अचूकतेचा अभाव

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
28 Dec 2008 - 10:47 am
गाभा: 

आपल्या भारतीयांत अचूकतेचा अभाव ठायी ठायी दिसून येतो. त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर निश्चितच होतो. आपल्या प्रगतीचा प्रवास अतिसंथ आहे त्यांतल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे.
पत्रकारांचेच पहा ना, त्यांनी लोकांपर्यंत अचूक बातम्या पोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्षांत काय दिसते? साधी नांवे सुध्दा या मंडळींना अचूक लिहिता येत नाहीत. 'कसाब्'ला पकडणारा तो शूर पोलिस! त्याचे नांव सुध्दा ओंबळे की उंबळे याबाबतीत गोंधळ दिसतो. 'कसाब' चे नांव सुध्दा कासाब, कासव, कासम असे लिहिलेले वाचायला मिळते. मागे भोपाळ्ला 'मिथाईल आयसोसायनेट' हा वायु सुटला होता तेंव्हा एक टाईम्स सोडला तर दुसर्‍या कोणत्याही पेपरांत त्याचे अचूक नांव नव्हते.
एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर जरी घडली तरी प्रत्येकाच्या सांगण्यात फरक पडतो. लोकांना पत्ता सांगताना किती लोक तो अचूकपणे सांगतात ते आठवून पहा. टी.व्ही. वर प्रश्न विचारणार्‍या बहुतांशी लोकांना आपल्याला नक्की काय विचारायचे आहे हेच मनांत स्पष्ट नसते. अं अं असे करत बोलणारी माणसे पाहिली की त्यांची कींव येते.
कांही माणसांना तर आपण काल काय जेवलो हे सुध्दा नीट आठवून सांगता येत नाही. प्रत्येकाने जर मनःपूर्वक अचूकतेचा आग्रह धरला तरी आपल्या समाजाची जलद प्रगति होईल!!!

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

28 Dec 2008 - 10:55 am | विनायक प्रभू

अहो, सकाळी मी नेमका काय ब्रेकफास्ट केला होता हे पण नक्की आठवत नाही.
समाजाच्या अधोगतीला कारणीभुत
वि.प्र.

गोगोल's picture

28 Dec 2008 - 10:57 am | गोगोल

महाराष्ट्र का टाइम्स ऑफ इंडिया?

मला वाट्त की या लेखात अचूकतेचा अभाव आहे.

तिमा's picture

28 Dec 2008 - 5:30 pm | तिमा

टाईम्स = टाईम्स ऑफ इंडिया
महाराष्ट्र टाईम्सला प्रेमाने मटा म्हणतात.

मराठी_माणूस's picture

28 Dec 2008 - 1:17 pm | मराठी_माणूस

पाश्चात्यांची नावे घेताना मात्र दक्षता घेतात

विनायक पाचलग's picture

28 Dec 2008 - 1:59 pm | विनायक पाचलग

आणी हो आजचा सापताहीक सकाळ वाचा
त्यातील बातमीनुसार
त्या अतीरेक्याची जात कासाब आहे पण उर्दुमुळे ती पोलिसाना पहिल्यांदा कळाली नाही आणि आता कळुन सुद्धा पत्रकार खरे नाव वापरत नाहीत

तिमा's picture

28 Dec 2008 - 5:33 pm | तिमा

जात कसाब , कसाब म्हणजे खाटिक. कासाब नव्हे! आठवा मराठी शब्द, कसाबकरणी = दुष्ट कृत्य