पूर्वी सैन्यात जायला अतिशिक्षित तरुणांपैकी फारसे कोणी उत्सुक नसायचे. सैन्यदलांत अधिकारी वर्गाच्या जागा रिकाम्या आणि कनिष्ठ पदांसाठी तोबा गर्दी अशी स्थिती होती.
मात्र सेवा देणार्या सर्वच क्षेत्रातील मंदीमुळे अतिशिक्षित तरुण परत सैन्यदलांत जायला उत्सुक झाला आहे. त्याची कारणे बरीच देता येतील; पण महत्त्वाची कारणे म्हणजे १) नोकरीची हमी - कंपनीच्या मनात आले आणि गुलाबी प्रेमपत्र दिले ही भानगड नाही २) मूळ पगार कमी असला तरी इतर भत्ते, कँटिनमध्ये सवलतीत वस्तु आणि निवासाची व्यवस्था ३) तांत्रिक बाबींसाठी उदा. संगणक तज्ज्ञ, स्थापत्य अभियंता इ. पदांसाठी निवडले जाणार असाल तर युद्धभूमीवर पाठवले जात नाही. छावणीत बसून कामकाज करायला दिले जाते. ४) निवृत्तीनंतर आजन्म निवृत्ती वेतन, कँटिन इ. सवलती. ५) रुबाबात जगणे.
त्यातील उणीव एकच म्हणजे काही कालावधीनंतर बदल्या होणे. विंचवाचे बिर्हाड पाठीवर हाच अनुभव नकोसा करणारा असेल.
महाराष्ट्रात अजूनही "शिवाजी जन्मावा पण दुसर्यांच्या घरात" हा ठेका कायम असल्याने ही सेवा-परिवर्तनाची लाट फारशी जाणवत नाही आहे. पण दक्षिणेत अतिशिक्षित तरुण पिढी उत्साहाने सैन्यदलांत सेवा देण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते.
अर्थात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली इ. ठिकाणी नोकरीसाठी जाणारा मराठी तरुण लवकरच "रोजगार समाचारपत्रिका" घेऊन ह्या नोकर्यांच्यात रुचि घेईल असे मानण्यात
प्रत्यवाय नाही.
प्रतिक्रिया
25 Dec 2008 - 2:20 am | सखाराम_गटणे™
>>सैन्यदलांत अधिकारी वर्गाच्या जागा रिकाम्या आणि कनिष्ठ पदांसाठी तोबा गर्दी अशी स्थिती होती.
ही चांगली गोष्ट असली तरी
>>सेवा क्षेत्रातील मंदी : एक इष्टापत्ति
नक्कीच नाही.
लोकांकडे पैसे नसले तर लोक टॅक्स कसा भरणार आणि सरकार सैन्य कसे चालवणार ????
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
25 Dec 2008 - 9:48 am | अमोल नागपूरकर
त्या अर्थाने नाही. पण ह्या मन्दीमुळे आतापर्यन्त जी उपेक्षित क्षेत्रे होती त्या क्षेत्रन्चा निदान विचार तरी तरुण मन्डळी करतील अशी आशा आहे. सैन्याविषयी तर दिलेलेच आहे. पण सरकारी सेवा, उत्पादन क्षेत्र इत्यादि अनेक क्षेत्रान्मध्ये करीअर करता येइल. देश चालविण्याकरिता उत्क्रुष्ट शासकीय अधिकारी वर्ग आवश्यक असतो. तिथे पगार खूप कमी असल्याने चान्गले, गुणी लोक येत नाहित. निसर्गाला vacuum मन्जूर नसल्याने अर्थातच तिथे अयोग्य व्यक्ति येतात. त्यामुळे भ्रष्टाचार, अरेरावी , अकर्यक्षमता ह्या गोष्टिन्ना मोकळे रान मिळून प्रशासनाची प्रतिमा धुळिला मिळते. उत्तम लोक तिथे आले तर ह्या सर्वात निष्चितच बदल होईल.
31 Dec 2008 - 9:03 pm | गुळांबा
सरकारी सेवा, उत्पादन क्षेत्र इत्यादि अनेक क्षेत्रान्मध्ये करीअर करता येइल. देश चालविण्याकरिता उत्क्रुष्ट शासकीय अधिकारी वर्ग आवश्यक असतो. तिथे पगार खूप कमी असल्याने चान्गले, गुणी लोक येत नाहित. निसर्गाला vacuum मन्जूर नसल्याने अर्थातच तिथे अयोग्य व्यक्ति येतात. त्यामुळे भ्रष्टाचार, अरेरावी , अकर्यक्षमता ह्या गोष्टिन्ना मोकळे रान मिळून प्रशासनाची प्रतिमा धुळिला मिळते. उत्तम लोक तिथे आले तर ह्या सर्वात निष्चितच बदल होईल.
