एआय हा सध्याचा परवलीचा शब्द झालाय. एआय चा दैनंदिन जीवनातील उपयोगाची काही उदाहरणे आणि त्यात काही प्राँप्टस् असा लेखाचा पसारा आहे.
लेखामधे मी चॅटजीपीटी सोबत जो संवाद साधला त्याचा दुवा दिला आहे.
ही एआयची काही प्रसिद्ध उदाहरणे.
एआयचा वापर
आपल्या मिपाच्या दिवाळी अंकात चित्रे काढण्यासाठी केला होता.
नक्की आठवत नाही पण बहुधा २०२३च्या लोकमत दिवाळी अंकामध्ये एआयकडून कथा लिहून घेतल्या होत्या.
काल परवाच्या चर्चेत मी आणि युयुत्सु यांनी मेटा एआयला काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे चर्चे मध्ये डकवली होती.
आता वरील उदाहरणात पहिली दोन ही कंटेंट क्रिएशन तर तीसरे गूगल वा बिंग सर्च इंजिनच्या जवळ जाणारे उदाहरण आहे. सर्च इंजिनच्या जवळ जाणारे म्हणतोय कारण सर्च इंजिनला जर ते प्रश्न विचारले असते तर त्यांनी पण उत्तरांचे संदर्भ दुवे दिले असते.
गूगलचे गूगल तर मायक्रोसॉफ्टचे बिंग सर्च इंजिन आहे.
सर्च इंजिन आणि एआय यात काय फरक आहे?
हाच प्रश्न मी मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि गूगल जेमिनीला विचारला.
गूगल जेमिनीचे उत्तरः
That's a great question! While both Google Search and I, Gemini, can provide you with information, we do it in different ways and have different strengths. Here's a breakdown of the key differences:
Google Search: Think of Google Search as a massive library card catalog. You give it keywords (your search query), and it points you to potentially relevant web pages, images, videos, and other files. It's excellent for finding information quickly, especially when you know what you're looking for. It excels at providing a wide range of sources and diverse perspectives. However, it doesn't directly answer your questions; it gives you links to explore. It's up to you to sift through those links and find the specific information you need.
Gemini (and other large language models like me): I'm more like a librarian who has read many of the books in the library. You can ask me a question directly, and I will try to give you a direct answer based on the information I've been trained on. I can synthesize information from multiple sources, explain complex topics, translate languages, generate creative text formats, and even have a conversation with you. I aim to provide concise and relevant information directly, rather than just a list of links.
Here's a table summarizing the key differences:
===================================================================================
Feature:Output
Google : Links to web pages, images, videos, etc.
Gemini : Direct answers, text, code, translations, etc.
===================================================================================
Feature:Interaction
Google : Keywords, search queries
Gemini : Natural language conversations, questions
===================================================================================
Feature:Focus
Google : Finding sources of information
Gemini : Providing information and completing tasks
===================================================================================
Feature:Analysis
Google :Requires user to analyze and synthesize
Gemini :Synthesizes information automatically
===================================================================================
Feature:Best for
Google :Finding specific websites, broad research
Gemini :Getting direct answers, creative tasks, learning
===================================================================================
In short, Google Search helps you find information; I aim to provide it directly. They are complementary tools. You might use Google Search to find articles on a topic and then ask me to summarize those articles for you.
आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलटचे उत्तर
Great question! While I'm powered by Bing search and can perform web searches, I offer much more than just search results. Here's how I stand out:
Conversational Interaction: I'm designed for engaging and meaningful conversations. I can chat with you, provide personalized responses, and assist in a more interactive manner.
Task Assistance: I can help with a wide range of tasks, from answering questions and brainstorming ideas to providing support and advice.
Context Awareness: I remember the context of our conversation, so I can provide more relevant and tailored information based on our previous interactions.
Creativity: I'm here to assist with creative projects, whether it's writing, generating ideas, or even creating images (when asked).
Empathy and Support: I aim to be more than just a search tool—I strive to be a companion who can listen, support, and engage with you on a personal level.
