इराण इस्राईल युद्ध आणि अमेरीका

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
17 Jun 2025 - 9:47 am
गाभा: 

आत्ताच एक बातमी हाती लागली.
https://www.msn.com/en-xl/news/other/trump-leaves-g7-summit-early-as-ira...
ट्रम्प तात्यानी जी७ समीट मधे त्यांचे भाषण सुरू असतानाच मधेच एक निरोप आल्यामुळे भाषण बंद केले आणे तेथून थेट अमेरीकेला प्रयाण केले.
त्याचबरोबर त्यानी सर्वानी तेहेरान लवकरात लवकर सोडावे असे आदेशही दिले आहेत. यावरून काहितरी भयंकर घटना घडली आहे / घडणार आहे असे वाटते.
ऑलरेडी इराणवर इस्राईलने इतकी अस्त्रे डागली आहेत की इराणकडे पर्तिकारक्षमता किती उरली आहे याबद्दल साशंकताच आहे.
इतके होऊनही पाकिस्तान अजूनही दोन डगरींवर पाय ठेवून आहे. एकीकडे इराण हा आमचा इस्लामी भाउबंद आहे असे म्हणतो त्याचबरोबर दुसरीकडे असीम मुनीर हे अमेरीकन आर्मी डे च्या परेडसाठी (न बोलावताही ) उपस्थित रहातात.
पण ट्रंप नी जी ७ परिषद मधेच सोडून जाणे तज्ञानाही बुचकळ्यात पाडणारे ठरणार आहे.
पुढचे तीच दिवस जगासाठी खूप नाट्यमय असणार आहेत हे नक्की.

प्रतिक्रिया

रामचंद्र's picture

17 Jun 2025 - 10:36 am | रामचंद्र

इतकी महत्त्वाची बातमी असूनही आपल्याकडे ती ब्रेकिंग न्यूज झालेली दिसत नाही हे आश्चर्यच आहे. सर्व प्रतिष्ठित अमेरिकी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर मात्र याची दखल घेतलेली दिसते.

बाकी बातम्या यांच्या लेखी,किस झाड की पत्ती.

अमेरिकन २८ टँकर विमाने रवाना झालीत म्हणे. बरोबर लढाऊ विमानाचा ताफा असू शकतो.

कंजूस's picture

17 Jun 2025 - 1:12 pm | कंजूस

कारण मराठी माणसांना तेच वाचवणार आणि दूरवर बोईसर, वांगणी खोपोलीला सोडणार.

कंजूस's picture

17 Jun 2025 - 11:15 am | कंजूस

ब्रेकिंग न्यूज ...

News nation India Today channel पाहाणे.

काल इरान ने केलेल्या मिसाइल हल्यात इस्राईल मधल्या अमेरीकन दूतावासाची नासधूस झाल्याची ही बातमी आहे
( ही नासधूस फक्त इमारतीच्या खिडक्या फुटणे काचा तुटणे इतपतच सीमित आहे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Jun 2025 - 8:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

युद्धखोर नेत्यान्यहु आणी त्यांचा देश अजून किती नासधुस करतात ते बघायचे आहे.
"आम्ही पाहिजे ते बनव्॑णार पण दुसर्याने अणुबाँब बनवायचा नाही" ही दादागिरी आहे.
ज्यु हुशार वगैरे कितीही कौतुक केले तरी भारताने ईराणला पाठिंबा दिला पाहिजे.

सुबोध खरे's picture

18 Jun 2025 - 9:51 am | सुबोध खरे

माई

हिरवा चष्मा काढून एकदा पहा.

जगाच्या नकाशावरून इस्रायल चे अस्तित्व नष्ट करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे असे इराणनेच (नव्हे तर इतर सर्व इराणचे बाहुले हमास हिजबुल्ला आयसिस ई ई ) कित्येकदा स्पष्ट पणे म्हटलेले आहे.

अशा परिस्थितीत इराणच्या हातात अणुबॉम्ब आला तर इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो

पॅलेस्टाईन मध्ये दोन देश असूच शकत नाहीत अशी धारणा असलेले संपूर्ण इस्लामी जग केवळ इस्रायलचा विनाश करण्यासाठी कंबर कसून उभे आहे अशा परिस्थितीत इस्रायलच्या हातात काय पर्याय आहे

येन केन प्रकारेण युद्धात जिंकणे हा एकमेव पर्याय आहे.

वोकपणाला भीक न घालणे हाच उपाय आहे

ट्रम्पने इराण न्यूक्लिअर डीलला पाठ फिरवली. इराणला बॉम्बसाठीच्या शुद्धीकरण पातळीपर्यंत पोहीचण्यापासून रोखण्यासाठी इतर कोणतीही उपाययोजना त्याने केली नाही.

