अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा

पुष्कर's picture
पुष्कर in काथ्याकूट
7 Jan 2008 - 7:57 pm
गाभा: 

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा रे. ही खंत आहे केवळ माझीच नाही, तर मिसळपाववर येण्यार्‍या कित्येक गावकर्‍यांची.

मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!)

मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुधा पडलं.

मनोज याने पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलाच आहे. मध्ये एका चर्चा विषयामध्ये सागर आणि डॉ. प्रसाद दाढे यांनीही त्यांना अरे-तुरे करावं असं सांगितलं आहे. मी त्या दोघांपेक्षाही वयानी लहान. पण वयाचा आंतरजालावर काय संबंध म्हणा. मलातरी 'रे' मध्ये जी आपुलकी वाटते ती साहेब-राव मध्ये वाटत नाही. मानाच्या उपाध्या लावण्याइतका मी मोठाही नाही, आणि कधी-मधी तसा होता आलं, तरी सगळ्यांना सांगीन-'बाबा रे! मला अरे-तुरे करा'.

आपल्याला इथे एकमेकांचे चेहरे/स्वभाव एकमेकांना प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे समोरच्याला 'अहो जाहो' करणंच सेफ वाटतं. पण माझ्याप्रमाणे ज्यांना अरे-तुरेचं संबोधन (मी तर त्याला उपाधीच म्हणेन) पाहिजे असेल, त्यांनी ह्या चर्चेखाली प्रतिसादरूपी अर्ज करावेत अशी मी समस्त गावकर्‍यांना विनंती करतो.

प्रतिक्रिया

सुनील's picture

7 Jan 2008 - 8:08 pm | सुनील

हे कसं वाटतं?

इनायकभौंनी माझा "सुन्या" केलेला आहेच!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

7 Jan 2008 - 8:27 pm | इनोबा म्हणे

च्यामारी मी तुला बालपणीचा मित्र असल्यासारखे मानायचे आणी तु मात्र मला इनायकभौ,विनायकराव्,अनिवसे साहेब आणि विनायकशेठ सारखी कानाला टोचणारी 'नावं ठेवता.'असं असल तर मी पण तुम्हाला ह्याच उपाध्या लावेन.चालेल का?

पुष्क्या इथं पंचायतीमधे सगळ्यांना या असल्या उपाध्या लावायचा आजार आहे बहूतेक.मला पण हे असेच परका करतात रे!किती दिवस सोसायचा हा अन्याय?आता परत कुणी अशी हाक मारली तर छोट्या डॉन्याला सुपारी देऊन 'गेम' करायला लावेन.

'पुष्क्या' नाव कसं वाटलं रे?

(साधा सरळ) -इनोबा

सुनील's picture

7 Jan 2008 - 8:55 pm | सुनील

च्यामारी मी तुला बालपणीचा मित्र असल्यासारखे मानायचे आणी तु मात्र मला इनायकभौ,विनायकराव्,अनिवसे साहेब आणि विनायकशेठ सारखी कानाला टोचणारी 'नावं ठेवता

स्वारी...चूक झाली. पुन्हा नाय करणार, इनोबा.

पुष्क्या इथं पंचायतीमधे सगळ्यांना या असल्या उपाध्या लावायचा आजार आहे बहूतेक

च्यायला. इथेही लोकांना "म" ची बाधा झाली??

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

28 Feb 2008 - 2:22 pm | छोटा डॉन

"........परत कुणी अशी हाक मारली तर छोट्या डॉन्याला सुपारी देऊन 'गेम' करायला लावेन"
अरे इन्या, हे काय नाटक आहे लेका ? [ आमच्या सोलापुरात कुठल्या 'वि' ने सुरू होणार्‍या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो 'इ' ने सुरू होते जसे की इन्या , इक्या , इज्या .... ]तू तर पार आम्हाला "सुपारी किंग्"बनवून टाकलसं.इथे आत्ताच आमच्या मागे "१२ मुल्कोकी पुलीस" लागल्याने पार्श्वभागाला पाय लाऊन पळता-पळता आमची पार वाट लागली आहे आणि त्यात तू मला सुपारी देतो म्हणून समद्या दुनवेत [ हा मिरासदारांचा शब्द ] आमच नाव खराब कर ....म्हंजे निघूदे आमच्या नावाने अजून एक "वॉरंट" आणि होऊदे आमचे "एंन्काऊंटर" .........
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पुष्कर's picture

8 Jan 2008 - 8:21 am | पुष्कर

काही हरकत नाही.