In short, I blend the power of Bing search with a more interactive, personalized, and supportive approach to assist you better.
How can I assist you further today?
आता एआयचा वापर दररोजच्या जीवनात कसा करता येईल ते पाहुयात:
चॅटजीपीटी सोबत संवाद
यात मी सर्वप्रथम एआयला विचारले "एक ५० वर्षीय भारतीय जे सोशल मिडीया, आणि टेक्नॉलॉजी मध्ये जाणकार आहेत, त्यांना दररोज च्या जीवनात एआय काय मदत करू शकेल?" त्यावर एआयने मला १० उदाहरणे दिली.
त्यातले क्र. ४ आणि ६ बद्दल एआय सोबत अधिक बोलणे झाले. Context Awareness हे एआयचे वेगळेपण आहे त्यामुळे मला परत विषय देण्याची गरज भासली नाही.
एआय एक उत्तम Task Assistance आहे.
- एआयने ५ दिवसीय पुणे ते गोवा फॅमिली ट्रिप प्लॅन बजेट ते फिरण्याची ठिकाणे सगळे सांगत प्रत्येक दिवसाचा प्लॅन दिला.
- मित्राच्या पाहुणचारासाठी ३ दिवसाचा मराठी पदार्थांचा मेनु दिला.
मराठी मेनु मिळेल अशी अपेक्षा मला पण नव्हती. तो एक सुखद धक्काच होता.
सरते शेवटी आमच्या संवादाला टायटल द्यायला सांगितले असता एआय जे दोन पर्याय दिले त्यातलेच एक ह्या लेखाचे शिर्षक आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2025 - 10:13 am | चंद्रसूर्यकुमार
अरे वा. मी तर चॅट जीपीटीचा दररोज उदंड वापर करतो. चीन्यांवर विश्वास नसल्याने डीपफेक चॅटजीपीटीहून स्वस्त असले तरी घेणार नाही.
मी करत असलेले चॅटजीपीटीचे काही उपयोग-
१. दररोज काहीही खाल्ले की त्याचा फोटो आणि वर्णन चॅटजीपीटीला सांगायचे आणि किती कॅलरी, किती फॅट्स, किती प्रोटिन, किती शुगर, किती सोडिअम, किती पोटॅशिअम वगैरे विश्लेषण त्याच्याकडून करून घ्यायचे. दिवसाच्या शेवटी आज दिवसभरात काय खाल्ले आणि त्याचे विश्लेषण करून घ्यायचे. त्यातही नॅचरल शुगर आणि वरून टाकलेली साखर किती, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स किती याचे पण विश्लेषण करून घ्यायचे. नैसर्गिक शुगर धोकादायक नसते पण वरून टाकलेली साखर अधिक धोकादायक. त्यातून आपण जीभेच्या चोचल्यामुळे आपलेच नुकसान करून घेत आहोत का हे लक्षात येते. दिवसात जे काही खाल्ले त्याला १० पैकी किती मार्क देणार हे त्याला विचारायचे आणि १० पैकी १० मिळायला काय बदल करता आला असता ते विचारायचे. त्याप्रमाणे दुसर्या दिवशी बदल करायचा प्रयत्न करायचा.
२. दररोज किती पावले चाललो, रक्तदाब वगैरेची नोंद ठेवायची. अनेकदा काहीही खायच्या आधी हे आणि एवढे खाऊ का हे विचारतो. दिवसभरात किती पावले चाललो आहोत किंवा रक्तदाब किती आहे त्यावरून जर त्याने सांगितले की अमुक एक गोष्ट अधिक सोडिअम/ शुगर किंवा फॅटवाली आहे म्हणून खाऊ नको किंवा कमी कर तर मग मी तसे करतोही.