माझे स्नेही मारुतराव पण मला एकदा हेच म्हणाले की बीएस्सी नंतर वनाधिकारी, वनक्षेत्रपाल किंवा अग्निशामकदलात अधिकारी म्हणून येण्यास अतिशय कमी मराठी मुले उत्सुक असतात. घराण्याची परंपरा असेल तरच ह्या क्षेत्राकडे ती वळतात.
26 Dec 2008 - 12:07 pm | मेथांबा
लोकांकडे पैसे नसले तर लोक टॅक्स कसा भरणार आणि सरकार सैन्य कसे चालवणार ????
पॉइंट आहे. पण सर्व लोकांकडे पैसा नसला काही लोकांकडे गडगंज काळा पैसा आहे. पण तो बाहेर काढायची सरकारची तयारी आहे का? जर तो बाहेर काढला तर मग निवडणूक गंगाजळी कुठून उभी करणार?
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
31 Dec 2008 - 8:34 pm | गुळांबा
लोकांकडे पैसे नसले तर लोक टॅक्स कसा भरणार आणि सरकार सैन्य कसे चालवणार ????
कोणतीही मंदी ही दीर्घकाळ नसते. त्यावर चलन अवमुल्यन, चलन फुगवटा इ. तात्पुरते इलाज केले जातात. त्यामुळे कोणतेही सरकार आपल्या कडील राखीव पैशातून सैन्य काही काळापुरते तरी व्यवस्थित चालवू शकते.
तसेच माझ्या लेखाचा थोडक्यात आशय असा की १) संधी जेव्हा एक दरवाजा बंद करते तेव्हा दुसरा दरवाजा उघडते. मात्र मंदीच्या नावाने रडत न बसता तो दुसरा दरवाजा स्वीकारण्याची आपली तयारी हवी. आता इथेच पहा. इतके आयटीत नोकरी करणारे इथे असतील. पण त्यापैकी उद्या आपली नोकरी गेली तर हा पर्याय स्वीकार करावासा वाटेल? किती जणांनी त्याबद्दल मत व्यक्त केले? २) दुसरे म्हणजे प्रत्येक आपत्ती ही अनिष्ट असतेच असे नाही. काही संकटे निभवून न्यायला कठिण असतात पण त्यांचे परिणाम चांगले पण होऊ शकतात. ३) एकासाठी संकट हे दुसर्यासाठी सुवर्णसंधी पण असू शकते.
मी आता साठीला आलेला म्हातारा आहे नाहीतर मीच सैन्यात जाण्याचा विचार केला असता. मंदीच्या नावाने गळे नसते काढले. विठ्ठल कामतांसारखे, पैसे गेले की
निराश न होता ट्रॉल्या गोळा करणे हाच चांगला उपाय.
31 Dec 2008 - 8:38 pm | सखाराम_गटणे™
सैन्यातील अटींमध्ये बरेचसे आय टी वाले बसणार नाहीत. मी तरी नाही.
>>>संधी जेव्हा एक दरवाजा बंद करते तेव्हा दुसरा दरवाजा उघडते.
मान्य
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 8:57 pm | गुळांबा
सैन्यातील अटींमध्ये बरेचसे आय टी वाले बसणार नाहीत. मी तरी नाही.
ही पळवाट फारच सोपी आहे. लक्षातच आली नव्हती. बाकी अटी ह्या कठिणच असतात, त्यात आपण बसायचे असते, अटी आपल्यासाठी सोप्या करत नसते कोणी. तसे असेल तर त्याला अटी न म्हणता सवलती नाही का म्हटले असते?
25 Dec 2008 - 7:39 am | दवबिन्दु
वजन फकतं ४८ किलो आहे मला जाता येयील का लष्करात? कोनितरी सांगल का?
26 Dec 2008 - 12:14 pm | मेथांबा
केळ्याला तुप लावून व पोळीला मेथांबा लावून खा आणि ॐ बलभीमाय नम: म्हणून रोज १०० जोर-बैठका काढा. वजन पहिल्या महिन्यात १० किलोने वाढेल. नाही वाढले तर नशीबाला दोष द्या.