-पुष्क्या (ना हरकत प्रमाणपत्रवाला)

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Jan 2008 - 8:09 pm | ब्रिटिश टिंग्या

बघ....मी म्हणालो तुला!!!!

पुष्कर's picture

12 Jan 2008 - 6:27 pm | पुष्कर

आणखी काय म्हणू?

विकि's picture

8 Jan 2008 - 6:20 pm | विकि

अरे ए.....पुष्क्या .
एकेरी संबोधन लय आवडतय तुला काय बात काय हाय. अस्सल मराठी माणुस समोरच्याला शिव्या घालून आपलासा करतो.तेव्हा तुला शिव्या घालायची पण विनंती कर की लेका.
आपला
कॉ.विकि

पुष्कर's picture

12 Jan 2008 - 6:33 pm | पुष्कर

सा.लो.वि.वि. *
प्रतिक्रिया लिहिण्यास कारण की,

आपला प्रतिसाद वाचून हसू आलं. तसे आम्ही लिंबूटिंबूच. आम्हा गरीबाची चेष्टा करताय का राव!
आम्ही म्हणलं, पिझ्झा-बर्गर खाऊन कंटाळा आला, काहीतरी घरगुती होऊन जाऊ द्या; तर तुम्ही म्हणताय 'वांग चालेल का, दोडका चालेल का..'

ते असो. लोभ असू द्या. चेष्टा नको.

विकि's picture

12 Jan 2008 - 6:40 pm | विकि

आपला प्रतिसाद वाचून हसू आलं. हसणे,रडणे हे तुझ्यावर अवलंबुन आहे त्यामुळे तुला हसु आल काय नी रडू आल काय ते तुझ तु बघ .
आपला
कॉ.विकि

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2008 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

मालवणी माणूस शिव्यांची लांबलचक माळ लावू शकतो. परंतु मागेपुढे पाहून. खास करून एकाच्या शेतातील तरवा (पेरणीनंतर उगवलेली रोपे जी नंतर उपटून वाफ्यात शिस्तबद्ध लावणी करतात.) खाल्ल्यानंतर एखाद्या बैलाने खाल्ले किंवा खाण्यास बैल घुसला तर लाखो शिव्यांची माळ लावतो. परंतु एरवी बोलतांना लौकिक दृष्ट्या छोट्यात छोट्या माणसाला देखील आदरार्थी संबोधन करतो. (एखद्या मालवण्याला भारतीय क्रिकेट चमूत घेतल्यास कांगारूंचे स्लेजिंग जरूर थांबेल. कुणीतरी सचीनला माझ्याकडे प्रशिक्षणार्थ पाठवा.)

प्रमोद देव's picture

8 Jan 2008 - 9:28 pm | प्रमोद देव

अस्सल मराठी माणुस समोरच्याला शिव्या घालून आपलासा करतो.


विकी उगीच चुकीचा प्रचार करू नकोस. तू वैयक्तिक तसा वागत असशीलही.पण उगाच सगळ्या मराठी माणसांबद्दल असे सरसकट विधान करून गैरसमज पसरवू नकोस.

विकि's picture

9 Jan 2008 - 1:40 am | विकि

तुला कस माहीत मी असा वागतो ते .अस्सल मराठी माणुस कसा वागतो ते तुच सांग की
आपला
को.विकि

इनोबा म्हणे's picture

9 Jan 2008 - 1:56 am | इनोबा म्हणे

प्रमोद काका(मला तुमचं वय माहित नाहि) आणि विक्या...आधीच इथे वातावरण ढवळून निघाले असताना,नवा वाद नको...त्यापेक्षा आपण सामंजस्याने घेऊ...