३. माझ्या आवडीच्या विषयांवरील पुस्तकावर चॅटजीपीटीशी गप्पा मारतो. मला माईंडफुलनेस, मेडिटेशन, लॉ ऑफ अॅट्रॅक्शन वगैरे गोष्टींमध्ये बराच रस आहे. सध्या चॅटजीपीटीला गौतम बुध्दांनी वेगवेगळ्या वेळेला केलेल्या विधानांचे धम्मपद म्हणून पुस्तक आहे त्यावर गप्पा मारत आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे कोणते हे चढत्या क्रमाने मला सांग हे त्याला सांगितले. एकेक मुद्दा वाचून पडलेले प्रश्न त्याला विचारायचे आणि त्याचे निरसन करून घ्यायचे. ते झाले की मगच पुढचा मुद्दा घ्यायचा. हे सध्या चालू असलेले दुसरे पुस्तक आहे. दुसर्या एका पुस्तकावर दीड महिना गप्पा चालू होत्या. इतिहासात उल्लेख आहेत की वायव्य भारतात (पेशावर वगैरे भागात) इंडो-ग्रीक साम्राज्याचा मिनँडर म्हणून राजा होता. त्याचे भारतीय नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनला विचारलेले प्रश्न आणि नागसेनाने त्या प्रश्नांना दिलेली उत्तरे याचे मिलिंदपन्हा म्हणून एक पुस्तक आहे. त्याप्रमाणे मी माझे 'चंसूकुपन्हा' बनवत आहे.
४. माझ्या आवडीच्या विषयांवर चॅटजीपीटीशी चर्चा करणे. मला पूर्वी नेहमी वाटायचे की १४५३ मध्ये ऑटोमन साम्राज्याने कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकले आणि युरोपचा भारताशी असलेला व्यापार बंद पडला. त्यातून मग भारताकडे जाणारा केप ऑफ गुड होपला वळसा घालून जाणारा मार्ग शोधावा ही गरज युरोपिअन लोकांना वाटायला लागली आणि म्हणून वास्को द गामा भारतात आला. एक साधा प्रश्न पडला की त्यावेळी ४५ वर्षात दोन पिढ्या आरामात होत असतील. समजा माझ्या आजोबांना काही गोष्टी वापरायला मिळत असतील आणि त्या मला मिळाल्या नाहीत तर त्या मिळाव्यात हे माझ्या आजोबांना जितक्या तीव्रतेने वाटेल तितकेच मला वाटेल का? शक्यता फारच थोडी. जशी वर्षे जातात तशी त्या गोष्टीची तीव्रता कमी होत जाईल मग असा सागरी मार्ग शोधून आपला जीव धोक्यात घालून भारतात जावे असे युरोपिअन लोकांना का वाटले असेल? हा प्रश्न चॅटजीपीटीला विचारला. मग त्यावरून बर्याच गप्पा मारून अनेक नव्या गोष्टी कळल्या. वास्को द गामा भारतात आला तेव्हा तो झामोरीन राजाशी नक्की कसा बोलला असेल? याला त्याची भाषा येत नाही, त्याला याची भाषा येत नाही मग त्यांच्यात संवाद कसा झाला असेल हा पण प्रश्न त्याला विचारला आणि उत्तर मिळाले.
५. चॅटजीपीटीलाच बर्याच गोष्टी आपल्याला शिकवायला सांगता येतात. मला पायथन वरवरचे येते. ते त्याच्याकडून शिकून घ्यायचा प्रयत्न करत आहे. एखादी गोष्ट समजली नाही तर त्यालाच अधिक स्पष्ट करून सांगायला सांगायचे. सध्या तो प्रकार सुरू आहे. इतरही अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकून घ्यायच्या आहेत. बघू कधी वेळ होतो ते.
6 Feb 2025 - 10:42 am | Bhakti
मला चॅट जीपीटीपेक्षा डीपसिक आवडलं,पण भारतीय सरकारने या चीनी ॲपवर बंदी आणू नये हीच इच्छा.सध्या मेडिकल बायो केमिस्ट्रीचे बरेच प्रश्न विचारत आहे.अचूक उत्तरे मिळत आहे.