विजुभाऊ's picture

18 Jun 2025 - 10:25 am | विजुभाऊ

इराणकडे अण्वस्त्रे असायला हवीत असे तुमचे म्हणणे असेल तर मग उत्तर कोरीया आणि पाकिस्तान यांचा तरी अपवाद कशाला करायचा

विवेकपटाईत's picture

18 Jun 2025 - 2:38 pm | विवेकपटाईत

माई साहेब, थोडे डोके वापरा. आता भारत एवढा मूर्ख नाही जो सतत भारत विरोधी भूमिका घेणार्‍या भारत व इराणला पाठिंबा देईल. रूस आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन 3 वर्ष झाले. रूस ने परमाणु अस्त्र युद्धात वापरले नाही. पण इराण परमाणु अस्त्रांचा वापर युद्धात करू शकतो. आम्ही नष्ट झालो तरी चालेल आम्ही दुसर्‍यांना ही नष्ट करू ही जेहादी मानसिकता सर्वच मुस्लिम देशांत आहे. इराक सिरिया लेबनान अफगाणिस्तान ते गाजा सर्वच ठिकाणी हेच पाहायला मिळते. दोन ते तीन आण्विक अस्त्र इजराईलचा संपूर्ण विनाश करू शकतात. दुसरे इराण ज्यू लोकांच्या सर्वनाशाची भाषा अनेकदा बोलून चुकला आहे. पाकिस्तान ही भारताच्या विरोधात आण्विक अस्त्रांचा वापर करू शकतो. जे त्यांच्या ईश्वराला मानत नाही त्यांना जीवंत राहण्याचा अधिकार नाही. हे ज्यू लोकांना चांगले माहीत आहे. या युद्धात इराणची परमाणु अस्त्र नष्ट होतील. त्यानंतर पाकिस्तानचा नंबर लागणार आहे.
बाकी इराण सतत भारत विरोधी भूमिका घेत राहिला आहे. तो नेहमी पाकिस्तानचा पक्ष घेतो. दुसरीकडे कारगिल युद्धात इजराईल ने युद्ध जिंकायला भारताची मदत केली होती. ओपरेशन सिंदूर मध्ये ही इजराईली मिसाईल भारताने वापरले. या युद्धात ही त्याने आपल्याला मदत केली. बाकी भारताने या युद्धात तटस्थ भूमिका घेतली आहे जशी युक्रेन रूस युद्धात घेतली आहे.

काय मदत केली हे सविस्तर सांगता का ?

सुबोध खरे's picture

18 Jun 2025 - 6:23 pm | सुबोध खरे

हे दोन दुवे वाचून पहा

https://www.ndtv.com/india-news/how-israel-helped-india-win-the-air-war-...

https://www.indiatoday.in/fyi/story/israel-helped-india-during-kargil-wa...

या शिवाय मोसाद हि संघटना पाकिस्तानवर कडक नजर ठेवून असते आणि तयातील आपल्यासाठी महत्वाच्या गुप्त वार्ता भारतीय गुप्तहेर खात्याला पुरवत असते.
विशेषतः सायबर वॉर बद्दल.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jun 2025 - 8:38 pm | चंद्रसूर्यकुमार

इस्राएलची स्थापना झाल्यानंतर त्या देशाला आपल्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करायचे होते. पण त्याला आपण प्रतिसाद दिला नाही. आपण तर यु.एन मध्ये इस्राएलच्या स्थापनेसंबंधित ठरावाच्या विरोधात मत दिले होते. तरीही इस्राएल इतर कोणत्याही देशाशी त्या देशात इतिहासकाळात ज्यूंना कशी वर्तणूक मिळाली होती या एका महत्वाच्या मुद्द्यावर संबंध कसे वाढवायचे हे ठरवित असे. १९५६ मध्ये इजिप्तच्या नासेरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करून सुएझ कालव्याचे नियंत्रण करणार्‍या ब्रिटिश कंपनीला पळवून लावले तसेच इस्राएली जहाजांसाठी सिनाई द्विपकल्प आणि इस्राएलमधील अकाबाचे आखात बंद केले. त्यामुळे ब्रिटिश आणि इस्राएली सैन्याने इजिप्तवर हल्ला केला होता. तेव्हा आपण इस्राएलचा जोरदार निषेध केला होता. १९५६ मध्ये आपली ताकद किती होती आणि आपल्याला कोणी विचारत होते का हा प्रश्न वेगळा तरीही आपण इस्राएलचा निषेध केला होता. १९६२ मध्ये चीनने हल्ला केल्यावर नेहरू खडबडून जागे झाले आणि दुबळ्यांच्या आलिप्ततेला फारसा अर्थ नसतो हे त्यांना बहुदा समजले. मग त्याच इस्राएलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिऑन यांना पत्र लिहून मदत करायची मागणी केली. इतकेच नव्हे तर तुम्ही आम्हाला मदत करा पण ती मदत स्विकारायला आमची एक अट आहे- आम्हाला मदत घेऊन येणार्‍या जहाजांवर इस्राएलचा झेंडा नसावा. म्हणजे पूर्वीची १४ वर्षे सतत त्या देशाविरोधात भूमिका घ्यायची, परत त्यांच्याकडूनच मदत मागायची आणि मदत स्विकारायला वर अटी घालायच्या असले प्रकार नेहरूच करू जाणोत. डेव्हिड बेन गुरिऑनना (खरं तर कोणालाही) असला मूर्खपणा मान्य होणे अशक्य होते. तुम्हाला मदत हवी असेल तर आम्ही देऊ पण वर अटी घालू नका असे त्यांनी म्हटले. मग नेहरूंना ती अट मागे घ्यावी लागली आणि इस्राएलने आपल्याला १९६२ मध्येही मदत केली होती.

१९७१ मध्ये पाकिस्तानशी युध्द होणार हे लक्षात आल्यावर इंदिरा गांधींनी इस्राएलच्या पंतप्रधान गोल्डा मेअर यांना पत्र लिहून मदत करायची विनंती केली. तशी मदत इस्राएलने केली होती. अट एकच होती की भारताने इस्राएलला राजनैतिक मान्यता द्यावी. ती अटही आपण तेव्हा पूर्ण केली नाही. इतकेच नव्हे तर १९७३ मध्ये योम किप्पोर युध्दाच्या वेळेस इस्राएलचे अस्तित्वच धोक्यात आले असताना आपण अरब राष्ट्रांना उघड पाठिंबा दिला होता.

