व्हिस्की मौलाना !!!!

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
10 Sep 2024 - 7:04 pm
गाभा: 

"मित्र म्हणे" या यु ट्यूब माध्यमावर सौमित्र पोटे विविध क्षेत्रातील रोचक काम केलेलया लोकांन बरोबर . त्यातील भारतीय गुप्तहेर श्री जयंत उमराणीकर यांची हि मुलाखत आवर्जून पहा .... मोठी आहे आणि सर्वसामान्याला सर्वात कुतूहल असणारऱ्या रिसर्च अँनॅलिसिस विंग आणि इंटेलिजन्स ब्युरो बद्दल आहे
उमराणीकरणानी ना सांगून हि खूप काही सांगितले आहे

त्यान्चे यातील सर्वात लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "पाकिस्तनी माणसे व्यक्तिगत पातळीवर " भारतीयांशी आपुलकीने वागतात पण एकत्र / समूह आणि समाज म्हणून आले कि द्वेषाने वागतात "

https://www.youtube.com/watch?v=3Ph3jlfGn8I

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

11 Sep 2024 - 1:16 pm | कर्नलतपस्वी

चित्रफित शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

एक अतिशय वरिष्ठ पातळीवरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व्यक्तीने संयमित व माहितीपूर्ण दिलेला साक्षात्कार व तितक्याच ताकदीने सौमित्र यांनी प्रस्तूत केला आहे. आवर्जून बघण्यासारखा आहे.

फॅक्ट आणी फिक्शन मधला फरक अतिशय सुंदर व सोप्या भाषेत सांगीतला. काहींचे पोवाडे गायले जातात तर काही अनसंग हिरो. गुप्तचर हे मोलाची कामगिरी बजावत असतात पण नेहमीच मिस्टर इंडिया सारखे इनव्हिजीबल असतात. एक कडक सॅल्युट त्यांच्या कार्याला.

काही आठवणी जागृत झाल्या. जमीन समतल झाली तेव्हां मी लखनौलाच होतो. ॲम्युनिशन डंम्प ब्लास्ट सुद्धा आठवतो. ब्ल्यू स्टार ची पण आठवण झाली.

साक्षात्कार ऐकताना एक गाणे आठवले...
गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा.

मी बरेच वर्ष मराठी वाचत आहे पण कधी कधी काही वाक्यप्रयोग मला अचंबित करुन जातात. आपणाला अजून आपलीच मातृभाषा कळत नाहिये याचे दु:ख होते.


जमीन समतल झाली तेव्हां मी लखनौलाच होतो.


ह्या वाक्याचा अर्थ मला अनेकदा वाचून देखील लागला नाही. नक्की काय म्हणायचे आहे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Sep 2024 - 4:34 pm | अमरेंद्र बाहुबली

मलाही लागला नाही. मला वाटतं आणीबाणीचा इंदिरा गांधी हत्येचा संबंधक असावा? राजीव गांधींचे वक्तव्य. “जब बडा पेड गिरता….

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 4:45 pm | कर्नलतपस्वी

समजदार को इशारा काफी.

चावटमेला's picture

16 Sep 2024 - 9:15 pm | चावटमेला

बाबरी मशिद जमिनदोस्त केली तो सन्दर्भ असावा. वाजपेयी त्यांच्या प्रसिध्द भाषणात म्हणाले होते की 'जमीन को समतल बनाना पडेगा'

चौकस२१२'s picture

11 Sep 2024 - 3:24 pm | चौकस२१२

या मुलाखतीत अनेकांचं मनात असलेला एक प्रश्न विचारला गेलला होता " भारतावर पाकिस्तान सरळ आणि छुप्या पद्धतीने इतके हल्ले करते पण भारत नेहमी संयम का राखतो , काही करीत नाही असे का दिसते" असे जनतेला वाटते आणि नैराश्य येते राग येतो ...

यावर त्यांनी "गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा." अश्या पद्धतीने भारत काम करते अश्या पद्धतीनेच उत्तर दिले आहे,
पण ते ऐकून सुद्धा समाधान झाले नाही असे चरोटा म्हणून माळ वाटले
पण जसे इस्राएल ने एन्टीबी किंवा जखमा ला अर्जेन्टिण मधून उचलून आणणे अश्या गोष्टी केलय आणि त्या जाहीर केल्या मग आपण का नाही "घुसेंगे भी और मारेंगे भी" ते पूर्वी पासून का नाही ? १९७१ वर्षी इंदिराजनी एकदा केले आणि मध्यंतरी मोदींनी .... पण असे वाटत एकी "आह मनोहर तरीही ..."

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Sep 2024 - 10:49 am | अमरेंद्र बाहुबली

संपूर्ण मुलाखत एकली. अतिशय माहितीपूर्ण.

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 2:33 pm | कर्नलतपस्वी

युद्ध पद्धती अतिशय गुंतागुंतीची व कुठली कधी वापरायची हे परिस्थिती व नेतृत्व यांच्यावर अवलंबून असते.

नेहमीच दारूगोळा वापरायाचा नसतो. इतर पातळीवर सुद्धा लढाई चालूच असते.

कंजूस's picture

15 Sep 2024 - 5:18 am | कंजूस

LOC असं काही नाव असलेलं पुस्तक आहे इंग्रजीत, मराठी अनुवादही आहे. हे आणि इतर बरीच पुस्तके या विषयावर आहेत. ती वाचल्यावर भारत पाकिस्तान संबंधांबद्दल कळतं. दुखऱ्या, सलणाऱ्या गोष्टी दोन्ही बाजूंना आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2024 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली

कुणी लिहिलय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Oct 2024 - 8:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

'रॉ'ची स्थापना ही पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी झाली होती असे वाचले होते. कॅनडात सध्या भारतिय दूतावास आणि गुप्तचरांची जी अवस्था झाली त्यावरुन त्याना चांगल्या ट्रेनिगची गरज आहे असे वाटते.