नमस्कार मंडळी,
दि.२८:१२:२००८ रोजी पहिला ठाणे " मिपा कट्टा " झक्कासपणे संपन्न झाला.
श्रीयुत संतोष जोशी ; तात्या अभ्यंकर ; संकेतजी कळके ; श्री विनायक प्रभू ; श्री रामदास ; मदनबाण ; देवदत्त (सपत्नीक) ; वाहिदा ; प्रगती ; सुनील ; श्री हेमंत बर्वे ; श्री चंद्रशेखर गोखले ; मंदार धारप ; अतुल परांजपे .
हे सर्व मिपाकर उपस्थित होते.
बरोबर ४.३० वाजल्यापसून मंडळी जमावयास सुरूवात झाली.
प्रथम चहा नंतर मिक्स भजी ( कांदा,बटाटा,मूग्,सिमलामिरची) अशी चविष्ठ सुरूवात झाली.
प्रथमच भेट होत असली तरी अनौपचारिकपणाचा बुरखा गळून पडायला जराही वेळ लागला नाही.
हळू हळू गप्पा रंगायला लागल्या.
आणि सरांकडून अतुलला फर्माईश आली.
त्यानंतर अतुलने स्वतः लिहिलेली आणि संगीतबध्द केलेली तीन गाणी सादर केली. साथीला होती फक्त गिटार आणि डोलणार्या माना. जाम धमाल आली.
परत गप्पांचा फड रंगायला लागला. गप्पांमधे ९.०० कधी वाजले हे समजलंच नाही.
त्यानंतर मिसळ पाव ; मटण , भाकरी ; आम्रखंड ; भात आणि ताक
या मेनूचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि पुन्हा भेटूया असे म्हणत पण कधी ते न ठरवताच सर्वजण मार्गस्थ झाले.
मिपा कट्टा ठाणे ; संपन्न झाला
गाभा:
प्रतिक्रिया
30 Dec 2008 - 11:37 am | आनंदयात्री
वृत्तांत फारच त्रोटक !
तात्यांनी गाणे सादर केले की नाही ?
30 Dec 2008 - 11:52 am | रामदास
आता मिसळ जाळ्ळ तिखट लागलीच तर अंजीरबर्फी पण आली.बर्फी यजमान संतोष जोशी यांना कन्यारत्न प्राप्त झाले त्याची.खाणं समोर आल्यावर मास्तर आणि रामदासचं तोंड थोडावेळ बंद झालं
30 Dec 2008 - 1:17 pm | रामदास
यमनाचे चलन गाताना तात्या आणि लक्ष देऊन ऐकतोय तो मंदार धारप.
देवदत्त आणि त्यांची पत्नी, फोटो काढतेय ती प्रगती (सलोनी लायब्ररी)आणि बाजूला वाहीदा.
अतुल आंखोके सागर ...गाताना.

यजमान सगळ्यात शेवटी जेवतात. पाहुणे तृप्त झाल्यावर .संतोष आणि अतुल काही नोट्स एक्स्चेंज करताना.

30 Dec 2008 - 1:21 pm | रामदास
कोण म्हणेल त्रोटक आहे.
पाच अंकाचे नाटक आहे.
30 Dec 2008 - 4:42 pm | अनिल हटेला
आता कसं भरल्या भरल्या सारखं वाटतये...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Dec 2008 - 4:54 pm | shweta
कुठल्या लग्ना च्या / साखरपुड्याच्या रीसेपशन सारखे वाटतय.
फार बोर झालं असणार नक्की :)
तात्या उर्फ विसोबा खेचर "बरेच" वजनदार दिसतायत. मिसळपाव चे शरद पवार हि पदवी देयला हरकत नाहि :)
30 Dec 2008 - 4:56 pm | आजानुकर्ण
कट्टा चांगलाच झालेला दिसतोय...
पण 'संपन्न होणे' म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे एखाद्याचे व्यक्तिमत्त्व संपन्न असते. साजरा होणे यासारखा मराठमोळा शब्द उपलब्ध असताना हा हिंदीकडून उसना आणलेला शब्दप्रयोग कशासाठी?
आपला
(हिंदाळलेला) आजानुकर्ण
30 Dec 2008 - 6:20 pm | llपुण्याचे पेशवेll
'संपन्न झाला' हा हिंदीकडून उसना आणलेला कसा काय बरे. आम्ही तर म्हणतो बुवा शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
बाकी कट्टा लई भारी झालेला दिसतो आहे.
