सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
27 Dec 2008 - 12:35 pm | अवलिया
या वर्षी मी संकल्प न करण्याचा संकल्प केला आहे
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
27 Dec 2008 - 12:37 pm | गीत
हे सगळ्यात छान :D
27 Dec 2008 - 12:40 pm | विनायक प्रभू
बिनडोक वादात शिरणार नाही.
अवांतरांपासुन शक्यतो लांब राहीन.
क्रिप्टिक लिहीणार नाही.
ओरिजिनल रामायण किंवा महाभारत वाचणार नाही.
श्री कृष्णांचा जन्म २४००० वर्षापुर्वी की २५०००वर्षापुर्वी ह्या काथ्याकुटात अजिबात शिरणार नाही.
अवांतरः जमेल की नाही ते ५ दिवसात कळेल.
27 Dec 2008 - 12:44 pm | अवलिया
क्रिप्टिक लिहीणार नाही एवढे सोडुन बाकीचे जमेल.
शुभैच्छा
अवांतर - अवांतरा पासुन एका प्रतिसादात पण दुर नाही राहिले तुम्ही काय *टा जमणार आहे तुम्हाला?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
27 Dec 2008 - 12:46 pm | विनायक प्रभू
हे जमण्यासाठी तुमचे समुपदेशन घेईन.
27 Dec 2008 - 7:05 pm | नीधप
१ व्यसन सोडायचं आणि १ कमी करायचं असं ठरवलंय.
सोडायचं व्यसन दारूचं
आणि कमी करायचं व्यसन महाजालाचं...
पहिलं जमेल.. दुसर्याचं बघायला हवं..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Dec 2008 - 9:22 am | विसोबा खेचर
सोडायचं व्यसन दारूचं
शुभेच्छा..! :)
29 Dec 2008 - 8:02 am | केशवराव
अहो, नविन वर्षाला नविन काहितरी 'सुरू 'करण्याचा संकल्प करायचे सोडून हे 'सोडून देण्याचा ' आणि 'कमी करण्याचा' कसला संकल्प करताय? मी ५०व्या सोडलेली दारू या वर्षी परत 'सुरू' करण्याचा संकल्प केलाय.
27 Dec 2008 - 7:47 pm | सोनम
ह्या नवीन वर्षी मी लायब्ररी जांईट करण्याचा संकल्प केला आहे.
28 Dec 2008 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्यात मिळणारी काही निवांत क्षण मिपाने बळकावले आहेत :)
-दिलीप बिरुटे
28 Dec 2008 - 11:13 am | उम्मि
नविन घर घेण्याचा...........
ऊम्मि
28 Dec 2008 - 4:22 pm | वेताळ
ह्या नवीन वर्षी मी लायब्ररी जांईट करण्याचा संकल्प केला आहे.
बाकी उसंत मिळाल्यावर संकल्पाबद्दल विचार करु.
वेताळ
28 Dec 2008 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगलं काही करायला नवीन वर्षाची वाट का बघायची? पुन्हा एक मुहुर्त!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
28 Dec 2008 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
=))
बिपिन कार्यकर्ते
29 Dec 2008 - 3:39 am | एकलव्य
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
:))
29 Dec 2008 - 9:26 am | अवलिया
आमच्यात संकल्प करण्यासाठी (आणि सोडुन देण्यासाठी) नवीन वर्षाची वाट पहात नाहित.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
29 Dec 2008 - 12:09 pm | धमाल मुलगा
१.मी खोटे बोलणार नाही.
२.मी दारु पिणार नाही
३.मी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळेन.
४.मी रोज देवपुजा करेन
५.मी अवांतर प्रतिसाद देणार नाही
६.मी खरडाखरडी खेळणार नाही.
७.मी अहिंसेचा पुजारी होणार
८.मी मांसाहार करणार नाही.
९.मी हापिसात बसुन फक्त आणि फक्त कामच करेन...मिपा उघडणारसुध्दा नाही!
-------------------------
हड् तिच्याआयला, कसले संकल्प आणि कसले काय?
३१ डिशेंबराच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या सकाळपर्यंत बम दारूकाम करणार ;) मस्त कोंबड्या चापणार, दोस्तांशी दंगामस्ती करणार, त्यांच्या फिरक्या घेणार, आणि पुढचं सगळं वर्षं 'मी हे करणार आणि ते करणार नाही' अशा काटेकोर बंधनाच्या चाकोरीत न अडकवता, जसं जमेल तसं मनमुराद जगणार!!!! जस्ट लाईक देअर इज नो टूमॉरो :)
31 Dec 2008 - 1:23 pm | ऍडीजोशी (not verified)
३१ डिशेंबराच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या सकाळपर्यंत बम दारूकाम करणार....
लवकरच आपल्या धम्याला बघायला हास्पिटलात जावं लागणार असं वाटतंय. सेलिब्रेशन ची स्वप्न बघता बघाता वैणी मिपा वर आहेत हे धम्या विसरून गेलाय :)
29 Dec 2008 - 12:16 pm | अनिल हटेला
इन शॉर्ट..
मी अजाबात सुधारणार नाय ...
;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Dec 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा
उत्तम प्रतिसाद...
फारसे कष्ट न घेता आणि देता, मनातील भावना समोरच्याला पुर्णपणे समजावण्याची सुंदर शैली!
आता अवांतरः
मी अजाबात सुधारणार नाय ...
सुधारणा म्हणजे काय रे भाऊ???
29 Dec 2008 - 12:38 pm | अनिल हटेला
मी अजाबात सुधारणार नाय ...
सुधारणा म्हणजे काय रे भाऊ???
जे तुझ्या आणी माझ्या बाबतीत अजिबात शक्य नाय ते ....
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
31 Dec 2008 - 1:25 pm | ऍडीजोशी (not verified)
मी यंदाच्या वर्षात अजून एक बाईक घेण्याचा संकल्प करणार आहे. त्यानंतर थांबायचं की नाही ते ठरवीन.
आणि महिन्यातून किमान २ वेळा बाईक नी लाँग टूर वर जायचा मागच्या वर्षीचा संकल्प ८०% तरी पाळलाय :)
31 Dec 2008 - 1:26 pm | पर्नल नेने मराठे
मी सर्फिन्ग कमि करनार आहे............
चुचु