(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार)
काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी ....
मी: वडिलांना दुकान टाकून दिले...
ती: नाही हो,
मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल.
ती: नाही हो, हा जो दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली.
मी विचार करू लागलो, हा साईन बोर्ड जास्तीसजास्त पाच किंवा दहा हजाराचा असेल. सिप मध्ये नियमित गुंतवणूक करून तिला एवढेच पैसे मिळाले...
सर्वांनी सिप गुंतवणूक करण्यापूर्वी, हे विज्ञापन अवश्य पाहिले पाहिजे. अश्याच प्रकारचे विज्ञापन दिसले असतील तर त्यांचा उल्लेख ही प्रतिसादात करवा. जास्त मजा येईल.
प्रतिक्रिया
7 Apr 2025 - 2:36 pm | सुरिया
जाहिरातीत दाखवलेल्या एलईडी बोर्डाचे आजच्या भावात साधारणपणे कमीत कमी ७५ ते ८० हजार होतात.
.
तुम्ही काहीही सांगायला आणि खरे मानायला हा काही पीएम ऑफिसचा धागा नाहीये.
नीट बघा, माहीती घ्या आणि त्यावर धाग्याचा डोलारा उभा करा.
7 Apr 2025 - 4:34 pm | विवेकपटाईत
LED रेट २५० sq फुट पासून सुरू होतात. विज्ञापन मध्ये दाखविलेल्या दुकानाचे साईन बोर्ड २x१० sq ft. असेल. ५००० रुपये होतात. लेख लिहिण्याआधी ऑनलाईन रेट बघितले होते. मिपावकरांचा स्वभाव माहित आहे मला. प्रतिसादात एका व्यक्ती प्रति द्वेष सर्व ठिकाणी उफाळुन येतो. बाकी उत्तम क्वालिटी धरली तरी १० ते २० हजार होतील.
बाकी मौज मस्ती म्हणून लिहिलेला लेख आहे उगाच सिरीयस घेऊ नका.
9 Apr 2025 - 11:37 am | प्रसाद गोडबोले
आजकाल
मिपावर अशा व्यक्ती केंद्रित टिप्पणीचे संपादन होत नाही, असे प्रतिसाद देणारे स्कोअर सेटलिंग करणारे आयडी उडवले जात नाहीत असे निदर्शनास येत आहे !
चांगलं आहे.
मोदी सरकारच्या काळात किमान मिसळपाव वर तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकून आहे !
=))))
7 Apr 2025 - 7:59 pm | श्रीगुरुजी
मिपावकरांचा स्वभाव माहित आहे मला. प्रतिसादात एका व्यक्ती प्रति द्वेष सर्व ठिकाणी उफाळुन येतो.
सहमत
9 Apr 2025 - 2:44 pm | अमर विश्वास
मुळात जाहिरात SIP ची नसून GROW app ची आहे .. Grow च्या माध्यमातून सिप फक्त सिप करता येते हे कोणी सांगितले तुम्हाला ?
आणि या अँप मधून गुणवणूक करून काहीतरी साध्य केल्याचा आनंद आहे ..
कुठेही असे म्हटले नाहींनाही कि सगळीच्या सगळी गुंतवणूक वापरून तो बोर्ड बनवला
उगाच काहीही लिहायचे