(मराठमोळा)
पुण्याचे पेशवे
Since 1984
31 Dec 2008 - 9:48 am | सुनील
प्रथमच स्पष्ट करतो की, ही चर्चा येथे अवांतर आहे.
सोहळा संपन्न झाला असे आता बर्याचदा ऐकू येते. एकदा एखादा शब्दप्रयोग रूढ झाला की तो चूक आहे असे म्हणता येत नाही, कारण भाषा ही प्रवाही असते.
तरीदेखिल, हा (आणि यासारखे अनेक) शब्दप्रयोग मराठीने हिंदीच्या प्रभावाखाली उसने घेतले आहेत, हे आजानुकर्ण यांचे मत योग्यच आहे.
गेल्या पिढीपर्यंत सोहळा साजरा होत असे आणि एखादी व्यक्ती धनसंपन्न होत असे. आता सोहळा संपन्न होतो.
अशी अनेक उदाहरणे आहेत, पण त्यासाठी वेगळा धागा सुरू करणे इष्ट.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Dec 2008 - 5:09 pm | विनायक प्रभू
कट्ट्यानंतर एक वायला कट्टा झाला. तो संपता संपता सर्व हिंदीत आणि उर्दुत बोलायला लागले. रिपोर्ट लिहिताना त्याचा अंमळ अम्मल दिसतोय.
30 Dec 2008 - 5:14 pm | आजानुकर्ण
भज्यात काही होते काय ;) कोजागिरी पौर्णिमेला आमच्या गल्लीच्या पार्टीत भज्यांमध्ये भांग घालायचे. तसला काही प्रकार वाटतं. ह. घ्या.
आपला
(भजीप्रेमी) आजानुकर्ण
30 Dec 2008 - 5:24 pm | विनायक प्रभू
छे. भांग कशाला. खांब होता. नंतर खांबाला धरत धरत (जिन्याच्या) उतरलो रे आज्या माझ्या.
30 Dec 2008 - 5:32 pm | आजानुकर्ण
अच्छा म्हणजे माल्ट वगैरेंचे सत्त्वही होते वाटते. मं ठीक आहे.
आपला
(संपन्न) सात्त्विक आजानुकर्ण
30 Dec 2008 - 5:14 pm | shweta
फोटोतले सगळे अगदि गंभीर दिसत आहेत.
कोणी आनंदि दिसत नाहित. कारण काय आहे ?
बील जास्त झालं होतं का? :)
30 Dec 2008 - 5:16 pm | आजानुकर्ण
कांदाभजी आणि मूगभजी (मूगभजी की उडीदभजी आहेत?) झकासच दिसत आहेत.
आपला
(तोंडाला पाणी) आजानुकर्ण
30 Dec 2008 - 5:27 pm | लिखाळ
कट्टा छान झालेला दिसतोय :)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
30 Dec 2008 - 6:54 pm | विजुभाऊ
अरेरे एक मस्त मैफील चुकली म्हणायची
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
30 Dec 2008 - 7:00 pm | सुनील
कट्टा झकासच झाला.
संतोषने सर्व प्रकारची व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. तात्याने सांगितलेले भिमसेन जोशींचे किस्से तर बहारदारच. अतुलचे गितार वादनही श्रवणीय.
मास्तर आणि रामदास यांनी "कौटुंबिक कलह" ह्या विषयावर सर्वांचे छोटेखानी बौद्धिक घेतले. वाहिदाने त्या बौद्धिकाला चांगले खतपाणी घातले.
चंद्रशेखर गोखले यांनी आपली कविता सादर केली तर तात्याने थोड्या "गायनी कळा" दाखवल्या.
चहा-भजींचे स्टार्टर आणि नंतर मिसळ-पाव, मटण-भाकरीचे रुचकर जेवण!
त्यानंतर शहाणी मंडळी निघून गेली आणि उरलेले कट्टेकरी एका वेगळ्या रंगात नहाण्यासाठी सज्ज झाले!! (पुढचे आठवत नाही!!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Dec 2008 - 7:43 pm | रामदास
मदनबाण,मंदार,प्रभू सर्,रामदास कान देउन काय ऐकतायंत
अतुलच्या बाजूला सुनील (प्रेटी वुमन वाले)

कट्टा बरखास्त झाल्यावर एक खासा कट्टा झाला ही अफवा आहे.मला तर काहीच आठवत नाही.पोरं आणि बायाबापड्या गेल्यावर पुरीया झाला.त्याचं कल्याण आणि धनश्री मधलं परीवर्तन ,बदलते रिश्तेच गाणं .तेरी सासोंसे जो महक आ रही है .....एव्हढंच .
