संशय आणि शंका

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in काथ्याकूट
24 Dec 2008 - 3:56 pm
गाभा: 

आपल्या पोलीस दलातील तीन आधिकार्‍यांच्या मृत्यूला कारणीभूत दहशतवादीच आहेत की आणखी कुणी असा संशय श्री. अंतुले यांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती सोडल्यास प्रत्येक व्यक्ति ही संशयाच्या वर्तूळातच असते या प्रचलित सिद्धांतास अनुसरूनच श्री. अंतुले यांचे विधान असल्याने त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
परंतू यानंतर आता अजूनही काही शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात.
उदाहरणार्थ - अतिरेक्यांनी रेल्वेस्थानकात सामान्य व्यक्तिंवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी कामा हॉस्पीटल पाशी पोलीस आधिकार्‍यांवर हल्ला केला. ताज व इतर हॉटेलांत त्यांनी उद्योगपती / विदेशी नागरिक यांच्यावर हल्ला केला. नरिमन हाउस येथे वास्तव्य करुन असलेल्या ज्यू नागरिकांवर हल्ला केला. रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांवर हल्ला केला. कारवाई सुरू झाल्यावर त्याचे चित्रीकरण करणार्‍या पत्रकार / छायाचित्रकारांनाही सोडले नाही.

पण ?

त्यांनी एकाही नेत्यावर हल्ला का केला नाही???

(खरे तर अतिरेक्यांनी एकाही राजकारण्याला लक्ष्य केले नाही एवढे एकच कारण त्यांना फासावर लटकवण्यासाठी पुरेसे आहे) त्यांनी असे केले नाही कारण त्यांना राजकारणी लोकांची छुपी मदत मिळत असण्याची शक्यता आहे. अथवा त्यांनी भारताच्या परिस्थितीचा थोडा फार अभ्यास केला असेल तर त्यांना ही खात्री नक्कीच असणार की शंभर अतिरेकी भारताचे जेवढे नुकसान करू शकतील त्याहून आधिक विध्वंस भारतातील एकेकटा राजकारणी करत असतो. तेव्हा अशा राजकारण्यांना संपवून भारताचे उगाच भले कशाला करा? असाही दूरचा विचार अतिरेक्यांनी केला असावा.

अंतुलेंपासून स्फुर्ती घेऊन आपणही अशाच अनेकानेक शंका व्यक्त करुयात.

प्रतिक्रिया

सुनील's picture

24 Dec 2008 - 4:05 pm | सुनील

अंतुलेंपासून स्फुर्ती घेऊन
स्फूर्ती घेण्यासाठी तुम्हाला अंतुलेच सापडावेत ना!!

आपणही अशाच अनेकानेक शंका व्यक्त करुयात
चेतन महाशय, ह्या विशिष्ट प्रकरणी, अशा अनेकानेक शंका व्यक्त करणे हे अफवा पसरण्याएवढेच घातक ठरू शकेल.

चौकशी पूर्ण होऊद्यात, मग काय करायचे ते करू.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगी९००'s picture

24 Dec 2008 - 4:41 pm | योगी९००

कारण त्यांना राजकारणी लोकांची छुपी मदत मिळत असण्याची शक्यता आहे
नारायण राणेही हेच म्हणाले. पण पुरावा काय ? आहो इतका सढळ पुरावा असून् सुद्धा पाकिस्तान मानत नाही. मग आपले राजकारणी नुसत्या आरोपांनी मानणार आहेत काय?

आपण अंतूले नाही आहोत.

खादाडमाऊ

shweta's picture

25 Dec 2008 - 2:23 pm | shweta

मला हि असच वाटत आहे कि त्या अतिरेक्यांना कोणी तरी मदत केली असेल.