ठाणे ' मिपा ' कट्टा (४)

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट
24 Dec 2008 - 7:23 pm
गाभा: 

नमस्कार,
आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मिपा कट्ट्याचे नक्की केले आहे.
स्थळ :
'लक्ष्मी केशव कार्यालय'
प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.)

सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती .
कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल.
मेनू :
सायं. ५.०० पासून मंडळींनी जमवयास सुरूवात करावी.
प्रथम भजी ( कांदा,बटाटा, मूग, मेथी ) आणि चहा.
आणि रात्रौ ७.३० नंतर भोजन :
मिसळ पाव ; मटण , भाकरी ; भात ; दही ; ताक ; कांदा ;टमाटो वगैरे.

आता या दोन्ही कार्यक्रमांच्या मधे काय करायचे ते त्याच वेळी ठरवू.
येण्याचे नक्की करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

संतोष जोशी ९८२०० ६२१३३
तात्या अभ्यंकर ९८२०४ ९४७२०

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्रतिक्रिया

शेणगोळा's picture

25 Dec 2008 - 12:52 am | शेणगोळा

मेनू छानच आहे, नक्की येण्याचा प्रयत्न करणार.

तात्याला फोन करून कन्फर्मेशन देतो.

इतर कोण कोण सभासद येणारेत ते समजेल का?

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

पिवळा डांबिस's picture

25 Dec 2008 - 1:54 am | पिवळा डांबिस

थोडी मूगभजी इथे पार्सल करा....

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 7:59 am | विसोबा खेचर

अरे कोण कोण मंडळी नक्की येणारेत ते लौकर कळवा रे!

सुचेल तसं's picture

25 Dec 2008 - 9:44 am | सुचेल तसं

पण कोणत्या तारखेला???

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

व्यंकु's picture

25 Dec 2008 - 9:57 am | व्यंकु

माझ्याकडून कट्ट्याला हार्दीक शुभेच्छा

देवदत्त's picture

25 Dec 2008 - 10:19 am | देवदत्त

रवि २८ डिसें. ला आहे ना?

सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती .
मेनू :
सायं. ५.०० पासून मंडळींनी जमवयास सुरूवात करावी.

हे काही समजले नाही. :?

वेळ ४ करा रे :)

संध्याकाळी ४/ ४:३० ला येईन, किती वाजेपर्यंत असेन ते नक्की नाही.

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 11:22 am | विसोबा खेचर

हो, येत्या २८ च्या रविवारी आहे...

shweta's picture

25 Dec 2008 - 2:03 pm | shweta

हा काय प्रकार आहे ?

ठाण्यात तुम्ही दर रविवारी भेटता का ?

गणेशराव's picture

26 Dec 2008 - 8:22 am | गणेशराव

सर्व खादाड आडवा हात मारण्यास तयार व्हा.

shweta's picture

26 Dec 2008 - 11:22 am | shweta

जमलं तर मी हि तुमच्या ग्रुप मधे सामील होण्याचा प्रयत्न करीन.

जयेश माधव's picture

26 Dec 2008 - 6:40 pm | जयेश माधव

साहेब,तारीख कोण कळविणार?

जयेश माधव

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Dec 2008 - 10:51 am | श्रीयुत संतोष जोशी

दि. २८ डिसेंबर , २००८ ( रविवार ) दु. ४.०० नंतर पुढे ' नो लिमिट '

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

झकासराव's picture

26 Dec 2008 - 6:44 pm | झकासराव

कट्ट्याचा खादाडी बेत जंगी दिसतोय. :)
कट्ट्याला अनेकोत्तम शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विनायक प्रभू's picture

27 Dec 2008 - 11:18 am | विनायक प्रभू

मी , रामदास, विजुभाउ येणार बर का?

मदनबाण's picture

27 Dec 2008 - 1:55 pm | मदनबाण

मी पण येतोय... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

पॅपिलॉन's picture

29 Dec 2008 - 11:49 am | पॅपिलॉन

कट्ट्याचा वृत्तांत (फोटोसकट) कधी टाकणार?

