दिवाळी अंक २०२४ - कमान ओलांडून अठरावी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

कमान ओलांडून अठरावी
अधीर आलो अनंग(§)-देशी
इथल्या अणु-रेणूवर अविरत
प्रथम-रसाची(#) झाक जराशी

पर्वत इथले अवघड, दुस्तर
घळीत त्यांच्या नजर न ठरते
चेटूक त्यांचे नजरबंदीचे
स्वप्नातही ना पाठ सोडते

गुहा निसरड्या, फसव्या इथल्या
दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन
गारूड गूढाचे पण त्यांच्या
पंचप्राणा छळते निशिदिन

अनंगदेशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात अपुला जगन्नाथ - जो
मुठीत दे अनुभव तुष्टीचा :)

=================

(§): अनंग = मदन
(#): नवरसांतील प्रथम रस = शृंगाररस

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

31 Oct 2024 - 10:36 am | कर्नलतपस्वी

अनंगदेशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात अपुला जगन्नाथ - जो
मुठीत दे अनुभव तुष्टीचा :)

वाचकांना अनंगदेशातील पहिल्या वाहिल्या अनुभवाची नक्कीच आठवण करून देईल.

अश्लीलतेचा लवलेश नसलेला पण पौगंडावस्थेतील तो पहिला वहीला अनुपम्य अनुभव काव्यरसात अप्रतिम गुंफला आहे.

स्वकुशीतील स्वानंद गंध
तू जपून ठेव मन कुपीत
सांगू नकोस कोणा
तू कालचे गुपित....