तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक खर्च किती?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Oct 2024 - 12:49 pm
गाभा: 

मी आहारशास्त्राचा आधुनिक विज्ञानाधारीत ज्ञाता नाही तरीही व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न सारख्या तुरळक चांगल्या चर्चा मिपावर झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे भारतीयांचे दैनंदीन आहारातील प्रथिन सेवन आदर्श स्थितीपेक्षा बरेच कमी आहे अशी टिका वैद्यकीय क्षेत्रात ऐकण्यास येते. या चर्चेचा उद्देश अशी टिका योग्य कि अयोग्य अशा चर्चेचा नाही; तर उलटपक्षी तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम कुणाला कुठे (कोणत्या गावी) किती खर्च येतो आहे? हे ढोबळमानाने समजून घेणे हा तुमच्या प्रतिसातूनच एक सोपेसे ढोबळ सर्वेक्षण करणे असा आहे. उद्देश्य माहितीची देवाण घेवाण होऊन सुयोग्य दरात सुयोग्य प्रथिन पोषक आहाराने मिसळपावकर समृद्ध आणि तृप्त होऊन त्यांचे जिवन आरोग्यदायी व्हावे.

* तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम किती खर्च येतो आहे? हा मुख्य प्रश्न

उपप्रश्न यादी:

* तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक ईत्यादी वरील ढोबळ खर्च किती?

उदाहरणार्थ: माझ्या घरी ४ कुटूंबीय आहेत. आमच्या वजनाची गोळा बेरीज अदमासे २०० किलो आहे. महिन्याला डाळ/कडधान्य सहा किलो पनीर अंदाजे अर्धा किलो. यावरून ६५००/३० दिवस = प्रती व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत २१६ ग्रॅम आहे. अर्थात प्रत्यक्ष प्रथिन स्त्रोतातील मात्रा १० ते २० % दराने बरीच कमी भरेल. ( या व्यतरीक्त दूध दही महिन्याचे अदमासे २० लिटर) महिन्याची यादी हाताशी नाही म्हणून प्रति घटक प्रति ग्राम खर्चाचे आकडे दिले नाहीत पण आकडे जसे जसे उपलब्ध होतील तशी माहिती प्रतिसादातून जोडेन

* तुमच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचे वजनाची गोळा बेरीज किती ?

* प्रथिन स्रोतांवरील मासिक खर्च /भागीले कुटूंबीयांच्या वजनाची गोळा बेरीज =/भागीले ३० दिवस =? म्हणजे तुमच्या कुटूंबात प्रतिव्यक्ती प्रति दिवस अ‍ॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन होते?

* प्रत्येक प्रोटीन सोर्समध्ये प्रत्यक्ष प्रोटीन मात्रा कमी जास्त असते मिपावर कुणी जाणकार असतील तर त्यांनी प्रतिव्यक्ती प्रति दिवस अ‍ॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन वरून प्रत्यक्ष प्रोटीन कंझम्पशन मोजण्यास शक्य ती मदत करावी.

माझे ढोबळ ज्ञानः

आहारातील प्रथिने किंवा प्रोटीन्सचे महत्व आपण सारेच समजतो. माझ्या ढोबळ माहितीनुसार मानवी शरीराला एनर्जी प्रदान करणार्‍या कार्ब आणि फॅट पेक्षा प्रथिने किंवा प्रोटीन्स अधिक उजवे समजले जातात कारण प्रथिनयुक्त आहार सावकाश पण अधिक दिर्घकाळ एनर्जी सप्लाय चालू ठेवतो, इन्शुलीन स्पाईक कमी राहून इन्शुलीन क्षमता सक्रीय राहण्यास मदत होते, स्नायूंना अधिक बळकटी प्रदान करतात. डाळ/कडधान्य/दुघ्धजन्य पदार्थ- पनीर, चक्का, खवा, चीज/ मश्रुम/ अंडी/मांस/मासे/प्रोटीन सप्लीमेन्टस इत्यादी मुख्यस्रोत अभिप्रेत आहेत.

सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या प्रती एक किलो वजनाच्या एक ग्राम रेशोने म्हणजे कुणाचे वजन ६० किलो असेल तर ६० ग्रॅमच्या आसपास मोजण्यास सोपे जाते.

(आदर्श परिमाण मला वाटते काहीशा फरकाने वेगळे असते प्रतिव्य्क्ती आवश्यकता वजन वाढवायचे की कमी करायचे यानुसार कमी जास्त असू शकतात)

चु.भू.दे.घे.

* डिस्क्लेमर लागू : धाग्याचा उद्देश्य कोणताही व्यक्तीगत सल्ला देणे नाही.
* कोणत्याही प्रथिने प्रोटीन स्रोत विकणार्‍या कोणत्याही व्यवसायाशी माझा कोणताही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आतापावेतो नाही. इतर कुणाचा संबंध असेल तरी चर्चेत सहभागी जरूर सहभागी व्हावे पण प्रोटीन स्रोत विक्रीचा व्यवसायिक संबंध असेल तर तसे स्पष्ट नमूद करावे.
* चर्चेत पदार्थांच्या विशेषतः शाकाहार, मांसाहार, सप्लिमेंट यातील अधिक काय चांगले या वादात प्रदिर्घ स्वरूपाने अडकणार नाही हे पहावे कारण ते वाद घालणे हा चर्चेचा मुख्य उद्धेश नाही प्रतिग्राम खर्च काय येतो आहे हे बघणे आहे.
* शुद्धलेखन चर्चा किंवा अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी आभार

प्रतिक्रिया

प्रति व्यक्ती शंभर ग्राम एक दिवस.

हे डाळी आणि दूध धरून आहे. (डाळींतील प्रोटिन हे चवीसाठी असते. ते पूर्ण शोषले जात नाही. )