इस्राएलने आपल्याला १९९९ च्या कारगील युध्दाच्या वेळेसही मदत केली होती. पण नशीबाने १९९२ मध्ये आपण त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. मग २००३ मध्ये अरिएल शेरॉन भारताला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले. त्यानंतर २०१७ मध्ये मोदी चांगले चार दिवस इस्राएलमध्ये होते. पूर्ण नैतिकदृष्ट्या विचार केला तर इस्राएल या देशाची स्थापनाच अनैतिक आहे आणि पॅलेस्टिनींचा लढा न्याय्य आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात आदर्शवाद चालत नाही. आपले हितसंबंध पॅलेस्टाईनपेक्षा इस्राएलबरोबर अधिक चांगल्या प्रकारे निगडीत आहेत. त्यामुळे आपण त्या देशाबरोबर संबंध अधिक वृध्दींगत करत आहोत हे चांगले आहे.

१९७० मध्ये जॉर्डनने यासर अराफात आणि सगळ्या पॅलेस्टिनींना त्यांच्या देशातून हाकलून लावले होते. त्या कामात मदत कोणी केली होती? तर पाकिस्तानने. याह्या खानने झिया उल हकला जॉर्डनला मदत करायला पाठवले होते. तरीही अराफातला पाकिस्तानचेच कौतुक होते. आताचा हमास तर अराफातपेक्षा कितीतरी अधिक कट्टर आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी पण हमासचे लोक पीओकेमध्ये आपल्याला त्रास देणार्‍या दहशतवाद्यांना भेटले होते. काहीही झाले तरी ते लोक धर्मालाच महत्व देणार. इतर सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण असतात. जर स्वतः मुजीबूर रेहमान १९७४ मध्ये बांगलादेशचा बुचर म्हणून कुप्रसिध्द असलेल्या टिक्काखानबरोबर लाहोरमध्ये हस्तांदोलन करू शकत असतील तर इतरांची काय कथा? त्याच टिक्काखानने बांगलादेशात रक्ताचे पाट वाहिले होते. पण त्यांच्यासाठी शेवटी धर्मच सर्वतोपरी महत्वाचा. तेव्हा पॅलेस्टिनी जर धर्माच्या नावावर आपल्या शत्रूला मदत करत असतील तर आपल्या लोकांचे जीव गेले तरी चालतील पण त्यांचा लढा न्याय्य म्हणून त्यांना समर्थन द्यायचे असला फालतूचा वोकिशपणा आपण करत नाही आहोत हे चांगलेच आहे.

भारत - पाक चकमकीत संपूर्ण जगातून फक्त आणि फक्त इस्रायल आपल्या बाजूने ऊभा राहिला त्याचे असे पांग फेडायचे का ?

बाकी ब्रिक, जी २० वगैरेंनी बाजू घेण्याचे तर राहूच द्या उलट विरोधच केला. अझरबैजान सारख्या देशाने पाकिस्तानची तळी उचलली आणि आपण आपल्या एकुलत्या एक मित्राचा विश्वासघात करायचा ?

बात कुछ हजम नही हुई .

सुबोध खरे's picture

18 Jun 2025 - 10:18 am | सुबोध खरे

भारताने इस्रायल ला सोडून इराणला पाठिंबा देणे हा तर मूर्खपणा होईल.

आजतागायत इस्रायल ने भारताला युध्दात आणि इतर अनेक क्षेत्रात बिनशर्त आणि विना विलम्ब पाठिंबा आणि प्रत्यक्ष मदत दिलेली आहे. यात लष्करी सामग्री पासून शेती तंत्रज्ञान सायबर क्षेत्र असिह अनेक क्षेत्रे आहेत.

अर्थात इराण बरोबर भारताचे सौहार्द्रपूर्ण संबंध आहेत. याची कारणे नुसती व्यापारी आहेत असे नव्हे तर इराण हा सर्वात मोठा शिया मुसलमान देश आहे आणि इतर सुन्नी मुसलमान देशात जशी शिया लोकांना दुय्यम भूमिका मिळते तशी भारतात कधीच मिळाली नाही. शिया मुसलमानांना भारतात सन्मानानेच वागवले जाते

गप्प बसणे हा मुत्सद्दीपणाचा उपाय आहे आणि सद्य सरकार तेच करते आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jun 2025 - 10:26 am | चंद्रसूर्यकुमार

१९८१ मध्ये इस्राएलने ऑपरेशन ऑपेरा करून इराकच्या अणुभट्ट्या उडवल्या होत्या. त्यानंतर इराणने आपले आण्विक अ‍ॅसेट्स एकाच ठिकाणी न ठेवायची काळजी घेतली आहे- जेणे करून इस्राएलचा हल्ला होईल तेव्हा (असा हल्ला कधीतरी होणार याविषयी खुद्द खामेनीच्या मनात शंका नसावी) एकाच वेळेस सगळे काही उध्वस्त होणार नाही. इस्राएल शत्रूंनी वेढलेला देश आहे.त्यांच्या शत्रूंपैकी कोणाकडेही अणुबॉम्ब असल्यास त्या बॉम्बचा उपयोग आपल्याविरोधातच केला जाणार याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आपल्या शत्रूंकडे कधीही अणुबॉम्ब येऊ नये याविषयी इस्राएल एकदम संवेदनाशील असतो.