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

विसोबा खेचर's picture

29 Dec 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर

काल खूप छान कट्टा झाला. लाईफमधल्या दोन घटका सुखाच्या गेल्या. सर्व कट्टेकरींना भेटून आनंद झाला. संतोष जोशींनीही अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली होती..

आपला,
(आनंदी) तात्या.

सुनील's picture

29 Dec 2008 - 2:39 pm | सुनील

सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

देवदत्त's picture

29 Dec 2008 - 7:19 pm | देवदत्त

मी ही पूर्ण सहमत.

इतके वेळा ऐकून असलेला मिपा चा कट्टा काल एकदाचा अनुभवला.

मस्त मजा आली.

(पुढील कट्ट्याच्या)(आणि सध्या वृतांत आणि छायाचित्रांच्या) प्रतिक्षेत)
-देवदत्त

वाहीदा's picture

29 Dec 2008 - 3:49 pm | वाहीदा

सगळे च म्स्त आहेत !
~ वाहीदा

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Dec 2008 - 1:32 am | बिपिन कार्यकर्ते

डिटेल्स टाक बरं!!!!

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

29 Dec 2008 - 3:53 pm | अनिल हटेला

ते सगळ ठीक आहे .
पण काय वॄत्तांत ,फोटो वगैरे टाका की ....
आम्ही काय-काय मीस करतोये ते तर कळेल...:-(

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धमाल मुलगा's picture

29 Dec 2008 - 3:58 pm | धमाल मुलगा

आयला, काय वो तात्या,
कट्टा लै भारी झाली...मजा आली....एव्हढ्यात संपलं का सगळं?
च्यायला, रामाची बायको शीता, तिला रावणानं पळवली, रावणाशी रामानं युध्द करुन त्याला ठार मारला आणि शीतेला सोडवून आणलं एव्ढ्यात रामायण संपतं का????
रामायण कसं असतं?
आटपाट आयोध्यानगरी होती, तिचा राजा दशरथ ह्याला तीन राण्या होत्या, पण मुलबाळ व्हत नव्हतं म्हणुन त्यानं पुत्रकामिष्टेका यज्ञ केला..............
इथुन चालु होतं...काय? बराबर बोल्लो का नाय?

सुनील's picture

29 Dec 2008 - 4:05 pm | सुनील

रामायण कसं असतं?
आटपाट आयोध्यानगरी होती, तिचा राजा दशरथ ह्याला तीन राण्या होत्या, पण मुलबाळ व्हत नव्हतं म्हणुन त्यानं पुत्रकामिष्टेका यज्ञ केला..............

१००%

अगदी राम काय खात होता, पीत होता, ते पण!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे's picture

29 Dec 2008 - 9:45 pm | संदीप चित्रे

१००%

विनायक प्रभू's picture

29 Dec 2008 - 3:54 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.

देवदत्त's picture

29 Dec 2008 - 7:07 pm | देवदत्त

अरे वा मास्तर,
+१०१ लगेच प्रतिक्रियेत आले :)

संकेतजी कळके's picture

29 Dec 2008 - 5:50 pm | संकेतजी कळके

लई भारी......... कट्टा झाला. झकास...

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Dec 2008 - 1:28 am | बिपिन कार्यकर्ते

च्यायला सगळे फोक्या ताणतायेत!!! जो पर्यंत वृत्तांत आणि फोटू येणार नाय तो पर्यंत आपण काय विश्वास ठेवणार नाय!!!!!!!!!!!!!!!!!! (ह.घ्या)

;)

बिपिन कार्यकर्ते

एकलव्य's picture

30 Dec 2008 - 5:51 am | एकलव्य

... खूप दिवसांनी भलतीच मजा आली.

चीअर्स - एकलव्य ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2008 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला नुस्ता ! कट्टा झकास झाला ! कट्टा झकास झाला !

अरे पण वृत्तांत टाका ना !

(कट्टा झकास झाला ! अशा प्रतिक्रिया आता उडवून लावेन..जळवायचे एखाद्याला पण किती ) :)