जबरा चविष्ट झालीय...
सहमत....

पांथस्था... दिल खुश करून टाकलास.... शनिवार्-रविवार करुन बघतोच.
कवटी

http://www.misalpav.com/user/765

लवंगी's picture

2 Jan 2009 - 12:10 am | लवंगी

सणसणून भूक लागली..

वेताळ's picture

2 Jan 2009 - 10:36 am | वेताळ

मिपाचा सुगरण्या हा किताब उगाचच पांथस्थाला मिळाला नाही.खुपच सोप्पे करुन पाककृती लिहण्यात कोणीही हात धरणार नाही तुमचा. जबराट.....
वेताळ

सुनील's picture

2 Jan 2009 - 10:46 am | सुनील

...तर, प्रत्येक पायरीला बहारदार फोटो ताकून, पाकृ देण्याचा एक नवा मापदंड त्याने घालून दिलाय!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

2 Jan 2009 - 10:47 am | सुनील

...तर, प्रत्येक पायरीला बहारदार फोटो ताकून, पाकृ देण्याचा एक नवा मापदंड त्याने घालून दिलाय!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मृगनयनी's picture

2 Jan 2009 - 11:00 am | मृगनयनी

++१

सहमत!

- शाकाहारी मृगनयनी.
:)

पांथस्थ's picture

2 Jan 2009 - 12:01 pm | पांथस्थ

मंडळी,

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

सुक्या's picture

2 Jan 2009 - 10:27 pm | सुक्या

माझ्या नवीन वर्षाच्या 'वजन कमी करण्याच्या' संकल्पाला पहील्याच दिवशी सुरुंग लावनार्‍या पांथस्थाचा जाहीर निषेध. (निषेध, निषेध, निषेध असं तीन वेळा लिहिनार होतो परंतु शेवटचे भरलेले ताट पाहुन पुढचे दोन 'निषेध' टंकायचे झालेच नाही. पांथस्थाचा महीमा, दुसरं काय. या सदस्यावर बंदी घाला वगेरे टंकनार होतो पन हात, मेंदु, पोट ह्यांच्या पुढे मी काहीच करु शकलो नाही.)

बाकी पाकक्रुती नेहेमीसारखीच जबरा आहे. पाक्रु चे प्रत्येक स्टेज चे फोटो अगदीच अप्रतीम.
धन्यवाद पांथस्था !!

सुक्या (बोंबील - बोंबला)
(आता वजन वाढनारच. अब कहा जायेगा तु सुक्या?)

अनंत छंदी's picture

3 Jan 2009 - 9:30 am | अनंत छंदी

बा पांथस्था
का असा आम्हाला माशासारखा तडफडवतो आहेस. पाककृती पाहिली की करून खाल्ल्याशिवाय रहावतच नाही. चित्रे पाहून स्वाद जिभेवर आला असता तर किती बरे झाले असते.

असेच म्हणतो.

"प्रत्येक पायरीला बहारदार फोटो ताकून, पाकृ देण्याचा एक नवा मापदंड त्याने घालून दिलाय!!"- सुनील.

मापदंड कसला? वाचणार्‍यांच्या जीवाची तडफड होतेय इकडे.

पांथस्था, अतिउत्तम पाककृती. रानातल्या प्रकाशाबरोबरच पाकृ स्पेशल अशी अनुदिनी लिही.

नाव मी सुचवतो.

करली. _ _ _ _.कॉम

(कर्ली हा जगातील अतीउत्कृष्ट मासा आहे असे मानणारा) सुनील मोहन.

विकि's picture

4 Jan 2009 - 2:23 pm | विकि

कोळंबीचा फोटो पाहून तोडाला पाणि सुटले.पण वैधकीय सल्ल्यानुसार सध्या शाकाहार स्विकारला असल्यामुळे फोटो पाहूनच समाधान मानत आहे.खुप वाईट वाटते हो पण ............