इराण आणि इस्राएल हे दोन्ही देश आपले मित्र आहेत. खरं तर इस्राएल आपला मित्र आहे आणि इराणबरोबर आपले संबंध चांगले आहेत- इराणला मित्र म्हणता येईल का याविषयी साशंकता आहे. आपल्या दोन मित्रांमध्ये (किंवा चांगले संबंध असलेल्यांमध्ये) भांडण होते तेव्हा एक तर आपण मध्ये पडू नये किंवा दोन बाजूंमध्ये शांतता प्रस्थापित करायला मदत करावी. पण काहीही झाले तरी कोणाची उघड बाजू घेऊ नये. याविषयी आपण योग्य धोरण ठेवत आहोत असे वाटते. तसेही हा काळ युध्द करायचा नाही, परस्पर चर्चेतून मतभेद सोडवावेत वगैरे फुकाचे उपदेश करण्यात आपण अगदी एक्सपर्ट असतो. असल्या बडबडीला कोणीही गांभीर्याने घेत नसते. इतके वर्ष जे करत होतो तेच आपण आताही करत आहोत :)

आता परिस्थिती कशी चिघळते ते बघायचे. तात्यांनी सगळ्यांनी तेहरान सोडून जावे असा इशारा दिला आहे. सध्या रशिया युक्रेनमध्ये गुंतला आहे त्यामुळे रशिया थेट उतरायची शक्यता कमी. पण समजा एका बाजूला अमेरिका आणि दुसर्‍या बाजूला रशिया आल्यास मात्र तिसरे महायुध्दाची चाहूल लागेल हे नक्की. अर्थात लगेच तिसरे महायुध्द सुरू होईल असे नाही. १९३९ मध्ये दुसरे महायुध्द सुरू झाले त्याच्या ७-८ वर्षे आधीपासून जपान, जर्मनी आणि इटलीच्या हालचालींमधून दुसर्‍या महायुध्दाची चाहूल लागली होती त्याप्रमाणे तिसर्‍या महायुध्दाची चाहूल लागायची ही सुरवात असेल.

समजा तिसरे महायुध्द झाले तर आपण कोणत्याही बाजूला नसू आणि थेट युध्दात पडणार नाही ही शक्यता जास्त. पण समजा पाकिस्तान कोणत्याही बाजूने (अमेरिकेच्या बाजूने जायची शक्यता जास्त) गेल्यास आणि परत पहलगामसारखी घटना घडल्यास किंवा पाणी प्रश्नावरून परिस्थिती चिघळल्यास आपले आणि पाकिस्तानचे आता झाले तसे किंवा मोठे युध्द होईल ही शक्यता पण आहेच. आणि ते कधीतरी होणार आहे याविषयी कोणाच्याच मनात शंका नाही.

एकूणच सगळी परिस्थिती विलक्षण गुंतागुंतीची आहे. दुसर्‍या महायुध्दाच्या वेळेस कोणता देश कोणत्या बाजूस आहे हे बर्‍याच अंशी स्पष्ट होते. पण यावेळेस मात्र परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. पाकिस्तान कोणत्या बाजूला धरायचा? तुर्कीचे अझरबैजान आणि पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपण आर्मेनिया, सायप्रस आणि ग्रीसशी सामरिक संबंध सुधारायचा प्रयत्न करत आहोत. आता इस्राएल आणि तुर्कीचे आणि पाकिस्तानशी संबंध चांगले नसले तरी अझरबैजानशी संबंध चांगले आहेत. त्याचे कारण भारताप्रमाणेच अझरबैजानमध्येही ऐतिहासिक काळात ज्यूंना कधीही त्रास दिला गेला नव्हता. २०२० मध्ये नागोरनो-काराबाखच्या प्रश्नावरून अझरबैजान आणि आर्मेनियात युध्द झाले होते. अझरबैजानशी इस्राएलचे संबंध चांगले म्हणून आर्मेनियाचे इस्राएलशी संबंध वाईट. पण त्याच वेळेस आर्मेनियाचे भारताशी संबंध चांगले आणि भारताचे इस्राएलशी संबंध चांगले पण अझरबैजानशी वाईट. म्हणजे मोठे खेळाडू सोडले तर सगळ्या देशांचे आपापल्या हितसंबंधांप्रमाणे इतर देशांशी संबंध आहेत.

रात्रीचे चांदणे's picture

18 Jun 2025 - 1:39 pm | रात्रीचे चांदणे

असीम मुनीरला ट्रम्प त्यात्या ने डिनर ला बोलावले आहे. कदाचित इराण इस्राएल संघर्षमुळेच बोलावलं असण्याची शक्यता आहे. तर चीन चे कर्गो विमान इराण ला land झाल्याच्या बातम्या आहेत.
त्यात मोदींनी तात्यांना भारत पाक दरम्यान माध्यस्ती मान्य नसल्याचे सांगितल्याच्या बातम्या आहेत. खुद्द इराणी जनता खेमेनीच्या विरोधात असल्याच सांगितलं जातंय पण हे खोटं असण्याची शक्यता वाटत आहे. समजा विरोधात जरी असले तरी इस्राएल विरोधात एकवटतील.

विवेकपटाईत's picture

18 Jun 2025 - 2:44 pm | विवेकपटाईत

बहुतेक इजराईल आणि अमेरिका पाकिस्तानी विमानतळांचा वापर करणार. बाकी पाकिस्तान ने जॉर्डनला आपले सैन्य भाड्यावर दिले होते. फिलिस्तिनी शरणारथ्यांना जॉर्डनमधून हाकलून द्यायला. (आपल्याच जातभाईंना मारताना पाकिस्तान्यांना काहीही वाटले नव्हते). पैसे द्या आम्ही आपल्या बापाला ही मारू शकतो ही पाकिस्तानची मानसिकता आहे.