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
25 Dec 2008 - 1:58 pm | shweta
हे काहि खरं नाहिये.
मंदि वैगरे काहि येणार नाहि. जे क्ववालिफाइड लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि.
फक्त पगार वाढ आधी होत होती तेवढि होणार नाहि.
मी म्हणते सर्व पुरुषांनी स्वत: हुन ३-४ वर्ष सैन्यात भरती होउन देश सेवा करायला काय हरकत आहे ?
मिसळ पाव वरील काहि लोकांनी तरी सैन्यात भरती होणे जरुरीचे आहे ! :)
25 Dec 2008 - 2:03 pm | अवलिया
मंदि वैगरे काहि येणार नाहि
वा वा वा
किती बरे वाटले मला हे वाचुन.... गेल्या कित्येक दिवसांत डोळ्याला डोळा लागत नव्हता.
आज छान झोप लागेल (कायमची)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
25 Dec 2008 - 2:28 pm | मनिष
=))
पुर्वी गल्ल्याबोळात क्रिकेट्तज्ञ होते, कोणीही बसून सचिनला सल्ला द्यायचे, तसे आता अर्थतज्ञ झाले आहेत.
25 Dec 2008 - 3:52 pm | कुंदन
>>मंदि वैगरे काहि येणार नाहि
मंदि येणार तर आहेच , म्हणुन -१
>>क्ववालिफाइड लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि
यात थोडा बदल करुन ... +१
क्ववालिफाइड आणि इफिशियंट लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि
25 Dec 2008 - 6:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
क्ववालिफाइड आणि इफिशियंट लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि
कंपनी बुडली नाही तर.... ;-)
25 Dec 2008 - 6:44 pm | कुंदन
एक बुडाली तर दुसरी , दुसरी बुडाली तर तिसरी.......
25 Dec 2008 - 6:46 pm | अवलिया
बुडवा ... बुडवा... अख्खे जग बुडवा
अरे कोण आहे तिकडे ऽऽऽ
जरा यालाच बुडवा
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
31 Dec 2008 - 8:42 pm | गुळांबा
मिसळ पाव वरील काहि लोकांनी तरी सैन्यात भरती होणे जरुरीचे आहे !
अहो गरजतील ते पडतील काय? इथे पाकिस्थान नष्ट करा, त्याचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाका म्हणणे सोपे आहे हो पण प्रत्यक्षात मिपावरील किती टक्के तरुण / तरुणी शारीरिक कष्ट घेऊन, परीक्षा देऊन सैन्यात जायला तयार आहेत? ही काय चकाट्या पिटण्याची नोकरी नव्हे. किती जणांना सीडीएसई हा शब्द माहित आहे?
31 Dec 2008 - 8:54 pm | सखाराम_गटणे™
देशसेवा काय सैन्यातच जाउन करता येते काय?
एक चांगले नागरीक होणे म्हणजे सुदधा जवळपास देशसेवाच आहे. आय टी मध्ये भरपुर परकीय चलन देशाला मिळते. हा सुदधा देशाचा फायदा नाही काय?
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 9:09 pm | गुळांबा
आय टी मध्ये भरपुर परकीय चलन देशाला मिळते. हा सुदधा देशाचा फायदा नाही काय?
पण सैन्यात काम करण्यात आंतरिक समाधान आहे. तिथे कोणी स्वत: बद्दल हमाल, मजुर, वेठबिगार असे शब्द वापरत नाही. असो. तुलना हा ह्या लेखाचा हेतु नाही. प्रत्येकच काम श्रेष्ठ आहे. पण मुलांनो मंदी आली म्हणून घाबरून न जाता इतर मार्ग शोधा.
31 Dec 2008 - 8:56 pm | सखाराम_गटणे™
>>>मी म्हणते सर्व पुरुषांनी स्वत: हुन ३-४ वर्ष सैन्यात भरती होउन देश सेवा करायला काय हरकत आहे ?
सर्व पुरुष जर सैन्यात गेले तर, सरकार तेवढे सैन्य ठेवु शकते का?
आणि जे
कामे स्त्रीया करु शकत नाहीत
अशी कामे कोण करणार?
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 9:15 pm | गुळांबा
सर्व पुरुष जर सैन्यात गेले तर, सरकार तेवढे सैन्य ठेवु शकते का?
