प्रश्न: Is: O n ⊆ I n ?
मागील पानावरून पुढे चालू. O5 ⊆ I5 अर्थात कोणतीही आर्टिफिशियल इंटेलिजंट सिस्टिम केवळ तेच आउटपुट निर्माण करू शकते जे की तिच्या ट्रेनिंग सेट मध्ये आहे. हे केवळ शब्दांच्या पुरते मर्यादित नाही तर सर्वांच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा मार्फत मिळणाऱ्या शब्द स्पर्श रस रूप गंध इत्यादी बाबतीत सत्य ठरते.
पण मग फक्त मानवी संवेदनांच्यावर का थांबा !
संवेदना फक्त माणसांनाच असतात असे कुठे आहे, त्यात प्रत्येक जीवाला असतात. त्यातल्या कित्येक संवेदना ज्या इतरांना असतील त्या माणसाला असतील असे नाही. वातावघुळांना अल्ट्रासोनिक सेन्सर्स आहेत, ईल सारख्या माशांना इलेक्ट्रिक सेन्सर आहेत, काजव्यांना फोटो इलेक्ट्रिक सेन्सर आहेत. इत्यादी इत्यादी.
व्याख्या
• समजा I n : त्या सर्वच्या सर्व शब्द स्पर्श रस रूप गंध ह्या पाचही ज्ञानेंद्रियांचा संवेदनाचा आणि ह्याचाही परे सर्व प्राणीमात्रांना , अगदी झाडांना , फंगस , बॅक्टेरिया व्हायरस इत्यादी सर्व "जीवांना" असलेल्या संवेदनांचा संच जो की LLM, किंबहुना LSM लार्ज सेन्सरी मॉडेल ला ट्रेन करताना वापरले गेले आहेत.
• समजा O n : त्या सर्व संवेदना, ज्या कोण्यातरी मानवी किंवा अन्य कोणत्यातरी बुद्धिमत्तेला, कोणत्या जीवाला आकलन करता येईल अशा, अर्थपूर्ण, संवेदनांचा संच जे LSM जनरेट करू शकेल.
प्रश्न असा आहे की O n हा I n च सब सेट असेल की सुपर सेट ?
---
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Jun 2025 - 5:49 pm | श्वेता व्यास
I n सुपरसेट असेल, कारण तेच O n मध्ये अजून एक फिल्टर वाढला आहे.
अट एकच, I n फक्त LLM फीडर्स च्या आकलनातला सेट नसून खरंच सर्वच्या सर्व सेट आहे.
27 Jun 2025 - 10:02 pm | गामा पैलवान
प्रगो,
१. मला LLM म्हणजे काय हा प्रश्न पडला आहे.
२. विचार ही संवेदना मानावी का ?
आ.न.,
-गा.पै.