कपिलमुनी's picture

18 Jun 2025 - 1:53 pm | कपिलमुनी

आपापली शस्त्रे विकायला , मार्केटींग करायला पुढे जाउन बेस बनवायला अशा युद्धांचा वापर करतात .

युद्ध फक्त दुसर्‍यांच्या भूमीवर लढावीत एवढेच

१. जो कोणी अणूधडाका करेल तो धडाका शेवटचा असेल या जगात.
२. इराणकडे दहा टक्के तेल आणि पंधरा टक्के वायू आहे. तो बंद झाल्यास इंधन क्रांती होईल.
३.तेल नसलेले बारके गरीब देश किंवा खूप तेल खर्चणारे मोठे श्रीमंत देश दोघांच्याही आर्थिक घड्या विसकटतील.

कंजूस's picture

18 Jun 2025 - 2:25 pm | कंजूस

उठसूठ 'गावी' जाणारे आणि धार्मिक यात्रा करणारे यांच्यावर राशनिंग केले जाईल. हौसेचे पर्यटन करणाऱ्यांसाठी जामर लागतील.

हाइपरसोनिक अग्निबाण ( यांनी तीन ते पाच हजार किमी वेगाने जाणारे) फक्त इराणकडेच आहेत का? त्यांचे विरोधी अग्निबाणच इजराएलकडे नाहीत?

इस्रायलने इराणची क्षमता जोखण्यात नक्कीच चूक केलेली दिसतेय.
पहिल्या दिवसापासून पूर्ण सक्रीय युद्धास आठवडा लोटूनही अजून इराण माघार घेण्याची कुठलीही चिन्हे दिसतं नाही. उलट sejil मिसाईल सारखी नवनवीन मिसाईल इराणकडून वापरली जात आहेत. शिवाय त्यांचा 300 फूट खोल अण्वस्त्र प्रकल्प सुद्धा सुरक्षित आहे. ट्रम्प आजपर्यंत तरी बोलबच्चन करत आहे प्रत्यक्ष कृती अमेरिका करू इच्छित नाही. Psychological warfare अमेरिकेकडून केले जात आहे. आणि या psychological statements मध्ये सुद्धा इराण चा खॉमनेई जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
एकंदरीत आज तरी iran is not Palestine हे अक्षरशः खरे ठरत आहे. इस्राएल च्या संरक्षण मंत्री ला जनतेने मारले का कायतरी एका समारंभात आणि मोसाद च ही अधिकारी का कोण म्हणाला आम्हाला इराण च्या मिसाईल क्षमतेचा अंदाज आला नाही असे म्हणाला.
इस्त्रायलची जनता युद्धाला अगोदरच कंटाळलेली होती. काही दिवसांपूर्वीच 5 लाख लोकांनी नेत्यानाहू विरोधात निदर्शने केली होती. या युद्धाने तर 15000 बालके मारलेल्या इस्राएल ला नागरिक मेल्याचे दुःख कळत आहे.
एकूण परिस्थिती गंभीर आहे.
युद्ध आणि राष्ट्रवाद हे दोन्ही उन्माद आहेत आणि भयानक आहेत.
लवकरात लवकर युद्ध थांबावे हीच आशा

सुबोध खरे's picture

19 Jun 2025 - 9:43 am | सुबोध खरे

इराणची अण्वस्त्र निर्मितीची क्षमता नष्ट करणे हा इस्रायलच्या युद्धाचा मूळ हेतू आहे. तो जोवर सफल होत नाही तोवर इस्रायल युद्ध थांबवणार नाही. कारण हा इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

त्याच बरोबर मध्यपूर्वेत गेली ५० -५५ वर्षे तेलासाठी जी अमेरिकी दंडेली चालू आहे तिला इराणच्या अण्वस्त्र क्षमतेमुळे खीळ बसते यामुळे अमेरिका सुद्धा बहुतेक इराणच्या भूमिगत अण्वस्त्र निर्मिती केंद्रांचा नायनाट केल्याशिवाय थांबणार नाही.

चीन सुद्धा अमेरिकेचे पाणी जोखतो आहे.अमेरिका दुसऱ्या देशा च्या भानगडीत किती पडेल हे चीनला पाहायचे आहे कारण उद्या चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिका तैवानच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष युद्धात उतरेल का हे पाहत आहे त्यामुळे चीन सध्या तरी या युद्धात पडणार नाही.

बाकी रशियाला घरचं झालं थोडं अशी स्थिती आहे म्हणून रशिया नैतिक पाठिंबा देण्यापलीकडे जास्त काही करत नाही.

तेंव्हा आता अमेरिका इराणच्या अण्वस्त्र निर्मिती केंद्रांवर केंव्हा बॉम्ब टाकतो ते पाहायचे.

चीन अमेरिकेला जोखतोय
आणि रशियाला सध्या घरचं झालं थोडं
एकदम perfect!

कर्नलतपस्वी's picture

19 Jun 2025 - 12:58 pm | कर्नलतपस्वी

इस्त्रायलमधील एक हाॅस्पिटल वर हल्ला.

वाॅर झोन मधून विद्यार्थी परत आले.

सर्वात स्वस्त ड्रोन बनवण्यात इराण पुढे आहेच.

अणूबॉम बनवण्यासाठी लागणारी मोठी यंत्रे, भूगर्भातील बंकर बनवून देण्यात एकच देश पुढे आहे. जर्मनी.