नक्कीच नाही. पण म्हणूनच सर्वांनी न जाता किमान अतिशिक्षित तरुणांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी जायचा तरी विचार केला पाहिजे.
आणि जे कामे स्त्रीया करु शकत नाहीत अशी कामे कोण करणार?
अशी कामे नक्की कोणती?
31 Dec 2008 - 9:22 pm | सखाराम_गटणे™
>>अशी कामे नक्की कोणती?
कोणतीही जी स्त्रीया करु शकत नाहीत.
आणि बाहेर आजकाल स्त्रीया पेक्षा पुरुषच जास्त काम करतात. अजुन हाउस हझबंड ची कल्पना आली नाही भारतात तरी.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
25 Dec 2008 - 4:42 pm | आकाशी नीळा
क्ववालिफाइड आणि इफिशियंट लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि
अगदी मनातल बोललात..
31 Dec 2008 - 8:50 pm | गुळांबा
क्ववालिफाइड आणि इफिशियंट लोकं आहेत त्यांच्या जॉब ला कोणी हात लावणार नाहि
सत्यम कडे पहा, वेळ आली की कोणाचीही गच्छंती अटळ आहे. तज्ज्ञ, कसबी, धूर्त
अश्या संचालकांना नारळ देण्यात आला. एक प्रसिद्ध वचन आहे - Love your working skill and not the company where you work because you don't know when company stops loving you.
आपले काम करण्याचे कौशल्य छान आहे म्हणून आपल्याला कोणी काढणार नाही असे म्हणणे मूर्खांच्या नंदनवनात राहणे आहे.
26 Dec 2008 - 11:31 am | shweta
नुसतं मंदि -मंदि म्हणुन रडत बसण्या पेक्षा काहितरी उपयोगी करा...
आय टि प्रोफेशनल्स ना जास्त पगार मिळतो म्हणुन जर कोणी नाराज असेल आणि ती जळ जळ ओकण्या साठि "मिसळपाव" चालवत असतील तर आपण काहि करु शकत नाहि.
माझ्या मते मिसळपाव वरील ९० टक्के लोकं हे आय टि प्रोफेशनल्स असतील. तरी सगळे काहि का लिहित नाहित. लोकं आय टि वाल्यांना उगाचच शिव्या घालताहेत आणि सगळे शांत पणे हो.. हो करताहेत ?
आय टि वाले नसते तर मिसळपाव डॉट कॉम कुठे असते ?
विसोबा खेचर यांनी उत्तर द्दावे.
26 Dec 2008 - 11:42 am | अवलिया
सहमत
खरेच विसोबा खेचर कुठे आहात? उत्तर द्याच आता मिसळपाव कुठे असते?
बाकी श्वेताताई, The Secret Codes of the Universe A Practical Guide for the New Age चा मंदी टाळायला उपयोग होवु शकतो का याचा मी विचार करत आहे. आपले काय म्हणणे आहे ? कि अशा क्षुल्लक गोष्टींसाठी ते वापरु नये. आपला काय सल्ला?
(अरे कोण तिकडे देवनागरी देवनागरी ओरडतोय... नवीन आहेत.. बदलतील देवनागरीमधे आपले नाव... नवीन माणसांवर काय एकदम धावायचे?)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Dec 2008 - 12:18 pm | मेथांबा
अंतर्गत कलहात आपण पडत नसतो, आपण फक्त लांब राहून मजा बघतो,
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
26 Dec 2008 - 12:20 pm | आम्हाघरीधन
आय टि प्रोफेशनल्स ना जास्त पगार मिळतो म्हणुन जर कोणी नाराज असेल आणि ती जळ जळ ओकण्या साठि "मिसळपाव" चालवत असतील तर आपण काहि करु शकत नाहि.
अहो श्वेता ताई आहात कुठे......?
कोण म्हणते नोन आय टी वाल्यान्ना आमच्या पेक्षा जास्त पगार नाहीये....... आय टी वाल्यान्चे 'नाव मोठे आणी पगार छोटे' अशी नवीन म्हण लागु करावी लागेल आता.
आमच्या पेक्षा जास्त पगार जवळ पास सर्वच क्षेत्रातील लोक आता मिळवु लागली आहेत पण सर्वान्चे लक्ष मात्र फक्त आमच्या कडेच का असते याचे कोडे अजुन उलगडत नाही....
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.