गेले काही दिवस सर्वत्र गोव्यातील पर्यटनावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
मुळात गोव्यात येणारे पर्यटक खरोखरच मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत की राज्य सरकार म्हणते त्याप्रमाणे या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून सर्व काही ठीक आहे. जर सगळं सुरळीत चालू आहे तर एकाएकी विरोधी सूर का?
जर पर्यटकांची संख्या रोडावली असेल तर खरी कारणे कोणती असतील?
वेगवेगळ्या ब्लॉगर व यू ट्यूबर यांनी दिलेली काही कारणे अशी:
१ भारतातून सगळ्याच भागातून/ शहरांतून थेट रेल्वे गाड्या आणि उड्डाणे नाहीत. उड्डाणे बदलून जायचं तर वेळ फार मोडतो आणि तिकिटही महाग पडतं. यापेक्षा बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका याच पैशात जाता येईल.
२ हॉटेल चे महागडे दर. यापेक्षा बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका येथे याच पैशात चांगली हॉटेल्स आहेत
३ स्थानिक वाहतूक भयंकर महागडी आणि स्थानिक टॅक्सी संघटनांची दादागिरी व एकाधिकारशाही. ओला उंबर वगैरेंना हाकलून दिले आहे
४ अनेक हॉटेल्स व शॅक्स मध्ये मनमानी दर आणि सुखसोयींचा अभाव तसेच हॉटेल व्यावसायिकांची दादागिरी व प्रसंगी पर्यटकांना मारहाण
५ अनेक रेस्टॉरंट, बार व पब्ज मध्ये फसवणूक
६ भाड्याने मिळणाऱ्या वाहनांच्या मालकांकडून फसवणूक व दादागिरी
गोव्याच्या खर्चात परदेशी गेल्याचा आनंद म्हणून लोक गोव्यात न जाता बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका येथे जात असावेत हे तितकसं पटत नाही कारण ही परिस्थिती अनेक वर्षे आहे आणि आजही भारतात सहली काढणाऱ्या यात्रा कंपन्या चांगला व्यवसाय करत आहेत. काश्मीर, हिमाचल, केरळ वगैरे ठिकाणी सुद्धा सगळ्या शहरांतून थेट विमानसेवा नाही आणि उड्डाणे बदलून जायचं तर वेळ फार मोडतो आणि तिकिटही महाग पडतं तरीही लोक मोठ्या संख्येने जातात.
कदाचित परदेशी पर्यटकांची सरबराई करताना भारतीय पर्यटकांना दुय्यम वागणूक, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, स्थानिकांची अरेरावी व पर्यटकांची फसवणूक ही कारणे असतील तर कठीण आहे. उद्या हेच अन्य पर्यटन स्थळांच्या बाबतीत घडू शकेल आणि पर्यटनाधारित अर्थकारण कोलमडून पडेल
मिपाकरांनी आपले अनुभव वा मत सांगावे
प्रतिक्रिया
5 Jan 2025 - 6:29 pm | रात्रीचे चांदणे
मी २०१५-१६ पासून करोना काळ वगळता प्रत्येक वर्षी गोव्याला गेलेलो आहे. आणि दुर्दैवाने प्रत्येक वेळी वाईट अनुभव आला. ऐनवेळी ठरल्या पेक्षा जास्त भाडे मागणे. रस्त्यावरती अरेरावी करणे, भारतीय पर्यटकांना दुय्यम वागणूक अशी भरपूर करणे आहेत. त्यामुळे गोव्याचे लोक हे अतिशय मजूरडे आहेत आणि त्यांना पर्यटकांची काहीही गरज नाही ह्या निष्कर्ष पर्यंत पोहचलो आहे. गोव्यातील परप्रांतीय व्यावसहिक मात्र चांगले आहेत. ह्याच कारणासाठी २०२५ ला गोव्याला न जाता केरळ चा प्लॅन केला आहे. एक दोन मित्र जात होते तर त्यांनाही न जाण्याचा सल्ला दिल्यामुळे ऐनवेळी तेही दुसऱ्या ठिकाणी गेले. त्यामुळे पर्यटक कमी झाल्याचा बातम्या खऱ्या असतील तर चांगलंच आहे. पर्यटकांअभावी हॉटेल्स इत्यादी व्यवसाय बंद पडून त्या लोकांचा माज कमी व्हावा हीच माझी तर इच्छा आहे.
5 Jan 2025 - 8:00 pm | चौथा कोनाडा
कदाचित गोव्याचं अप्रुप संपलं असावं !
पण "रात्रीचे चांदणे: याण्च्या म्हणण्यानुसार बिंदूमुद्द्यांना दुजोरा मिळतो आहे... पर्यटक पर्यटन करतात ते एक्सपेरियन्स अर्थात चांगल्या अनुभवासाठी जातो... जर अनुभवच चरे उमवटवणारे असतील आणि सहलीच्या आठवणी कटू असतील तर पर्यटक पुढच्यावेळी का जातील ? आणि माऊथ पब्लिसिटी / नकारात्मक रिव्ह्युव आपले योग्य ते काम पार पाडतातच.
मला आठवतं त्या नुसार टुरिझम गोल्डन ट्रॅन्गल म्हंजे बेंगलोर मैसुर उटी हा त्रिकोण मराठी पर्यटकांमध्ये अ ति शय झाला ... कारण येणारा अनुभव.. दक्षिणी लोक आदरातिथ्याला उत्तमच .. सोयी उत्तम ... अजुनही हा त्रिकोण मस्तच आहे !