आणि 300 फुटी जमिनीखालील बंकर bust करण्याची क्षमता
जगात केवळ अमेरिकेकडे आहे म्हणे
याविषयी काही माहिती मिळेल का ?

इराणने आता जे अग्निबाण हल्ले केले आहेत त्यांचा ताशी वेग सात ते नऊ हजार किमी वेगाने जाणारे आहेत. त्याला आकाशात नष्ट करायला तेवढ्याच वेगाची रॉकेट्स लागतील. ती बहुतेक इजराएलकडे नाहीत. त्यामुळे मार खात आहेत. किंवा क्षेपणास्त्रे मारा करणारी ठिकाणे हलती ( मोबाईल) असली तर तीही नष्ट करणे सोपे नाही. त्यांचे स्थानच निश्चित होत नाही.

सुबोध खरे's picture

19 Jun 2025 - 7:10 pm | सुबोध खरे

भारताचे १०-१२ उपग्रह ऑपरेशन सिंदूर च्या वेळेस आकाशात पाकिस्तानवर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानने क्षेपणास्त्र डागले कि त्याच्या शेपटीतून निघालेल्या प्रचंड ज्वालांतून निघणाऱ्या इन्फ्रा रेड किरणांकडे पाहण्यासाठी आपल्या उपग्रहांमध्ये कॅमेरे होते.

त्यामुळे पाकिस्तानने क्षेपणास्त्र डागले कि ते कुठून डागले जात आहे त्याप्रमाणे त्या क्षेपणास्त्राच्या मार्गातील सर्वात जवळ असलेली आपली आकाश आणि S ४०० क्षेपणास्त्र प्रणाली चालू केली जात असे यामुळं पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्रे भारतीय अवकाशात प्रवेश करण्याच्या अगोदर च आपण नष्ट करत होतो.

आपण बोफोर्स https://en.wikipedia.org/wiki/Bofors_40_mm_Automatic_Gun_L/70आणि शिल्काhttps://en.wikipedia.org/wiki/ZSU-23-4_Shilka आणि तंगूष्का https://weaponsystems.net/system/60-2S6+Tunguskaया तोफा ड्रोन साठी वापरल्या मुळे येणारी क्षेपणास्त्रे किंवा विमाने उडवण्यासाठी आपल्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता कधीच जाणवली नाही. तोफांचे गोळे आपल्याकडे लक्षावधी आहेत आणि त्यांचे उत्पादन सुद्धा आपल्याकडे सहज होते.

माझ्या माहिती प्रमाणे इस्रायलने त्यामानाने तोफा कमी वापरल्या आणि आपली क्षेपणास्त्र प्रणाली जास्त वापरली यामुळे ९० % क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन उडवली तरी त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीवर फार ताण पडतो म्हणूनच साधारण १० टक्के क्षेपणास्त्रे इस्रायल मध्ये पोहोचतात आणि त्यामुळे एवढा विध्वंस होताना दिसतो.

इस्रायल ला एकाच वेळेस सौदी अरेबियातील हौती बंडखोर सीरिया जॉर्डन पॅलेस्टाईन इ ठिकाणी असणाऱ्या हमास आणि हिजबुल्लाह बंडखोरांवरही लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे इस्रायलच्या लष्कर आणि युद्धसामग्रीवर फार ताण पडत आहे.

इस्रायल हा चहुबाजूनी शत्रूने वेढलेला देश आहे त्यामानाने भारताच्या एकाच बाजूला शत्रू आहे त्याशिवाय भारताचा आकार कितीतरी मोठा आहे.

कपिलमुनी's picture

23 Jun 2025 - 11:26 am | कपिलमुनी

हा दावा अंशतः बरोबर आहे, परंतु त्यात अप्रमाणित आणि अतिशयोक्तीपूर्ण घटक आहेत.
योग्य: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने कदाचित उपग्रहांचा वापर निरीक्षणासाठी केला असेल, आणि एस-४००/आकाश प्रणालींनी पाकिस्तानी क्षेपणास्त्रे/ड्रोन यशस्वीरीत्या रोखले, ज्यात एस-४०० ची आधीच नष्ट करण्याची क्षमता आहे.
अप्रमाणित: १०-१२ उपग्रहांनी इन्फ्रारेड कॅमेऱ्यांद्वारे क्षेपणास्त्र प्रक्षेपण शोधल्याचा दावा पुराव्यांशिवाय आहे. उपग्रह डेटाने थेट आकाश/एस-४०० प्रणाली सुरू केल्याचे कोणत्याही स्रोताने सिद्ध केलेले नाही.
अतिशयोक्ती: क्षेपणास्त्र रोखण्यासाठी उपग्रहांची थेट भूमिका अतिशयोक्तीपूर्ण आहे, कारण सामरिक हस्तक्षेपासाठी प्रामुख्याने जमिनीवरील रडार आणि एकात्मिक नेटवर्कवर अवलंबून असते.

कपिलमुनी's picture

23 Jun 2025 - 11:27 am | कपिलमुनी

ग्रोक म्हणे

बरीच क्षेपणास्त्रे एकाच वेळी डागली गेली तर त्या सर्वांचा रोख आणि वेग नोंदवायला वेळ जातो आणि विरोधी बाणांना लक्ष्य लवकर निश्चित होत नाही. तोपर्यंत ते क्षेपणास्त्र येऊन आदळते.

बाकी "iron dome, golden dome" या इजरायलच्या सुरक्षा प्रणाल्या बंद पडल्या वाटतं.

सुबोध खरे's picture

19 Jun 2025 - 7:37 pm | सुबोध खरे

"iron dome, golden dome" या इजरायलच्या सुरक्षा प्रणाल्या व्यवस्थित चालू आहेत.