तात्यांचा आवाज खास लागला होता.पण वेळ कमी होता.
30 Dec 2008 - 8:11 pm | विनायक प्रभू
शीलेक्टीव मेमरी आहे बॉ?
31 Dec 2008 - 9:58 am | सुचेल तसं
लै भारी फोटो!!!
बाकी सुनील दिसताहेत, पण त्यांची प्रिटी वूमन नाही दिसते.... ;)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
31 Dec 2008 - 1:47 pm | सुनील
बाकी सुनील दिसताहेत, पण त्यांची प्रिटी वूमन नाही दिसते....
अरेच्चा! म्हणजे मी काय तिला सगळीकडे मिरवत मिरवत न्याचये की काय!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Dec 2008 - 7:55 pm | संदीप चित्रे
भजी आणि मिसळ पाहून तोंड खवळलेच ना एकदम :)
(मटण - भाकरी दिसले नाहीत अजून !) :?
-----------
30 Dec 2008 - 9:48 pm | देवदत्त
खाली सर्वांशी ओळख झाल्यावर वरच्या खोलीत गप्पा सुरू झाल्या.


_______________________________________
थोड्याच वेळात चहा झाला व नंतर भजी ....
संपायच्या आधी बटाट्याच्या भजांचा फोटो काढून घेतला...
अतुलच्या गाण्यानंतर गिटार वरील सप्तसूर आणि शास्त्रीय संगीतातील सा रे ग म ह्यांची सांगड घालताना आपले तात्या व लक्ष देऊन ऐकणारे श्री चंद्रशेखर गोखले व अतुल
31 Dec 2008 - 1:22 am | टारझन
तात्यांची लिपीष्टीक आवडली !! (ह.घ्या)
कट्टा उत्तम झाला की (अति ह.घ्या)
(णको तिथे ह.घ्या.चे प्रयोग करणारा षायंटिष्ट) टा.र.झन
30 Dec 2008 - 8:40 pm | मयुरा गुप्ते
आइशप्पथ कट्टा मिस केला......
30 Dec 2008 - 8:57 pm | प्राजु
मस्त फोटो.
ते मटन आणि भाकरीचे कुठे आहेत फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Dec 2008 - 12:38 am | विसोबा खेचर
ते मटन आणि भाकरीचे कुठे आहेत फोटो.
तुला गं काय करायच्येत ते फोटू? तू कुठे खातेस मटन अन् भाकरी? :)
31 Dec 2008 - 12:42 am | चित्रा
आम्हाला बघायचे आहेत की पण!
छान, मजा केलेली दिसते आहे.
31 Dec 2008 - 12:55 am | शितल
अरे वा..
कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे. :)
31 Dec 2008 - 3:25 am | रेवती
कट्टा मिस् केला म्हणायचा.:(
खानपान सेवेबरोबरच गानसेवाही होती की!
रेवती
31 Dec 2008 - 2:15 pm | shweta
नुसते पदार्था चे फोटो आणि काहि मख्ख आणि गंभीर चेहरे बघुन असे वाटत नाहि कि काहि मजा आली असेल.
सगळे तात्या तात्या करताहेत.. असे वाटते कि तात्या चा विविध गुणदर्शना चा कार्यक्रम होता !! :)
ऑडियो क्लिप्स टाका म्हणजे समजेल तरी कि हे गंभीर चेहरे का येवढे गंभीर आहेत.
(स्पष्ट वक्ति ) श्वेता
3 Jan 2009 - 10:40 am | नितिन थत्ते
मिसळ मामलेदारांकडची किंवा आमंत्रण मधली दिसत नाही. (लाज वाटत नाही का? ठाण्याच्या कट्ट्यावर माम्लेदाराशिवाय दुसरी मिसळ?)
हां तिथेच बनविलेली असली तर मात्र ठीक.
3 Jan 2009 - 10:48 am | नितिन थत्ते
तिथेच म्हणजे कट्ट्यावरच बनविलेली.
3 Jan 2009 - 10:51 am | सुनील
सगळे पदार्थ अगदी कट्ट्याच्या जागीच बनवलेले होते. आणि हो, मिसळ मामलेदारच्या तोडीस तोड होती, शंका नसावी.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Jan 2009 - 11:04 am | विसोबा खेचर
सहमत आहे, मिसळ नि:संशय चवदार होती..
3 Jan 2009 - 12:51 pm | नितिन थत्ते
कट्ट्यावर बनवलेली होती तर मग ठीक आहे.