वजन कसे कमी करावे ? हा प्रश्न विचारल्यावर त्याने मला आठवड्याचे टाइमटेबल न विचारता बनवून दिले आहे ;)
6 Feb 2025 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली
सेम! माझा मेडिकल रिपोर्ट मी चॅट जीपीटीला दिलाय, सकाळी चॅट जिपीटीच्या सल्ल्याने मिसळ मधील फक्त उसळ तेवढी खाल्ली, पाव नी तिखट रस्सा चाट जीपीटीने आजिबात खाऊ दिला नाही.
दुपारी मटण फ्राय नी तिखट रस्सा खायचेच ठरवले होते चैट जीपीटीने तीव्र विरोध करून मला मटनाचा अळणी रस्सा नी २ भाकरी खायला सांगून सुवर्णमध्य काढून दिला. नी मला हेच खा म्हणून कन्वेन्स केले. :)
काल रात्री माझे mf एक्सेल डेटा, चॅट जिपीटी ला दिला नी त्यावर जास्त पीएसयू फंड आहेत ते चॅट जी ने विकायला लावून अमेरिकन टेक कंपन्यात पैसे गुंतवायला लावले. घर घेऊ की एमएफ मधे गुंतवू ह्यावर माझी परिस्थिती समजून घेऊन सध्या एमएफ मध्येच पैसे गुंतव म्हणून सांगितले. :)
6 Feb 2025 - 11:58 am | युयुत्सु
मला brainsrorming म्ह० मंथन करण्यासाठी, तसेच शक्यता अजमावण्यासाठी ए०आय० चा खूप उपयोग होतो. एका ए०आय० कडुन दिलेले उत्तर दुसर्याकडून तपासून घेतले की विश्वासार्हतेची समस्या कमी होते. मी "आर प्रोग्रामिंग" करत असल्याने तिथे पण उपयोग होतो. माझा ए०आय० चा वापर रोज असतो.
6 Feb 2025 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चॅट जीपीटी ४ अनेकदा वापरतो. विशेषतः टक्केवारी आणि गणीत आकडेमोड. अधून-मधून चॅट जीपीटीकडे कोणकोणती माहिती आणि कशी उपलब्ध होते त्यासाठी वापर करतो. डीपसीकची जाहिरात झाली आणि तिकडेही गर्दी पडली असे वाटले. सध्या वेळ घेतेय. तंत्रज्ञान उपयोगाचं आहे, विसंबून न राहता योग्य उपयोग केला की फायदा नक्की. दुष्परिणामही येत्या काळात दिसून येतीलच. साधक बाधक चर्चेसाठी धागा उत्तम. बाकी, उपयोजकं काय उत्तर देतात, वगैरेचं दळन नसतं टाकलं तरी चाललं असतं.
-दिलीप बिरुटे
6 Feb 2025 - 4:20 pm | गवि
आता फक्त AI शी चॅट करणे काहीसे जुने झाले.
आता संगीत पण AI आपल्या सूचनेनुसार बनवून देतो.
उदा. हा चॅनल पूर्ण AI ने बनलेल्या गाण्यांचा. असे अनेक सापडतील. अर्थात शब्द लिहिणे, सूचना देणे यासाठी संगीताचे बेसिक ज्ञान असेल तर अधिकच उत्तम संगीत बनवून घेता येते.
https://youtube.com/@bossanovabot
लहान मुलांसाठी AI गाणी
https://youtube.com/@tomkatoom
नर्सरी गाणी हल्ली सर्रास AI द्वारे बनवतात
तेही आता जुनं झालं. आता sora (openai) तर व्हिडिओ पण बनवते सांगू तसा.
इथे बघा नमुने
https://sora.com/
6 Feb 2025 - 7:54 pm | कर्नलतपस्वी
मस्त लेख व समर्पक प्रतिसाद .
असले लेखन आमच्या सारख्या डिपारर्चर गेट वर उभ्या असलेल्यांना बरेच काही नवीन शिकवून जाते.
बरीच नवीन माहीती कळाली.
धन्यवाद.
7 Feb 2025 - 7:34 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...