परन्तु ज्याला सॅच्युरेशन अटॅक म्हणतात तसे एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे आल्यामुळे हि प्रणाली ओव्हर लोड होते आणि साधारण ८-१० टक्के क्षेपणास्त्रे त्यातून पार होतात. याशिवाय इस्रायल हे राष्ट्र फारच लहान आहे आणि लोकसंख्या केंद्रीभूत झालेली आहे. त्यामुळे कुठेही डागलेले क्षेपणास्त्र त्यांच्या लोकवस्तीवर पडतं. त्यातून इस्रायल मध्ये लोकशाही आहे त्यामुळे झालेला विध्वंस लगेच सर्वत्र पसरतो.

इस्रायलची संसद किंवा विमानतळ किंवा मोठे लष्करी तळ याचा विध्वंस झालेला आपल्याला का दिसत नाही कारण हि ऑयर्न डोम प्रणाली व्यवस्थित काम करत आहे.

पाकिस्तानचा याच्या किमान पन्नास पट विध्वंस झालेला आहे पण तेथे पत्रकारितेचा गळाच आवळल्यामुळे आपल्याला त्यांचा विध्वंस तेवढा दिसून आला नाही. आणि भारतानेही याबद्दल जास्त काही बोभाटा केलेला नाही. ज्यांना समजवायचे त्यांना ते समजलेले आहे आणि बाकीच्यांना ज्याची काही गरज नाही त्यांना सांगायची आवश्यकताही नाही.

दुसऱ्या देशांच्या राजकारणात लक्ष घालणार नाही आणि 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' MAGA याचाच पाठपुरावा ट्रंप करेल असं वाटलं होतं........
तरी बडबड चालू आहे.

ट्रीप अत्यंत स्वार्थी होत आहे.याचा बंदोबस्त लवकर व्हावा.अमेरिका अत्यंत नीच होत चालला आहे.त्यात इस्त्रायल विषयक माझी सहानुभूती आता संपत चालली आहे.
खरंच भारताने योग्य वेळी युद्ध थांबवले,हे खुपचं आशादायी व दूरदर्शी वाटतं आहे.

विजुभाऊ's picture

20 Jun 2025 - 8:22 am | विजुभाऊ

शस्त्रास्त्रे विकून मेक अमेरीका ग्रेट अगेन हेच तर करणे चाललेय

सुबोध खरे's picture

20 Jun 2025 - 11:46 am | सुबोध खरे

कोणताही देश स्वार्थी असतोच.

त्यातून अमेरिका हा बलिष्ठ देश आहे त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने जगभर उचापत्या करून अनेक देशांच्या अंतर्गत आणि बाह्य बाबींमध्ये ढवळाढवळ करून ठेवलेली आहे.

त्यामुळे त्यांचे अनेक वेळेस भरपूर नुकसान हि झालेले आहे परंतु श्रीमंत माणसाला थोडा फार तोटा फार जाड जात नाही या न्यायाने त्यांचं चांगलं चाललंय.

तेंव्हा आपण उगाच अमेरिकेची तळी उचलण्याचे काही कारण नाही.

आता अमेरिका का घुसली युद्धात?

शाम भागवत's picture

22 Jun 2025 - 2:26 pm | शाम भागवत

इराण हैती व हमासला रशिया व चीनने उघड पाठींबा दिला नाही म्हणजे मिळवली. शस्त्रास्त्र विक्रीची उत्तम संधी आहे त्यांना.

शाम भागवत's picture

22 Jun 2025 - 2:36 pm | शाम भागवत

इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे १३००० हजार टनी बॉंब नाहीयेत. आणि असलेच तर ते टाकण्यासाठी विमाने नाहीयेत. त्यामुळे हे काम अमेरिकेलाच करायला लागणार होते.
पण १५ दिवसांची मुदत द्यायची व २-३ दिवसात हल्ला करायचा हे काही कळलं नाही.

तात्यांचा “हो” चा अर्थ “नाही”
आणि
“नाही” याचा अर्थ “हो” असा यापुढे लावायला लागणार आहे असे दिसते.
🤣

ह्या प्रकाराचं पेटंट कोणितरी अगोदरच घेतलंय म्हणे.
🤣

अथांग आकाश's picture

22 Jun 2025 - 3:25 pm | अथांग आकाश

इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे १३००० हजार टनी बॉंब नाहीयेत.

१३००० हजार टनी? एवढे वजनदार बॉम्ब टाकणारे विमान कोणाकडे असेल :-)

शाम भागवत's picture

22 Jun 2025 - 3:41 pm | शाम भागवत

हाहाहा
या विमानाची कल्पना आता मलाही करता येत नाहीये.
:)

१३००० किलोचा बॉंब म्हणायचं होतं मला.
🤦

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jun 2025 - 10:22 am | माईसाहेब कुरसूंदीकर

Iran launches missiles towards US' Al-Udeid base in Qatar

https://economictimes.indiatimes.com/news/defence/axios-iran-launches-si...

ईराणचे अभिनंदन. ईस्रायल आणि अमेरिकेची खोड जिरवणे आवश्यक आहे. बहुतेक दुसरे ९-११ करुन नाक कापल्याशिवाय अमेरिकेची मस्ती उतरणार नाही.