अध्यक्षः मिपा शांतता समिती
('शांती' ठेवलेला) -इनोबा

प्रमोद देव's picture

9 Jan 2008 - 9:03 am | प्रमोद देव

तुम्हाला राग आलेला दिसतोय त्यावरून नक्की तुम्ही तसे वागत असणार असे सिद्ध होतेय.

आपला आज्ञाधारक नातू (पम्या)

विकि's picture

9 Jan 2008 - 3:30 pm | विकि

तुम्ही मनोगतावरील अत्यानंद आहात का?

विसोबा खेचर's picture

9 Jan 2008 - 12:29 am | विसोबा खेचर

अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा

मीही एक्सॅट्ली हेच म्हणतो...!

मलाही अहो जाहो पेक्षा अरे तुरे केलेलेच जास्त आवडते!

आम्ही राहतो त्या इमारतीत बच्चे कंपनीची फौजही बरीच आहे. ती तमाम बालसेना मला 'अरे तात्या' असंच म्हणते! As far as Tatyaa is concerned, 'NO aho-jaho' business please! अशी शिस्तच मी त्यांना लावली आहे. खूप धमाल येते!

इथे मिसळपाववर काही एक दोन अपवाद वगळता मला सगळे अहो तात्याच म्हणतात तेही खरं तर मला आवडत नाही. तात्या आले, तात्यासाहेब बसले, तात्याराव हगले, तात्याजी पादले अशी आदरार्थी बहुवचने ऐकून ऐकून खरं तर कंटाळा आला आहे! :)

खरं तर सर्वांनीच (माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनीही,) मला अरे तुरे केलं तर ते मला जास्त आवडेल. पुष्करच्या या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने मीही सर्वांना हीच विनंती करतो...! : )

मालकाला/प्रशासकाला अहो जाहो करण्याची पद्धत मिपावर नाही! :)

अहो एवढंच कशाला मंडळी, तिथे आमच्या मनोगतावरदेखील जो तो, प्रशासक/वेलणकर यांना अहोजाहो म्हणत असे/अजूनही म्हणतो. आपण साला मनोगताचरचा पहिला माणूस ज्याने वेलणकराला चारचौघात आपुलकीने अरेतुरे केलंन! :)

काय रे शक्तिवेलू, खरं की नाही बोल लेका! :))

असो..

तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Jan 2008 - 2:03 am | ब्रिटिश टिंग्या

आता ठीक आहे ना?

(तुझा अरे 'तुरे' वाला मित्र) छोटी टिंगी

इनोबा म्हणे's picture

9 Jan 2008 - 12:42 am | इनोबा म्हणे

तुझ्या भावना पोचल्या आणि टोचल्यासुद्धा...जाऊ दे जून्या आठवणी...आता मिपावर झकास चाललंय ना... हेच पाहिजे आपल्याला.

(लोकशाही जिंदाबाद!) -इनोबा

देवदत्त's picture

12 Jan 2008 - 8:01 pm | देवदत्त

ती तमाम बालसेना मला 'अरे तात्या' असंच म्हणते!
ह्यावरून तुम्ही मला "४०५ आनंदवन" मधील बॉबीच (सुधीर जोशींनी साकार केलेला) वाटताय. मग त्यावरून 'अरे तात्या' म्हणायला हरकत नाही. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jan 2008 - 9:26 am | llपुण्याचे पेशवेll

मित्रहो,
हा उपक्रम एकदम मस्त आहे.. आणि विशेषत: परदेशात आल्यावर याची महती जास्त पटली..खरोखरच काहीतरी अस्सल मिळाले....
ध.अ.मिराशी

अवलिया's picture

9 Jan 2008 - 6:59 pm | अवलिया

ते रोशनी वगैरे काय गुंडाळले काय आणीबाणीत?
आणी ते आणीबाणी काय ते कमरेचे काढुन कधी डोस्क्याला गूंडाळणार?
औ.....

नाना

विजुभाऊ's picture

28 Feb 2008 - 3:15 pm | विजुभाऊ

पुष्कराक्षस  हे नाव चालेल का रे पुष्कुबाळा.....
सेमिराक्षस: विजुभाउ