त्रांगडे

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
30 Aug 2024 - 5:34 am

त्रांगडे
थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे

इमर्जन्सी
नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून

१) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज
किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ .. एकूण गोचीच ( अर्थात प्रत्यक्षात इंदिराजनची चुकीची प्रतिमा असे काही तरी आरडाओरड केली जाईलच )
२) खलिस्तान वादि आणि त्यांचे छुपे समर्थ यात "सिखी " च्या विरुद्ध प्रोपोगांडा म्हणून बोम्ब मारणार ( कॅनडा मध्ये इंदिराजींच्य वरील हल्ल्याचे प्रतीक असलेली मिरवणूक काढली होती आठवत असेल तर )
३) ज्याना राजकीय इतिहासावर चित्रपट आवडतो ( आणि भारतीय राजकारणात तर भरपूर माल मसाला आहे ) त्यांचचे साठी तरी झलक पाहून असे वाटते कि इंदिराजींचं चंगलं आणि वाईट/ वादग्रस्त दोन्ही गोष्टी यात समतोल पणे दाखवलया असाव्यात

बाकी चित्रपट बघितल्या नंतर

प्रतिक्रिया

इंदिरा गांधी भारतीय राजकारणात शक्तीशाली नेत्या होत्याच.

त्यांच्या काळात दुसरा कुणीही नेता मोठा झाला नसता.
फक्त इमर्जन्सीवरच प्रकाशझोत टाकून चित्रपट येण्याअगोदर संपूर्ण चरित्रावर एखादा भाग यायला हवा. निर्मात्याला पैसे काय दोन्ही भागांतून मिळतीलच.

चौकस२१२'s picture

30 Aug 2024 - 7:21 am | चौकस२१२

फक्त इमर्जन्सीवरच
नाव जरी इमर्जन्सी असले तरी झलक वरून तरी असे वाटते कि संपूर्णे जीवनाचाच आढावा असावा बघुयात