माहितगार's picture

24 Jun 2025 - 11:38 am | माहितगार

? प्रश्नचिन्ह वरील प्रतिसादातील शेवटच्या वाक्यातील भूमिकेबद्दल आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jun 2025 - 2:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पराकोटीचा ईस्लामद्वेष आणि खनिज तेलासाठी मध्य आशियात नाक खुपसण्याची अमेरिकेची सवय ह्यामुळे ९-११ झाले होते. 'they hate us' , Clash of Civilizations हे सगळे अमेरिकन जनतेला पटले असेल पण प्रत्यक्षात हे सगळे बोगस होते हे सर्व जगाला माहित होते.

"We have heard that half a million [Iraqi] children have died. I mean, that is more children than died in Hiroshima," Stahl said. "And, you know, is the price worth it?"

"I think that is a very hard choice," Albright answered, "but the price, we think, the price is worth it."
https://www.newsweek.com/watch-madeleine-albright-saying-iraqi-kids-deat...

असो.

रात्रीचे चांदणे's picture

24 Jun 2025 - 10:54 am | रात्रीचे चांदणे

इराणचा हा हल्ला प्रतीकात्मक होता. आधीच सूचना देऊन करण्यात आलेला होता, युद्ध थांबावंयचं असेल तर जनतेसमोर काहीतरी "दाखवणं" गरजेचं असतं, आणि हा हल्ला त्याचाच भाग होता.

या संघर्षाचा शेवट अमेरिका, इस्राएल आणि इराण—या तिघांसाठी ‘win-win-win’ असा दाखवण्यात आला आहे. इस्राएल आणि अमेरिकेने इराणच्या अणुउपक्रमांवर हल्ले करून त्यांना काही वर्ष मागे फेकलं असणार, ह्याबद्दल शंका नाही.
पण या संपूर्ण घडामोडीत खरा नुकसानग्रस्त पक्ष म्हणजे इराण. त्यांनी इस्राएलवर प्रतिहल्ला करून थोडंसं नुकसान केलं असलं, तरी इस्राएलने केलेले अणुस्थळांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. त्यांचे मोठे अधिकारी ह्या हल्ल्यात बळी पडले आहेत. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने पाहता, इराणचं नुकसान अधिक आहे.

विजय म्हणजे काय ? याच्या व्याख्या वेग्वेगळ्या आहेत .
इराक मध्ये सद्दाम हरला कि जिंकला ?
अमेरिकेने त्याला फाशी देउन मारला म्हणजे त्यांना वाटले ते जिंकले ..
इराकी जनतेच्या मानाने सद्दाम जिंकला..शहीद झाला

यावेळी इस्राएल चे सुद्धा युद्धात मोठे नुकसान झालेले आहे. आणि इस्राएल सुद्धा युद्ध थांबविण्यास उतावळा झालेला आहे असे दिसते.
यावेळेस प्रकरण इस्राएल साठी फार painful झालेलं आहे.
गाझा सारख्या उध्वस्त इमारती इस्राएल मध्ये दिसत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jun 2025 - 2:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ज्यु लोक हुशार असल्याने त्यांचे नुकसान होणार नाही असा बाळबोध समज काहींचा होता. पण जे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यानुसार हैफामध्ये चांगलेच नुकसान झाले आहे.
Israel

..that nearly 40,000 Israelis had crossed into Egypt via the Taba border crossing since Tehran responded to Tel Aviv’s airstrikes with a barrage of missiles earlier this month.
https://www.newarab.com/news/egypts-south-sinai-high-alert-israelis-flee...
म्हणजे अनेक ईस्रायली देश सोडुन गेलेही आहेत.
जे पेरले ते उगवले.

विजुभाऊ's picture

24 Jun 2025 - 4:21 pm | विजुभाऊ

अमेरेकेचा इराणवरचा हल्ला ( इराणचे न सापडलेले अणूबाँब ) त्या नंतरची युद्धबंदी आणि इराणचा कतर वरचा हल्ला हे एका मोठ्या खेळीचा भाग होता असे ऐकतोय. ( इराणचे न सापडलेले अणूबाँब ) या मधे इस्राईलला मात्र नुकसान सोसावे लागले.

कोणत्याही घटनेचे विडिओ गेम अमेरिकेत बनतात ९-११ सोडून?

मग काय शेवटी युद्धविराम झाला का नाही?
सर्वांचेच हात पोळले आहेत.
--------------
आठवीत असताना बीएड/ डीएड करणारे शिक्षक 'पाठ' घ्यायला वर्गावर येत असत. एका धड्यात 'पदराला खार लावून घेणे' हा वाक्प्रचार आला. त्या पाठ घेणाऱ्या बाइंनाही ती म्हण कशी आली माहीत नव्हते. मग प्रपाठक बाईंनी उत्तर दिल़. एक बाई शेजारणी कडे गेली तेव्हा ती लोणचं करत होती. तर ती शेजारणीला शिकवायला म्हणाली "हे बघ असं कालवतात मसाला आणि फोडी." जेव्हा घरी आली तेव्हा लक्षात आलं की साडीच्या पदराला खार ( मसाला) लागून डाग पडला होता. (=फुकटच्या ढवळाढवळीत नुकसान करून घेणे).

तात्यांनी केलेले युद्ध विराम (भारत पाकिस्तान असो कि इराण इस्रायल असो) हे म्हणजे वधू वरांना न सांगता जुळवलेल्या (अरेन्जड मॅरेज) लग्नासारखा आहे.

))=((

रामचंद्र's picture

24 Jun 2025 - 8:57 pm | रामचंद्र

किंवा कार्यालयाबाहेर बॅन्डच्या बाजूला "माझ्यामुळेच हे लग्न जुळलं" असं म्हणत नाचणारा स्वयंघोषित 'मध्यस्थ'!